आज च्या ह्या महिला दिनी -
पहिला माझा चरणस्पर्श फुलेंना (महात्मा ) करीन गं
स्त्री शिक्षणाची दारे उघडली त्यांनी गं !
दुसरे नमन सावित्रीना करेन गं
रोष पत्कारुनी समाजाचा शिकुनी शहाणी झाली गं !
तिसरे वंदन महर्षिना (कर्वे) करते गं
शाळा उघडॉनी जागोजागी स्त्रीला जागे केले गं
!
चौथा प्रणाम कर्मवीरांना करते गं
शिक्षणाचा मोठा प्रसार त्यांनी देशी केला गं !
पाचवा नमस्कार बाबांना करते ग
मुलगा -मुलगी भेद कधी नाही केला ग
सहावा नमस्कार आईला मी करते ग
स्त्री जन्माची महती सांगून मज आत्मविश्वास दिधला ग
सातवे वचन माझे मलाच गं
काम करता करता माझे अस्तित्व जगवेन गं !
अर्चना कुलकर्णी
.08/03/2013
No comments:
Post a Comment