Thursday, 10 July 2014

गुणगुणणे

गुणगुणणे  हे गुणगुणणे  असते
मनाच्या  विरंगुळ्याचे एक साधन असते !
त्याला सुराचे बंधन नसते ,
सोबत वाद्यांची संगत नसते

मुख्य म्हणजे ऐकायला कोणी आसपास नसते !



अर्चना '

२८/०२/२०१४

महिला दिनी

आज च्या ह्या महिला दिनी -
पहिला  माझा चरणस्पर्श फुलेंना (महात्मा ) करीन गं
स्त्री शिक्षणाची दारे उघडली त्यांनी गं !
दुसरे नमन सावित्रीना करेन गं 
रोष पत्कारुनी समाजाचा शिकुनी शहाणी झाली गं !
तिसरे वंदन महर्षिना (कर्वे) करते गं 
शाळा उघडॉनी  जागोजागी स्त्रीला जागे केले गं !
चौथा प्रणाम कर्मवीरांना करते  गं 
शिक्षणाचा मोठा प्रसार त्यांनी देशी केला गं !
पाचवा नमस्कार बाबांना करते ग
मुलगा -मुलगी भेद कधी नाही केला ग
सहावा नमस्कार आईला मी  करते ग
स्त्री जन्माची महती सांगून मज आत्मविश्वास दिधला ग
सातवे वचन माझे मलाच गं 
काम करता करता माझे अस्तित्व जगवेन  गं !
अर्चना कुलकर्णी .

08/03/2013

Saturday, 4 January 2014

शब्द 2

 शब्द जेव्हा असतात हसरे

मन जगाला विसरे !

शब्द होतात कधी बोचरे

भरते थंडीत ही कापरे !



गुणगुणणे  हे गुणगुणणे असते …

मनाच्या  विरंगुळ्याचे एक साधन असते

त्याला सुरांचे बंधन नसते

वाद्यांची साथ नसते

मुख्य म्हणजे जवळपास ऐकणारे कोणी नसते ….