Tuesday, 2 June 2015

वट पौर्णिमेच्या निमित्ताने

वट पौर्णिमेच्या निमित्ताने ---
आज सा-या  भिंतीवर एक च जाणवते , कि जुन्या रूढी ,जुन्या प्रथा किती चुकीच्या  अशी भावना 
पण ह्या सणा मागचा खरा उद्देश काय होता ? त्यातून काय साध्य होत होते हे विचार न करता , असे बोलणे चुकीचे आहे . 
पूर्वी खरोखर नवरा गेल्यावर स्त्रियांची स्थिती अतिशय भयानक होई , मग अशा वेळेला देवाची भक्ती करावी  जेणेकरून नवर्याचे आयुष्य वाढेल , हे एक कारण तसे च ह्या सणांच्या निमित्ताने विवाहित स्त्रियांना घराबाहेर पडायला मिळे ,आपल्या मैत्रिणींशी ,माहेरशी,निसर्गाशी   संवाद साधायला मिळत असे. ते त्या काळाला खरोखर साजेसे होते  …
आता त्या सणाचे रूप पालटले ,  पूजा करायला स्त्रीला ना वेळ असतो , ना जवळ तेवढी वडाची  झाडे असतात ,म्हणून 
आता वडाची फांदी तोडून आणून त्याची पूजा करतात ते हि तितकेच चुकीचे आहे . त्याचवेळी 
असे  च मनात आले , आज चा दिवस असता  जर पाश्च्यात्य कडून आलेला , 
                                  wife day  किंवा husband day 
                                   तर सा-यांनी  केल्या असत्या कथा उद्धृत 
                                वर्षाव स्तुतीसुमनांचा आपल्या सहचाऱ्यावर 
                               भिंत भरली असती , कविता न चारोळ्यांनी 
                               फोटो हि मग बदलले असते  तासातासाने !
                              
                              अर्चना 
२/६/२०१५ 

Monday, 18 May 2015

aruna shraddhanjali

तिचे ते जगणे का जीवन होते ?
विधाताच्या मनातले कोणा न कळते !
नराधमास सुटका मिळते !
निष्पाप जीवा मात्र यातना छळते !
जरी मिळाली आज शांतता !
लाभेल का आत्म्यास स्थिरता ?

माझी भावपूर्ण श्रद्धांजली!!
अर्चना
१८/०५/२०१५
पाझर

तिचे ते जगणे का जीवन होते ?
विधात्याच्या मनातले कोणा न कळते !
नराधमास सुटका मिळते !
निष्पाप जीवा मात्र यातना छळते !

सोबतच्या परिचारिकांचे मान पाझरले
बेचाळीस वर्षे तिला सांभाळले
दूध,  चहा,  अंघोळ पाणी प्रेमाने केले
डीन ने देखील लेक च मानले !

जरी मिळाली आज शांतता !
लाभेल का आत्म्यास स्थिरता ?



माझी भावपूर्ण श्रद्धांजली!!


अर्चना कुलकर्णी.

१८/०५/२०१५
(अरुणा शानभाग 5 वर्षांपूर्वी आज च्या तारखेस गेल्या,  तेव्हा सुचलेले )

Thursday, 7 May 2015

पोपट

काही दिवसापूर्वी एका ओळखीच्यांकडे गेले होते. 
बेल वाजवली , आतून मस्त पोपटाची शीळ  ऐकू आली . 
दार उघडले , त्या ताई बरोबर पोपट हि स्वागताला !
खूप मस्त वाटले , मनात आले बरे झाले ,पिंजर्यात अडकवून नाही ठेवले त्याला !
गप्पा चालू होत्या ,पोपट उड्या मारत इथून तिथे जात होता . 
एक लाकूड ठेवले होते ,त्यावर चोच उगाच च घासत होता . 
मध्य मध्ये  वेगवेगळे आवाज काढून बोलत होता . 
त्याच्या कौतुकात ,ताई  खूप बोलत होत्या . 
A.C.  शिवाय झोपत नाही दुपार चा , म्हणून हल्ली दिवसभर A.C. सुरु असतो . 
हे खातो ,ते नाही , चमच्याने कधी कधी भरवावे लागते वगैरे वगैरे … 
अरे वाह ,किती मजा न ?

पण मला राहवले नाही , विचारले की हा उडत नाही का ?
तेव्हा क्षणभर गप्प झाल्या ताई , पण लगेच च म्हणाल्या लहानपणी तो आमच्या खिडकीत आला न तेव्हापासून उडता च येत नाही आहे त्याला … 

छे , खूप वाईट वाटले …. 
पण त्याहून अधिक वाईट जेव्हा कळले कि त्याचे पंख छाटून , उरलेली पिसे काही धाग्यांनी बांधतात , मग त्यांना उडता येत नाही …. 

एकीकडे त्याची उडण्याची शक्ती कापायची अन दुसरीकडे त्याचे लाड , कौतुक करत राहायचे … 

काय वाटत असेल त्या पोपटाला ? 


असेच मनातले काही 
अर्चना 
७/५/२०१५ 

Tuesday, 28 April 2015

संध्याकाळी बस ने येताना

 संध्याकाळी बस ने येताना 

संध्याकाळची वेळ असल्याने ,बसला बर्यापैकी गर्दी होती . स्त्रियांकरिता राखीव आसनावर एक वृद्ध गृहस्थ बसले होते . पुढील स्टोप वर बस थांबली बर्याच महिला चढल्या . त्यातल्या एकीने सांगितले की ही जागा महिलांकरिता आहे , ज्येष्ठ नागरिकांना त्या बाजूला सीट आहे . त्यावर तो माणूस म्हणाला तिथे लोक बसली होती ,आहेत म्हणून मी इथे बसलोय . तिथे बसलेले ज्येष्ठ नागरिक होते का ? तर नाही , पण प्रत्येक जण आपण त्या गावचेच  नाही अशा अविर्भावात बसले होते किंवा जाणूनबुजून डुलक्या काढत होते . 
आता ती महिला उभी च राहिली . अजून पुढच्या स्टोप वर अजून काही महिला चढल्या . 
त्यातल्या एकीने अगदी तुम्ही इथून उठा , हि स्त्रियांची जागा आहे , तुम्ही दुसर्या बाजूला बसा . असे परत परत  सांगून त्या माणसाला उभे राहायला लावले . व स्वतः त्या जागेवर बसली . त्या वेळेस conductor आला व एका तरुणाला सांगून ही ज्येष्ठ नागरिकांची जागा आहे , तुम्ही इथे बसा ,असे सांगून त्यांना बसायची जागा दिलि. 
प्रसंग इथे संपला नाही , जी स्त्री अगोदरच्या स्टोप वर चढली होती , तिने दुसरीला म्हटले असे वयस्कर माणसाला उठवणे बरे नाही केले तुम्ही . 
ओ , तुम्ही मला काय बरे आणि काय वाईट ते शिकवू नकात . खरे तर तुम्ही च आधी सांगायला हवे होते . 
मी सांगितले पण ते उठले नाहीत आणि दुसरी सीट पण रिकामी नव्हती . 
अच्छा , म्हणजे तुम्हाला जे जमले नाही ते मला जमले म्हणून तुम्हाला राग का ?
नाही , असे नाही पण म्हाताऱ्या माणसाला उठवणे वाईट च . 
आता गप्प बसा , तुम्हाला बसायला मिळाले नाही तर माझ्या डोक्याशी कटकट नका करु. 
मला जे योग्य वाटले ते मी केले …. 


कोणाचे योग्य ?


अर्चना 
२८/०४/२०१५

Monday, 27 April 2015

मनातले काही



मनातले काही … 

झाडांना ही जीव असतो , आपण जसे प्रेम देवू तसे ते वाढतात , असे म्हणतात . प्रथम विश्वास नव्हता  पण आताशा खरे वाटू लागले आहे . 
सदाफुली माझे आवडते फुल ,त्याला पाणी घालताना माझ्या चेहऱ्यावर हास्य फुलते आणि मग कोणत्याही मोसमात, कोणत्याही देशात , ती फुलून माझ्या मनाला गारवा देते . 
अबोली , तिला पाणी घालताना विचार येतो खरे तर कोणतेच फुल बोलत नाही मग हीच का फक्त अबोली ?
अच्छा , फुल बोलते ते गंधातून , तो तिच्याकडे  नाही ,म्हणून ती अबोली . पण मला तिचे नाजूकपणे उमलणे बघायला खूप आवडते , हळूहळू एक एक फुल फुलते , अशा प्रकारे फुलणारी  ती एकटीच अबोली … मस्त फुलून येते माझ्या घरी । 
जास्वंद ,त्याचा लालबुंद रंग मन अगदी आकर्षून घेतो . देवाला ही प्रिय फुल.  उमलण्यापूर्वीच चाहूल देते . 
देवघर खुलून दिसते . 
सोनचाफा ,त्याच्या सुगंधाने मन वेडे होते . कुंडीत वाढेल का ? ह्या वर हो उत्तर मिळताच मी घेतले विकत . सुरुवातीला रुसला होता , मग मात्र आता ह्या मोसमात येईल फुल असे म्हणत पाणी घालत गेले आणि खरोखर चाफा ही कुंडीत मस्त बहरला … 
मोगरा , त्याला पाणी घालताना तर 'मोगरा फुलला ' ह्या ओळी आठवतात च मग आता ह्या मोसमात बहरून डोळ्यांना थंडावा देतो … त्याच्या घमघमाटाने घर प्रसन्न होते . 
जाई , जुई कोमल लतिका , हळुवारपणे जपायचे त्यांना हे वेगळे सांगावे लागत नाही . 

पण का कोण जाणे , गुलाब मला तितकासा आवडत नाही , फुल काढायला जावे तर आधी काटे च टोचतात. 
नवीन आणला कि सुरुवातीला ज्या कळ्या  असतात त्या उमलून गेल्या कि परत फुल येत च नाही माझ्या घरी . तरी हि दर वेळेस फुलांचा राजा म्हणून त्याची खरेदी करते , अन नंतर उदास होते . काल च गुलाब सुकला म्हणून त्याची पाने काढून टाकत होती तर त्याचा काटा रुतला बोटात अजून हि ठुसठुसतोय   अंगठा !


अर्चना 
२७/०४/२०१५ 


सदाफुली....

माझी आवडती सदाफुली 
ना कसली आस 
ना कसला ध्यास 
मनात आले की फुलायचे 
वाऱ्यासवे  डुलायचे 
असो ऊन वा पाऊस वारा 
फुलून येता चेहरा हसरा 




Tuesday, 21 April 2015

दोस्त

अकेलापन सच्चा दोस्त था ,

जब तक मेरे जैसे दोस्त नहीं मिले थे !

मिल के तो तूने बोल ही दिया 

यार पहले क्यों न हम मिले ? :) :)



चाहे दोस्त कितना भी दूर रहे 

दोस्ती की मात्रा न होगी कम !

जब भी लगे तकलीफ तुम्हे 


पलट कर देखो पीछे होगे हम !



ARCHANA 

21/04/2015

Thursday, 16 April 2015

todays triple filter test

One day an acquaintance came to meet Chanakya and said to him excitedly, “Do you know what I just heard about your friend” Just wait a while, Chanakya replied. “Before you tell me anything I would like you to pass a little test which I call the Triple Filter Test.”
“What is that?”
“I will tell you”, Chanakya said, “Before you talk to me about my friend, it might be a good idea to take a moment and filter what you are going to say. That is why I call the Triple Filter Test. The first filter is “Truth”. “Are you sure that what you are about to tell me is true?”
“No,” the man said, “Actually, I just heard about it.”
“All right,” said Chanakya. “So you don’t really know if it is true or not. Now let us try the second filter, the filter of “Goodness".
Is what you are about to tell me about my friend something good.
“No,” on the contrary…”
So, Chanakya continued, “you want to tell me something bad about him but you are not certain it is true. You may still pass the test because there is one filter left; the filter of “Usefulness.” Is what you want to tell me about my friend going to be useful to me.
“No,” not really
“Well,”continued Chanakya, if what you want to tell me may not be true and is neither good nor useful, why tell it to me at all.
हे वाचले , त्या प्रमाणे वागायचे ठरवले , तर त्यामुळे सहा महिन्यात आलेले काही अनुभव
१. एक जण सांगायला आली तिला थांबवले , … नको सांगूस असे प्रांजळपणे समजवले …. जावू दे तू तर अति करतेस (तुझ्याशी बोलायला च नको )
आणि तिने पुढे बोलणे बंद केले … बरे झाले आपला एक त्रास कमी झाला … 
  २. दुसरी हा मला माहित आहे , तुला कळले असेल म्हणून असे बोलतेस … 
३. माझ्याबद्दल तुला अमकीतमकी ने काय सांगितले ग ,अग मला काही च माहित नाही आणि मला माहित देखील करून घ्यायची जरुरी नाही ,
काल तर तुला तिचा फोन आला होता , मला काय माहित नाही का ? झाले ,
आता त्या दोघीत काय झाले होते त्याचा मला पत्ता नाही , पण खूप भांडण झाले होते असे वाटत होते …. काही दिवसांनी बघते तर त्या दोघी अगदी खिद्ळून बोलत होत्या , आणि माझ्याशी च भांडण झाल्यागत तोंड फिरवले ….
४. गेल्या आठवड्यात मात्र हद्द झाली, एकीने सर्वाना सांगून टाकले कि अर्चना आता बदललीय , कोणाशी बोलत नाही स्वतः ला शहाणी समजतेय , आणि आता मी बोलणार नाही , असा मेसेज मला चाट BOX मध्ये पाठवला ….
त्यामुळे जुन्या गोष्टी ….त्यांना नवीन जमान्यात स्थान नाही हे च खरे ...



अर्चना 
१६/०४/२०१५ 

Thursday, 9 April 2015

अक्कलखाती काय जमा करावे ?

अक्कलखाती काय जमा करावे ?

चांगली पुस्तके आपण हौसेने  घ्यावीत , वाचावीत अशी माझी सवय !
आता  पुस्तक आवडले कि  मैत्रीणीना  सांगावे , खूप छान आहे , तू पण वाच तुला पण आवडेल .
त्यातल्या एखादीने म्हणावे सध्या माझ्याकडे वाचायला काही नाही च आहे,  तुझे वाचून झालेच आहे न , मग मला दे ,सध्या वेळ पण आहे , देते तुला दोन दिवसात ….
दोनाचे - चार - चारचे आठ   तरी पुस्तक  नाही , सुरुवातीला आता देते म्हणणारी , नंतर अग कुठे ठेवलेय ते च सापडत नाही असे म्हणू लागते ,पण मी व्यवस्थित ठेवलाय बर … हे वरती …


नंतर नंतर आपण दिसल्यावर ती  दुस-या वाटेने जावू लागते ,
 मैत्री टाकावी अक्कलखाती कि दिलेले पुस्तक ?

अर्चना

९/४/२०१५

Tuesday, 7 April 2015

सर्व काही साई ।

सर्व काही साई ।

कसा -याहून पुढे गाडी निघाली की जिथे बघावे तिथे साई  दिसून येवू लागतो .
हॉटेल , इमारती , एवढे च काय garage नावात हि साई भक्ती ,
साई श्रद्धा , साई विसावा , साई  वैभव ,साई मनोर, साई , साई सागर    असे वाचत वाचत मी गाडीतून पुढे पुढे जात होते ….

मनात माणसाच्या कल्पनेला दाद देत होते , तेवढ्यात वाचले साई छकुला , अर्थबोध झाला नाही ,

पुढे गेले तर अजून एक , साई dream   असे नाव  ! साई स्वप्न सुचले नाही का त्याला ?

साई 'ज सखी (Sai 's  सखी) हे वाचून तर माझी झोप उडाली ,

गम्मत म्हणून सर्व च नावे काळजीपूर्वक वाचू लागले  नेहमी निसर्गसौंदर्य पाहणारी मी ह्या वेगवेगळ्या नावाचा आनंद (अर्थबोध) घेत राहिले … :)


अर्चना ।

४/४/२०१५



Friday, 27 March 2015

निरर्थक





डोळ्यातून ओघळणारे पाणी
ढगातून बरसणारे पाणी

दोन्ही सारखीच कामे करतात
डोळ्यातून पाणी वाहून गेल्यावर मन शांत होते

ढगातून पाणी बरसल्यावर
 आभाळ  निरभ्र होते

अवेळी येणारा पाऊस
अवेळी आलेले अश्रू
ते दोन्ही देखील निरर्थक !



अर्चना
२५/०३/२०१५