Sunday, 5 November 2023

जन्म..

 श्वास, जन्म, भास,आभास

(शब्दसमूहावरून काव्य )

अचानकच काय होतंय?

का होत आहेत भास?

अजून कोणी माझ्यासोबत

घेत आहे भरून श्वास!


जाणीव नवागताची

की सारे आभास?

होईल पूर्ती स्वप्नांची

सत्य होऊ दे सारे भास!


वाट पाहते तिच्या जन्माची

उजळेल रात्र चांदण्यांची

हाक माझ्या आईपणाची

करू तयारी स्वागताची!


अर्चना कुलकर्णी.

No comments:

Post a Comment