Sunday, 16 June 2024

गुंता भावनांचा

 शब्दरजनी साहित्य समुह आयोजित उपक्रम 

विषय - गुंता भावनांचा 


गुंतले तुझ्यात 

माझी नुरले मी 

गुंता भावनांचा 

कसा सोडवू मी?


यत्न असफल 

 नाते भावनांचे 

अतूट होईल 

प्रेमे वीणायचे 


विविध रंगाचे 

गुंफून ते धागे 

खेळ हे मनाचे 

उगा येई मागे 


लालरंगी धागा 

हळूच हसवी 

मनातच जागा 

घेऊन दाखवी 


भावनांचा खेळ 

आपल्या मनाचा 

नाही कुठे मेळ 

स्पर्श प्रकाशाचा!


अर्चना कुलकर्णी. नासिक

अलक जमापुंजी

 *शब्दरजनी साहित्य समूह* आयोजित *अलक* लेखन कार्यशाळा उपक्रम (२४/०४/२३)


ती दोघेही दिसायला अगदी देखणी, गाण्यात प्रवीण. मुलगी झाली दिसायला साधीशीच रंग सावळा.. दोघांनाही खूप दुःख झाले...

तीन वर्षाची झाली आणि अचानकच तिने सुंदर गाण्याची तान घेतली... दोघांना समाधानाने जाणवले ही च तर आपली जमापुंजी, जी मुलीकडे आपसूक गेलीय...



अर्चना कुलकर्णी. नासिक

गुंता भावनांचा

 शब्दरजनी साहित्य समुह आयोजित उपक्रम 

विषय  - गुंता भावनांचा 


गुंतले तुझ्यात 

माझी नुरले मी 

गुंता भावनांचा 

कसा सोडवू मी?


यत्न असफल 

 नाते भावनांचे 

अतूट होईल 

प्रेमे वीणायचे 


विविध रंगाचे 

गुंफून ते धागे 

खेळ हे मनाचे 

उगा येई मागे 


लालरंगी धागा 

हळूच हसवी 

मनातच जागा 

घेऊन दाखवी 


भावनांचा खेळ 

आपल्या मनाचा 

नाही कुठे मेळ 

स्पर्श प्रकाशाचा!


अर्चना कुलकर्णी. नासिक

स्पर्श


विषय - स्पर्श 

दिनांक - 22/05/2024

शीर्षक - स्पर्श लाभेल का?



करोनाचे वादळ आले 

एकमेकांना भेटणे अशक्य केले 

घरात राहून मन कोमेजले 

जो तो विचार करे,

पुनः प्रिय जनांचा 

*स्पर्श लाभेल का?*


घेतली खूप सारी काळजी 

नाही कुठे बाहेर गेले 

मुखपट्टी नेहमीच लावली 

हात धुवून कातडी सोलवटली 

विचार मनी 

*स्पर्श लाभेल का?*


करोनाने मला गाठलेच 

प्राणवायू कमी होई 

आले विलगीकरण नशिबी

औषधं, इंजेक्शन भडीमार 

कधी संपेल हे सारे?

*स्पर्श लाभेल का?*


 केला नेहमी पॉसिटीव्हचा अट्टाहास 

आता पॉसिटीव्ह म्हणता मन उदास 

सकारात्मक राहून दिवस काढले आठ 

नेगेटिव्ह रिपोर्ट आला...

*स्पर्श लाभेल का?*



अर्चना कुलकर्णी.


खिडकी

 शब्दरजनी साहित्य समूह आयोजित उपक्रम..


मुक्त छंद कविता लेखन..


विषय - खिडकी..


शीर्षक - अबोल खिडकी..


ती एक खिडकी नव्हे 

तर माझी ती तिथे असे 

खिडकीत बसायची 

हातात घेऊन पुस्तक 

डोळे घारे बोलके 

हळूच बघायचे चोरून 

बोलावे वाटे अनेकदा 

पण नव्हता नीट नोकरीधंदा 

कसा करू मी धीर?

एकदा चेहऱ्यावर दिसले स्मित 

मी ही हसून पाहिले नीट,

डोळ्याच्या कोपऱ्यातून 

बोलू पाहे काही 

मला समजलेच नाही,

कळले नंतर,

ती गेली दुसऱ्या गावी 

लग्न करून कोणाशी,

खिडकी माझी अबोलच राहिली 

नकळत कायमची बंद केली...



अर्चना कुलकर्णी. नाशिक

Saturday, 15 June 2024

वेडा पाऊस

 *कल्पतरु जागतिक साहित्य मंच आयोजित उपक्रम* 

 *दि.१४/६/२४* 

 *विषय : पाऊस असाही* 

 *शीर्षक : वेडा पाऊस*



मुलांना हवाहवासा पाऊस

निसर्गात नाचतो पाऊस

फुलांना फुलवतो पाऊस

शेतांना आनंद देतो पाऊस 


तरुणांना प्रिय पाऊस 

गाणे गातो तो पाऊस 

प्रेमाने वेडा पाऊस 

सुगंधित चिंब पाऊस 


मनामनात रंगणारा पाऊस 

कामावर जाताना नकोसा पाऊस 

ट्रेकला जाताना उनाड पाऊस 

खिडकीतून धुवंधार पाऊस 


कडाडे बिजली सैराट पाऊस 

उन्हात दिसे सप्तरंगी पाऊस

नदीकाठी भासे खळाळता पाऊस

श्रावणात रिमझिमता पाऊस 


देई नवचैतन्य धरतीस 

रानोमाळी हासे पाऊस,

कधी वेडा होई पाऊस

धावे रस्त्यातून तुफान 

सागरा येई उधाण 

मन परि म्हणे हवा हा पाऊस!


अर्चना कुलकर्णी, नाशिक.

Tuesday, 11 June 2024

पाऊस

 चार थेंब पावसाचे 


पुरे मला फुलण्याला 


हेच दिवस सुखाचे 


देई बळ जगण्याला!


अर्चना कुलकर्णी