काटा रुते कोणाला .....
आज सकाळपासून की काल संध्याकाळपासून माझे मन कशात नाही आहे .... आईला ही ते जाणवले आहे म्हणून सारखी माझ्या पुढे -मागे करते आहे . त्याचा ही आता त्रास होतोय ..... आईला सांगू शकत नाही .... तिला आधीच फार विवंचना आहेत .... आज कामावर जाण्याचा पण मूड नाही ..... छे , घरातून तर बाहेर पडू या ...बघू काही उत्तर सापडते का ...... बस, अशा विचारात बाहेर पडले ,आणि स्कूटी स्टार्ट केली ..... आज नेहमीचा रस्ता सुद्धा अनोळखी झाला ....एका वळणावर अचानक एका पाटीने माझे लक्ष वेधून घेतले .... नारी समता मंच ....yes आता इथे जावून प्रयत्न करू या आपले मनोगत सांगण्याचा ...... थांबले तिथेच .... पण मनाचा निश्चय होत नव्हता ..... हळूहळू करत पहिल्या मजल्यावरील त्या कार्यालयात शिरले .... काम करणार्या महिलांनी मला बसवयास दिले अन माझ्या गर्भार पोटाकडे ... हळूच गळ्यातल्या मंगळ्सूत्राकडे ,कपाळावर नसलेल्या टिकलीकडे नजर फिरवली .... का आली असेल ? असे चेहर्यावरचे प्रश्नचिन्ह सहज वाचता येत होते ...... तेवढ्यात संचालिका बाई आल्या .... अतिशय प्रेमळ ,मृदु आवाजात म्हणाल्या 'बोल बेटी ,काय हवे आहे तुला ?'" .......त्यांचा मृदू पण आश्वासक आवाज ऐकून माझ्या डोळ्यातून कालपासून साठून राहिलेले पाणी झरू लागले .....थोडा वेळ जावू दिला त्यांनी आणि मग पाठीवरून मायेने हात फिरवत म्हणाल्या , तू आता इथे आली आहेस , कसली ही काळजी करू नकोस , जे मनात असेल जो काही त्रास असेल ते सांग....... अश्रू आवरून मी सांगू लागले .... मला त्रास स्वतः ला काही नाही .... पण जे सांगायचे आहे ते खूप मोठे आहे .... काही हरकत नाही ,तू सांग मला " ..... त्या आधी तुझे नाव तरी सांग .....
त्यांच्या त्या बोलण्याने मनाचा निर्धार केला आणि
माझे नाव रेवा , मी एका I V F सेंटर मध्ये काउन्सेलर म्हणून काम करते , आमचे डॉक्टर पाटील शहरातले नावाजलेले ,प्रतिष्ठित स्त्री रोग तज्ञ , प्रसूती तज्ञ आहेत , तीन महिन्यापूर्वी आमच्या कडे एक स्त्री आली होती . फार मोठी नाही असेल २२ -२३ वर्षाची …गौरी तिचे नाव …दिसायला अतिशय सुंदर ,नाजूक … डोळे पण छान बोलके …. तिच्याबरोबर तिचा नवरा नव्हता आला तर सासरे आले होते …. हे च आधी मनाला पटले नव्हते … ती डॉक्टरांकडून काम झाल्यावर माझ्याशी बोलायला आलि. अर्थात माझे ते काम च होते . …डॉक्टरांनी तिला समजवायची जबाबदारी माझ्यावर टाकली होती . तिचे शरीर गर्भ धारण करण्यास अनुकूल नव्हता , उगाच टेस्ट टुब करण्यात अर्थ नाही …. आमचे डॉक्टर त्याबाबतीत एकदम शिस्तीचे …. जर यश मिळणे शक्य नसेल तर कोणाला आशा लावायची नाही , मिळतो म्हणून पैसे घ्यायचे नाहीत … आता हे सर्व मी तिला सांगितले …. तिच्या नजरेतली चमक पूर्णपणे नाही शी झाली … सासरे उठून पैसे भरायला गेले , तेव्हा ती पटकन म्हणाली " चलो अब सभी आशा खात्म हो गयी !' मला राहवले नाही , खूप समजवले तिला , तेव्हा म्हणाली इस से पहले दो डॉक्टर के पास जा क हुआ है ।दोनो बार तिसरे महिने मे सब खात्म होताथा !" यहा आ के पहले हि दिन सब खतम …" मनात आले अरे बाप रे इतक्या लहान वयात …. कसे झेलले तिने ! तितक्यात सासरे आले . अगदी हसून बेटी इस को कुछ सामाझावो ! अब नाही होगा बच्चा तो हम क्या करेंगे ? …. मग इतक्या लहान वयात सारखे डॉक्टर कडे का घेवून जाता ? तिचा नवरा का सोबत येत नाही ? हे सारे प्रश्न मनातच राहिले …. गौरी चेहऱ्यावर घुंघट घेवून चालू लागलि… आणि तो विषय सुद्धा ….
काल परत तेच तिचे सासरे आले होते … एका १७-१८ वर्षाच्या मुलीला घेवून …ती त्यांची होणारी सून होती …. तेच तुपकट हसू दाखवून म्हणाले हिची अगोदर च तपासणी करून घेतोय …. म्हणजे नंतर काही भानगड नको … पण गौरी ? डोळ्यात थोडेसे (खोटे )दुखः दाखवत म्हणाले …. तुम्ही तिला एवढे समजावले …. आम्ही घरून पण म्हटले आपल्याला वारस नाही झाला तर काही काळजी नाही …. हवे तर दुसरे डॉक्टर कडे जावू …. पण तिचे कामात लक्ष च नव्हते … आम्ही घरात नव्हतो आणि माहित नाही कसे काय ग्यास चा स्फोट झाला आणि गौरी गेली …. . आता तीन महिने झाले … घरात कोणी बाई माणूस नाही … पोराला म्हटले कर दुसरे लग्न …दुसरा काय करणार न ? … मी पाहिले तर ही दिसायला गौरीपेक्षा हि सुंदर …. पण चेहऱ्यावर गरिबी दिसून येत होती … तिच्या डोळ्यातले भाव मला जाणवले …. काय कारुण्य होते तिच्या नजरेत … तिची आई पण सोबत होती … आई ची नजर लाजिरवाणी होति…. मनात येत असावे लग्नापूर्वी अशी तपासणी का करावी ? … पण गरिबीला बोलत येत नाही …. डॉक्टर ना भेटले ….सगळे ठीक आहे … असा निर्वाळा मिळाले …ते तिघे निघून गेले …. आणि मला सुचेनासे झाले …खरच गौरी कशाने गेली असेल ? ती पण गरीब च होती का ? ती त्याची पहिली बायको होती कि कितवी ?तो तिचा नवरा का येत नाही ?की हा म्हातारा माणूस च नवरा … ,,,, किंवा त्याची आई देखील कशाने वारली असेल ? …. आणि बायको म्हणजे फक्त प्रजोत्पादन करणे असे का आज हि महत्वाचे मानले जाते ?…. तिला मन नसते का ? तिच्याच बाबतीत असे नाही पण अजून हि मुलगी झाली म्हणून कपाळावर आठी घालणारे वडील दिसतात ……. अशिक्षित सासू दिसते … एवढेच नाही तर शिक्षित सासूदेखील ,पाहिली आहे , अगदी परवाच … फक्त ती आरडओरडा करत नाही हा च काय तो फरक … मुलगी -नात झाली असे म्हटल्याबरोबर तिला न बघता आजी ऑफिस ला गेली …। मग सून म्हणाली , नातू झाला असता तर सासूबाई VRS घेणार होत्या …. पण आता काही त्या नाही घेणार …. म्हणजे फक्त मुल नाही तर मुलगाच च हवा असा हट्ट का ? …. किती पिढ्या असे चालणार ? …मुली होणे चूक आहे का ? मुल झाले झाले नाही तर स्त्री जगू शकत नाही का ? तिला किती स्त्रिया समजून घेत असतील ? खूप उद्धवस्त झाले आहे मी …।
रेवा शांत हो , तुझ्या ह्या परिस्थितीत तू जास्त tension घेवू नकोस … तुझ्याकडे त्यांचा पत्ता आहे का ? किंवा फोन नंबर ? …. पत्ता, फोन नंबर मी नाही देवू शकत … आमच्या हॉस्पिटल नियमांविरुद्ध आहे ना ? …. अग पण जर तू काही नाही दिलेस तर आम्ही कसे शोधणार ?आपण कदाचित अगोदर घडलेल्या घटनांबाबत काही करू शकणार नहि… पण आता जी मुलगी लग्न करणार आहे तिची तर काळजी घेवू शकतो ना ? ती लग्न मोडणार ही नाही , पण तिला कल्पना दिली तर ती सजग राहील … तू देतेस का नंबर ? …. थांबा ,मी आधी डॉक्टर न विचारते …. oh नो , मी मोबाईल घरी च विसरले वाटते …. आता आई काळजी करणार ….तिने हॉस्पिटल मध्ये हि एव्हाना फोन केला असेल …. मी आधी घरी जाते …. उद्या येवून सर्व काही सांगते …. अन तिथून मी बाहेर पडले …।
मी तिथून बाहेर पडली ती काहीशी हलकी होवून च …काल पासून जे मनावर मळभ आले होते ते दूर झाल्यासारखे वाटत होते …. घरी जाताना खात्री होत होती की जरी आपण गौरीला मदत करू शकलो नाही तरी ह्या सुंदर मुलीला तरी आपण सावध करू शकू …. लग्न ठरले असल्याने मोडण्याचा विचार ही तिच्या घराची माणसे करणार नाहीत ,पण तिच्या बाबतीत काही गैर घडू नये हे तरी पहात येईल …. ह्या विचारात आपले घर कधी आले ते कळलेच नाही ….
आई वाट बघत होती …. काय झाले रेवा ? बरे नाही का ? आणि मोबाईल घरी च कसा राहिला ? … काही नाही ग ,जरा डोके दुखते आहे मी विश्रांती घेते ….होईल बरे तू नको काळजी करूस … असे कसे काळजी नको करूस … दोन जीवाची आहेस तू … जरा दुध पी आणि मग आराम कर …।
आज दोन दिवसांनी मी परत त्याच कार्यालयात जाते आहे … डॉक्टर ना पूर्ण कल्पना दिली .त्या माहितीचा दुरुपयोग होणार नाही हे पटवून दिले आणि मी तो नंबर त्यांना देते आहे …. … मी आता शिरताच ,अरे वा रेवा आज अगदी छान दिसते आहेस … बस इथे … परत तेच मृदू शब्द …. जीव सुखावतो असे ऐकून … त्यांना नंबर, पत्ता दिला … माझ्याकरिता आलेला गरमागरम चहा घेण्याचा आग्रह मला मोडवेना … चहा घेत असताना , मला म्हणाल्या "मला कल्पना ताई म्हणतात " तू मला मावशी म्हटलेस तरी चालेल … पण तुझ्या मनातले जे वादळ आहे ते ही तू सांग … " छे तसे काही नाही " " अग ,कदाचित तुझ्या जन्माच्या आधीपासून मी हि कामे करते आहे , आधी संस्था नव्हती , घरूनच करायची … लष्कराच्या भाकर्या असे सर्व जण म्हणायचे … पण मला स्वस्थता हे काम करूनच मिळते . बोल तू निसंकोच पणे ….
"कल्पना मावशीचे ते शब्द ऐकून माझ्या मनाचा बांध फुटला …. का रडायला लागले हे ही कळेना …. "हे बघ मनाला त्रास होत असेल तर नको सांगूस , पण सांगशील तर उपाय ही सापडेल … " पाठीवर फिरणारा हळुवार हात ,…. /तो च हातात घेवून सांगू लागले …. मी रेवा ,हे तर तुम्हाला माहित आहे च … आई -बाबांची एकुलती एक …. खूप लाडात , पण शिस्तीत ही वाढवले आई-बाबांनी …. मी होमेओपथि च्या शेवटच्या वर्षाला असताना एका मैत्रिणीच्या लग्नात माझी आणि राजेशची गाठ पडली …। त्याला मी बघताक्षणी आवडले … आणि दोन तीन दिवसात एखाद्या चित्रपटात घडावे तसे तो मला कॉलेजला भेटण्यास आला ….
माझे शिक्षण पूर्ण होत होते …. मी लगेच च घरी सांगितले … आईचा पहिला प्रश्न तुला पण तो आवडला आहे का ? काय करतो ? त्याच्या घरी माहित आहे का ? आपली जात वेगळी आहे हे त्याला सांगितलेस का ? …प्रश्नाची सरबत्ती सुरु राहिलीच … तितक्यात राजेश आमच्या घरी आला …. त्याने माझ्या आई -बाबांचे मन जिंकले …B.Tech .. M.B.A. चे त्याचे शिक्षण …. चांगल्या पगाराची नोकरी … बोलण्यात वागण्यात नम्र … दिसण्यास रुबाबदार …. अजून काय हवे ? … त्यातून माझे शिक्षण पूर्ण होईस्तोवर थांबू या … तोवर भेटण्यास परवानगी मोठ्या हुशारीने त्याने घेतली …. ते सहा महिने खूप आनंदात गेले … सुरुवातीला त्याच्या घरून जातीमुळे विरोध होता … पण कदाचित मुलगा ऐकत नाही म्हणून किंवा मी हि त्यांना पसंत पडले असेन …. त्यांचा विरोध मावळला …इतका की लग्नात कोणी काही बोलले तर राजेश ची आई आमच्या बाजूने उत्तर देत होती …. खूप हौसेने आईबाबांनी ,राजेश च्या घरच्यांनी लग्न केले …. लग्नानंतर ही सासू असे कधी त्या वागल्याच नाहीत … आपल्याकडे असे करतात असे समजावून सांगत … तुझ्या माहेरी काय करतात असे उत्सुकतेने विचारत ? … सहा महिने सर्व सण … सुट्ट्या दोन्ही कुटुंबे आनंदात घालवत होतो …. त्यांना जाणीव होती एक च लेक मग तिच्या आई बाबांना आता एकटे वाटत असेल म्हणून मुद्दाम बोलावून घेत …… तुझ्या करिता सुरुवातीला घरून च दवाखाना सुरु कर मग आपण दुसरीकडे शोधू असे म्हटले गेले …… आणि जुन मध्ये राजेश कामावरून घरी परतत असताना रस्त्यावरच्या खड्ड्याचा अंदाज आला नाही
…. आणि तो उडून नेमका ट्रक च्या समोर … क्षणात होत्याचे नव्हते झाले …डोळ्यापुढे अंधकार …
मला तर काही च कळेना …. आठवडाभरापूर्वी डॉक्टर मी आई होणार , ह्याचे घरी CELEBRATION केले होते … आणि आता अशी स्थिती झाली होती …. येणारा प्रत्येक जण हळहळत होता …. त्यातच कोणी एक सासूबाईची मैत्रीण आली होती … सगळे विचारून झाले आणि मग हळूच म्हणाली … सुनेची पत्रिका पाहिली होती का ? … अर्थात च नकारात्मक उत्तर मिळाले … मग एक एक कहाण्या कडक मंगल …. कोणी म्हणे राक्षस गणी असले कि असे होते … आपण कोणत्या प्रसंगाला आलो आहोत …. मी तिथे च बाजूला बसून रडते आहे …हे कोणी समजून घेत नव्हते …शेवटी आईनेच मला दुसर्या खोलीत नेले …. वयाच्या चोविसाव्या वर्षी माझ्या वर असा प्रसंग यावा …. ह्यात दोष कोणाचा ? माझाच ? की माझ्या नशिबाचा ? कोण लिहिते हे नशीब ? … आपण ही असे च निघून जावे वाटू लागले …. कशासाठी जगायचे ? …. तेव्हा खूप धीर दिला आई-बाबांसोबत माझ्या मैत्रिणीनी …. खूप समजूत घातली …. तुझ्याबरोबर तू येणाऱ्या ही जीवाला त्रास देते आहेस असे म्हणून बळेबळे खायला लावले ….चार च दिवस झाले आणि राजेश ची आई म्हणाली , "तुला इथे राहून त्रास होईल , तू माहेरी जा , मी तुझ्या आईला बोलावून घेते " आणि मी माहेरी आले … समजले नाही त्यांच्या बोलण्यात प्रेम होते कि मुद्दाम मला दूर केले जात आहे …. आई कडे आल्यावर मी थोडे शांत झाले … मैत्रिणी येवू लागल्या … खूप वेगवेगळ्या विषयावर गप्पा होवू लागल्या …. पण कोणी हि राजेश चा विषय काढत नव्हते … एका मैत्रिणीच्या ओळखीने ह्या डॉक्टर च्या हॉस्पीटल मध्ये नोकरी देखील मिळाली ,,, खूप काही नवीन शिकायला मिळते आहे … मी शांत आहे असे वाटते …. तोच काही दिवसांनी आई -बाबांचे बोलणे कानावर पडले … राजेशच्या आकस्मिक मृत्यूला मी च जबाबदार आहे असे राजेशच्या आईने बाबांना सांगितले … रेवाला परत आमच्या घरी पाठवू नका …. तिच्यामुळेच आमचे सर्व सुख नाहीसे झाले आहे … असे बरे च काही बोलण्यात आले …. त्यामुळे आई-बाबा माझ्याशी आता तो विषय काढीना …. शेवटी मी मैत्रीणीना विचारले … नक्की काय झाले आहे ? तेव्हा ज्योती (माझी जवळची मैत्रिण) म्हणाली अग राजेश चे जे काही पैसे आले त्यावर तुझा अधिकार नाही , घरातही तुला स्थान नाही असे सांगितले आहे …तू तरुण आहेस ,तू कमवू शकतेस … दुसरे लग्न पण करशील मग तुला राजेश च्या घराकरिता काही करावे लागणार नाही … त्यामुळेच तुला आता काही अधिकार नाही … .आई- वडिलाच तो च एक आधार होता …. पण मग होणार्या बाळाचे काय ? त्याचा आधार कोण ? त्याचे वडील नाहीत ,म्हणून कोणीही नाही का ? … त्यावर देखील त्यांचे उत्तर होते … जर मुलगी झाली तर ती दुसर्याची च होणार मग तिला हि अधिकार नाही …. जर मुलगा झाला तर आम्ही त्याला सांभाळू … पण रेवा नको … का का का ? ह्या प्रश्नांना उत्तरे नाहीत …. आई बाबा सध्या शांत आहेत ,मला न कळू देता वकिलाचा सल्ला घेत आहेत … मला ह्या अवस्थेत कोणताही त्रास देण्याचा त्यांचा विचार नाही …
पण मावशी मला सांगा आज ही असे च का चालू आहे ? मुलीची पोटात च हत्या करण्यात येते …हे जितके वाईट आहे त्या पेक्षा हि भयंकर अशी हि वागणूक आयुष्य भर स्त्रीला दिली जाते …. कोणाला मुल होत नाही म्हणून छळ … मग देवादिकांचे उपास =तापास ते देखील तिनेच करायचे … जिला मुल होत नाही अशा स्त्रीला इतर स्त्रियादेखील नीटपणे समजून घेत नाहीत … तर कोणाला मुलीच होतात म्हणून छळ … कोणाला पर - पुरुषांशी बोलायला बंदी तर ,तर कोणाला पेहरावावर बंदी …आई -वडील खूप कौतुक केले तरी सासरी मिळेल ह्यांची खात्री नाही …. तिलाच का आयुष्यभर सर्वांच्या नजरा रोखलेल्या अवस्थेत जीवन व्यतीत करावे लागते ? का उत्तर नाही ह्या प्रश्नाला ? ….
मला अजून महिनाभरात मुलगा / मुलगी होईल … पण त्याच्या हक्काकरिता मी झगडावे का ? … मी झगडले तरी हि सर्वांची सहानुभूती हि राजेशच्या आई-बाबांकारिता च राहिले हे ही मला माहित आहे …. इतर कोणी कशाला माझे मन पण म्हणते की त्यांचे बरोबर आहे ,वृद्धपणी त्यांनी कशाच्या आधारावर जगावे ? पण मी काही वाईट न वागता देखील माझ्याशी असे का वैर करावे ? बरे मी तर बाहेरची पण होणारे मुल हे त्यांचे नातवंड असेल तरी हि ते नाकारू शकतात ? …. मला त्रास न व्हावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या आई-बाबांना माहित नाही आहे कि मी किती मोठ्या तणावाखाली जगते आहे …. त्यांच्यासमोर मला काही माहित नाही … असे दाखवत आनंदाने राहते आहे …. त्यात असे गौरी सारखे काही कळले की मी उन्मळून पडेन कि काय अशी भीती वाटते …
पण मावशी माझा निर्धार मी केला आहे , मी हक्काकरिता झगडणार आहे …. त्यावेळेस नक्की तुमच्या कडे येईन …. जर मी दोन महिन्यात तुम्हाला भेटायला नाही आले तर हि माझी कहाणी माझ्या अक्षरात लिहून तुमच्याकडे देते आहे … तसे च माझा पत्ता पण आहे …. तुम्ही मला न्याय मिळवून द्याल ना ?
पूर्वप्रसिद्धी - http://issuu.com/-012/docs/________________________-__________