असा ही एक अनुभव -
गेल्या आठवड्यात एका मैत्रिणीबरोबर एका BRANDED चष्म्याच्या दुकानात जाण्याचा योग आला . डोळे तपासणी मोफत होती , तिला करायची होती . मी म्हटले आपण ही एकदा करून घ्यावी . UP university तून कसला तरी डिप्लोमा घेतलेली मुलगी डोळे तपासत होती . आधी जुना चष्मा लावून , वाचायला सांगितले , वाचले की मी सारे , तरी देखील नियमानुसार वेगवेगळी भिंगे लावून इथे तिथे फिरवत पुन्हा नवीन नंबर , परत एकदा इलेक्ट्रोनिक मशीन वर हनुवटी ठेवून डोळ्यात प्रखर किरण सोडून त्याचे फोटो …
हे सर्व सोपस्कार झाले , मग सुरु झाले तिचे पुराण (अर्थात हिंदीत )
खूप नंबर वाढला आहे , axis पण बदलला आहे.
मी म्हटले ठीक आहे ,बघू थोडे दिवसांनी ,आता फक्त तुम्ही मला नवीन नंबर चा कागद द्या .
नाही तो आम्ही देत नाही , तुम्ही इथे चष्मा घ्यायला हवा .
नाही घेतला नवीन चष्मा तर डोळे तिरळे होतील , पुढे जावून ग्लुकोमा होईल , मोतीबिंदू होईल …।
जे काही डोळ्याचे आजार असतील ते सर्व होतील … असे सांगत राहिली …
हे बघा मला नवीन नंबर चा कागद द्या , मी तो घेवून येते दोन -चार दिवसात ,
नाही तो नाही देवू शकत .
पण तुम्ही आज च चष्मा घेतलात तर तुम्हाला फ्रेम वर १५ % सूट मिळेल … अशी प्रलोभने सुरु झाली …
तोवर मैत्रिणीने डोळे तपासून कोणता चष्मा वगैरे ठरवत होती ,
तिने इथे च घेतला चष्मा …
तिचे आटोपल्यावर आम्ही निघालो .
दुसर्याच दिवशी आमचे नेहमीचे Opthalmologist आहेत त्यांचेकडे गेले ,
म्हटले उगाच काही व्हायला नको …।
डोळे तपासून त्यांनी निर्णय दिला, नंबर आहे तो च आहे, अजिबात बदलला नाही , चष्मा पण चांगला आहे .
इतक्यात बदलण्याची गरज नाही ….
हुश्श झाले ना !
जागो ग्राहक जागो !
अर्चना .