आण्टी , युज आण्ड थ्रो चा जमाना आहे , इतक्या मोठ्याने समोर ची मुलगी म्हणाली , अन माझे लक्ष समोर बसलेल्या तिघींकडे गेले . शनिवार संध्याकाळ ची वेळ ,गाडीत फारशी गर्दी नव्हती, मी ,जरा उत्सुकतेने त्या तिघींकडे पाहू लागले . तिघी वेगवेगळ्या वयाच्या ,पण नात्यातल्या वाटत नव्हत्या . बहुधा एका कार्यालयात काम करणाऱ्या असाव्यात ,
अग , युज आण्ड थ्रो कसे काय म्हणतेस ? ते चांगले पालक असतात ना ?
मुलगी १ :पालक ठीक आहे ,चांगले कि वाईट ते ज्याचा त्याचा विचार !
ऑन्टी :असे कसे , इतकी वर्षे तुम्हाला सांभाळले ,मोठे केले मग आता तुमचे कर्तव्य नाही का ?
मुलगी १ : ओके ,मग मला सांगा ,तुम्ही मुलांना मोठे करताना ज्यावेळेस कोणतीही गोष्ट त्याने स्वतः हून केली की तुम्ही कौतुक करता , स्वतः कपडे घालतो , स्वतः जेवतो , अभ्यास करतो वगैरे वगैरे मग जेव्हा तो स्वतः च्या PARTNER विषयी निर्णय घेतला की का सगळे चिडतात ?
मुलगी २ :आता माझ्याबाबतीत बघा ,सगळे खरे तर बघून ठरवून झाले . पण हनिमून ला कुठे जायचे ते आम्ही दोघांनी ठरवले तर त्याच्या बाबांना किती राग आला . किती दिवस तरी मला बोलत होते .
ऑन्टी : अग , द्यावा मान मोठ्यांना
मुलगी १ : मै मेरे मा पापा कि एक हि बेटी हु , तो मेरे ममी पापा मेरे से उम्मीद नही करते कि मै शादी कर के उन के साथ रहुंगी . तो फिर लडके के PARENTS ने भी वैसे हि सोचना चाहिये न ? आप भी देख लो जिनकी एक या दो बेटिया है , वो लोग जादा ख़ुशी से जीते है , और जिनके बेटे है वो तो हमेशा यही चिंता मे मग्न राहते है कि बहु के साथ हमारा कैसा होगा !
मुलगी २ : BTW ऑन्टी ,पूर्वी वानप्रस्थाश्रम असायचा तो कधी ?
आता त्याचे नाव वृद्धाश्रम असले तर तिथे राहून जायला काय हरकत आहे ?
मुले ही लवकर स्वावलंबी होतील . जे प्रत्येक आई -वडिलांचे स्वप्न असते आणि ते ही स्वतंत्रपणे जगू शकतील .
जितके लांब लवकर होतील तितके नाते जास्त चांगले टिकेल , कटुता येण्यापूर्वी च जर असे झाले तर चांगलेच नाही का ?
नक्की कोणाचे बरोबर ? आमच्या पिढीचे की ह्या समोर दिसणाऱ्या युवा पिढीचे ?
असा विचार करत मी गाडीतून खाली उतरले …
अर्चना