Thursday, 25 April 2024

समज

 *शब्द रजनी साहित्य समूह आयोजित उपक्रम अलक*


*२३/०४/२०२४*


*विषय - समज*


दहावीतला तिचा मुलगा अभ्यास न करता तासभर टीव्ही बघत होता, हे ती कामावरून घरी येताच सासूबाईंनी सांगितले.

ती चिडून त्याला ओरडू लागली. 



दोन मिनिटात तो म्हणाला टीव्ही पाहिला चुकले, वेळ गेला वाया पण आता तू ओरडत राहिलीस तर वेळ अजून वाया जाईल... मी करतो अभ्यास. 



अर्चना कुलकर्णी

भावना

 शब्दरजनी साहित्य समुह आयोजित उपक्रम 

विषय - गुंता भावनांचा 


गुंतले तुझ्यात 

माझी नुरले मी 

गुंता भावनांचा 

कसा सोडवू मी?


यत्न असफल 

 नाते भावनांचे 

अतूट होईल 

प्रेमे वीणायचे 


विविध रंगाचे 

गुंफून ते धागे 

खेळ हे मनाचे 

उगा येई मागे 


लालरंगी धागा 

हळूच हसवी 

मनातच जागा 

घेऊन दाखवी 


भावनांचा खेळ 

आपल्या मनाचा 

नाही कुठे मेळ 

स्पर्श प्रकाशाचा!


अर्चना कुलकर्णी. नासिक

Tuesday, 23 April 2024

अलक

 *शब्द रजनी साहित्य समूह आयोजित उपक्रम अलक*


*२३/०४/२०२४*


*विषय - समज*


दहावीतला तिचा मुलगा अभ्यास न करता तासभर टीव्ही बघत होता, हे ती कामावरून घरी येताच सासूबाईंनी सांगितले.

ती चिडून त्याला ओरडू लागली. 



दोन मिनिटात तो म्हणाला टीव्ही पाहिला चुकले, वेळ गेला वाया पण आता तू ओरडत राहिलीस तर वेळ अजून वाया जाईल... मी करतो अभ्यास. 



अर्चना कुलकर्णी

चित्रचारोळी



 चित्रचारोळी 


मनात खूप काही साठलेले 

तरी ओठ मात्र शिवलेले 

वाटे दातांना तोडावे बंधन 

तरीही ते पहाऱ्यात अडकलेले 



अर्चना


खारुताई....



केले तुझ्यावर प्रेम चोरून

ठरवले आज मात्र

टाकावे मनातले सांगून

वाचला प्रेमाचा मंत्र,

द्यावा म्हणे लाल गुलाब

शोधला किती दिवस

नाही लागला हाती गुलाब

टोचले मात्र फार काटे 

बसलो होतो तळ्याकाठी

आठव सदा तुझीच मनी

दिसली ही सुंदर फुले

रंग त्यांचा जांभळा छान

आवडतील ना तुला राणी?

घेऊन हात हाती

गाऊ गोड गाणी....


अर्चना कुलकर्णी..

मीन


 शब्दरजनी साहित्य समूह 

चित्रकाव्य 


नदी, तळी, नाले 

सारे काही आटले 

मीन रस्त्यावरी

पाण्याची बाटली 

घेई पाठीवरी 

जलचर धावे 

धरा भेगाळलेली 

जगणे अशक्य मला 

मानवा लोभ आवर 

नसे रे ही प्रगती 

होते आहे अधोगती 

जप निसर्गाला 

वाढव झाडांना 

वाचव पाण्याला

जागा हो आता तरी 

घे तू जबाबदारी!


अर्चना कुलकर्णी नाशिक.

Tuesday, 2 April 2024

मला बी शाळला येऊ द्या की

 मला बी शाळला येऊ दे की ग 

मला बी शाळला येऊ दे 

छान गणवेश घेऊन द्या की ग 

मला बी शाळला येऊ दे की ग 

झाली आता मी बी मोठी 

घेतली की मोठी गदा हाती 

मला बी थोडं शिकू द्या की ग 

मला बी शाळला येऊ दे की ग 

पाटी, पुस्तकं घेऊन द्या की 

गोड गोड गाणी म्हणू द्या की 

पुस्तकं वाचाय शिकू द्या की ग 

मला बी शाळला येऊ दे की ग 

माझ्या बी मैतरिणी व्हाल ना तुमी 

तुमच्याशी खेळाया घ्याल ना तुमी 

अभ्यास कराया शिकवाल तुमी 

मला बी शाळला येऊ द्या की ग 

मला बी शाळला येऊ द्या की 


अर्चना कुलकर्णी.