Thursday, 19 August 2021

आप्पा

 आप्पा....

आप्पा,

असे काय झाले?

काल बोलणारा, फिरणारा माणूस

आज असा कोमात जावा?

स्वतः ला जपून राहणारे,

सर्वांची काळजी घेणारे,

करारी पण हसमुख चेहरा

आज म्लान का व्हावा?

चार दिवस असेच सरले

नाकातोंडात गर्दी नळ्यांची

घालमेल आमच्या जीवाची

आज सकाळी वेगळेच घडले

हाकेने माझ्या तुम्ही डोळे उघडले

नजरेत दिसली चमक ओळखीची

परि शक्ती नसे बोलण्याची

भाषा सुरु झाली खुणेची

खूणवावे तुम्ही काही,

समजून मी उत्तर देई

व्हाल बरे तुम्ही आता

समजूत घातली मी जेंव्हा

मान हलवून दिलात नकार

जाणवत होते तुम्हा सारे,

मालवताना कुडी जीवाची

आई ची तुम्हास काळजी,

हातात घेऊन माझा हात

सांगून गेलात नजरेत

न बोलताच दिले वचन,

घेतले तुम्ही ही समजून

तगमग थांबली जीवाची!


अर्चना कुलकर्णी....

लेखणी

 लेखणी...

मनातील भाव भावना

लिहून दुसऱ्यास पोचवी

ती असते लेखणी!


लेखकाची लेखणी

कधी शब्दांतून हसते 

कधी लिहिताना रडते

कधी गोंधळून जाते 

तर कधी होते रहस्यमय!


कवीची लेखणी

शब्दांसवे लाजते,

रम्य स्वप्नी नेते,

कधी अर्थासोबत

लपाछपी खेळते!


संतांची लेखणी

अध्यात्मिक असते

मधुर, रसाळ भाषेत

जीवनज्ञान देते!


माझी लेखणी

माझी सखी, सोबतीण 

आहे अगदी साधी

मनातले लिहितानासुद्धा

मध्येच घाबरणारी,

मोठ्या शब्दांचे भार

न पेलणारी,

सोपेच शब्द पुनः पुनः लिहिणारी

आठवणीत रमणारी,

पत्र लिहायला आवडणारी...


शिकतेय आता

स्वतः च्या प्रतिमेतून

बाहेर येऊन

कविसारखी स्वप्ने पहात

नवीन प्रतिभा

येईल का?ते शोधणारी.....


अर्चना कुलकर्णी....

Wednesday, 4 August 2021

स्वरचित शायरी

 ख्वाब...

ख्वाब बचपन में रंगीन हुआ करते थे

जवानी में वही हसीन हो गये,

बुढापा आते ही धुंधले से हो गये!

अर्चना...      

मौसम....


बिन मौसम कि बारिश,

सब जगह खुशियाँ छायी

पर

मेरे आँखोमें नमी सी छोड गयी!


अर्चना.