काहीजण माझ्यापुढे चालत असतात ….
वाटेतले काटे वेचून घेत माझा मार्ग निष्कंटक करत राहतात ….
काहीजण चालत राहतात पुढेच …….
पण काटे टाळून वाट कशी काढायची हे दाखवत …
काही जण मागून येत होते जाणूनबुजून …
पायात रुतलेला काटा काढायला कुणी असावं म्हणून …
काहीजण मात्र पावलागणिक माझ्यासोबत राहिले ….
वाटेतल्या अदृश्य काट्यांची जाणीव करून देत …
डोळ्यांची भाषा बोलत … आणि …
हाताच्या घट्ट पकडीतून भक्कम आधाराची ग्वाही देत …
जर … त्या अदृश्य काट्या पुढे माझा अगदीच निभाव लागला नाही तर …
सारेच गुरू …
आई -वडील , शिक्षक ,समाजसेवक , भाऊ -बहिणी , मैत्रिणी- मित्र , पती …। ते सारे -गुरू …
माझ्या मनात झिरपणारे …सर्वाना भावपूर्वक नमस्कार !
५/९/२०१३