काही दिवसापूर्वी एका ओळखीच्यांकडे गेले होते.
बेल वाजवली , आतून मस्त पोपटाची शीळ ऐकू आली .
दार उघडले , त्या ताई बरोबर पोपट हि स्वागताला !
खूप मस्त वाटले , मनात आले बरे झाले ,पिंजर्यात अडकवून नाही ठेवले त्याला !
गप्पा चालू होत्या ,पोपट उड्या मारत इथून तिथे जात होता .
एक लाकूड ठेवले होते ,त्यावर चोच उगाच च घासत होता .
मध्य मध्ये वेगवेगळे आवाज काढून बोलत होता .
त्याच्या कौतुकात ,ताई खूप बोलत होत्या .
A.C. शिवाय झोपत नाही दुपार चा , म्हणून हल्ली दिवसभर A.C. सुरु असतो .
हे खातो ,ते नाही , चमच्याने कधी कधी भरवावे लागते वगैरे वगैरे …
अरे वाह ,किती मजा न ?
पण मला राहवले नाही , विचारले की हा उडत नाही का ?
तेव्हा क्षणभर गप्प झाल्या ताई , पण लगेच च म्हणाल्या लहानपणी तो आमच्या खिडकीत आला न तेव्हापासून उडता च येत नाही आहे त्याला …
छे , खूप वाईट वाटले ….
पण त्याहून अधिक वाईट जेव्हा कळले कि त्याचे पंख छाटून , उरलेली पिसे काही धाग्यांनी बांधतात , मग त्यांना उडता येत नाही ….
एकीकडे त्याची उडण्याची शक्ती कापायची अन दुसरीकडे त्याचे लाड , कौतुक करत राहायचे …
काय वाटत असेल त्या पोपटाला ?
असेच मनातले काही
अर्चना
७/५/२०१५

No comments:
Post a Comment