प्रिय सुप्रिया ,
मला माहित आहे की हे पत्र जरी मी लिहिले तरी तुला कधी च मिळू शकणार नाही...आणि माझे अनेक प्रश्न हि अनुत्तरीत च राहणार आहेत.......
दोन दिवसापूर्वी कळले ,अजिबात विश्वास वाटला नाही....अनेक वेळा वर्तमानपत्रात वाचतो त्या प्रमाणे सुप्रिया ......आपली हसरी मैत्रीण असे काही करेल.....खरे तर जेव्हा कळले तेव्हा तर हि बातमी खोटी असु दे अशी देवाकडे किती तरी वेळ प्रार्थना करत होते.....पण ते खरे ठरले आणि माझ्यावर जो काही आघात झाला तो अजून हि तसाच आहे ...म्हणून आता रात्री तुला लिहायला हे पत्र घेतले ....
सुप्रिया आज हि आठवते आहे मला आपली पहिली भेट ....अंजू च्या जिम मध्ये ...तू आलीस खूप गोड ,हसरा चेहरा ...छान पाणीदार डोळे ..जराशी बुटकी .....गोरी ....लांबसडक ...आणि जाडजूड वेणी......तू जिम मध्ये नेहमीचीच होतीस मी नवीन होते .....इतर कोणी नाही पण तू स्वतः हून नाव विचारलेस .....'मुंबईहून आलीस 'असे म्हणून हसलीस .....मी म्हटले किती छान केस आहेत.....त्यावर तू म्हणालीस जितके केस लांब तितकी माझी उंची कमी आणि जितके घनदाट तितके आयुष्यात दुख जास्त असे आई म्हणायची ......मला च काय कोणालाही कळले नाही तू असे का म्हणतेस ? 'अग , असे पूर्वीचे समज ग '.....आणि हसून व्यायामाला सुरुवात केलीस....
त्यानंतर आपण नेहमीच भेटत होतो ... जाणवत होते नावाप्रमाणेच तू सर्वाना प्रिय आहेस....मनापासून व्यायाम करणारी अशी तू एकटीच असे आम्ही सर्वजणी म्हणायचो.... एखादे दिवशी जमले नाही तर दुसर्या दिवशी अगदी दुप्पट करशील इतके असायचे तुझे..
भिशी सुरु केली तेव्हा विचारले येशील का ग तू ? म्हणालीस शक्य नाही होणार ग पैसे देणे .....पण का? हे खरे कारण कोणी विचारलेच नाही ....कोणी म्हणाले कि तिच्या घरी मैत्रीणीना आणणे बंदी आहे ......असेच सोडून दिले ....
त्यानंतर तू जिम ला येणे बंद केलेस सासर्यांना बरे नव्हते सर्व करावे लागे ....त्यांचा पाय AMPUTE केला होता ...बरोबर आहे कसे जमणार तुला .....बस इतकाच विचार केला......
मग तू रस्त्यात भेटलीस आपण दोघी चांगल्या तासभर बोलत होतो ..मुलीची शाळा तिथली पालक सभा ...तिचे पाचवीचे वर्ष ...नवीन विषय ....सासर्यांची तब्येत ....तेव्हा बोलताना समजले कि तुझे आई-वडील लहानपणीच वारले ...मामाने तुला व तुझ्या भावाला सांभाळले .....आता भाऊ दिल्लीत .....त्यामुळे माहेरी कोणी नाही असे च चित्र...तरी हि तुझ्या चेहऱ्यावर एक अल्लड ,निरागस हसू तसेच होते ....
मग मी तुला मुद्दाम बोलावू लागले मुलीला शाळेत सोडायच्या वेळेस उभी राहून गप्पा मारत असे .....पण तेव्हा हि तुझा हसरा चेहरा........ कधीच जाणवले नाही ग .....कि "तुम इतना जो मुस्करा रहि हो ...क्या गम ही जिस को छुपा राही हो ..." आज जाणवते आहे .....आणि खूप अपराधी वाटते आहे .... आपल्या इतर कामांमधून आपण कधी दुसर्याचा विचार केला नाही......इतके कदाचित तुला सांगायचे असेल पण कधी विचारू शकले नाही ....
तू सुद्धा आपण मैत्री म्हणतो पण ती फक्त हसणे - खाणे - गप्पा मारणे एवढी च मर्यादित का ठेवलीस ? तुझ्यावर होणार्या अन्यायाबद्दल तू कधी च कोणाशी काही बोलली नाहीस.....
एकदाच बोललेले एकच वाक्य आमच्या घरी भाजीवाली येते ....माझ्या नवर्याला आवडत नाही....मी भाजीवाल्याकडे गेलेले ...... त्यावर मी म्हटले असे आज च्या जमान्यात कसे चालेल ? तुझा नवरा देखील SALESMAN आहे मग त्याला बघून बायकांनी दारे बंद करावी का ?...तर लगेच च हसत म्हणालीस अग तसे नाही ....उलट तुम्ही सर्व मैत्रिणी खरेदी करता म्हणून चांगले चालले आहे आमचे ...
का असे केलेस ? किती हि अन्याय झाला तरी तुझ्या डोळ्यात कधी विस्तव दिसलाच नाही ....की डोळ्यानीच विझवली होती तुझ्या मनातली आग ? कसे पचवलेस तू हे सारे ? कसे स्विकारलेस ?
अन शेवटी असे काय घडले ? की तू स्वतःला जाळून घेतलेस ? मुलीची हि काळजी नाही का वाटली तुला ? कसला कंटाळा आला ? सासर्यांचे मनापासून तू केलेस .......आणि ते गेल्यावर महिन्याभरात तुझे असे का व्हावे ? की हा अपघात होता ? अपघात, घात-पात ,की आत्मघात सर्वच अनाकलनीय..... माझ्या प्रिय सुप्रिया चा असा अप्रिय अंत व्हावा ......एक हसू जे गेले तीन वर्षे मी पहात होते ते मावळले .........
ह्या सार्या प्रश्नांची उत्तरे मला कधी च मिळणार नाहीत ......पण मी आज मात्र मनापासून ठरवले आहे कि कोणत्या हि स्त्रीवर अन्याय होतो आहे असे वाटले की नक्की च तिला बोलायला लावणार .....तिला योग्य ते सहाय्य करणार .....जावून दे ती सांगत नाही सोडून देवू ....असे नक्की च करणार नाही.......कदाचित अन्याय नसेल हि पण जे काही मानसिक दडपण असेल ते तरी नक्की कमी करण्याचा प्रयत्न करून दुसर्या कोणाचा हि असा अप्रिय अंत मला बघावा लागणार नाही ..... त्याने तरी तुला शांती मिळेल ...असे वाटते .....
तुझी मैत्रीण (?)
अर्चना