आज असे दिवाळी
लाविते पणत्या दारी
आकाशकंदील सजविला
उजेड पडे घरी दारी
दिव्यांची केली रोषणाई
रांगोळीची सुंदर उधळण
स्नानास सुगंधी उट्टन
फराळाचा सुगंधी वास
नवीन कपड्यांचा उत्साह
साजरा होई दिपोस्तव
चंद्राने घेतली आज सुट्टी
पृथ्वी वरून दिसती
चांदण्याच्या पणातीत
लाविल्या चंद्रज्योती!
(सर्वांना कोजागिरीला चांदण्या सुरेख भासतात मला मात्र लक्ष्मीपूजन दिवशी )
अर्चना कुलकर्णी