Thursday, 12 December 2019

बिबट्या आला ठाण्यात !

एकदा आले बिबट्याच्या मना
करुया साजरा व्हँलेंटाईन महिना
खरेदी करुया एखादा गाऊन
येताना काहीतरी येऊ खाऊन!
आला बिबट्या ठाण्यात
अडकला ट्रॅफिकच्या गराड्यात
एकटेच निघाले फिरायला
कोरम माँल पहायला
नव्हते कोणीच पार्किंगला
कोप-यात गेले झोपायला

हाँटेलात गेले जेवायला
तेथे सत्कार रेसिडेन्सीला
वाँचमनला दिसले माँनिटरवर
क्लोज सर्किट टीव्ही वर

उडाला एकच गोंधळ
जिकडे तिकडे पळापळ
बिबट्याला पकडले पिंज-यात
रवानगी झाली जंगलात
                   
              अर्चना
२१फेब्रुवारी२०१९

ख्रिसमस

सांता क्लॉज येणार, अशी
नाताळ मधे खुप मजा असायची.अतिश नितीश किन्शासाला असताना रात्री मोजे  लावायाचो, झाडाला झिरमिळ्या लावायच्या....
अन सकाळी उठल्यावर मज्जाच मज्जा
सांता चॉकलेट्स,खाउ, खेळणी द्यायचा
खुप मजा यायची,नितीश तर जाम खुशीत ! कुठून आला असेल सांता?  त्याला कसे कळते मला काय आवडते?
मग अतीश हळूच माझ्याकडे बघायचा, गालातच हसायचा ....

कुणी दिला हा खाऊ? खेळणी?
सांता आला होता, तुला आवडतात म्हणुन दिलि.....बाबा
मग मला का नाही उठवलेला ?.....
सांता म्हणाला त्याला झोपु द्या...बाबा म्हणाले.
सांता कधिच भेटला नाही त्याला.
एका नाताळला मोजा लावला
व म्हणाला दादा आज रात्री आपण झोपूया च नको..
दादा हसू लागला,  का हसतोस रे मी म्हटले
मला माहितेय
सांता बिंता काही नसतो..
 आई बाबा च खा,खेळणी आणुन ठेवत असतात..हसत म्हणाला.......
चला मग आता नको डेकोरेशन..  मी म्हणाले
हे ग काय आई?
"अरे ज्या दिवशी तुम्हाला कळत ना
कि सांता बिंता काही नसतो.
त्या दिवसा पासुन तुमच लहानपण  संपलेल असत"
आणि खरंच त्या वर्षांपासून घरात ख्रिसमस डेकोरेशन करावे लागले नाही.

काल अतीशने canada त त्याच्या बिल्डिंग मध्ये डेकोरेशन ला मदत केली त्यावरून आठवले हे सारे.....


अर्चना
13/12/2019.

Monday, 2 December 2019

Why are you so disturbed?

Honestly, the worst thing you can do is make someone feel bad about enjoying or liking something. You know, when they get all excited and their eyes light up a little more and you can see how passionate they feel about a certain thing. Please please please do not insult, make fun of, tease or tell them to shut up. If it makes them happy, and it in no way affects you, let them source their happiness off it. Anyways, have a nice week ALL

Thursday, 31 October 2019

संसार

संसारातले वाद संपले
संवाद आता आटले
हुंकाराचे राज्य आले
हसले, रडले, रुसले
ह्याचे आता smiley झाले.


Archana

1/10/2019

Thursday, 12 September 2019

आईची तिजोरी./आई हीच तिजोरी

*आईची तिजोरी...!*

आप्पांच्या पगार झाला की पगारातली ठराविक रक्कम आईला द्यायचे; किरकोळ खर्चायला..! त्यात दुधबील, भाजीपाला, इतर किरकोळ खर्च वजा करता थोडीफार शिल्लक रहायची ती आई बचत करून ठेवायची...

घरात एक गोदरेज कपाट सर्वांचे.! आई अप्पा. आम्ही चार भावंडे असे सगळे मिळुन  प्रत्येकाला वेगळे ही चैनीची कल्पना देखील नव्हती..त्यालाच वरती आरसा ,ते च अमचे ड्रेसिंग टेबल!

तो काळ ही तसाच होता... प्रामाणिक सरकारी नोकर.. त्याकाळी पगार कितकासा राहणार? आजच्यासारखं वेतन आयोगामध्ये लोळणारे नव्हते ते!  त्यावेळी समाजातला आर्थिक दृष्ट्या सगळ्यात कमकुवत पेशा परत पांढरपेशा म्हणजे दुसरे काही व्यवसाय करणे शक्य नाही.

घरखर्च, चारही जणांचं शिक्षण, कपडे, वह्या पुस्तकं, आजारपण ह्यातच त्यांची महिनाअखेर दहाव्या दिवशी सुरू व्हायची... झाकलेल्या पाटीसारखी अवस्था... एक कोंबडं झाकावं तर दुसरं आरवायचं! अशावेळी आईची मदत व्हायची...

म्हणतात की घरची स्त्री लक्ष्मी असते. घरात धनधान्याला बरकतता असते.  पगार वाटुन संपलेला असायचा तेंव्हा आईचा घरासाठी खर्च सुरू व्हायचा; साचवलेल्या बचतीतून...!

कुणाचा हात पोहोचू शकणार नाही किंवा कुणाचं सहज लक्ष जाऊ नये  म्हणून घरातल्या घरात साचवून ठेवायची ती वेगवेगळ्या क्लुप्त्या करून...! आणि माझ्यावर किंवा माझ्या स्मरणशक्ती वर विश्वास म्हणून मला सांगून ठेवायची ! ते सर्व ती घरासाठीच करते हे त्या बाल-किशोर-तरुण वयातही समजायचं...!

हाडाची शिक्षिका होती ती ,आमच्या अभ्यासावर तिचे लक्ष असायचेच. आमचे शालेय शिक्षण संपल्यावर तिला रिकामपण वाटू लागण्यापर्वीच तिने कामवाली च्या दोन मुलांना (एक मुलगा एक मुलगी) आमच्या घरी मोफत शिकवायला सुरुवात केली.
कामवाली चे दर महिन्याला काही शिल्लक टाक म्हणून बौद्धिक घेतले. तिने ही १०रू तुमच्याकडे ठेवत चला सांगितले . तो ही हिशोब पेन्सिल ने लिहून ठेवायला मला संगे व दुसऱ्या दिवशी तिला सांगत असे. मग तिने देखील कोणाचे बदली काम केले की पैसे मिळत ते ही घरी न नेता आईकडे सोपवून जाई . दिवाळीला त्या पैशातून स्वतः करिता चांदीचे पैंजण की जोडवी काही तरी घेतले. ते बघून इतर ही दोन तीन बायका आईकडे पैसे जमवू लागल्या. निळा डबा तो अजुन ही आठवतोय. कारण नेहमी तू म्हणायची की ह्यातले पैसे आपले नाहीत . अर्चना तू लक्षात ठेवून त्यांचे त्यांना देशील.

 फडतळात वीसपंचविस कप्पे असतील...! स्वयंपाक घरातील सगळ्या छोट्या छोट्या डब्यामधून ५/२रू नोटा तुझ्या ठेवलेल्या असत.
अप्पा ना transistor घ्यायचा होता ,तेव्हा पटकन तू च दिलेस सगळीकडून काढून पैसे.


पुढे कधी कपाटाच्या पायांच्या खाचेत, ड्रॉवरच्या बाजूच्या जागेत... असे किती तरी वेळी सापडले...! कितीतरी वेळी तू साचवलेल्या पैशातून घरच्या गरजा पूर्ण केल्या; जशा जमतील तशा...!

ना स्वतःसाठी काही दागिना केल्याचं आठवत, ना कधी साड्या. मेकप तर कधी आठवतही नाही तिनं केल्याचं!
साधी पावडर काय ती तेवढं लावतांना दिसायची... साधी, भोळी, भाबडी... साधं आयुष्य...!

वडिलांची मिळकत जेवढी त्यावर गुजराण करत जपलं सारं... हट्ट नाही की हेका नाही... परिस्थितीशी समझोता...


मला मुलगा झाला त्यावेळी मला व बाळाला हौसेने सारे केलेस.
त्यानंतर ही प्रत्येक भेटीत हातावर ५/१०/५०रुपये ठेवल्याशिवाय सोडत नसे

अप्पा अंथरूणाला खिळले तेंव्हाही त्यांच्या दर महिन्याला काढलेल्या आणि साचवलेल्या पेन्शन मधूनच त्यांचे औषधपाणी, दवाखाना झाला... माझी मदत म्हणून किरकोळ..!

वडील गेले तेंव्हाही रितिरिवाजाप्रमाणे जेंव्हा घरातील डबे धुवायला घेतले... तेंव्हाही किती तरी डब्यात हजार पंधराशे सापडले पुरचुंड्या करून त्यावर आकडा लिहून ठेवलेल्या...!

तिला विचारलं तर भोळ्या मनानं म्हटली _"मलाच नाही माहीत...पण प्रत्येक बॅग मध्ये सुद्धा पैसे सापडतील मी गेल्यावर

व्यावहारिक नव्हतीच ती कधी... अन जमलं ही नाही तिला कधी...! स्वतः ऍडमिट झाली तेंव्हाही तिचीच बचत कामी आली दवाखान्यासाठी... तिच्या उत्तर कार्यासाठी...! झळ नाही देऊन गेली जातांनाही...!

_'आई..._

_तुझ्या बचतीतले पैसे तुझ्या दवाखान्यासाठी खर्च होऊन शेवटचे उरलेलेे पैसे मोजले तेव्हा डोळ्यात फक्त पाणी आले.....! कित्येक पुरचुंडी दिसल्या ,उघडून बघितले की पाच ,वीस ,पन्नास रुपयाच्या नोटा एकत्र ठेवलेल्या. लक्ष्मीपूजनाचे.सारे coins  neet  ठेवलेत ग आई..! एका लक्ष्मीची एका गृहलक्ष्मीने केलेली पूजा खरच भोळी असायची...! श्रद्धा खूप तुझी... देवानं दिलंही सढळ सारं...! खूप हौशीने साजरी करायचीस तू लक्ष्मीपुजन...! १रू पासून ५००रू च्या वेगवेगळ्या चलनी नोटा तू व अप्पा नी जम्मवलेल्या त्याही ठेवल्या आहेत..... तू शिसपेन्सिलने लिहिलेले हिशोबाचे कागदही तसेच ठेवलेत तुझ्या डब्यात...!
.._
 एक मित्र बोलता बोलता खखूप छान सांगून गेला; दारी आला होता तर... _"लिहा तुमच्या आठवणी लिहा... लिहिलं नाही तर पुढच्या पिढीला कसं समजणार की तुम्ही काय आणि कोण होतात ते...? कळू द्या पुढच्या पिढीला... वाचनाने जितकं समजतं तितकं सांगुन कमीच... म्हणून लिहा... कडू, गोड... लिहिण्यात चित्र उभं करा..."_

छान सुचवून गेला तो...!

आई, तू आजही हे लिहिताना
तू तशीच उभी राहिलीस समोर, साडी ,कुंकू ,मंगळसूत्र ,हातात काचेच्या बांगड्या !
अर्चना
९/९/१९


*******

Thursday, 6 June 2019

तू मिठीत घे

 तू  मिठीत घे ।   

--------------------

तू विचारत नाही ,

तुला काही आठवत नाही, 

तरी मी सांगणार ,

तसं  तर, 

मन नाही भरणार ,

तू जे जे देशील ,

ते कमी पडणार ,

फार असं  ,

काहीच नको ,

घेत असशील तर,

तू मला फक्त ,

तुझ्या मिठीत घे !


मी जेव्हा उदास असेन,

कोणी माझे नसेल, 

दुःखात एकटी  बसेन,

संपवून सारे कष्ट ,

सारे जग,

माझ्या विरोधात ,

सगळ पुन्हा सावरताना,

वाट सरता सरता,

मृत्यूच्या जवळ असेन,

तो क्षण येण्याआधी,

तू विचारत नाही ,

तरी मी सांगणार ,

तसं काहीच नको ,

घेत असशील तर,

तू मला फक्त ,

तुझ्या मिठीत घे !


विसरुनी सारे कष्ट

होईन मी संतुष्ट 

मिळेल सारे काही 

हे च सांगत आहे 

तू मला फक्त 

तुझ्या मिठीत घे.....



अर्चना कुलकर्णी.

02/06/19

Sunday, 12 May 2019

आई 2019

*१२.०५.२०१९*
*आज मातृदिन म्हणजेच मदर डे आहे…*🙏🏻
*हैप्पी मदर डे* 

*आई म्हणजे माउली…*
*आई - हृदयाची हाक*
*आई - निशब्द जाग* 
*आई - गुज अंतरीचे*
*आई - नाव परमात्म्याचे* 
*आई - ऒजळभर माया* 
*आई - दुधाची सावली* 
*आई - आभाळ माउली* 

*आई तुझी खूप आठवण येते आहे……* 
*8जुलैला तुला जाऊन दोन वर्षे होतील …*
*कित्येक दिवस तुझ्या आठवणीने घालवले आहे*
*मला माहित आहे तू सतत माझ्याबरोबर आहे ….*
 *पण तरी कुठेतरी पोरकेपण जाणवत आहे ग...*
*हो खरच मी पोरकी झाले आहे…।*
*आता मी माहेरी कोणाकडे जाऊ ग….*
*कोणाला सांगू माझी आई इथे रहाते …. मला आईकडे जा्याचे आहे …* 
*आई कुणा म्हणू मी…. माझ्या मनातील व्यथा कोणाला सांगू ग ….*
*डोळ्यात पाणी दाटले असता ….  तुझा जिव्हाळाचा हाथ नाही ग …*
*तू परत येशील का ग …. तुझ्या लेकीला कुशीत घेशील का ग*
*माझ काही चुकंल माकंल असेल तर माफ करशील का ग….*
*तू गेलीस सोडून आणि सगळंच काही बदल झाले*

*आईसाठी काय लिहू …. आईसाठी पुरतील ऐवढे शब्द नाहीत कोठे…*
*आई तू उन्हातली सावली…… आई तू पावसातील छत्री…* 
*आई तू थंडीमधील शाल… आई म्हणजे वेदने नंतरची पहिली हाक…*
*मातृदिनाच्या शुभेच्छा काय देणार…*
*एक दिवस शुभेच्छा देऊन काय होणार….*
*आईला त्याची गरज नाही असे मला वाटते …*
*आई सारखे दैवत या जगात नाही ….*
*मी आईसाठी हे केले ,ते केले सांगणारी लोक भेटतात पण आई कधी सांगत फिरत नाही मी मुलांसाठी काय केले ते*
*जाणवते आज ही तुझे प्रेम ,सर्वांना एकत्र ठेवायची धडपड*
*मुलांच्या हौशिखतर स्वतः च्या आवडीला दिलेली तिलांजली*
*चार शब्द प्रेमाचे हवे होते कायम तुला*
*वेळ मिळेल तेव्हा भेट हवी होती तुला*
*मुलांनंतर नातवाची ही झालीस आई*
*त्यांच्या करिता शिकलीस तू पिझ्झा व पास्ता ची रेसिपी तू*
*येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला प्रेमाने खाऊ घालणारी तू*
*किती आठवणी येतात मनात दाटून, दुःख होते तुझी उणीव जाणवून*

आई म्हणजे सर्वस्व
आई म्हणजे मुलांचे वर्चस्व
सर्वांचे सर्व व्यवस्थित सांभाळणारी ती आई
न बोलतासुद्धा चेहऱ्यावरून सर्व जाणून घेणार ती आई
माहेरी जायची ओढ वाटावी ती आई
स्वतः कष्ट करून मुलांचे हट्ट पुरवणारी ती आई
शिक्षणाचा आग्रह धरणारी ती आई
स्वावलंबी राहा असे सांगणारी आई
खंबीर राहा,आपले आसू परक्यांसमोर ओघळू देऊ मकोस असे सांगणारी आई
कष्ट करताना लाजू नकोस ,कष्टाचे पैसे द्यायला विसरू नकोस व कोणासमोर कधी हात पसरू नकोस असे शिकवणारी आई
बाहेरची कामे करतेस म्हणून घरातल्या कामांना कमी लेखू नकोस असे सांगणारी आई
स्वयंपाक मन लावून कर असे मनावर बिंबवणारी आई
नवीन शिकायला वयाचे बंधन नाही असे सांगणारी आई
समाजाचे नीतिनियम कोणते योग्य ,कोणते कालबाह्य समजून सांगणारी ,त्याचे बंधन मानणारी आई
आज ती नाही म्हणून पोकळी वाटली तरी ती सोबत आहे असे भासणारी ती माझी आई।





अर्चना 
12।05।2019

Monday, 28 January 2019

आई ,तू नाहीस

आई ,तू नाहीस आता दीड वर्ष होईल. असा दिवस नाही की तुझी आठवण नाही . आई तू व अप्पा असताना घरी आले की लहान झाल्याचा feel असे. तुमची भेट म्हणजे एक तासाची असली
तरी भरपूर आराम देणारी,
पोचल्यावर हातात चहा , थोडा हट के नाश्ता,
निघताना टेबलावर खाऊच डबा, तब्येतीची काळजी असणारा संवाद,
अगदी दारापर्यंत चालणाऱ्या गप्पा
मग डोक्यावरून हळूच
फिरणारा  हात ,त्यात सापडणारी प्रेमाची ऊब,
प्रश्न नाही उत्तरे नाही
कारण समजून घेणारी आई
निवांत बिनधास्त थोडीशी बेजबाबदार वागणारी मी .
खूप आठवतंय ग आई आज! खूप बदलले आहे सारे! घरी जाऊन सुद्धा वाटत नाही ती आता माहेरची भेट !

अर्चना
२४/०१/२०१९


Thursday, 10 January 2019

मैत्री (नासिक मैत्रीणकरिता)

निव्वळ दोन शब्दांची साद असते
भेटू या ?
तिला वेळेचे बंधन नसते,
फक्त भेटीची ओढ असते.
त्याच भावनेने ती भेटते
तेव्हा ती फक्त मैत्री असते
किती वेळ भेटलो हे महत्वाचे नसते
तर भेटीतील उत्कटता महत्वाची असते
म्हणून कधी ही भेटले, तरी
बराच काळ ताजीतावानी वाटते
बकुळीच्या फुलासम सुगंधी राहते
अशी आपली मैत्री सदैव आठवत राहते

अर्चना
6/1/2019