हास्यक्लब या संकल्पनेला मी अगदी काल - परवा पर्यंत हसत होते. हास्यक्लबची गरज काय, असे मला नेहमीच वाटायचे. ऑफिसमध्ये जाताना अकारण हसताना लोकं दिसले की मला विचित्र वाटायचं ..माझे वडील जात असत , त्यानंतर माझ्या सासूबाई सुद्धा जात .... परंतु गेल्या एकवीस दिवसात माझे हे मत पूर्णतः बदलले.
आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आमच्या इथे एकवीस दिवसांचे योग शिबीर आयोजित केले होते. प्रत्येक दिवसाचा समारोप हास्यसनाने होत होता.
त्या वेळेस मला कळले,
आपण दिवसभरात खळखळून हसतच नाही.. बहुतेक लोकांचा दिवस ताणतणाव यातच जातो..याची चिंता...त्याची काळजी.. ह्याचा आजार , त्याचे ऑफिस..घर..! आज काल कोणी समाजात मिळून मिसळून गप्पा गोष्टी हास्य विनोद असे करत नाहीत.इतकेच नाही तर समोरच्या व्यक्तीच्या Smile ला Smile ने उत्तर देखील देत नाही ...
बोटावर मोजण्या इतके टीव्हीवरील शोज सोडले तर बाकी सगळे गंभीरच असतात! बातम्या तर या ताण वाढवणाऱ्याच असतात. व्हाट्स अप, फेसबुक यात व्यस्त असताना प्रत्यक्ष असे आपण एकटेच असतो... त्यामुळे खूप मनमोकळे हसू येतच नाही.. किंबहुना मनसोक्त हसणे आपण जसे विसरूनच गेलो आहोत!

हसण्याचे भरपूर फायदे आहेत..मन प्रसन्न राहते, शरीरात एक प्रकारची ऊर्जा येते, चेहऱ्यावर प्रसन्नता दिसून येते वगैरे... उन्मुक्त हसणे, हे एक प्रकारचे औषधही आहे. सगळेच लोकं ताण तणावाला हसत खेळत सामोरे जाऊ शकत नाहीत.... अशा लोकांकरिता हास्यासन किंवा हास्यक्लब अत्यंत जरुरी आहे, असे मला वाटते. अगदी रोज नाही तरी सप्ताहातून एकदा तरी हास्यासन करायला हवे...किंवा खूप विनोदी पुस्तक वाचायला हवे..आपले पु. ल . किंवा आणिक दुसरे असे च . किंवा विनोदी मालिका / चित्रपट पाहायला हवे...या कामी you tube खूप महत्वाची ठरू शकेल . परंतु प्रत्येकानेच आठवड्यातून एकदा तरी खळखळून हसायलाच हवे!ताजेतवाने व्हायला हवे !
अर्चना
२१/०६/२०१५
अर्चना
२१/०६/२०१५
No comments:
Post a Comment