Friday, 2 December 2016

हास्य

हास्य 
हास्य म्हणजे काय हे वेगळे सांगायला नको ,बालपणी चे हास्य ते खरे हास्य का ?

खावून पिउन सुखी असलेल्या आणि भाऊ बहिणींची प्रेमळ माया असलेल्या मध्यम वर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला हे माझे मोठेच भाग्य..!त्या काळच्या अश्या कुटुंबाचे आईवडील विद्या आणि कला ह्यांचा आदर करणारेच असत.
सिनेमाच्या 2 रुपयाच्या  तिकिटाला हात आखडता घेणारे वडील,शाळा कॉलेजच्या कोणत्याही खर्चासाठी कधीच नाही म्हणत नसत लहान मुलांच्या नाटकाला मुद्दाम हून घेऊन जात असत , बस ने दादर ला शिवाजीमंदीर इथे किती बालनाट्ये पाहिली त्याची गणती नाही ,ती नाटके बघताना येणार हसू , त्याच बरोबर येणारे विचार हे हे वेगळे च होते . 

बाहेरचे खाणे ही चैन समजणारी,आणि त्यासाठी एकही पैसा खर्च न करता ते सर्व खाद्यपदार्थ स्वतःच्या हाताने बनवून आम्हाला खाऊ घालणारी आई,आम्ही कोणत्याही क्लासला जायचे म्हटले कि लगेच फीचे पैसे हातावर ठेवायची.मग तो भावाचा सुतारकीचा  क्लास असो,बहिणीचा शिवणकामाचा क्लास असो कि ,एखाद्याचा चित्रकलेचा असो...वडील दादर सार्वजनिक वाचनालयाचे सभासद, नेहमी वेगवेगळी पुस्तके आणत ती वाचण्याचा एक वेडा मला   छंद लागला .शिवणकाम विणकाम ह्यात कधी फारसे मन गुंतले नाही , अडून नको राहायला इतपत शिवण शिकले , लोकरीचे स्वेटर मोजे ,स्पंजच्या बाहुल्या , शिंपल्यांची तोरणे , मोत्याच्या बांगड्या   त्या वेळेस ज्या काही नवीन  शिकण्यासारख्या होत्या त्या सर्वाकरिता वेळ व पैसे दिले जात . फार सुंदर होते ते दिवस.उत्साह आनंद ह्यांनी रसरसलेले....!

खेळ,स्पर्धा,बक्षिसे,अभ्यास,वाचनालय,भरतकाम,विणकाम,किंवा इतर छंद ह्या सर्व गोष्टी करण्यात हे दिवस कापरासारखे कधी उडून गेले ते समजलेच नाही.

मग नोकरी लागली .त्यात प्रथम धारातीर्थी पडले ते खेळ आणि व्यायाम..!वाचन आणि इतर गोष्टीसाठी सुट्टीच्या दिवशी प्रयत्नपूर्वक वेळ काढावा लागे.पण नंतर नोकरी लग्न आणि संसार सुरु झाल्यावर "कोण होतीस तू,काय झालीस तू"असे म्हणायची वेळ आली.सर्व विसरून घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे पोटार्थी धावपळ सुरु झाली.मुलांचे अभ्यास,त्यांची शिक्षणे,त्यांचे प्रश्न ...!जीवन म्हणजे नुसती लढाई...!


आज आयुष्य एवढ्या बंधनाच्या चौकटीत अडकून पडलय कि त्यातून बाहेर पडायचा विचारही अंगावर शहारे उमठवतो , मार्ग खडतर झालेत ,पावलोपावली दुख माणसाची वाट बघतय ,माणूस हसण तर विसरूनच गेलाय जसा ,पणअसे म्हणतात ज्या माणसाने या दुःखाच्या मार्गाने प्रवास केलाय त्याला हसण्याची किमंत उमगलीये ,त्याला ठाऊक आहे हसण म्हणजे काय ते दुख विसरण्याची किल्ली आहे  ,क्रोधावरचा उत्तम उपाय म्हणजे हास्य ,सुखी आणि आनंदी जीवन जगण्याची कला म्हणजे हास्य आणि ज्या माणसाने पाऊलोपावली दुख भोगलीयेत तोच माणूस दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतो कारण त्याला त्या निरागसपणे मनमुराद ,निखळ हास्याची खरी किमंत माहित असते . 
आपले दुःख जर आपण उगाळत बसलो तर कधी च आनंदी राहता येणार नाही . 
ही कविता मला खूप प्रेरणा देऊन जाते ,

जिंकण्याची जिद्द आहे
म्हणूनच आज वादळाशी झुंजते आहे
जगाला परत सामोरे जाताना 
नवीन जगण्याची उमेद आहे ||१||

जिंकण्याची जिद्द आहे
म्हणूनच सारे गंगाजळी वाहुनी
आकाश नवीन पेलण्यासाठी
सरसावले पुन्हा आज जीवनी ||२||

जिंकण्याची जिद्द आहे
म्हणूनच पुन्हा राखेतून जन्मायचे आहे
फिनिक्स पक्षाप्रमाणे
पुन्हा आज नव्याने भरारी घेयची आहे ||३||

जिंकण्याची जिद्द आहे
म्हणूनच देवास माझे सांगणे आहे
घे कितीही परीक्षा माझ्या
मी ह्या जीवनी जिंकणार आहे ||४||


हो मी नक्कीच जिंकणार आहे ,

हरले कधी नाही ,हरते आहे असे जाणवू दिले नाही मी माझ्या मनाला , नाही कुठे जाणवू दिले बाह्य जगाला ,

कारण चेहऱ्यावरच्या हास्यने च साथ दिली मला सर्वदा ,तसे च रहस्य फुलवण्याची ताकद राहो सर्वदा

असे च आज मनात आले ते लिहिले


अर्चना कुलकर्णी
१९/१२/२०१५

मुलगी

आज रिओ ऑलिंपिक मध्ये भारताने मिळवलेली पदके बघून सर्वानाच मुली च सहारा आहेत असे वाटू लागले आहे, हे हि नसे थोडके
मध्यमवर्गाचा आज चा विचार करता तिथे मुलीला कधी च दुय्यम दर्जा देणे सोडले आहे। योग्य शिक्षण, नोकरी जे काही शक्य असेल ते आई वडील करत असतात , पण लग्न झाल्यावर अजून हि किती जणींना तिच्या मनाजोगते काम / करियर करायची संधी मिळते ?
त्याकरिता घरच्यांचा किती पाठिंबा असतो ? तिच्या कामाबाबत आपुलकीने विचारपूस होते ?
ती तिच्याकरिता नोकरी करते असा च सूर आज ही ऐकायला मिळतो ना?
मग मुलगी झाली की आई ला च वाईट वाटते की अरे बाप रे  ही असे च आयुष्य घालवावे लागणार ?
ह्यात दोष कोणाचा ?
सासरी  सर्व व्यवस्थित करून जरी ती माहेर चे करत असली तरी ही  तिला दूषणे दिली जातात .

मग आज ची स्त्री घटस्फोटाचा विचार करू लागते , त्यात ही तिला च कमीपणा दिला जातो 

तिला ऍडजस्ट करता आले नाही ? 

काय बरोबर ना ?

मग कसली मुलगा मुलगी समानता ?


अर्चना कुलकर्णी

१०/१०/१६



Friday, 8 July 2016

अशा देखाव्याला भुलती सारी

मंदिरात वाजवायची घंटा ,
घरी मात्र करायचा  तंटा !
पित्याला घराचा कोपरा
देवाला दिवाणखाना सारा !
 चढवून खोटा   मुखवटा
समाजकार्याकरिता जमवायच्या नोटा !
प्रसाद वाटावा शेजारी पाजारी
घरात उपाशी म्हातारी !
घरातल्यांना नाही थारा
बाहेरच्यांना घालतो वारा !
असा माझा थाट न्यारा 
देखाव्याने भुलवी साऱ्या !

अर्चना 
३/५/१५



बाहेर करायचे ओम साई
घरात रडते बिचारी आई
सर्वाना म्हणायचे ओम साई राम
तिच्या नशिबी फक्त घरकाम
मंदिरात लावी साई ला दिवा
घरात देतो आई ला शिव्या
साई ला स्वतः चे जग मानतो
घरी आई ला लाथेने हणतो
आई चे आटवतो रक्त
असा कसा साई भक्त ?

अर्चना 
२/ ६ /१६ 

Sunday, 3 July 2016

मैत्री

मैत्री 

नेहमी एक मेसेज वाचनात  येतो , मैत्री कशी असावी ? आरश्यासारखी जी कधी खोटे बोलत नाही व सावलीसारखी जी कधी साथ सोडत नाही . 
सर्वांच्याच वाचनात आला असेल , 
हा मेसेज जुना आहे की नवीन आहे , कोण लेखक आहे वगैरे मला  माहीत नाही ,
पण ते वाचले की नेहमी माझ्या मनात हा च प्रश्न येतो किंवा जाणवते मला ,
आरसा किंवा सावली हे दोन्ही ही जेव्हा आपण उजेडात ( प्रकाशात) असतो तेव्हाच उपयोग असतो . 
काळोखात आरशात बघून काही दिसत नाही , तर सावली आपल्या सोबत नसते च . 
म्हणजे मैत्री किंवा नाते हे फक्त आपण प्रकाशात असतानाच ठेवली जावी का ?
 फेसबुक वर किंवा जीवनात अशी अनेक माणसे भेटतात , जी तुम्ही चांगल्या स्थितीत असताना आपल्याबरोबर असतात , पडत्या काळात पाठ फिरवतात . 

मग अशी मैत्री /नाते काही कामाचे असते का ?
का त्याचेच कौतुक केले जाते ?

नक्की काय अर्थ असावा ? 

अर्चना 
३/०७/ २०१६ 




मैत्री

मैत्री 

नेहमी एक मेसेज वाचनात  येतो , मैत्री कशी असावी ? आरश्यासारखी जी कधी खोटे बोलत नाही व सावलीसारखी जी कधी साथ सोडत नाही . 
सर्वांच्याच वाचनात आला असेल , 
हा मेसेज जुना आहे की नवीन आहे , कोण लेखक आहे वगैरे मला  माहीत नाही ,
पण ते वाचले की नेहमी माझ्या मनात हा च प्रश्न येतो किंवा जाणवते मला ,
आरसा किंवा सावली हे दोन्ही ही जेव्हा आपण उजेडात ( प्रकाशात) असतो तेव्हाच उपयोग असतो . 
काळोखात आरशात बघून काही दिसत नाही , तर सावली आपल्या सोबत नसते च . 
म्हणजे मैत्री किंवा नाते हे फक्त आपण प्रकाशात असतानाच ठेवली जावी का ?
इथे फेसबुक वर किंवा जीवनात अशी अनेक माणसे भेटतात , जी तुम्ही चांगल्या स्थितीत असताना आपल्याबरोबर असतात , पडत्या काळात पाठ फिरवतात . 

मग अशी मैत्री /नाते काही कामाचे असते का ?
का त्याचेच कौतुक केले जाते ?

नक्की काय अर्थ असावा ? 

अर्चना 
३/०७/ २०१६ 




Wednesday, 22 June 2016

हास्यक्लब

हास्यक्लब या संकल्पनेला मी अगदी काल - परवा पर्यंत हसत होते. हास्यक्लबची गरज काय, असे मला नेहमीच वाटायचे. ऑफिसमध्ये जाताना अकारण हसताना लोकं दिसले की मला विचित्र वाटायचं ..माझे वडील जात असत , त्यानंतर माझ्या सासूबाई सुद्धा जात .... परंतु गेल्या एकवीस  दिवसात माझे हे मत पूर्णतः बदलले.
आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आमच्या इथे एकवीस  दिवसांचे योग शिबीर आयोजित केले होते. प्रत्येक दिवसाचा समारोप हास्यसनाने होत होता. 
त्या वेळेस मला कळले,
आपण दिवसभरात खळखळून हसतच नाही.. बहुतेक  लोकांचा दिवस ताणतणाव यातच जातो..याची चिंता...त्याची काळजी.. ह्याचा आजार , त्याचे ऑफिस..घर..! आज काल कोणी  समाजात मिळून मिसळून  गप्पा गोष्टी हास्य विनोद असे करत  नाहीत.इतकेच नाही तर समोरच्या व्यक्तीच्या Smile  ला Smile ने उत्तर देखील देत नाही ...
 बोटावर मोजण्या इतके टीव्हीवरील शोज सोडले तर बाकी सगळे गंभीरच असतात!  बातम्या तर  या ताण वाढवणाऱ्याच असतात. व्हाट्स अप, फेसबुक यात व्यस्त असताना प्रत्यक्ष असे आपण एकटेच असतो... त्यामुळे खूप मनमोकळे हसू येतच नाही.. किंबहुना मनसोक्त  हसणे आपण जसे विसरूनच गेलो आहोत!
हसण्याचे भरपूर फायदे आहेत..मन प्रसन्न राहते, शरीरात एक प्रकारची ऊर्जा येते, चेहऱ्यावर प्रसन्नता दिसून येते वगैरे... उन्मुक्त हसणे, हे एक प्रकारचे औषधही आहे. सगळेच लोकं ताण तणावाला हसत खेळत सामोरे जाऊ शकत नाहीत.... अशा लोकांकरिता हास्यासन किंवा हास्यक्लब अत्यंत जरुरी आहे, असे मला वाटते. अगदी रोज नाही तरी सप्ताहातून एकदा तरी हास्यासन करायला हवे...किंवा खूप विनोदी पुस्तक वाचायला हवे..आपले पु. ल . किंवा आणिक दुसरे असे च .  किंवा विनोदी मालिका / चित्रपट पाहायला हवे...या कामी you tube खूप महत्वाची ठरू शकेल .  परंतु प्रत्येकानेच आठवड्यातून एकदा तरी खळखळून हसायलाच हवे!ताजेतवाने व्हायला हवे !

अर्चना 
२१/०६/२०१५ 

Tuesday, 17 May 2016

वृद्धाश्रम (new view)

आण्टी , युज आण्ड थ्रो चा जमाना आहे , इतक्या मोठ्याने समोर ची मुलगी म्हणाली , अन माझे लक्ष समोर बसलेल्या तिघींकडे गेले . शनिवार संध्याकाळ ची वेळ ,गाडीत फारशी गर्दी नव्हती, मी ,जरा उत्सुकतेने त्या तिघींकडे पाहू लागले . तिघी  वेगवेगळ्या वयाच्या ,पण नात्यातल्या वाटत नव्हत्या . बहुधा एका कार्यालयात काम करणाऱ्या असाव्यात ,
अग , युज आण्ड थ्रो कसे काय म्हणतेस ? ते चांगले पालक असतात ना ?
मुलगी १ :पालक ठीक आहे ,चांगले कि वाईट ते ज्याचा त्याचा विचार !
ऑन्टी :असे कसे , इतकी वर्षे तुम्हाला सांभाळले ,मोठे केले मग आता तुमचे कर्तव्य नाही का ?
मुलगी १ : ओके ,मग मला सांगा ,तुम्ही मुलांना मोठे करताना ज्यावेळेस कोणतीही गोष्ट त्याने स्वतः हून केली की तुम्ही कौतुक करता , स्वतः कपडे घालतो , स्वतः जेवतो , अभ्यास करतो वगैरे वगैरे मग जेव्हा तो स्वतः च्या PARTNER विषयी निर्णय घेतला की का सगळे चिडतात ? 
मुलगी २ :आता माझ्याबाबतीत बघा ,सगळे खरे तर बघून ठरवून झाले . पण हनिमून ला कुठे जायचे ते आम्ही दोघांनी ठरवले तर त्याच्या बाबांना किती राग आला . किती दिवस तरी  मला बोलत होते . 
ऑन्टी : अग , द्यावा मान मोठ्यांना 
मुलगी  १ : मै मेरे मा पापा कि एक हि बेटी  हु , तो मेरे ममी पापा मेरे से उम्मीद नही करते कि मै शादी कर के उन के साथ रहुंगी . तो फिर लडके के PARENTS ने भी वैसे हि सोचना चाहिये न ? आप भी देख लो जिनकी एक या दो बेटिया है , वो लोग जादा  ख़ुशी से जीते है , और जिनके बेटे है वो तो हमेशा यही चिंता मे  मग्न राहते है कि बहु के साथ हमारा कैसा होगा !
मुलगी २ : BTW ऑन्टी ,पूर्वी वानप्रस्थाश्रम असायचा तो कधी ?
                    आता त्याचे नाव वृद्धाश्रम असले तर तिथे राहून जायला काय हरकत आहे ?
मुले ही लवकर स्वावलंबी होतील . जे प्रत्येक आई -वडिलांचे स्वप्न असते आणि ते ही स्वतंत्रपणे जगू शकतील . 
जितके लांब लवकर होतील तितके नाते जास्त चांगले टिकेल , कटुता येण्यापूर्वी च जर असे झाले तर चांगलेच नाही का ? 

नक्की कोणाचे बरोबर ? आमच्या पिढीचे की ह्या समोर दिसणाऱ्या युवा पिढीचे ?
असा विचार करत मी गाडीतून खाली उतरले …




अर्चना 

Monday, 9 May 2016

माता दिन 2016

कालच्या  पोस्टवरून असे मनाला वाटून गेले , जेव्हा बाळ तान्हे असते तेव्हा त्याचे सर्व विश्व हे आई च असते  ,आईकरिता देखील ते च विश्व असते . 
पुढे त्याच्या विश्वात बाबा , भाऊ/ बहिण , आजी आजोबा , शेजारचे सामील होत जातात , मग मित्र मैत्रिणी , शिक्षक असे करत त्याचे (बाळाचे - मुलगा मुलगी दोन्ही) विश्व विस्तारत जाते . मग सहचर .त्याचा परिवार ,असे करत करत मग  स्वतः चे मुल करत विश्व   बदलत   जाते. त्या विश्वात आता मोठे झालेले ते च बाळ नकळतपणे आपल्या पहिल्या विश्वाला विसरून जाते . तिचे आपण काही करू शकत नाही अशी खंत असते काहीना पण बर्याच वेळेस शक्य असूनदेखील नाकारतात , मी देखील बर्याच वृद्धाश्रमांना  भेटी दिल्या आहेत . तिथले वृद्ध पाहून हे च जाणवते की खरोखर आज काल माणूस हा जास्त PRACTICAL होत आहे का ?  'कस्मे वादे ' करत तरुण वयात , निदान रडता तरी येते पण असे वृद्ध होवून एकाकी जिणे नकोसे होवून जाते . तिथे राहून आपल्या घरच्यांची वाट  पहात , मृत्यूची पण वाट पाहताना बघितले की मन खिन्न होते . म्हणून आज सकाळी व्ह्त्साप्प वर आलेला मेसेज जास्त पटतो , " काल जितके सोशल मिडिया वर "श्रावण बाळ " फिरत होते , त्यापैकी अर्धे जरी खर्या आयुष्यात असे असते तर  ८०% वृद्धाश्रम बंद झाले असते " 
अशीच एक कविता मी २०१२ मध्ये केली होती ती पुन्हा टाकते आहे ,


माता दिन म्हणुनी
लेकाचा फोन आला
विसरुनी मागचे सारे
आईला पाझर फुटला !
ऐकोनी शुभेच्छा सार्या
माता म्हणे त्याजला
तुला पाहोनी
बराच काळ लोटला !
शिकुनी घे तू
कॉम्पुटर चा मेळ सगळा
मग SKYPE  वरुनी
दाखवेन दुनिया सारी तुजला !
अरे पण एकदा
येवूनी जा बाळा
तव स्पर्शाकरिता
जीव हा आसुसला !
कामाचा हा सारा पसारा
त्यात नसे सुट्टीला थारा !
तिकीट धाडतोस का मजला ?
येवूनी भेटेन मी तुला !
पहातो मिळेल का विसा तुला
अन त्याने फोन ठेवला !
मग लेकीचा फोन वाजला
आई तुझ्या वर मी केली कविता
ऐक आधी ती आता
जागी सर्व श्रेष्ठ माझी माता
तिच्यावाचुनी जीवनात रिक्तता !
मातेस वाटे बहु धन्यता
कधी येतेस तू भेटायला ?
आता नको
खूप असेल न गावी उन्हाळा ?
मग मी येवू का मुंबईला ?
अग पाणी नाही नळाला
अन नणंद हि
येत असे  माहेरपणाला
भेटू आपण दिवाळीला !
आवरोनी भावनेचा उमाळा
हास्य आणोनी डोळा
म्हणतसे सुखी रहा तू बाळा !

अर्चना ....9/5/2016

Wednesday, 17 February 2016

तिन्ही सांज

तिन्ही  सांज

काल ठाण्यात नाट्यसंमेलना निमित्त असणाऱ्या नाटकात , " तिन्हीसांज" ह्या नाटकाची वर्णी लागली होती

. काशिनाथ प्रेक्षागृह प्रेक्षकांनी भरून गेले होते . शेखर ताम्हाणे लिखित ,राजन ताम्हाणे निर्मित , संपदा जोगळेकर - कुलकर्णी दिग्दर्शित हे नाटक सर्वच बाबतीत  एका वेगळ्या उंचीवरचे आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये . नाटकाचा कालावधी १९३६ ते १९५० च्या दरम्यानचा आहे .कथेचा कालखंड म्हणजे संस्थाने खालसा झाली त्यादरम्यानचा . कोणा एका संस्थानिकाचा गायनात निपुण  मुलगा त्याचे राज नर्तिकेवर असलेले प्रेम … ते समाजाने नाकारणे … त्यानंतर त्याने गाणे पूर्णपणे सोडणे … पुढे बरेच काही रहस्यमय ते नाटक बघितल्यावर च कळेल . 
 नाटक इतक्या खुबीने लिहिले आहे की  क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत रहाते , नेपथ्य अतिभव्य असे  लागेल . रंगमंचावर पडणारा पाऊस हे तर अतिउत्कृष्ट म्हणवे लागेल . संपदा जोगळेकर -कुलकर्णी यांचे दिग्दर्शन ह्या नाटकाला लाभले आहे , त्यामुळेच नाटकातील नृत्य हे खरेखुरे ताल बद्ध लय बद्ध होते .
संगीत - रहस्य - प्रेम ह्या तिन्हीचा संगम ह्या नाटकात आहे , आशयघन  लेखन  -  हुबेहूब  नेपथ्य - उत्तम दिग्दर्शन ,सर्वच कलाकारांनी समरसून केलेले काम ह्यामुळे हे नाटक कायम लक्षात राहील . सर्वांनी आवर्जून पाहावे असे रहस्यमय प्रेम नाट्य !
निर्मिती : त्रिकूट लेखक : शेखर ताम्हाणे
 दिग्दर्शन : संपदा जोगळेकर-कुलकर्णी
 नेपथ्य : संदेश बेंद्रे
कलाकार - अंगद म्हसकर ,शीतल क्षीरसागर ,शाल्मली टोळ्ये , श्रीराज ताम्हनकर व इतर 
 संगीत : परीक्षित भातखंडे
विशेष सहाय्य - वेदश्री ओक 
 प्रकाश : राजन ताम्हाणे - 

अर्चना कुलकर्णी 
१८/०२/२०१६ 

Monday, 15 February 2016

बाबा


आई चे प्रेम बालपणी च उमजते
 ,
वडिलांची माया कळायला थोडे मोठे व्हावे लागत,

बाबांची आवड आपल्याला कधी कळत च नाही

आपल्या गरजा पुरवताना ते हि विसरून जातात

आता विचारावे  वाटते माझ्या करिता तुम्ही किती आवडी सोडल्या ?

माझ्या हौशेखातर कधी नाही म्हटले नाही सहलीला

स्वतः मात्र जात राहिले बस ने ऑफिस ला

चांगले हवे घर राहायला म्हणून घेतला flat  छान

हफ्ते फेडताना मात्र निघाला तुमचा घाम

जाणवले नाही कधी तेव्हा ,

जाणवते ते आज जेव्हा

श्वास घ्यायला सुद्धा दिवस नाही पुरा

कधी भेटाव म्हटले तर

आज नाही जमत ,उद्या नाही जमत

फोन वर बोलून तुम्ही समाधान मानायचे

माझे मात्र मन मला खात राहायचं ...!

बाबा आज चा दिवस मात्र आहे खास तुमचा !

 तुमच्या जुन्या आठवणी चा !

अर्चना कुलकर्णी
१९/६/२०११

नक्की सांगा तुम्हाला काय वाटते ?

नक्की सांगा तुम्हाला काय वाटते ?

गोष्ट काल संध्याकाळ चीच आहे, दाराची बेल वाजली. दारात एक महील उभी होती .आपण अर्चना कुलकर्णी न ?हो ...
मला तुमची पाच  मिनिटे हवी आहेत ,आणि मला सांगा माझे काय चुकले ?
माझे नाव रश्मी ,माझा नवरा रमेश IT  ENGINEER  चांगल्या मल्टी नशनल कंपनीत वरिष्ठ हुद्द्यावर कामाला आहे . आमच्या लग्नाला १५ वर्षे झाली आहेत . मला दोन मुले आहेत . मी स्वतः मुनिसिपाल शाळेत  शिक्षिका आहे .लग्न झाल्यापासून च  माझी नोकरी हा घरच्यांचा चेष्टेचा विषय आहे. मुनिसीपाल्टी शाळेत कोणी शिकवते तरी का ? असा च सूर असतो ...त्यामुळे माझ्या कामाचे स्वरूप किंवा अडचणी कोणी समजून घेतल्या नाहीत .घरी सर्व जेवण मी बनवायचे पण माझा डबा  मी भरू लागले तर सासूबाई म्हणाल्या शाळेत असतो न तुमच्या नाष्टा  ,जेवण कशाला  उगाच घरून नेतेस...पण नोकरी सोड असे हि म्हटले नाही , त्यात च मी समाधानी होते. पगाराची रक्कम पूर्णपणे नवर्याकडे द्यायची आणि मग दररोज तो खर्चाचे पैसे देतो , म्हणजे कधी शाळेत कशाची वर्गणी निघाली कि मी च फक्त अशी कि सांगणार उद्या देते. आज नाही आहेत, खूप लाजिरवाणे वाटे ,पण तसे च चालू आहे .....मुले झाली त्यांच्या शाळा सुरु झाल्या ,मी अभ्यास घेते असे म्हणण्यापूर्वीच रमेश म्हणाला ,आई कडून नको रे शिकू,पास होशील कि नाही हि शंका.....अगदी पहिलीपासून शिकवणी बाहेर लावली .मग IT ला थोडे वाईट दिवस आले ,तेव्हा शिकवणी सोडायला लागली आणि मी मुलांना शिकवू लगले .बाकी कोणती हि गोष्ट मला लागली ,मी मागितली कि मिळते . तिथे कुठे हि कमी नाही अगदी दिवाळीला दहा हजाराची साडी पण घेतील ,मी म्हटले तर ...स्वतः हून कधी च काही आणत नाहीत .आणि कधी कशाला चांगले म्हणत नाहीत ..
.
.
.

असेच दिवस चालले होते ,६ वर्षापूर्वी नवीन जागेत आलो ,मोठी जागा ,हवेशीर प्रशस्त खोल्या खूप आनंद झाला . तेव्हाच शेजरचे दया आणि दीप्ती आले .ते हि नवीन च होते. ओळखी झाल्या .दया ने ओळख करून दिली ,तो एका खाजगी शाळेत नोकरीस होता ...मी मुनिसिपाल्तीत आहे हे कळल्यावर लगेच च म्हणाला अरे वाह ,खूप CHALLENGES असतात  अशा नोकरीत. गरीब -मध्यमवर्गीय ..वेगवेगळ्या समाजातील ,तसे त्यांना सांभाळून घेवून शिकवणे अवघड असते .घरी कधी कधी शिक्षणाचे महत्व नसते ,तेव्हा मुलांना अभ्यासाचो गोडी लावणे पण करायला लागत असेल ना ? ...किती बारकावे जे मला हि कधी जाणवले नव्हते , किंवा ज्याचा मला कधी अभिमान वाटला नव्हता ते आज दयाच्या बोलण्याने मिळाला .
/
.

मग कधी बाहेर कुठे भेटलो ,कि शाळेबद्दल च बोलत असू . त्याच्या शाळेतल्या "यशस्वी  दहावी " वर्गाबद्दल ..तर कधी माझ्या शाळेबद्दल ...घरी येवून रमेश ला सांगत असे , मग एकदा रमेश म्हणाला तू जास्त दयाशी बोलू नकोस .तो माझ्यासारखा नाही आहे ,मी स्व कमाई ने हि जागा घेतली आहे ,तर त्याने गावाकडचे घर विकून घेतली  आहे ... मी म्हटले माझी कमाई ? तर लगेच च हसून उत्तरला विचार तुझ्या शाळेत ५० लाख लोन तरी देतील का ?.......मला वाटते इथे कुठे तरी मनात तुटले .....

त्यानंतर मी आणि दया कधी कधी  भेटत असू ,फक्त घरी बोलत नसे .चार वर्षापूर्वी  माझी बदली दयाच्या शाळेजवळ च्या शाळेत झाली .त्यानंतर आमचे भेटीचे प्रमाण वाढले . मला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आणि मी पहिला फोन दयाला केला . तो हि शाळा सुटताच पेढ्याचा पुडा घेवून आला . घरी जेव्हा सांगितले , पुरस्काराबाबत ..तेव्हा प्रश्न आता अजून किती शिक्षिका बाकी आहेत पुरस्कार न मिळालेल्या ? एक एके वर्षी एकेकिला द्यायचा ...त्यात काय....
आता आमच्या दोघांच्यात जे भावनिक नाते निर्माण झाले आहे ,त्याबद्दल काही सांगता येत नाही , पण त्या शिवाय जगणे विचार करू  शकत नाही .कुठलेही शारीरिक संबंध नाहीत . पण एकेम्कांचा भावनिक आधार मला खूप मोलाचा वाटतो .
.
.

.
पण दयाच्या घरचे काय, असे वाटत असेल ना ? त्याचे लग्न  ठरवून झालेले .तो मुळचा  सोलापूर चा ,त्याच गावात दीप्ती चे माहेर आहे .मुलगा मुंबई ला चांगल्या शाळेत शिक्षक आहे , आई-वडिलांनी ठरवून रीतसर लग्नझाले. वर्षाभर  छान चालले होते. मग तिच्या बहिणीने गुजराती मुलाशी लग्न केले ,तो खूप श्रीमंत आहे . अजून धाकट्या बहिणीने  डॉक्टर शी लग्न केले . आणि मग दीप्ती ची कुरबुर सुरु झाली . बहिणी कशा छान छान साड्या  घेतात ,दागिने  घालतात ....स्त्री चे विचार म्हणून दया दुर्लक्ष करी .मग तिच्या वडिलांचा ६० चा वाढदिवस आला .तिच्या आई-वडिलांना काहीतरी  द्यावे म्हणून दया खूप मागे लागला ,पण दीप्ती ने हट्टाने घेतले नाही . वर तिथे जावून आई-वडिलांना सांगितले कि तुम्ही च शोधून दिलात न मास्तर ...मग आता आम्हाला काही द्यायला परवडत नाही ... सर्वांसमोर मुद्दाम आई ने घेतलेल्या नवीन २ door फ्रीज समोर फोटोज काढले ,जणू दया आणि दीप्ती नेच तो दिला आहे असे नातेवाईकांना वाटावे...
.

.
त्यानंतर प्रत्येक वेळेस ती आई-वडिलांनाच दोष देई ...मग आई -वडील बहिणी कोणी बोलावेनाश्या झाल्या. मग घरात आदळआपट आपण गरीब ,आपल्या ला मान नाही ...मोठी असून आई -वडील मला विसरले ....दयाची आई निवर्तल्यावर गावाकडचे घर विकून हा ब्लोक घेतला . शाळा आणिटुश्यंस  घेवून दया दिवसभर कमावतो पण घरी कधी चांगले जेवायला हि मिळत नाही.... कटकट तर दर एक दिवसाआड असते च कारण काही हि पुरते ...तरी हि संसार सुरु आहे ....
.


आता कधी तरी मी त्याच्याकरिता पण डबा  नेते...आम्ही एकमेकांना सर्व गोष्टी सांगतो कधी त्यामुळे हळवे होवून रडतो देखील....खूप जिवलग मैत्री च म्हणेन मी ..भाऊ -बहिण असली खोटी नाती म्हणायची नाहीत मला....
आनंदाच्या वेळेस किंवा अडचणीच्या वेळेस प्रथम त्याची च आठवण येते , मग कधी कधी अपराधी वाटते ...आर्थिक ,सामाजिक, शारीरिक कसले हि कमी नसताना हे असे का झाले ?
आणि मग मी परत स्वतः ला समजावते  तुझे बरोबर आहे ,पण मला सांगा अशी मैत्री समाजात मान्य होईल का ? कोणी विश्वास ठेवेल का ? कोणतेही शारीरक संबंध नसलेली स्त्री -पुरुष मैत्री समजून घेतली जाईल का ?

..

अशी मैत्री करणे आज तरी चुकीचे मानले जाते , मग आता मला सांगा माझे कुठे चुकले ? मी तुमच्या दृष्टीने ति-हाईत  आहे , आणि तीऱ्हायीतच्या  नजरेतून तुम्हाला काय वाटते ?


अर्चना कुलकर्णी 

२/११/२०१२ 




Dear Appa,

Dear Appa,
It didn’t matter whether we met often or not, what mattered is that your advice helped me connect my life’s dots. It didn’t matter whether we spoke every day or not, what mattered was that you loved me a lot. Appa!, I miss you!
Whenever I go and meet Aai , There are spots in the house, that scream of your memory,there are cupboards and bags ,that want you back badly , 
Books are also waiting for you to read ...
You taught me to be strong always , but really whenever I remember you , I feel weak to accept your absence ....
We did so many things together, taught me to read good books, watch good Marathi dramas, listen good music... appreciate every good aspect ...
Appreciate people ,understand feelings .... So while doing it ,I remember you every single moment ...
But Appa, I really feel sad , that I did not record your voice... That would have helped me little to relieve my pain ... As I see photos and recollect the memories...
If only I could build a time machine, to erase everything , your sickness ,
that I have seen, I would turn time back,to the moment when you
were actively taking part , in everything .
Enjoying life with interest , writing books and notes ...Taking photographs from your camera, 

Nature as well people loving !
yes , writing letter was your hobby , I never missed your letter when I was in abroad ! Now found so many envelopes , inland letters from your cupboard, who will use it now ? Miss you very badly ... Can't send you letter ! Won't get any reply .... its hard to believe . 

it is said that anyone can become Father , But it takes someone Special To become DAD !
Now its about one year ,I understood the real meaning of pain and sadness !

Archana
31/1/2016

Thursday, 11 February 2016

खेळ

देवून बघ कधी  तरी ,मला थोडा वेळ ,
जमेल मग तुझ्याही आयुष्याचा ताळमेळ !
चढत्या भाजणी ला नव्हता जर ही वेळ  
उतरत्याला म्हणशी हा कसला नशिबाचा खेळ !
अर्चना 
१२/२/२०१६

Tuesday, 19 January 2016

प्राक्तन प्राजक्ताचे

प्राक्तन प्राजक्ताचे

कोणा न कळले
उमलताच ते
मातेने झिडकारले
धरेने सावरले
रमणी ने वेचिले
परी कधी न माळिले
हरी चरणी अर्पिले
असुनी सुवास हि
कोणी त्यास न पुसिले

त्याचे दुख्ख फक्त

त्यानेच साहिले ...!
अर्चना

Monday, 18 January 2016

VYATHA KONALA ?

जरा कुठे खुट्ट झाले की घाबरणारे मन तिचे , आज तीच मोठ्या आवाजात सांगत होती , सर्व काही ठीक होईल ,तुम्ही नका काळजी करू !
कधी झाला तिच्यात हा बदल ?
अगदी काही महिन्यांपूर्वी भेटली होती , लग्न ठरले सांगत होती , वय वर्षे १६ ! अभ्यास अर्धवट सोडून तिला बोहोल्यावर उभे केले ,
त्यानंतर दिसली आज , भर रस्त्यात तिला एक माणूस मारत होता , तिचा नवराच होता … जवळ जावून त्या माणसाला मी ढकलले , 
त्याच्या तोंडाला येणारा दारूचा उग्र दर्प …. त्याचे शब्द , त्याचे चालणे कसले ते लडखडणेच ते … सारेच विचित्र …
काही क्षणांकरीता आली ती माझ्याजवळ , पण लगेच च दूर निघून गेली ,त्याच्या मागे …
जाताना "सर्व काही ठीक होईल ,तुम्ही नका काळजी करू !"
मनात असंख्य प्रश्न व चिंता , काळजी तिच्या आयुष्याची निर्माण करून गेली !


ARCHANA 
15/1/16

JAGO GRAHAK JAGO

असा ही एक अनुभव -

गेल्या आठवड्यात एका मैत्रिणीबरोबर एका BRANDED चष्म्याच्या दुकानात जाण्याचा योग आला .  डोळे तपासणी मोफत होती , तिला करायची होती . मी  म्हटले आपण ही एकदा करून घ्यावी . UP university तून कसला तरी डिप्लोमा घेतलेली मुलगी डोळे तपासत होती . आधी जुना चष्मा लावून , वाचायला सांगितले , वाचले की मी सारे , तरी देखील नियमानुसार वेगवेगळी भिंगे लावून इथे तिथे  फिरवत पुन्हा नवीन नंबर , परत एकदा इलेक्ट्रोनिक मशीन वर हनुवटी ठेवून डोळ्यात प्रखर किरण सोडून त्याचे फोटो … 
हे सर्व सोपस्कार झाले , मग सुरु झाले तिचे पुराण (अर्थात हिंदीत )
खूप नंबर वाढला आहे , axis पण बदलला आहे. 
मी म्हटले ठीक आहे ,बघू थोडे दिवसांनी ,आता फक्त तुम्ही मला नवीन नंबर चा कागद द्या . 
नाही तो आम्ही देत नाही , तुम्ही इथे चष्मा घ्यायला हवा . 
नाही घेतला नवीन चष्मा तर डोळे तिरळे होतील , पुढे जावून ग्लुकोमा होईल , मोतीबिंदू होईल …। 
जे काही डोळ्याचे आजार  असतील ते सर्व होतील … असे सांगत राहिली … 

हे बघा मला नवीन नंबर चा कागद द्या  , मी तो घेवून येते दोन -चार दिवसात ,

नाही तो नाही देवू शकत . 
पण तुम्ही आज च चष्मा घेतलात तर तुम्हाला फ्रेम वर १५ % सूट मिळेल … अशी प्रलोभने सुरु झाली … 

तोवर मैत्रिणीने डोळे तपासून कोणता चष्मा वगैरे ठरवत होती , 
तिने इथे च घेतला चष्मा … 
तिचे आटोपल्यावर आम्ही निघालो . 

दुसर्याच दिवशी आमचे नेहमीचे Opthalmologist आहेत त्यांचेकडे गेले ,
म्हटले उगाच काही व्हायला नको …। 


डोळे तपासून त्यांनी निर्णय दिला, नंबर आहे तो च आहे, अजिबात बदलला नाही , चष्मा पण चांगला आहे . 
इतक्यात बदलण्याची  गरज नाही …. 


हुश्श झाले ना !


जागो ग्राहक जागो !

अर्चना . 

Friday, 8 January 2016

ऐसा क्यों ?

नजदीकियाँ इतनी थी ,
की सब जला करते थे ,
 कुछ बात पे खफा हो गए ,
मगर वो हमें आजमाते रहे ,
हम उन्हें ,
गलतफहमियाँ बढती रही ,
अहसास जब हुआ ,
तब दूरियाँ बढ़ चुकी थी !

अर्चना 
9/01/2016