अरे चालणे चालणे
सकाळचे ते चालणे
आधी पायला टोचणे
मग व्हावे चालणे...
चालणे चालणे
नाही कधी म्हणू नये
आळसाची लक्षणे
शरीर ते फुगणे
अरे चालणे चालणे
कमी कधी लेखू नये
तब्येत सांभाळणे
नीट होत असे....
अर्चना कुलकर्णी.
11/11/2025
अरे चालणे चालणे
सकाळचे ते चालणे
आधी पायला टोचणे
मग व्हावे चालणे...
चालणे चालणे
नाही कधी म्हणू नये
आळसाची लक्षणे
शरीर ते फुगणे
अरे चालणे चालणे
कमी कधी लेखू नये
तब्येत सांभाळणे
नीट होत असे....
अर्चना कुलकर्णी.
11/11/2025
प्रेमकथा 😄
(ऐन दिवाळीत व्हाट्सअप बंद पडले,
आणि घडली ही कथा )
दोघांची ओळख
फेसबुक वरची
विचार जुळतात वाटले
नंबर share केले,
चाट करता करता
दोघे हरवू लागले,
प्रत्यक्ष कधी भेटू
वाटू लागले दोघांना,
तो म्हणाला तिला
भेटू या आज लंचला
लाजून ती हो म्हणाली त्याला,
करू सुरुवात नव्या नात्याला
जवळच हॉटेल आहे
लोकेशन पाठवतो तुला,
पाठवले लोकेशन
मारली गाडीला किक,
सुसाट हाकली गाडी
पोचला अगदी क्विक,
तिचा काही पत्ता नाही
मेसेज केला त्याने चेक,
दिसली फक्त एक टिक
केले का मला ब्लॉक?,
उगाच लावली आशा
सोडून आलो मी टास्क,
ह्या मुलीचे काही खरे नाही
सरळ सांगायचे ना नाही....
तिथे ती ही उदास
हॉटेल चे नाव नाही बोलला
लोकेशन पाठवतो म्हणाला
अर्धा तास होऊन गेला
कुठे जावू शोधायला?
समजले हे जर कोणाला
हसतील सारेच मला,
आभासी जगातल्या
कोणावर विश्वास ठेवला,
पुनः पुनः मोबाईल
हाती घेऊन restart केला,
पण त्याचा मेसेज नाहीच आला...
मी करू फोन त्याला?
नको,समजले खरे रुप मला...
ब्रेकअपचा मेसेज केला
तोच त्याचा कॉल आला,
सारा प्रकार समजून आला
कोसले त्या झुक्याला,
क्षणात विसरली दुःखाला
भेटीचा योग जुळून आला!
अर्चना कुलकर्णी..
22/10/2022
माझ्या भावना लिहिते आहे...
आपली शक्ती
आपल्या हातात,
आपली भक्ती
आपल्या मनात,
सकाळी उठताच
करावे भूमातेला नमन,
पाणी पिऊन करावे
अनुलोम विलोम,
दीर्घ श्वसन थोडे
योग प्रकार सोपे,
न विसरता करावा
हास्य योग,
दोन्ही हातानी वाजवावी टाळी
आवाज भरून घ्यावा कानी,
स्मरण करून आराध्याचे
मी सुदृढ आहे हे घ्यावे मनी,
दिवस होईल मग प्रसन्न
जातील हे परीक्षेचे क्षण!
अर्चना कुलकर्णी. नाशिक
माझा तिच्या वर खूप विश्वास होता, प्रेम , आपुलकी सारे ही होते.ती देखील तसे च वागत होती, म्हणून तर नाते जपले जात होते.
पण अचानक माझ्यावर आघात झाला, दवाखाना ,हॉस्पिटल मागे लागले, भेटायला आलीच नाही.
तरी मी शांत होते, मग म्हणाली उद्या सकाळी 8 ला मला वेळ आहे,तेव्हा येते भेटायला.
ठीक म्हणून फोन बंद केला. दुसऱ्या दिवशी भेटायला आली, खाणे झाल्यावर म्हणाली , तुला पैसे लागणार असतील तर 8 दिवस आधी सांग सगळे FD त आहेत, पैशाची मदत करेन पण हॉस्पिटल किंवा नंतर माणसाची (मनुष्यबळ) मदत आम्ही नाही करू शकणार!
त्यानंतर 6 महिन्यात साधा फोन देखील नाही.
असे नाते जपणे शक्य आहे का ?
(एक नाते सोडले ह्या पोस्टवरन मी सोडलेले नाते आठवले )
#जनी_म्हणे_देवा
# मैत्र जीवाचे
#थंडर... माझे पिल्लू
#अर्चना कुलकर्णी...
थंडर माझे पिल्लू असे मी आता म्हणते पण तो घरात आणला माझ्या धाकट्या मुलाच्या आग्रहाखातर.. अगदी छोटू दोन महिन्याचे पिल्लू. मी तर घाबरत होते, आणि सांगितलं होते तेंव्हा की मी फक्त त्याचे जेवण बनवून देईन. बाकी सर्व तुम्ही करायचे. धाकटा नितीश बाळाचे करावे त्या प्रेमाने त्याचे शू शी पुसणे, त्याला योग्य वेळेस बाथरूम मध्ये नेणे, फिरायला घेऊन जाणे सर्व करत होता. अतिशय खेळकर...
गोंडस मुलं सगळ्यांनाच आवडतात.तसेच त्याचे झाले,त्यांचं रुसणं, घरभर धावणं, आपल्या जवळ लाड करून घ्यायला येणे हे सगळं मला आनंददायी वाटू लागले.मी बाहेर गेले की लगेचच त्याचे वाट बघणे सुरू, गच्चीवर येऊन बसायचा.
माझ्या स्कूटरचा आवाज ऐकला की धावत कौलवर येई. पडेल की काय असे वाटे. फार वेळ सगळे घराबाहेर असले की चिडायचा आणि मग चादरी ओढून काढ, सोफ्यावर उड्या, कुठे कागद फाड, अशा खोड्या सुरू...लहानाचा मोठा होत होता, आता आम्हाला उशीर झाला की एका कोपऱ्यात जावून बसे, हाक मारली तरी बघणार नाही. मग जवळ जावून लाड करावे, सॉरी म्हणावे, तेंव्हा भुंकून जणू विचारी का उशीर केलात, मी कंटाळलो ना!
अतिशय प्रेमळ स्वभावाचा होता. कधी कोणावर ओरडत नसे. परंतु कोणी अनोळखी आले की वास घेऊन बघेल, त्या व्यक्तीला गोल फेरी मारून त्यांच्या तोंडाकडे बघेल.. ती व्यक्ति हसली की त्याचे लाड करावे असे वाटे.जर शांत उभी असेल तर थंडर देखील जागेवर शांत जावून बसायचा.
24 जून त्याचा वाढदिवस आम्ही अगदी केक कापून साजरा करत असू...
लहान मुलांना थंडरशी खेळायला खूप आवडे, घरी येऊन खेळत त्याला ही मजा येई. एकदा एक दोन अडीच वर्षाचा मुलगा त्याच्या पाठीवर बसला व कान ओढले. तरी तो ओरडला नाही. मुलाला बाजूला केल्यावर हा त्याच्याजवळ जावून उभा राहीला.
इडली व icecream त्याचे प्रचंड आवडते पदार्थ... Weak point च म्हणा न.. आम्ही खाताना तो अगदी बघत राही, आमचे झाले की लगेच भुंकून त्याची मागणी.. Icecream तर चाटूनपुसून.
असा माझा थंडर चौदा वर्षे आमच्याकडे होता. दोन्ही मुलांइतके त्याच्यावर प्रेम केले.
शेवटचे आठ दिवस मात्र त्याला खूप त्रास झाला. डॉक्टर उपचार करत होते पण उपयोग झाला नाही.
दुर्दैवाने माझ्या थंडू 15/12/2021 रोजी दुःखद निधन झाले.
आज ही कोणी कुत्रा दिसला की त्याचेच नावं ओठावर येते.
अर्चना कुलकर्णी.
नाट्य छटा
किती दिवसांनी पाऊस उघडलाय आणि माझ्याच बागेत किती छान वाटतंय.
काय म्हणतोस गोकर्णा, स्वागत करतो आहेस, हलून डुलून... धन्यवाद बरं का,
लाल अन पांढरी जास्वन्द हसतात हळूच, गणपतीकडे का जायचंय तुम्हाला? नेते बरं तुम्हाला...
बारीकशी जुई ना तू, किती मंद सुवास पसरवते, परडीत तुला ही घेते. हो हो अगदी हळुवारपणे हं.
अगं तगर तू रुसू नकोस, गंध नसला तरी तुझी चांदणी आवडते मला, तू ही हवीस हो.
अबोली, तू तर बोलूच नकोस तरी माझे लक्ष आहे बरं तुझ्याकडे, पद्माने दिलेली निळी अबोली तू छोटीशीच असते का ग? की माझे प्रेम तुला कमी पडतंय 😄
अरे वाह, गंधराज चाफा ही फुललाय...
'रजनीगंधा फुल तुम्हारे' आले ग बाई बऱ्याच दिवसांनी....
गणेशवेल लाल फुलांनी लगडलाय,
चिनी गुलाब, ऑफिस टाइम किती रंगानी बहरून आलंय,
सोनटक्का कणीस आलंय,
वाह वाह पावसाने अगदी कमाल केलीय तुमच्यावर...
आणि तुम्ही सर्वांनी मला जो काही खजिना दिलाय न, दिल खुश हो गया!
इन बहारोमें अकेले ही घुमा करो 😄
जागर लेखणीचा साहित्य समूह आयोजित उपक्रम क्रमांक ४२
दिनांक - २४/७/२५
विषय - गटारी अमावस्या / दीप अमावस्या
शीर्षक - दीपपूजा
आली आषाढी अमावस्या
दिव्यांची करू आरास
उजळून जाती साऱ्या दिशा
शांतता लाभे मनास
देवासमोर रांगोळी सजली
मांडला चंदनी पाट
कणकेचे दीप करण्या
केला छान मोठा थाट
वाहिले हळदी कुंकू
दुर्वा, फुले, पान सुपारी
आरती म्हटली प्रेमाने
दिवा दूर सारे अंधारी,
दीप ज्योती नमोस्तुते
करू मनापासून प्रार्थना
कहाणी वाचून दिव्याची
करू रोज त्याची अर्चना.
अर्चना कुलकर्णी. नाशिक
-*आठोळी*
*विषय -विठू माऊली माझी*
वारकरी निघाले पंढरीस
वाट पाहती एकादशीची
गावकरी रंगले भक्तीत
नसे शुद्ध खाण्या पिण्याची!
आली जवळ ती पंढरी
ध्वज दिसे कळसावरी
दर्शनास अति व्याकुळ
विठू माऊली पाव तू सत्वरी
अर्चना कुलकर्णी. नाशिक.
साहित्य सीमा दिपोत्सव साहित्य समूह आयोजित उपक्रम
दि .30 जून 2025
विषय :विठू माऊली माझी
पुष्प आठवे
ओढ तुझी पांडुरंगा
मला लागली आहे
घेण्या दर्शन निघाले
पंढरपुरच्या वाटेला
कर कटावरी ठेवूनी
पुंडलिकासाठी उभा राहिला
पांडुरंग किर्तनात
वारकरी दंग झाला!
****
२८/६/२०२५...
आठोळी लेखन..
पुष्प 6वे
विषय ...विठू माऊली माझी..
विठू माऊली माझी
आस तिला भेटण्याची
आषाढीला एकादशीस
वारी निघे वारकऱ्यांची...
गावातून निघे दिंडी
दिंड्या जाती पंढरपुरी
विठू नामाचा जयघोष
मेळा भरे चंद्रभागेतीरी...
अर्चना कुलकर्णी, नाशिक.
दिनांक.29जून 2025.
पुष्प सातवे.
विषय...विठू माऊली माझी...
दिंडी निघाली आळंदीहून
ज्ञानदेव वारीत चाले
नामजप विठूमाऊलीचा
ज्ञानदेव , तुकोबा मुखे बोलें
माळ मी घातली तुळशीची
चाळ खुळखुळत चाललो
भाळ सजले अष्टगंधी
टाळ वाजवित निघालो!
अर्चना कुलकर्णी. नाशिक.
दिनांक.29जून 2025.
पुष्प सातवे.
विषय...विठू माऊली माझी...
दिंडी निघाली आळंदीहून
ज्ञानदेव वारीत चाले
नामजप विठूमाऊलीचा
ज्ञानदेव , तुकोबा मुखे बोलें
माळ मी घातली तुळशीची
चाळ खुळखुळत चाललो
भाळ सजले अष्टगंधी
टाळ वाजवित निघालो!
अर्चना कुलकर्णी. नाशिक.
शनिवार :-८/३/२०२५
विषय :- चित्र काव्य लेखन
शीर्षक :- आज की नारी
आजची महिला
शिकून झाली हुशार
नाही मुळी अबला
कामे करती सर्व वार,
बाहेर करे ती नोकरी
कधी शिक्षक तर कधी नर्स
पुढे येते ती हुशारीने
बनते शास्त्रज्ञ्, कधी एअर हॉस्टेस
कामं करते मोठ्या खुबीने,
मुलांची प्रेमळ आई
छान पदार्थ करून खायला देई
मुलांची कडक माता
अभ्यासाच्या मागे लागे..
अष्टभुजा देवीच ती
घरात बाहेर लक्ष ठेवी...
अर्चना कुलकर्णी
*शब्दरजनी साहित्य समूह पुणे*
*आयोजित भव्य राज्यस्तरीय उपक्रम कविता लेखन*
*दिनांक :- १८/०३/२०२५*
*विषय:- झोळी*
शीर्षक --झोळी...
येताना घेऊन येतो
ती रिकामी झोळी
निरागस बाल्य असता
मागे फक्त भरण्यास
पोटाची खळी,
जसा जसा मोठा होई
शिरे त्यात विकारांची जोडी
राग, द्वेष मनात येता
इर्ष्या ही त्यात मिसळे
खळी पोटाची बाजूस पडे
कुठून कसे जास्त मिळावे
ह्यास्तव धडपड घडे
विवेक कधी सुटू पाहे
हव्यास अन लालसेपोटी
सारे सारे मिळूनही
शेवटी माणसाची
झोळी रिकामीच राही!
अर्चना कुलकर्णी. नासिक
शब्दरजनी साहित्य समूह पुणे आयोजित भव्य राज्यस्तरीय उपक्रम कविता लेखन
गुरुवार :-२०/३/२०२५
विषय :- प्रश्नांची शिदोरी
काव्यप्रकार :- मुक्तछंद
शीर्षक :- पडणारे प्रश्न
रिकामा वेळ,
डोक्यात प्रश्नाच्या लडी
कोण मी?
कशी मी?
काय करते मी?
कसे वागते मी?
नक्की बरोबर की चूक?
सोबत काय येणार?
का अट्टाहास मी माझे
म्हणण्याचा?
काही घेऊन आले नाही,
काही नेता येणार नाही...
असे म्हणत प्रश्नांची
लडी सोडवायची,
मनास शांती देणार!
अर्चना कुलकर्णी... नासिक
*शब्दरजनी साहित्य समूह, पुणे आयोजित भव्य राज्यस्तरीय चित्र चारोळी लेखन उपक्रम*
दि. २२/०३/२०२५
विषय:- " चित्र चारोळी "
शीर्षक:- *" दुःख "*
सांगू कसे कोणाला
दुःख माझ्या मनीचे?
नाही कौले, नाही झाडें
नाही चारा, घर बांधू कशाचे?
-----------
कशी आहेस तू राणी?
विचारी छोटी चिमणी
आले तुझ्या माहेरून
कामं करून गेलीस तू थकून!
अर्चना कुलकर्णी. नासिक
अंगणातील पारिजातक फुलांची
श्रीहरीचरणी अपर्ण केली ओंजळ
साजिरा गोजिरा दिसे श्रीहरी
अन् घरात पसरला प्रसन्न दरवळ..
*२ अखंडित कल्याणकारी चारोळी व विविध उपक्रम क्रमांक १९९*. दि.१/१२/२५
*विषय.पंढरीचा पांडुरंग*
*चारोळी क्रमांक १*
*पंढरीचा पांडुरंग*
सखा माझा पांडुरंग
सांगते त्यास सुख दुःख
तोच होऊनिया माय तात
देतसे मज उमंग आनंद!
*चारोळी क्रमांक २*
}
जागर लेखणीचा समूह
हा तिरंगा माझा...
दिमाखात लहरतो
हा तिरंगा माझा
सूर्याप्रमाणे तळपतो
ताठ मानेने उभा
शब्द रजनी साहित्य समूह आयोजित उपक्रमासाठी काव्यलेखन
विषय : चित्रकाव्य
२६/०३/२०२५
आतुर
आहे नवतरुणी मी
आहे मी रूपवती
नाजूक हास्य फुलता गाली
म्हणती सारे सौंदर्यवती!
नाही कधी मी रुपगर्विता
अवचित तुला पाहता
नुरले माझी मी आता
स्वप्नी तुज मी आठविता
करुनी आज साज शृंगार
बांगड्या मृदू किणकीणती
गळ्यात सुंदर हार घालुनी
केसात शुभ्र गजरे रुणझुणती
आतुर होउन भेटीसाठी
बसले मी धबधब्या काठी
होई स्पर्श थंड तुषाराचा
येशील ना तू माझ्यासाठी?
अर्चना कुलकर्णी. नासिक
शब्द रजनी साहित्य समूह आयोजित भव्य उपक्रम
विषय-चित्र काव्य
रामभक्त...
करू या पूजन विष्णु अवताराचे
जन्मदिन असे हो रामरायचा
अगाध ज्याची लीला
एकवचनी असे तो राम
पितृआज्ञा मानून प्रमाण
वनवासाचा केला स्विकार
भक्त त्याचा
पवन सूत हनुमान
माता सीतेसाठी
सागर पार करी हनुमान
उड्डाणं करुनी
पोचे लंकास्थान
अशोकवनात हुडकी
सीता माईला
दाखवी प्रभु रामाचे निशान
लंका दहन करुनी
बोले जय श्रीराम,
हनुमंत म्हणे
माझ्या हृदयी झाले विराजमान!
अर्चना कुलकर्णी. नासिक
शब्दरजनी साहित्य समूह पुणे
आयोजित
भव्य राज्यस्तरीय उपक्रम मुक्त छंद काव्य लेखन
*वेचलेली फुले*
*बकुळ*
(मुक्त छंद कविता)
फारा दिवसांनी आले माहेरी
फिरायला निघाले सकाळच्या प्रहरी
पक्ष्यांचा किलबिलाट
फुलांचा सुगंध
प्रसन्न झाले माझे मन
तोच दिसले आवडीचे
बकुळ झाड....
सडा पाडून सभोवती
शांत होता उभा
वेचली बकुळफुले
ओंजळीत धरून वेचलेली फुले
घेतला भरून मंद सुवास,
तोवर आला हुंदक्याचा आवाज
आजूबाजूस पाहिले
कोणी ना नजरेस पडले
हळूच बकुळ झाड डोलले
माझ्याशी बोलू लागले
"खूप दिवसांनी आठवण आली?"
"नाही जमले यायला "
"दिवस पूर्वीचे सुंदर होते
जमायच्या तुम्ही साऱ्या
टपटप पडणारी फुले
होते कोणी डोळे भरून पहाणारे
फुले गोळा करण्यात
होत असे स्पर्धा
रंग नसला तरी
सुंगधाचा होता मला गर्व,
करून लांब लांब गजरे
माळून तुम्ही
तुमच्या लांबसडक वेणीवर
फिरताना
सुगंध पसरे दुरवर
आनंदी होई माझे मन,
सुकलो तरी विसावे पुस्तकात
सार्थक होई माझ्या जीवनाचे
आता ना लांब केस
नको कोणास गजरा,
पडलेला सडा
न वेचताच सुकून जातो,
माझा सुगंध मातीत मिळतो
जीवन आता नको झाले "
" नको असे रडूस
येतील पुनः छोट्या मुली,
आवडतील त्यांना सुगंधी फुले,"
"वेड्या आशेवरच जगतो आहे
उन्हापावसात बहरतो आहे,
सांग पुढील पिढीला
फुलांचे जीवन "
ओंजळीतली फुले
अलगद पिशवीत ठेवली
घरी येताच मंद सुवास घेत वेचलेली फुलं आता पुस्तकांत ठेवली...
अर्चना कुलकर्णी. नासिक
कित्ती फुलं रंगबिरंगी,
मीच तेवढी सावळी,
हिरमुसली ती बकुळी.....
कृष्ण म्हणे, "वेडे, तू तर भोळी,
भरभरून सुगंधा ल्याली,
मी घेता तुज जवळी....
तू मजसम बनली, सावळी !"
अर्चना.
शब्दरजनी साहित्यसमूह पुणे आयोजित
भव्यराज्यस्तरीय उपक्रम
हिंदी शायरी लेखन।
विषय, चित्र शायरी
दिनांक, 7/06/2025
शिकायत
इजाजत हो तो कह दूं
एक ही आरजू थी मेरी,
साथ जीवनभर रहे अब
शिकायत नही अब तेरी |
अर्चना कुलकर्णी. नाशिक
*शब्दरजनी साहित्य समूह पुणे*
*आयोजित भव्य राज्यस्तरीय उपक्रम मुक्तछंद काव्य लेखन
*विषय:- एक झाड सावलीचं*
🌷 *दिनांक:- ३/०७/२०२५* 🌷
एक झाड सावलीचं
माझ्या प्रेमळ आईचं
कायम आपुलकीने
बोलणारी,
हसून,बोलून
सगळ्यांना आपलेसे
करणारी,
मुलाच्या सुखाकारिता
देव भक्ती करणारी,
त्यांच्या आनंदाकरिता
सदा झाटणारी,
संकटाचा हसत हसत
सामना करणारी,
मुलींना स्वावलंबी
करण्यास सज्ज होणारी,
लग्न होऊन
गेलेल्या लेकीची
वाट बघणारी,
तिच्या सावलीत
आरामात जगणारी मी..
आज आई नाही
तरी तिच्या
झाडाची सावली
माझ्यासोबत आहे!
अर्चना कुलकर्णी. नाशिक.
उपक्रम क्रमांक..३१
दि.१४/६/२०२५
विषय.. रक्त दान श्रेष्ठ दान
शीर्षक.. दान
कोण्या एका देशात
राहात होता एक श्रीमंत
घर, बंगला, शेती वडी
होते सारे सारे काही
त्याच्यापाशी हो त्याच्यापाशी!
होती गाडी मोठी
नाव गाडीचे फरारी
किंमत त्याची काही लाखात
हो काही लाखात!
दिली त्याने जाहिरात
जाहिरात दिली त्याने
पेपरात हो पेपरात!
अमुक दिवशी, अमुक वेळी
अमुक स्थळी,
गाडी माझी प्रिय ती फरारी
पेट्रोल टाकून जाळणार
हो जाळणार!
लोकं म्हणती लागले
का ह्याला वेड?
धंदा चाललाय चान्गला
अन गाडी का जाळणार?
द्यावी ना कोणाला,
अथवा विकावी अन पैसा
द्यावा गरिबाला हो गरिबाला!
तो दिवस उगवला
सर्वांना वाटे जावे
आपण पहायला,
कोणा वाटे शिकवायला
गर्दी लागली की जमायला
हो जमायला!
आला धनिक
गाडी घेऊन
डोळ्याचे पारणें फिटले
कित्येकांचे
अशी लांब च लांब गाडी पाहून हो गाडी पाहून!
करती दाटी सारे जन
विनविती हात जोडून
नको रे असे वागूस
धनिक हसे जोरजोरात
हो जोरजोरात!
गाडीची किंमत कळते
मला सांगा तुमच्या
शरीराची किंमत किती?
नसले डोळे काय पाहाल?
नसले कान कसे ऐकाल?
विचारा एखाद्या अपंगाला
हो अपंगाला!
रक्त आहे तर जीवन आहे
जीवन आहे तोवर किंमत
गेल्या जीवाची ही ठेवावी किंमत
करावे अवयव दान
हो अवयव दान!
रक्तदान करावे नियमित
जरूरी भागवावी
आजारी माणसाची
रुग्ण देईल आशिष
जोडावे नाते माणसांशी
हो नाते माणुसकीशी!
लिहून ठेवावे मृत्यूपत्र
करावे अवयव दान
नेत्रदान देवुनी
सृष्टी पाहिलं कोणी
राहू जिवंत त्याद्वारे
मनी करावा हा निर्धार
हा निर्धार!
रक्तदान, अवयवदान
मोठ्या पुण्याचे काम
आहे तेंच श्रेष्ठदान
अमर होऊ त्या दानाने
हो त्या दानाने!
अर्चना कुलकर्णी. नाशिक
साहित्यसीमा दिपोत्सव साहित्य
समूह आयोजित उपक्रम
क्रमांक 28
दिनांक:-१०/६/२५
विषय:-शेल चारोळी
*श्वास*
मन कसे फुलले माझे
माझे आता नच उरले
घेते सदा तुझेच नाव
नाव श्वासातही कोरले!
अर्चना कुलकर्णी. नाशिक
*शब्दरजनी साहित्य समूह आयोजित भव्य राज्यस्तरीय उपक्रम चारोळी लेखन*
*दि २३/२/२५*
*विषय * *शपथ*
उन्हाचे चटके सोसून बहरायचे
शिकवण ह्या गुलमोहराची
संसारात दोघे मिळून फुलायचे
शपथ तुला ह्या कट्ट्यावरची!
अर्चना कुलकर्णी.
गुलमोहराच्या पायघड्या
प्रेमाच्या वाटेवर रंगल्या,
गप्पांच्या उत्सवात रंगून
स्वप्नमाला सोनसळीत खुलल्या!
चारोळी उपक्रम.
शीर्षक =
रक्तवर्णी पुष्प अर्पून
पूजा करिते तरुणी
मनोहर दृश्य ते पहात
उभी स्तब्ध सुंदर हरिणी!
अर्चना कुलकर्णी
साहित्यसीम दीपोत्सव साहित्य समुह आयोजित
उपक्रम क्रमांक..३१
दि.१४/६/२०२५
विषय.. रक्त दान श्रेष्ठ दान
शीर्षक.. दान
कोण्या एका देशात
राहात होता एक श्रीमंत
घर, बंगला, शेती वडी
होते सारे सारे काही
त्याच्यापाशी हो त्याच्यापाशी!
होती गाडी मोठी
नाव गाडीचे फरारी
किंमत त्याची काही लाखात
हो काही लाखात!
दिली त्याने जाहिरात
जाहिरात दिली त्याने
पेपरात हो पेपरात!
अमुक दिवशी, अमुक वेळी
अमुक स्थळी,
गाडी माझी प्रिय ती फरारी
पेट्रोल टाकून जाळणार
हो जाळणार!
लोकं म्हणती लागले
का ह्याला वेड?
धंदा चाललाय चान्गला
अन गाडी का जाळणार?
द्यावी ना कोणाला,
अथवा विकावी अन पैसा
द्यावा गरिबाला हो गरिबाला!
तो दिवस उगवला
सर्वांना वाटे जावे
आपण पहायला,
कोणा वाटे शिकवायला
गर्दी लागली की जमायला
हो जमायला!
आला धनिक
गाडी घेऊन
डोळ्याचे पारणें फिटले
कित्येकांचे
अशी लांब च लांब गाडी पाहून हो गाडी पाहून!
करती दाटी सारे जन
विनविती हात जोडून
नको रे असे वागूस
धनिक हसे जोरजोरात
हो जोरजोरात!
गाडीची किंमत कळते
मला सांगा तुमच्या
शरीराची किंमत किती?
नसले डोळे काय पाहाल?
नसले कान कसे ऐकाल?
विचारा एखाद्या अपंगाला
हो अपंगाला!
रक्त आहे तर जीवन आहे
जीवन आहे तोवर किंमत
गेल्या जीवाची ही ठेवावी किंमत
करावे अवयव दान
हो अवयव दान!
रक्तदान करावे नियमित
जरूरी भागवावी
आजारी माणसाची
रुग्ण देईल आशिष
जोडावे नाते माणसांशी
हो नाते माणुसकीशी!
लिहून ठेवावे मृत्यूपत्र
करावे अवयव दान
नेत्रदान देवुनी
सृष्टी पाहिलं कोणी
राहू जिवंत त्याद्वारे
मनी करावा हा निर्धार
हा निर्धार!
रक्तदान, अवयवदान
मोठ्या पुण्याचे काम
आहे तेंच श्रेष्ठदान
अमर होऊ त्या दानाने
हो त्या दानाने!
अर्चना कुलकर्णी. नाशिक
साहित्य दर्पण मंच नागपूर
आयोजित उपक्रम
उपक्रमःक्रः४१८
दिनांक १४.६.२०२५
विषयः पंढरीची वारी..
पंढरीची वारी
वाटे जाते माहेरी
दुमदुमते पंढरी
विठ्ठलाच्या दारी,
चंद्रभागेकाठी
उभा विटेवरी
पुंडलिकासाठी
येती वारकरी,
भजन म्हणती
नाम विठू घेती
कीर्तन करती
असे प्रेमभक्ती,
जगाची माऊली
असते साथीला
प्रेमाची सावली
राहो आधाराला
आषाढी वारीला
निघाली मी जनी
दिसावी पंढरी
आस माझ्या
अर्चना कुलकर्णी. नाशिक
साहित्य दर्पण कला मंच नागपूर आयोजित काव्य लेखन उपक्रम उपक्रम क्रमांक:४०१
दिनांक:८मे २०२५
विषय:तुझा खळ खळ हसरा चेहरा
तुझा कॉलेजचा पहिला दिवस,
मी रेंगाळत होतो गेटवर
दिसला तुझा खळ खळ हसरा चेहरा
आनंद पसरला माझ्या चेहऱ्यावर!
आता रोज दिसतेस मला,
कधी होईल आपली भेट
चित्त नसते कधी थाऱ्यावर
बोलता येईल कधी थेट!
हसऱ्या तुझ्या गालावर,
पडते छान गोड खळी,
हसणे खट्याळ तुझे ,
ज्याने खुलते माझी कळी!
अगं,गुंतलाय जीव माझा
तुझ्या कुरळ्या केसात
गालावरच्या गोड खळ्यात
खळखळ तुझ्या हसण्यात!
समजतील का कधी तुला?
माझ्या मनीच्या भावना
अर्चना कुलकर्णी. नासिक
स्पर्धा क्रमांक 161
दिनांक 7=5= 25
विषय ऑपरेशन सिन्दुर
पहलगामी झाला दहशतवादी हल्ला
केले ऑपेरेशन सिंदूर
शांत तयाने हिंदू महिला
2) बदला
अतिरेक्यानी घेतले निरपराध बळी
धर्म विचारून घातला घाला
सैन्याने घेतला निर्णय योग्य वेळी
ऑपरेशन सिंदूरने भारत घेतो बदला!
अर्चना कुलकर्णी. नासिक
साहित्य दर्पण कला मंच नागपूर आयोजित काव्य लेखन उपक्रम उपक्रम क्रमांक:४०१
दिनांक:८मे २०२५
विषय:तुझा खळ खळ हसरा चेहरा
तुझा कॉलेजचा पहिला दिवस,
मी रेंगाळत होतो गेटवर
दिसला तुझा खळ खळ हसरा चेहरा
आनंद पसरला माझ्या चेहऱ्यावर!
आता रोज दिसतेस मला,
कधी होईल आपली भेट
चित्त नसते कधी थाऱ्यावर
बोलता येईल कधी थेट!
हसऱ्या तुझ्या गालावर,
पडते छान गोड खळी,
हसणे खट्याळ तुझे ,
ज्याने खुलते माझी कळी!
अगं,गुंतलाय जीव माझा
तुझ्या कुरळ्या केसात
गालावरच्या गोड खळ्यात
खळखळ तुझ्या हसण्यात!
समजतील का कधी तुला?
माझ्या मनीच्या भावना
अर्चना कुलकर्णी. नासिक
*अखंडित कल्याणकारी चारोळी व विविध उपक्रम
*चारोळी लेखन*
*समजून घे ना जरा*
*चारोळी क्र ०१*
*मूक संमती*
पहिला पाऊस येताच
मला भिजायची हौस असते
समजून घे ना मला जरा
त्यात आयुष्याची ख़ुशी मिळते .
*चारोळी क्रं ०२*
*प्रीत*
प्रेम केले मी तुझ्यावर
प्रीत तुझ्यावर जडली
समजून घे ना जरा मला
माझी काय चूक घडली...
*चारोळी क्र ०३*
*आयुष्य*
सोपे होते सरळ साधे जगणे
पण अचानक तुझा चढला पारा
मीदेखील रुसून बसले
समजून घे ना मला जरा
अर्चना कुलकर्णी. नाशिक
२ अखंडित कल्याणकारी चारोळी व विविध उपक्रम समूह आयोजित
स्पर्धा क्रमांक१५६
दिनांक.. १४ ते १६ एप्रिल२०२५
विषय
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
चारोळी क्रमांक १
शीर्षक.. सादर नमन
विश्वरत्न बाबासाहेब
भारतीय घटनेचे शिल्पकार
गोरगरिबांसाठी अहोरात्र झिजले
नमन करते त्यांना त्रिवार..
चारोळी क्रमांक दोन
शीर्षक.. कर्तव्य
स्मरण महामानवाचे
नित्य साऱ्यांनी करावे,
घटनेच्या अधिकारासोबत
कर्तव्याचे भान असावे!
अर्चना कुलकर्णी. नासिक.
चित्रकाव्य...
वाह वाह अंतरजाल
हवे ते मिळे एका क्षणात
अहो, झाले ते मोहजाल
बाल्य संपते त्या नादात,
मुलांना लागली ओढ
पालकदेखील म्हणतात
जरूरी ही विज्ञानयुगाची,
त्याचे तोटे कुठे जाणतात!
सगळे क्लिकवर मिळते
मग हात पाय का हलवावे?
डोळ्यावरचा चष्मा सांभाळत
एका जागी बसून रहावे,
पायात पडती जरी बेड्या
कोणा कशा कळाव्या?
अदृश्य बेड्या बुद्धीला
त्या ज्याच्या त्यांनी जाणाव्या!
चित्रकार फार हुशार
वास्तव त्याने मांडले
झाडून सारी जळमटे
प्रप्र कवीनी कवितेतून साकारले!
अर्चना कुलकर्णी. नासिक.
मैत्री
निरागस मैत्री
बालपणीची मनात जोपासत
खुदकन हसत
मिरवते!
मैत्री तरुपणातील
कधी गहिरे बंधन
कधी आश्वासन
जपायची!
मैत्रीचा कट्टा
हास्याचा उडे धबधबा
प्रेमाचा धाबा
भरतसे!
मैत्री विश्वासाची
सदा साथ देण्याची
अतूट बंधनाची
कायमची!
मैत्री प्रवासातली
दोन क्षण सोबतीची
ती सुखाची
वाटतसे!
अर्चना कुलकर्णी...
(प्रयत्न करते तोवर ही बरोबर आहे का सांगाल? )
सापडला तांदूळ दाणा
घेऊन चालले तुरुतुरु
सोबतीला शोधू कुणा?
पाऊस येतोय भुरभुरू
भेटली एकदाची सखी
सोबतीने जावू दोघी
भात करू,खीर करू
पोटभर खाऊन मजा करू!
अर्चना कुलकर्णी
हे गजानना,
वर्षारंभी नमू तुजला
आनंदाने वर्ष भरू दे
करा स्वीकार प्रार्थनेचा!
दुर्वांकुरांचा घालुनी हार
फुले वाहतो कमळाची
पूजा करितो हर्षभराने
होईल इच्छापूर्ती तव आशिषाने!
अर्चना कुलकर्णी
बालगीत...
असे का ग आई?
मला सांगशील का?
खेळ खेळताना
वेळ पटकन पळतो,
अभ्यासाच्या वेळेस
मात्र हळूहळू धावतो,
दिवस आणि रात्र
सूर्य,चंद्र सांगती
आणि वेळेचा मंत्र
घड्याळं गुणगुणती!
त्यांना कसे सारे
हे सारे वेळेवर जमते!
घड्याळाचा होतोय
मला खूपच त्रास,
घड्याळं सारी मी लपवली,
तरी समजेल का
अभ्यासाचा तास
अन खेळायची वेळ?
हे ग काय, उत्तरं दे ना मला!
अर्चना कुलकर्णी.
चित्रकाव्य...
घरकुल
छोटासा पिंटू
रोज इथे तिथे पळे
कधी दाणे देई
कधी लपंडाव खेळे,
एकदा त्याने आणले
लाकडी घरटे
अन झाडावर टांगले
होते जरासे छोटे
रोज पहात होतो मी
त्याच्या आईने ठेवला
कापूस खिडकीत
सांभाळून माझ्या सुरक्षेला,
जेंव्हा आली माझी राणी
दाखवले तिला घरटे
चक्क तिला पसंत पडले
मग काय सांगू
घेतला कापूस गादीसाठी
काड्यानी बंद केली
खिडक्या अन दारे
जमा केला दाणा पाणी
गुपित सांगे राणी
आराम कर म्हटले तिला
गोड खाऊ आणला,
निळ्या आकाशी
प्रकाश पसरला,
धन्यवाद देत पिंटूला
हसऱ्या घरकुलात
प्रवेश केला!
अर्चना कुलकर्णी
तू छान दिसतेस....
आज चक्क आरसा म्हणाला
*तू छान दिसतेस*
नको तो मिडी, नको ती जीन्स
ह्या नववारीत तू छान दिसतेस...
नाकात मोत्याची नथ,
कपाळावर चंद्रकोर
केसात माळलास गजरा
खुलून दिसतोय नखरा!
डोईवर घेता पदर
का झुकली माझी नजर?
आठवणीने कुणाच्या
गालावर पसरली की लाली!
काय होतंय आज वेगळं?
भासे नवीन सगळे!
सरले आता बालपण
अनुभवते सुंदर क्षण!
बोलतोय आरसा माझ्याशी
अन आई म्हणतेय
रेंगाळू नको आरश्यापाशी
अन मी माझ्याशीच हसतेय!
अर्चना कुलकर्णी.
विसरू सारी कटुता...
आयुष्याची उरली आता काही वर्षे
ठरवते मनाशी विसरू सारी कटुता
आनंदात घालवू उरलेली वर्षे
आपल्या शरीरास नाही सोसवत आता,
परि अहंकारास म्हणते स्वाभिमान
आठवत रहाते सारखी कटू घटना
उगाळून घेते त्याच त्याच गोष्टी,
अन वर्मी घाव बसलेल्या शब्दांना,
अजून होते मी च दुःखी कष्टी
मग धरते मौन साऱ्यांशी
अर्थ कळत नाही कोणा मौनाचा,
मग वाटे उदास मना!
वागणारा आजही चुकीचा वागतो
आपल्या मनाचा कोण विचार करतो?
तरी आपण परत म्हणावे का?
विसरून जावू सारी कटुता!
अर्चना कुलकर्णी
*प्रतिभा आणि प्रतिमा समूह आयोजित उपक्रम*
*अभंगलेखन*
*माझी सून*
नुकतेच झाले | लेकाचे लगीन |
अनघा कुलीन | सून माझी ||
राही समाधानी |बोलणे मधुर |
वागणे चतुर || सदा तिचे ||
सदैव उत्साही |सुंदर, हसरी | |
घेतसे लकेरी | आनंदाने ||
खाण्याची आवड | करण्यात गोडी |
जमली ग जोडी | सासू सून ||
लेकीच्या रूपात |नटते, सजते |
घर सजवते || मी पहाते ||
भाग्यवान आम्ही| जीवन सौख्याचे |
प्रेमाचे आस्थेचे | राहो सदा ||
अर्चना कुलकर्णी.
प्रतिभा आणि प्रतिमा उपक्रम
चारोळी
Bank कर्मचारी :
(अशी सुंदर, नखरेल नार
ना कधी इथे येणार
बाजूच्या लाईनीत जाणार
आम्ही फक्त नोटा मोजणार )
सुंदर स्त्री : (चोरून बघतोय,
रिकामा दिसतोय
आता करू गंमत
हाय काय नाय काय )
दादा, प्लि ssss ज हे पासबुक भरून देता काय?
कर्मचारी :(हाय रे कर्मा.. दादा काय?)
अर्चना कुलकर्णी
प्रतिभा आणि प्रतिमा उपक्रम
चारोळी
नवरा :
रोज रोज तीच भाजी न पोळी
बदल नाही, जराही डब्यात!
खावी वाटे पुरणपोळी
राम नाही आता जेवणात!
बायको
मी म्हणून घेतेय काळजी
गोळी घेताय मधुमेहाची
रोज उठून करते पोळीभाजी
शुगर तेव्हाच ताब्यात राहायची!
अर्चना कुलकर्णी
"*त्रास करून घेतला तर कशाचाही त्रास होतो*..
*आनंदी राहिलं तर प्रत्येक क्षण आनंदी होतो*"
---------=
काय हा वैताग!
दुपारी लागल्या घामाच्या धारा
आता बरसती पाऊस धारा
जमणार आता चिखल सारा
ट्राफिकचा उडणार बोजवारा!
असे का त्रासतोस?
मिळालीय संधी पावसात भिजण्याची,
बघू या समुद्राचा सुंदर नजारा,
रिमझिम गिरे सावन म्हणत
चेहरा करू या हासरा!
अर्चना कुलकर्णी...
अलक जिद्द...
लहान वयात लग्न, लगेचच गरोदर! पण मातृत्वाचा आनंद लाभला नाही....
ती जगली ह्या आनंदात नवऱ्याने जिद्दीने तिला प्रसूतीतज्ञ् होण्याचा सल्ला दिला आणि ती डॉक्टर झाली!
अर्चना कुलकर्णी.
विरह
घरची सर्व जबाबदारी तिच्यावर असल्याने तिने त्याला नाही म्हटले. तो लागोलग गाव सोडून गेला.पाच वर्षांनी तो परत गावी आला. भेटून म्हणाला, मी निम्मी जबाबदारी (आर्थिक )घ्यायला आता तयार आहे. तू?...
त्याच्या मिठीत शिरत विरह संपल्याची ग्वाही दिली
अर्चना कुलकर्णी
चित्र
सुखी संसाराचे *चित्र* रेखाटत काल तिने गृहप्रवेश केला.
आज काम करताना काही तरी चुकले तर सासूबाई म्हणाल्या हे तुझे घर नाही.... चित्रास अलगद तडा गेला...
अर्चना कुलकर्णी
अस्तित्व (अलक )
तिसरी मुलगीच कळल्यावर तिचे *अस्तित्व* बापाच्या लेखी शून्य होते.
आज तीच डॉक्टर होऊन बापावर औषधोपचार करत होती.
अर्चना कुलकर्णी
वेगळ्या वाटेवर...
कुष्ठरोग्यांची सेवा हेच माझे ब्रीद राहील, त्यांच्या सेवेकरीता माझे तन मन धन वाहीन. असे म्हणताच घरातल्या सर्वांनी तिला नेसत्या वस्त्रनिशी बाहेर काढले.
बुद्धी आणि इच्छेच्या जोरावर ती काम करत राहिली.
गावातल्याच धनाढ्य व्यक्तीने तिचे कौतुक करत आपला मोठा वाडा तिच्या कार्यकरिता दान म्हणून दिला.
तिला तिच्या वेगळ्या वाटेचा अभिमान वाटला...
अर्चना कुलकर्णी.
24. 1.25
अ ल क
*ती*
पोलीस स्टेशन मध्ये ती (साधारण ३० /३२ वर्षाची )नवऱ्याला ठेचून मारल्याच्या आरोपखाली अटक होऊन बसली होती.
साऱ्यांच्या मनात का असे बायको करेल? हाच प्रश्न होता.
सकाळी तिची भेदरलेली छोटी मुलगी पाहिली अन रहस्य उलगडले...
अर्चना कुलकर्णी
व्हॅलेंटाईन डे प्रपोजल
*तो* -
व्हॅलेंटाईन सप्ताह करू साजरा
गुलाब, चॉकोलेट,टेडी देईन तुला
होईल ना तुझा चेहरा हसरा?
नी अजून काय हवे? सांग मला..
*ती*
सप्ताहभर देशील तू सारे
स्वीकारेन मी प्रेमाने
जर देशील साथ जीवनभराची
सर्व कामे करू जोडीने!
अर्चना कुलकर्णी
प्रतिभा प्रतिमा समूह
आजचा उपक्रम
दि १८/२/२५
*तो*
नेहमी म्हणतेस *रोझ डे* ला
देत नाही मी तुला गुलाब
काय करू,होते मला विसरायला
आज आणलाय मी कुंडीसकट गुलाब!
ती :
तुझ्या प्रेमाचा तर
कधीच केलाय स्वीकार
निमित्त *रोझ डे*
पुन्हा प्रीत फुलवण्याचे!
आता वर्षभर निगराणी करून
प्रेमाने ह्याला गोंजारण्याचे!
अर्चना कुलकर्णी
रितेपण
-------------
भटक भटक भटकले ,
शांत नजरेने सारे पहात गेले ,
गजबजलेल्या ह्या गावात,
ह्या मनामधले रितेपण,
का कोणाला दिसले नाही,
ह्या गावातून त्या गावात,
सारे गाव त्याच त्या भावात,
सारा गाव गजबजलेला,
प्रत्येकजण एकटाच वसलेला,
हातवारे करून सुद्धा ,
का माझे अस्तित्व ,
का कोणाला दिसले नाही
वाटले आप्त तरी माझे असतील,
थोडा वेळ जवळ बसतील,
गोळा करत आप्तांना,
जवळ जाऊन बोलताना,
जाणवत नव्हते आपलेपण,
त्यांच्यातली मी,
का कोणाला दिसली नाही,
माझे मलाच
माझे रितेपण कधी भावलेच नाही!
अर्चना कुलकर्णी.
मातृभाषा दिन...
महत्व मातृभाषेचे
कोणास न कळले
घराघरात झाली असे
मातृभाषा दीन
कसा साजरा करावा
मातृभाषा दिन?
ज्याला त्याला
परकीय भाषेची आवड
जिथून मिळते नोकरीची हमी,
बाळकडू मातेकडून
मिळते इंग्लिशचे
सफरचंद शब्द विस्मृतीत
अँपल म्हणणे होई प्रतिष्ठित
आई नको रे म्हणू
मम्मी म्हणताच
खुलते माझी कळी,
विसरत चाललेल्या
मातृभाषेचा आज साजरा
करू मदरटंग डे!
अर्चना कुलकर्णी..
(नुकतेच 6 वर्षाच्या मुलाला आई मदरटंग डे सांगताना ऐकले 😄)
शब्दरजनी साहित्य समूह
स्वैर लेखन...
Give me some sun shine
डिसेंबर 2010 ची गोष्ट आहे.माझा धाकटा मुलगा दहावीत होता. Prelims नंतर मुलं कधी शाळेत तर कधी घरीच अभ्यास करत. मोबाईल अस्सल्याने फोनवर शंका विचार्याच्या व तेवढ्यात इतरही गप्पा सुरू असत. तेवढा तर बदल हवाच म्हणून मी कधीच त्याला काही बोलले नाही. पण त्या मित्रांच्या बोलण्यात आले, अरे तन्मय(topper )चा काही फोन नाही... त्याला केला तरी घेत नाही. व्हाट्सअप नव्हते. माझ्या मुलाने नितीशने त्याला फोन लावला. रिंग टोन ऐकली... Give me some sunshine.... वाजत राहिली आणि फोन बंद झाला. नितीश मला म्हणाला मी त्याच्या घरी जावून येऊ का? रिक्षाने जातो पटकन येतो, त्याशिवाय माझा अभ्यास होणार नाही. Three idiots मधील त्या गाण्याची पार्शवभूमी त्याला अस्वस्थ करत होती.
नितीश त्याच्या घरी गेला, अर्थात त्याच्या आईने दार उघडले. "काकू, तन्मय कुठे आहे?"
"तू कोण?"
"मी नितीश कुलकर्णी, मी तन्मयच्या वर्गात आहे."
"अच्छा, कितवा नंबर असतो तुझा? आणि आता अभ्यास नाही का तुला?"
"माझा पहिल्या दहात असतो नंबर, अभ्यास करतोय पण तन्मयशी बोलायचे आहे."
"हे, बघ मी फक्त हुशार मुलांशीच मैत्री कर असे सांगितलं आहे त्याला. आता आलाच आहेस तर बोल 2 मिनिटे. "
तन्मय बाहेर आला, आईसमोरच म्हणाला "कंटाळा आलाय life चा, कोणाशी बोलायचे नाही, tv बघायचा नाही, फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास. का तर बाबानाच्या ऑफिसमधील कोणाच्या तरी मुलीला गेल्यावर्षी 97% पडले.. तो माणूस तर किती जुनिअर पोसिशन वर आणि माझे बाबा VP आहेत.
आणि रडू लागला."
नितीश म्हणाला "काकू, फक्त हुशार मुलांशी बोल.... मग सचिन तेंडुलकर ने कोणाशीच मैत्री करायची नाही का? त्याच्या क्षेत्रात तो सर्वांत्कृष्ट.... अंबानी सर्वात श्रीमंत त्यांनी इतर कोणाशी बोलायचे नाही... लता, आशा ह्यांनी तर अगदीच गप्प रहावे....कोणी कोणाशी का बरोबरी करावी? तन्मयने अभ्यास करण्यासाठी थोडे तरी वेगळे हवेच ना? त्याच्या फोनची रिंगटोन ऐका आणि तो चित्रपट पहा आणि ठरवा."
एवढे बोलून त्याने तन्मयला जवळ घेऊन, आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत असे म्हणून निघाला....घरी आल्यावर मला फक्त म्हणाला की तो खूप अभ्यास करतोय. म्हणून वेळ नाही....
जूनमध्ये result च्या दिवशी तन्मयची आई मला भेटली. मी तर नितीशने मित्रांना द्यायला पेढे घेतले होते त्यातील एक त्यांच्या हातावर दिला. तन्मय तर पहिला आला, अभिनंदन म्हटले. त्यावर त्या म्हणाल्या नितीश तर सहावा आला, तरी तुम्ही पेढे वाटताय?
मी म्हटले, माझा मुलगा चांगल्या मार्कांने पास झाला मला त्याचे कौतुक आहे. माझा आनंद तोच आहे तो इतरांकडे बघून कमी का करू?
त्यावर त्या म्हणाल्या नितीशने तुमच्याकडून हा चांगला गुण घेतला आहे..
आणि मग त्यांनी वरील सर्व प्रसंग सांगितला.
खरोखर आपण आपला आनंद इतरांशी तुलना करून कमी करतो का?
अर्चना कुलकर्णी.
शब्द रजनी साहित्य मंच आयोजित उपक्रम
दिनांक _२४/०७/२४
विषय _चित्र काव्य
शीर्षक _ माझा बाप्पा
बाळगणपती साजरा
भू वर अवतरला
चेहरा ह्याचा हसरा
पावसात नको भिजायला
छत्री घेऊन हाती
हळूच जावून बसला
घेता गरम चहा
पुनः खट्याळ हसला
छत्र तुमचे रहावे
बाप्पाकडे हेच मागणे.
अर्चना कुलकर्णी. नासिक
शब्द रजनी साहित्य समूह आयोजित
काव्य लेखन उपक्रम
विषय -हळदीकुंकू
महिना आहे जानेवारीचा
आला सण संक्रांतीचा
हळदीकुंकू करण्याचा
तीळ लाडू करण्याचा
गुळपोळी खाण्याचा
वाण नवे लुटण्याचा!
सुवासिनीच्या मानाचा
काळी साडी नेसण्याचा
शेवंती फुले सजवण्याचा
गोड गोड बोलण्याचा
अन साऱ्यांना सांगण्याचा,
कोणाला न वगळण्याचा
निश्चय केला तिने मनाचा
बोलावले साऱ्या महिलांना
हळदीकुंकू सन्मान स्त्रित्वाचा
पतीनिधनानंतर का तो सोडायचा?
पटले मग ते साऱ्यांना
हळदीकुंकू लावून
वाण लुटले महिलांना
तिळगुळ वाटत
संकल्प केला गोड बोलण्यांचा!
अर्चना कुलकर्णी. नासिक
शीर्षक- विरह
६-२-२५
निळाशार डोह
चंद्रास होई मोह
उगा इथे थांबण्याचा!
कमल पुष्प उमलले
मजला मोहविले
सुंदर त्या रंगानी!
शांत, रम्य परिसर
पौर्णिमेचा पूर्ण चंद्र
जलाशयी डोकावतो!
केला मी साज शृंगार
नेसले मी पीत वस्त्र
वाट पहात इथे थांबली
संपू दे विरह आता
या लवकर नाथा
मिलना अधीर मी!
अर्चना कुलकर्णी.
*21/2/25*
*विषय: दाराची चौकट*
*शीर्षक:नववधू*
लगीन लागले
माहेर सोडून
सासरी मी आले
दाराची चौकट
आहे सजलेली
फुले हसणारी
मला बोलणवणारी
कधी खुणावणारी
उंबरठा ओलांडून
आत ये म्हणणारी,
खूप काही बोलणारी
चौकटीत राहून
प्रेम ममता देणारी
होशील तू ही
माझ्यासारखी
मर्यादा सांभाळणारी!
अर्चना कुलकर्णी.
धन्यवाद 🙏🏻
*विषय - वन*
ऋतु मोहरला
वनी दिसे हिरवाई
का जपायचे वनराईला?
व्हावे सारे जीवन आनंददायी!
अर्चना कुलकर्णी
*दि २३/२/२५*
*विषय * *शपथ*
उन्हाचे चटके सोसून बहरायचे
शिकवण ह्या गुलमोहराची
संसारात दोघे मिळून फुलायचे
शपथ तुला ह्या कट्ट्यावरची!
अर्चना कुलकर्णी. नाशिक
रक्तवर्णी पुष्प अर्पून
पूजा करिते तरुणी
मनोहर दृश्य ते पहात
उभी स्तब्ध सुंदर हरिणी!
अर्चना कुलकर्णी
शब्दरजनी साहित्य समूह आयोजित उपक्रम
दिनांक _११/१२/२४
विषय _चित्र चारोळी
आपल्या काळ्या मातीतून
आपले हिरवे शेत तरारले
तुझ्यासारखे सुंदर रूप पाहून
माझे मन धन्य जाहले!
अर्चना कुलकर्णी. नाशिक
*शब्दरजनी साहित्य समूह पुणे आयोजित भव्य राज्यस्तरीय उपक्रम चारोळी लेखन उपक्रम*
दिनांक २/९/२४
*विषय _मातृदिन*
*शीर्षक_ पिठोरी*
सण आज पिठोरीचा
सन्मान करू मातेचा
निश्चय पांग फेडण्याचा
संदेश देवू समानतेचा!
अर्चना कुलकर्णी
शब्द रजनी साहित्यसमूह पुणे आयोजित उपक्रम हिंदी शायरी लेखन
विषय:-तेरी याद
जब सूरज उगता हैं
तेरी याद सताती हैं
जब सावन बरसता हैं
दिल दिवाना होता हैं!
अर्चना कुलकर्णी...
शब्दरजनी साहित्य समूह
चित्र चारोळी
८-८-२४
बायको माझी देखणी
लाखात एक सद्गुणी
करायला गेली पोळी
नव्हती तिला शिकवणी!
अर्चना कुलकर्णी.
शब्दरजनी साहित्य समूह आयोजित उपक्रम
चारोळी लेखन
दिनांक:-६•८•२०२४
विषय:- चित्र चारोळी
शीर्षक:- चिठ्ठी
पती गेले ग परदेशी
सय त्याची सदा येई
लिहिते प्रेमचिठ्ठी
आठव माझी देई!
अर्चना कुलकर्णी.
शब्द रजनी साहित्य समूह पुणे आयोजित भव्य राज्यस्तरीय उपक्रम
शनिवार :-८/३/२०२५
विषय :- चित्र काव्य लेखन
शीर्षक :- आज की नारी
आजची महिला
शिकून झाली हुशार
नाही मुळी अबला
कामे करती सर्व वार,
बाहेर करे ती नोकरी
कधी शिक्षक तर कधी नर्स
पुढे येते ती हुशारीने
बनते शास्त्रज्ञ्, कधी एअर हॉस्टेस
कामं करते मोठ्या खुबीने,
मुलांची प्रेमळ आई
छान पदार्थ करून खायला देई
मुलांची कडक माता
अभ्यासाच्या मागे लागे..
अष्टभुजा देवीच ती
घरात बाहेर लक्ष ठेवी...
अर्चना कुलकर्णी
*शब्दरजनी साहित्य समूह पुणे*
*आयोजित भव्य राज्यस्तरीय उपक्रम कविता लेखन*
*दिनांक :- १८/०३/२०२५*
*विषय:- झोळी*
शीर्षक --झोळी...
येताना घेऊन येतो
ती रिकामी झोळी
निरागस बाल्य असता
मागे फक्त भरण्यास
पोटाची खळी,
जसा जसा मोठा होई
शिरे त्यात विकारांची जोडी
राग, द्वेष मनात येता
इर्ष्या ही त्यात मिसळे
खळी पोटाची बाजूस पडे
कुठून कसे जास्त मिळावे
ह्यास्तव धडपड घडे
विवेक कधी सुटू पाहे
हव्यास अन लालसेपोटी
सारे सारे मिळूनही
शेवटी माणसाची
झोळी रिकामीच राही!
अर्चना कुलकर्णी. नासिक
उपक्रम...
महाशिवरात्रीचा उपवास म्हणून जरा फराळाचे पदार्थ *कमीच केलेत*.....
एकादशी नाही तर
दुप्पट खाशी नकोच !!
साबुदाणा खिचडी,
रताळ्याचा कीस,
भगर डोसे,
राजगिरा ठेपला.
कवठाची चटणी,
कच्च्या केळ्याची भाजी,
रताळ्याच्या गोड चकत्या,
लिंबू लोणचे,
घरचे दही,
ताक,
शेंगदाण्याचा लाडू
फलाहार द्राक्षं, खरबूज , टरबूज , केळी , संत्रे, काकडी
शिवाय दुपारी उसाचा रस आहेच....
सारं काही मनसोक्त खा,
बैठे खेळ खेळा
ईश्वर भक्ती करा
सर्व फक्त ७०० रुपयात,
येताय ना?
अर्चना'ज किचन.
आपली वाट पहात आहे!
अर्चना कुलकर्णी.
आजचा उपक्रम...
गोरी गोरी पान
सून हवी छान!
नको आई हाटून बसू
पहा तरी तिचे मुक्त हसू
हा हा ये भी सही हैं,
गोरा रंग पावडरसे आयेगा,
मगर हसमुख चेहरा ही,
*मुक्ता चमक* के साथ हमेशा रहेगा!
आप भी खरीदो,*मुक्ता चमक*
अर्चना कुलकर्णी...
*महाशिवरात्री उपास*
अहो, उपासाचे नको टेन्शन
तुम्ही फक्त करा मेंशन
काय हवे?कधी हवे?
कुठे हवे? अन किती हवे?
नाश्त्या पासून उपास सोडेपर्यंत,
सर्व जिन्नस उपलब्ध
अर्चना'ज किचन मध्ये....
याशिवाय उपासाचे लोणचं, भाजणी, राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ तयार आहेच...
आत्ताच कॉल करा
अर्चना'ज किचन 98209176
अर्चना कुलकर्णी 😄
फळांच्या उपमा देवून हास्य काव्यरचना....
संकल्पना....चारुशीला गोखले
24/02/2025
अरे,सुरुवातीस भासलास
आंब्यासारखा गोड
विविध विषयाची तुला आवड
सगळे सांगायचा करून फोड,
पण उसासारखा सरळ तू
खाल्लेस तरी होत नाही जाड तू
गोडवा सगळा आत ठेवलास
मग रक्तातून दिसून आला 😄
नाही जरी कंजूष चिक्कू
पाच ठिकाणी करेल चौकशी
उपयुक्ततेची घेईल चाचणी
कशाला वाटेल वस्तू आणावीशी?
अर्चना कुलकर्णी
उपक्रम 10 मार्च 2025
आवडती लेखिका /कवी
वाचन हा माझा छंद आहे. अनेक लेखिका, कवी माझे आवडते आहेत. वेगळ्या व्यक्तीवर लिहावे म्हणून आवडत्या असणाऱ्या मंगला गोडबोले ह्यांच्याविषयी.
विनोदी लेखिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथा म्हणजे कुठे तरी आपल्याशी जुळत जातात. आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगातून विनोदी लिहिण्याचे कसब एकदम मनात ठसते. लोकसत्तामध्ये येणारे त्यांचे लेख अगदी ताज्या बातम्यावर आधारित विनोदी भाष्य खूप भावायचे. कथसंग्रह हातात पडल्यावर तो पूर्ण झाल्याशिवाय मी कधी खाली ठेवला नाही. झुळूक, पुनः झुळूक, पोटाचा प्रश्न, पर्स हरवलेली बाई, अशा अनेक कथा नावासहित लक्षात आहेत आणि पुनः पुनः वाचताना तेवढेच हसू येते. हसत हसत जगायचे असेल तर *महिलांनी* जरूर वाचावीत अशी पुस्तके...
अर्चना कुलकर्णी. नासिक
भय...
नोव्हेंबर 1999, मी दोन मुलासह आफ्रिकेतील कॉंगो ह्या देशात गेले. त्यापूर्वी 3 महिने, माझे यजमान नोकरीनिमित्त तिथेच होते. अतिशय अशांत देश असेच कानावर होते. पण तिथे बरेच भारतीय होते, त्यांच्याशी मैत्री झाली, आणि दहा दिवसात एका मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस त्यानिमित्ताने सगळ्यांना प्रथमच भेटले. पार्टी सुरू असतानाच बातमी आली curfew लागलाय. पार्टी थांबवून आम्ही घरी निघालो. रस्त्यात ठिकठिकाणी हातात बंदूक घेऊन पोलीस उभे. आयुष्यात प्रथमच इतक्या संख्येने बंदूकधारी पोलीस पाहिले अगदी हातच्या अंतरावर.. भीती म्हणजे काय ते जाणवले. दुसऱ्या दिवसापासून दीड महिना शहरात संचारबंदी होती.
अर्चना कुलकर्णी
सहज मनातले....
आमच्या घराशेजारील बंगल्यात एक वर्षांपासून girls हॉस्टेल सुरू आहे. 6/7 कॉलेज ला जाणाऱ्या मुली राहतात. जेंव्हा पहावे तेंव्हा त्या मोबाईलमध्येच. मैत्रिणी बनून आपापसात बोलताना दिसत नाहीत. किती वेड लावलंय ह्या मोबाईलने, असा सारखा विचार माझ्या मनात येतो.
पण महाशिवरात्रीची गोष्ट आहे. एक मुलगी बंगल्याच्या मागे आली, मोबाईलवर बोलतच. पप्पा तुम्ही vdo स्विच करा, मला बघायचे आहे. आणि मी बाहेर आलेय कोणी डिस्टर्ब नाही होणार.
नाही ग जमत. थांबा मी पुनः कॉल करते. लगेच vdo कॉल केला. पप्पा तुम्हाला बरे नाहीये, तुमचा आवाज सांगतोय.
नाही ग आता बरे आहे.
काय झाले होते?
थोडा ताप होता.
थोडा म्हणजे किती? Dr कडे गेलात का?
आता नाहीये ताप.
काय खाल्लेत सकाळपासून?
अगं आज शिवरात्री उपास आहे.
मावशीनी डबा नाही पाठवला?
मी नको म्हटले.
किती थकला आहात. आता काय खाणार?
थांबा, मी मावशीना फोन करून सांगते उपासाचे पाठवायला...
आणि तुम्ही ते आल्यावर खाताना मला vdo कॉल करा, तरच मी जेवेन..
अशी प्रेमळ धमकी वडिलांना दिलेली ऐकली आणि मोबाईलमुळे हे ही शक्य आहे असे जाणवले....
अर्चना
कुंभार...
वरच्या कुंभाराने
घडवले आमचे मडके
ठेवले मात्र जरा कच्चे
विचार करायला लागतो वेळ
जमत नाही शब्दांचा मेळ
तरी आभार कुंभाराचे
उच्च विचार मिळतात वाचायला
तेवढा आनंद माझ्या जीवाला!
अर्चना कुलकर्णी
श्रावण
श्रावण माझ्या आवडीचा
रिमझिमत्या पावसाचा
उन्हात हळूच बरसायचा
आकाशी इंद्रधनु पसरायचा!
हिरव्या गवतातून नटायचा
पाना फुलातून बहरायचा!
श्रावण माझ्या देवभक्तीचा
सोमवारी शिवामूठ व्हायचा!
बिल्वदलाने देव्हारा सजायचा
मंगळागौर फुलपत्रीने पुजायचा!
नागोबाला देव म्हणत जपायचा
लेकुरवाळ्या जिवती आशिषाचा!
कोळ्यांच्या सागर शांतीचा
लाडक्या भावाच्या प्रेमाचा
बहिणीने राखी बांधण्याचा,
मुलांच्या बाळकृष्ण जन्माचा
थरा वर थर, दहीहंडी रचण्याचा
कामकरी बैलांना पूजण्याचा!
श्रावण माझा गोडाधोडाचा
वरणापुरणाने भरल्या ताटाचा!
खीर पुरी आणि दहीकाल्याचा
करंजी,भात की वड्या नारळाचा!
श्रावण माझा देशभक्तीचा
आपल्या स्वातंत्र्य उत्सवाचा!
श्रावण विविध रंगात रंगून
हर्षित होत मनमुराद जगण्याचा!
अर्चना कुलकर्णी
चित्रकाव्य...
घरकुल
छोटासा पिंटू
रोज इथे तिथे पळे
कधी दाणे देई
कधी लपंडाव खेळे,
एकदा त्याने आणले
लाकडी घरटे
अन झाडावर टांगले
होते जरासे छोटे
रोज पहात होतो मी
त्याच्या आईने ठेवला
कापूस खिडकीत
सांभाळून माझ्या सुरक्षेला,
जेंव्हा आली माझी राणी
दाखवले तिला घरटे
चक्क तिला पसंत पडले
मग काय सांगू
घेतला कापूस गादीसाठी
काड्यानी बंद केली
खिडक्या अन दारे
जमा केला दाणा पाणी
गुपित सांगे राणी
आराम कर म्हटले तिला
गोड खाऊ आणला,
निळ्या आकाशी
प्रकाश पसरला,
धन्यवाद देत पिंटूला
हसऱ्या घरकुलात
प्रवेश केला!
अर्चना कुलकर्णी
मु. पो. बोंबीलवाडी
आज वर्षाचा पहिला दिवस, धमाल मराठी चित्रपट पाहून केला..
तब्बल २४ वर्ष झाली नाटकाला. २४ वर्षांनी त्यांच्याच नाटकाचं परेश मोकाशी यांनी चित्रपटात रूपांतर केलय. .
प्रशांत दामले एकदम भारी. त्यांच्या गोड हिटलर ने धमाल उडवून दिलेय. आनंद इंगळेना फार थोडा स्क्रीनटाईम मिळाला आहे. वैभव मांगले झकास. सर्वच कलाकारांची कामं उत्तम. सर्वात जास्त लक्षात राहिलाय तो मनमित पेम चा बबन. मनमित ने बबन उत्तम केलाय. अगदी छोट्या छोट्या जागातही त्याने कायच्याकाय धमाल उडवून दिलेय.
अवघ्या दोन तासाचा हा सिनेमा. जाम सगळे खळखळून हसवणारा
फार्स आवडत असेल आणि फार्स,फार्स म्हणून बघता येत असेल, एन्जॉय करता येत असेल तर अवश्य ब