माझी खाबुगिरी...
खाण्यासाठी जन्म आपुला . मला तर देवाने पृथ्वीवर विविध पदार्थांचा आस्वाद घ्यायलाच पाठवले आहे. भरपूर खा आणि मस्त रहा हेच आपल्या जीवनाचे ब्रीद वाक्य आहे. ज्या प्रदेशात जाईन तिथले पदार्थ खायचे, करून बघायचे आणि इतरांना खायला घालायचे असा शौक आहे. गुजरातचा ढोकळा, हांडवो, मुठिया, तामिळनाडू चे इडली, डोसे, उत्तपे,कर्नाटकाचा बिसिबिल्ले, केरळचा मलबार पराठा व कुर्मा, राजस्थानचा दाल, बाटी, चुरमा, पंजाबचे सरसो का साग, माँ की दाल तसेच इटालियन पिझ्झा, पास्ता, चायनीज नूडल्स, मन्चुरिअन घरी इतक्या वेळेस होतात की ते आमच्या घरचे झाले आहेत. दोन्ही मुलांनादेखील तीच आवड आहे. ती माझ्यापेक्षा दोन पावले पुढेच आहेत, मी फक्त शाकाहारी तर मुले मिश्राहारी. आता मुलांकडे कॅनडाला तीन महिने होते तेंव्हा घरी मी भारतीय पदार्थ करायचे तर बाहेर जावू तेंव्हा विविध देशातील खायचे असे मुलांनीच ठरवले. मग काय माझी अगदी मज्जा.
अनेक देशातील लोकं तिथे राहतात त्यामुळे वेगवेगळी खाद्यसंस्कृती आलीच.
कॅनडाची प्रसिद्ध डिश म्हणजे पुट्टीन...बटाट्याच्या चिप्स (फ्रेंच फ्राईस )त्यावर चीज कर्ड त्यावर पाहिजे तर चिल्ली सॉस . छान वाटले.
इथे आठवडाभर कामाच्या वेळेस ब्रेकफास्ट म्हणून क्रॉसो, बेगल, सलाड किंवा सँडविच खाल्ले जाते.
कॉफी इथे खूप प्याली जाते, टिम हॉरटन इथला ब्रँड,प्रत्येक कोपऱ्याला असतेच.काही कॅफे अगदी २४ तास सुरू ती.काळी कॉफी जास्त प्रिय. स्टार बक्स किंवा इतरही बरीच कॉफी ची दुकाने दिसतात. हल्ली चहा प्रेमीकरिता मसाला चहा देखील दिसतो.
माझा धाकटा लेक हेड बेकर आहे, त्याच्या 16 विविध प्रकारचे ब्रेड बनतात. तिथे ब्रेकफास्ट ला आम्ही गेलो. राय अक्रोड ब्रेड मध्ये केलेले पालक सँडविच,बेक्ड पोटॅटो बाउल,(चीज घालून ), बटर क्रोसॉ, scone खाल्ले.
मेक्सिकन ,जापनीज ,चायनीज ,
थायी ,कोरियन,इथिओपियन, जोरजियन, युक्रेनियन आणि अर्थातच इंडियन अश्या जिभेचे चोचले पुरवणारे खाद्यपदार्थ इकडे मिळतात.
मेक्सिकन खाद्यपदार्थ बरेचसे आपल्या भारतीय पदार्थाशी नाते जोडतात.
बाउल मध्ये खाली भात (बासील घालून जीरा राईस ) त्यावर बेक्ड बीन्स ची भाजी ,त्यावर टोमॅटो कांदा,सिमला मिरची,पनीर / टोफू टॉस करून केलेला साल्सा ,सॉस त्यावर खूप सारे चीज किसलेले आणि वर आवाकाडो चटणी . मस्त पोटभरीचा प्रकार.
Taco bell हा फ्रँकी सारखा प्रकार..
एंचीलाडा.Tortilo नामक पोळी सारखा प्रकार मिळतो, त्यात बीन्स किंवा भाजी घालून भरपूर चीज किसून आणि Ranch (मेयोनीज सारखे पातळ ) टाकून फोल्ड करून गट्टम करायचे.
Subway सारखे आउटलेट आहेत, तिथे सँडविच घेतले.
शाकाहारी एकच प्रकार मिळाला.
बर्गर शाकाहारी मिळत नाहीत.
युक्रेनियन पदार्थातील पेरोगी हा पदार्थ आपल्या करंजीच्या आकाराचा, मध्ये mash बटाटा किंवा चीज किंवा छोट्या कोबीची आंबवून केलेली भाजी भरून-- उकडून किंवा बेक्ड मिळतो. मसाले वेगळे असतात. छान होते.
इथिओपियनमध्ये जाताना मनात धास्ती होती, इथे शाकाहारी मिळेल का? पण इथे ही भरपूर प्रकार होते, vegetable platter मध्ये इंजिरा ब्रेड सोबत ४भाज्या. इंजिरा ब्रेड म्हणजे आपल्या डोश्यापेक्षा मोठा,टेफ पीठाला आंबवून बनवतात. आयीब रोल, शिरो म्हणजे काबुली चण्याची भाजी..
इथे आपल्यासारखेच बोटाने खायचे... काटे चमचे नाहीत.मनापासून आवडले ते पदार्थ...
जोर्जीयन मध्ये phkali प्लेटर म्हणजे लवाशी ब्रेड सोबत अक्रोड, गाजर, पालक आणि बीट मिश्रण... वेगळा आणि चविष्ट पदार्थ.
तैवानी मध्ये शाकाहारी असेल अशी आपल्याला कल्पना नसते. इथे एक पूर्ण शाकाहारी तैवानी रेस्टॉरंट आहे. तिथे शाकाहारी, vegan मिळतेच पण आम्ही भारतीय तिथे गेल्यावर शेफ येऊन विचारले, *vegetarian... Is onion, garlic ok?*
खूप आश्चर्य वाटले. सूप,मोमो, दोन प्रकारच्या भाज्या,(टोफू, वांगी,पालक,मुळ्याच्या चवीची एक चिल्ली सोया )दोन प्रकारचे भात... भरपूर प्रकार ऑर्डर केले, चवीने खाल्ले. तृप्त झालो. त्यांच्या प्लेट चा पोरशन जास्त असल्याने शिल्लक अन्न घरी नेले.
करिबीयन मध्ये देखील रोटी व भाजी मिळाली.
एक दिवस मध्य आखाती देशाचे रेस्टॉरंट मध्ये - Spanakopiti (चीज and पालक dish) घेतली व फलाफल platter with yam फ्राईस...एक प्लेट दोघांना पोटभरीची होती.
जपानी मध्ये शाकाहारी फक्त सलाड होते सोबत वसाबी sauce ते घ्यायचे किती तर काट्याने (chop stick )टोचून येईल तितकेच. मी तिखट प्रेमी म्हणून जरा जास्त घेतले, जीभपासून अन्ननलिकेपर्यंत तिथून कानापर्यंत प्रचंड जळजळ दोन मिनिटे पाणी प्यावे हेदेखील सुचलं नाही.5 मिनिटानंतर एकदम सगळी जळजळ गायब.
तिबेटी रेस्टॉरंट मध्ये शाप्ता घेतले, लसूण, टोमॅटो, मशरूम ची भाजी सोबत भात.. ह्याची चव जवळपास आपल्या भारतीय जेवणासाखी होती.
Dessert तर मजा आहे ,खूप सारे निरनिराळ्या flavourche आइसक्रीम ,योघर्त , ब्राउनी , केक्स .
सिर्फ पेट नही दिल भी खुश करनेवाला ...अपना लजीज खाना....ये मेरी खाबुगिरी पढना अच्छा लगा?
इसलीये युही खाते रहो, खिलाते रहो...
अर्चना कुलकर्णी.