Wednesday, 6 November 2013

काटा रुते कोणाला

काटा रुते कोणाला .....
आज सकाळपासून की काल संध्याकाळपासून माझे मन कशात नाही आहे .... आईला ही ते जाणवले आहे म्हणून सारखी माझ्या पुढे -मागे करते आहे . त्याचा ही आता त्रास होतोय ..... आईला सांगू शकत नाही .... तिला आधीच फार विवंचना आहेत .... आज कामावर जाण्याचा पण मूड नाही ..... छे , घरातून तर बाहेर पडू या ...बघू काही उत्तर सापडते का ...... बस, अशा विचारात बाहेर पडले ,आणि स्कूटी स्टार्ट केली ..... आज नेहमीचा रस्ता सुद्धा अनोळखी झाला ....एका वळणावर अचानक एका पाटीने माझे लक्ष वेधून घेतले .... नारी समता मंच ....yes  आता इथे जावून प्रयत्न करू या आपले मनोगत सांगण्याचा ...... थांबले तिथेच .... पण मनाचा निश्चय होत नव्हता ..... हळूहळू करत पहिल्या मजल्यावरील त्या कार्यालयात शिरले .... काम करणार्‍या महिलांनी मला बसवयास दिले अन माझ्या गर्भार पोटाकडे ... हळूच गळ्यातल्या मंगळ्सूत्राकडे ,कपाळावर नसलेल्या टिकलीकडे नजर फिरवली .... का आली असेल ? असे चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह सहज वाचता येत होते ...... तेवढ्यात संचालिका बाई आल्या .... अतिशय प्रेमळ ,मृदु आवाजात म्हणाल्या 'बोल बेटी ,काय हवे आहे तुला ?'" .......त्यांचा मृदू पण आश्वासक आवाज ऐकून  माझ्या डोळ्यातून कालपासून साठून राहिलेले पाणी झरू लागले .....थोडा वेळ जावू दिला त्यांनी आणि मग पाठीवरून मायेने हात फिरवत म्हणाल्या , तू आता इथे आली आहेस , कसली ही काळजी करू नकोस , जे मनात असेल जो काही त्रास असेल ते सांग....... अश्रू आवरून मी सांगू लागले .... मला त्रास स्वतः ला काही नाही .... पण जे सांगायचे आहे ते खूप मोठे आहे .... काही हरकत नाही ,तू सांग मला " ..... त्या आधी तुझे नाव तरी सांग .....

त्यांच्या त्या बोलण्याने मनाचा निर्धार केला आणि

माझे नाव रेवा , मी  एका  I V F सेंटर मध्ये काउन्सेलर म्हणून काम करते , आमचे डॉक्टर पाटील शहरातले नावाजलेले ,प्रतिष्ठित स्त्री रोग तज्ञ , प्रसूती तज्ञ आहेत , तीन महिन्यापूर्वी आमच्या कडे एक स्त्री आली होती . फार मोठी नाही असेल २२ -२३ वर्षाची …गौरी तिचे नाव …दिसायला अतिशय सुंदर ,नाजूक … डोळे पण छान बोलके …. तिच्याबरोबर तिचा नवरा नव्हता आला तर सासरे आले होते …. हे च आधी मनाला पटले नव्हते … ती डॉक्टरांकडून काम झाल्यावर माझ्याशी बोलायला आलि. अर्थात माझे ते काम च होते . …डॉक्टरांनी तिला समजवायची जबाबदारी माझ्यावर टाकली होती . तिचे शरीर गर्भ धारण करण्यास अनुकूल नव्हता , उगाच टेस्ट टुब करण्यात अर्थ नाही …. आमचे डॉक्टर त्याबाबतीत एकदम शिस्तीचे …. जर यश मिळणे शक्य नसेल तर कोणाला आशा लावायची नाही , मिळतो म्हणून पैसे घ्यायचे नाहीत … आता हे सर्व मी तिला सांगितले …. तिच्या नजरेतली चमक पूर्णपणे नाही शी झाली … सासरे उठून पैसे भरायला गेले , तेव्हा ती पटकन म्हणाली " चलो अब सभी आशा खात्म हो गयी !' मला राहवले नाही , खूप समजवले तिला , तेव्हा म्हणाली इस से पहले दो डॉक्टर के पास जा क हुआ है ।दोनो बार तिसरे महिने मे सब खात्म होताथा !" यहा आ के पहले हि दिन सब खतम …" मनात आले अरे बाप रे इतक्या लहान वयात …. कसे झेलले तिने ! तितक्यात सासरे आले . अगदी हसून बेटी इस को कुछ  सामाझावो ! अब नाही होगा बच्चा तो हम क्या करेंगे ? ….  मग इतक्या लहान वयात सारखे  डॉक्टर कडे का घेवून  जाता ? तिचा नवरा का सोबत येत नाही ? हे सारे प्रश्न मनातच राहिले …. गौरी चेहऱ्यावर घुंघट घेवून चालू लागलि… आणि तो विषय सुद्धा ….

काल परत तेच तिचे सासरे आले होते … एका १७-१८ वर्षाच्या मुलीला घेवून …ती त्यांची होणारी सून होती …. तेच तुपकट हसू दाखवून म्हणाले हिची अगोदर च तपासणी करून घेतोय …. म्हणजे नंतर काही भानगड नको … पण गौरी ? डोळ्यात थोडेसे (खोटे )दुखः दाखवत म्हणाले …. तुम्ही तिला एवढे समजावले …. आम्ही घरून पण म्हटले आपल्याला वारस नाही झाला तर काही काळजी नाही …. हवे तर दुसरे डॉक्टर कडे जावू …. पण तिचे कामात लक्ष च नव्हते … आम्ही घरात नव्हतो  आणि माहित नाही  कसे काय ग्यास चा स्फोट झाला आणि गौरी गेली   …. . आता तीन महिने झाले  … घरात कोणी बाई  माणूस नाही … पोराला म्हटले कर दुसरे लग्न …दुसरा काय  करणार न ? … मी पाहिले तर ही  दिसायला गौरीपेक्षा हि सुंदर …. पण चेहऱ्यावर गरिबी दिसून येत होती …  तिच्या डोळ्यातले भाव मला जाणवले  …. काय कारुण्य  होते तिच्या नजरेत … तिची आई पण सोबत होती … आई ची नजर लाजिरवाणी होति…. मनात येत असावे लग्नापूर्वी अशी तपासणी का करावी ? … पण गरिबीला बोलत येत नाही …. डॉक्टर ना  भेटले ….सगळे ठीक आहे … असा निर्वाळा मिळाले …ते तिघे निघून गेले …. आणि मला सुचेनासे  झाले …खरच गौरी कशाने गेली असेल ? ती पण गरीब च होती का ? ती त्याची पहिली बायको होती कि कितवी ?तो तिचा नवरा का येत नाही ?की हा म्हातारा माणूस च नवरा … ,,,, किंवा त्याची आई देखील  कशाने वारली असेल ? ….  आणि बायको म्हणजे फक्त प्रजोत्पादन करणे असे का आज हि महत्वाचे मानले जाते ?…. तिला मन नसते का ? तिच्याच बाबतीत असे नाही पण अजून हि मुलगी झाली म्हणून कपाळावर आठी घालणारे  वडील दिसतात ……. अशिक्षित सासू दिसते  … एवढेच नाही तर शिक्षित सासूदेखील  ,पाहिली आहे , अगदी परवाच … फक्त ती आरडओरडा करत नाही हा च काय तो फरक … मुलगी -नात झाली असे म्हटल्याबरोबर तिला न बघता आजी ऑफिस ला गेली …। मग सून म्हणाली , नातू झाला असता तर सासूबाई VRS  घेणार होत्या …. पण आता काही त्या नाही घेणार ….  म्हणजे फक्त मुल नाही तर मुलगाच  च हवा असा हट्ट  का ? …. किती पिढ्या असे चालणार ? …मुली होणे चूक आहे का ? मुल झाले झाले नाही तर स्त्री जगू शकत नाही का ? तिला किती स्त्रिया समजून घेत असतील ?  खूप उद्धवस्त झाले आहे मी …।

रेवा शांत हो , तुझ्या ह्या परिस्थितीत तू जास्त tension  घेवू नकोस … तुझ्याकडे त्यांचा पत्ता आहे का ? किंवा फोन नंबर ? …. पत्ता, फोन नंबर मी नाही देवू शकत … आमच्या हॉस्पिटल नियमांविरुद्ध आहे ना ? …. अग पण जर  तू काही नाही दिलेस तर आम्ही कसे शोधणार ?आपण कदाचित अगोदर घडलेल्या घटनांबाबत काही करू शकणार नहि… पण आता जी मुलगी लग्न करणार आहे तिची तर काळजी घेवू शकतो ना ? ती लग्न मोडणार ही नाही , पण तिला कल्पना दिली तर ती सजग राहील … तू देतेस का नंबर ? …. थांबा ,मी आधी डॉक्टर न विचारते …. oh  नो , मी मोबाईल घरी च विसरले वाटते …. आता आई काळजी करणार ….तिने हॉस्पिटल मध्ये हि एव्हाना फोन केला असेल ….  मी आधी घरी जाते …. उद्या येवून सर्व काही सांगते ….    अन तिथून मी  बाहेर पडले …।
मी  तिथून बाहेर पडली ती काहीशी हलकी होवून च …काल पासून जे मनावर मळभ  आले होते ते दूर झाल्यासारखे वाटत होते …. घरी जाताना खात्री होत होती की जरी आपण गौरीला मदत करू शकलो नाही तरी ह्या सुंदर मुलीला तरी आपण सावध करू शकू …. लग्न ठरले असल्याने मोडण्याचा विचार ही तिच्या घराची  माणसे करणार नाहीत ,पण तिच्या बाबतीत काही गैर घडू नये हे तरी पहात  येईल …. ह्या विचारात आपले घर कधी आले ते कळलेच नाही ….
आई  वाट  बघत  होती …. काय झाले रेवा ? बरे नाही का ? आणि मोबाईल  घरी च कसा राहिला ? … काही नाही ग ,जरा  डोके दुखते आहे मी विश्रांती घेते ….होईल बरे तू नको काळजी करूस … असे कसे काळजी नको करूस … दोन जीवाची आहेस तू … जरा दुध पी आणि मग आराम कर …।


आज दोन दिवसांनी मी परत त्याच कार्यालयात जाते आहे  … डॉक्टर ना पूर्ण कल्पना दिली .त्या माहितीचा दुरुपयोग होणार नाही हे पटवून दिले आणि  मी तो नंबर त्यांना देते आहे …. …  मी आता शिरताच ,अरे वा रेवा आज अगदी छान दिसते आहेस … बस इथे … परत तेच मृदू शब्द …. जीव सुखावतो असे ऐकून … त्यांना नंबर, पत्ता दिला … माझ्याकरिता आलेला गरमागरम चहा घेण्याचा  आग्रह मला  मोडवेना … चहा घेत असताना , मला म्हणाल्या "मला कल्पना ताई  म्हणतात " तू मला मावशी म्हटलेस तरी चालेल … पण तुझ्या मनातले जे वादळ आहे ते ही तू सांग … " छे तसे काही नाही " " अग ,कदाचित तुझ्या जन्माच्या आधीपासून मी हि कामे करते आहे , आधी संस्था नव्हती , घरूनच करायची … लष्कराच्या भाकर्या असे सर्व जण म्हणायचे … पण मला स्वस्थता हे काम करूनच मिळते . बोल तू निसंकोच पणे ….


 "कल्पना मावशीचे ते शब्द ऐकून माझ्या मनाचा बांध  फुटला …. का रडायला लागले हे ही कळेना …. "हे बघ मनाला त्रास होत असेल तर नको सांगूस , पण सांगशील तर उपाय ही  सापडेल … " पाठीवर फिरणारा हळुवार हात ,…. /तो च हातात घेवून सांगू लागले …. मी रेवा ,हे तर तुम्हाला माहित आहे च … आई -बाबांची एकुलती एक …. खूप लाडात , पण शिस्तीत ही वाढवले आई-बाबांनी …. मी होमेओपथि च्या शेवटच्या वर्षाला असताना एका मैत्रिणीच्या लग्नात माझी आणि राजेशची गाठ पडली …। त्याला मी बघताक्षणी आवडले … आणि दोन तीन दिवसात एखाद्या चित्रपटात घडावे तसे तो मला कॉलेजला भेटण्यास आला ….
माझे शिक्षण पूर्ण होत  होते …. मी लगेच च घरी सांगितले … आईचा पहिला प्रश्न तुला पण तो आवडला आहे का ? काय करतो ? त्याच्या घरी माहित आहे का ? आपली जात वेगळी आहे हे त्याला सांगितलेस का ? …प्रश्नाची सरबत्ती सुरु राहिलीच … तितक्यात राजेश आमच्या घरी आला …. त्याने माझ्या आई -बाबांचे मन जिंकले …B.Tech .. M.B.A. चे त्याचे शिक्षण …. चांगल्या पगाराची नोकरी … बोलण्यात वागण्यात नम्र … दिसण्यास रुबाबदार …. अजून काय हवे ? … त्यातून माझे  शिक्षण पूर्ण होईस्तोवर थांबू या … तोवर भेटण्यास परवानगी मोठ्या हुशारीने त्याने घेतली …. ते सहा महिने खूप आनंदात गेले … सुरुवातीला त्याच्या घरून जातीमुळे विरोध होता … पण कदाचित मुलगा ऐकत नाही म्हणून किंवा मी हि त्यांना पसंत पडले असेन …. त्यांचा विरोध मावळला …इतका की लग्नात कोणी काही बोलले तर राजेश ची आई आमच्या बाजूने उत्तर देत होती …. खूप हौसेने आईबाबांनी ,राजेश च्या घरच्यांनी लग्न केले …. लग्नानंतर ही सासू असे कधी त्या वागल्याच नाहीत … आपल्याकडे असे करतात असे समजावून सांगत … तुझ्या माहेरी काय करतात असे उत्सुकतेने विचारत ? … सहा महिने सर्व सण … सुट्ट्या दोन्ही कुटुंबे आनंदात घालवत होतो …. त्यांना जाणीव होती एक च लेक मग तिच्या आई बाबांना आता एकटे वाटत असेल म्हणून मुद्दाम बोलावून घेत …… तुझ्या करिता सुरुवातीला घरून च दवाखाना सुरु कर मग आपण दुसरीकडे शोधू असे म्हटले गेले …… आणि जुन मध्ये राजेश कामावरून घरी परतत असताना रस्त्यावरच्या खड्ड्याचा अंदाज आला नाही
…. आणि तो उडून नेमका ट्रक च्या समोर … क्षणात होत्याचे नव्हते झाले …डोळ्यापुढे अंधकार …
मला तर काही च कळेना …. आठवडाभरापूर्वी डॉक्टर मी आई होणार , ह्याचे  घरी CELEBRATION केले होते … आणि आता  अशी स्थिती झाली होती …. येणारा प्रत्येक जण  हळहळत होता …. त्यातच कोणी एक सासूबाईची मैत्रीण आली होती … सगळे विचारून झाले आणि मग हळूच म्हणाली … सुनेची पत्रिका पाहिली होती का ? … अर्थात च नकारात्मक उत्तर मिळाले … मग एक एक कहाण्या कडक मंगल ….  कोणी म्हणे राक्षस गणी  असले कि असे होते … आपण कोणत्या प्रसंगाला आलो आहोत …. मी तिथे च बाजूला बसून रडते आहे …हे कोणी समजून घेत नव्हते …शेवटी आईनेच मला दुसर्या खोलीत नेले …. वयाच्या चोविसाव्या वर्षी माझ्या वर असा प्रसंग यावा …. ह्यात दोष कोणाचा ? माझाच ? की माझ्या नशिबाचा ? कोण लिहिते हे नशीब ? … आपण ही  असे च निघून जावे वाटू लागले …. कशासाठी जगायचे ? …. तेव्हा खूप धीर दिला  आई-बाबांसोबत माझ्या मैत्रिणीनी …. खूप समजूत घातली …. तुझ्याबरोबर तू येणाऱ्या ही जीवाला त्रास देते आहेस असे म्हणून बळेबळे खायला लावले ….चार च दिवस झाले आणि राजेश ची आई म्हणाली , "तुला इथे राहून त्रास होईल , तू माहेरी जा , मी तुझ्या आईला बोलावून घेते " आणि मी माहेरी आले … समजले नाही त्यांच्या  बोलण्यात प्रेम होते कि मुद्दाम मला दूर केले जात आहे …. आई कडे आल्यावर मी थोडे शांत झाले … मैत्रिणी येवू लागल्या … खूप वेगवेगळ्या विषयावर गप्पा होवू लागल्या …. पण कोणी हि राजेश चा विषय काढत  नव्हते … एका मैत्रिणीच्या ओळखीने ह्या डॉक्टर च्या हॉस्पीटल मध्ये नोकरी देखील मिळाली ,,, खूप काही नवीन शिकायला मिळते आहे … मी शांत आहे असे वाटते ….  तोच काही दिवसांनी आई -बाबांचे बोलणे कानावर पडले … राजेशच्या आकस्मिक मृत्यूला मी च जबाबदार आहे असे राजेशच्या आईने बाबांना सांगितले … रेवाला परत आमच्या घरी पाठवू नका …. तिच्यामुळेच आमचे सर्व सुख नाहीसे झाले आहे … असे बरे च काही बोलण्यात आले …. त्यामुळे आई-बाबा माझ्याशी आता तो विषय काढीना …. शेवटी मी मैत्रीणीना विचारले … नक्की काय झाले आहे ? तेव्हा ज्योती (माझी जवळची मैत्रिण) म्हणाली अग राजेश चे जे काही पैसे आले त्यावर तुझा अधिकार नाही , घरातही तुला स्थान नाही असे सांगितले आहे …तू तरुण आहेस ,तू कमवू शकतेस … दुसरे लग्न पण करशील मग तुला राजेश च्या घराकरिता काही करावे लागणार नाही … त्यामुळेच तुला आता काही अधिकार नाही … .आई- वडिलाच तो च एक आधार होता …. पण मग होणार्या बाळाचे काय ? त्याचा आधार कोण ? त्याचे वडील नाहीत ,म्हणून कोणीही नाही का ? … त्यावर देखील त्यांचे उत्तर होते … जर मुलगी झाली तर ती दुसर्याची च होणार मग तिला हि अधिकार नाही …. जर मुलगा झाला तर आम्ही त्याला सांभाळू … पण रेवा नको … का का का ? ह्या प्रश्नांना उत्तरे नाहीत …. आई बाबा सध्या शांत आहेत ,मला न कळू देता वकिलाचा सल्ला घेत आहेत … मला ह्या अवस्थेत कोणताही त्रास देण्याचा त्यांचा विचार नाही …

पण  मावशी मला सांगा आज ही असे च का चालू आहे ? मुलीची पोटात च हत्या करण्यात येते …हे जितके वाईट आहे त्या पेक्षा हि भयंकर अशी हि वागणूक आयुष्य भर स्त्रीला दिली जाते …. कोणाला मुल होत नाही म्हणून छळ … मग देवादिकांचे उपास =तापास  ते देखील तिनेच करायचे … जिला मुल होत नाही अशा स्त्रीला इतर स्त्रियादेखील नीटपणे समजून घेत नाहीत … तर कोणाला मुलीच  होतात म्हणून छळ … कोणाला पर - पुरुषांशी बोलायला बंदी तर ,तर कोणाला पेहरावावर  बंदी …आई -वडील खूप कौतुक केले तरी सासरी मिळेल ह्यांची खात्री नाही …. तिलाच का आयुष्यभर सर्वांच्या नजरा रोखलेल्या अवस्थेत जीवन व्यतीत करावे लागते ? का उत्तर नाही ह्या प्रश्नाला ? ….
मला अजून महिनाभरात मुलगा / मुलगी होईल … पण त्याच्या हक्काकरिता मी झगडावे का ? … मी झगडले तरी हि सर्वांची सहानुभूती हि राजेशच्या आई-बाबांकारिता च राहिले हे ही मला माहित आहे …. इतर कोणी कशाला माझे मन पण म्हणते की त्यांचे बरोबर आहे ,वृद्धपणी त्यांनी कशाच्या आधारावर जगावे ? पण मी काही वाईट न वागता देखील माझ्याशी असे का वैर करावे ? बरे मी तर बाहेरची पण होणारे मुल हे त्यांचे नातवंड असेल तरी हि ते नाकारू शकतात ? …. मला त्रास न व्हावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या आई-बाबांना  माहित नाही आहे कि मी किती मोठ्या तणावाखाली जगते आहे …. त्यांच्यासमोर मला काही माहित नाही … असे दाखवत  आनंदाने राहते आहे …. त्यात असे गौरी सारखे काही कळले की मी उन्मळून पडेन कि काय अशी भीती वाटते …

पण मावशी माझा निर्धार मी केला आहे , मी हक्काकरिता झगडणार आहे …. त्यावेळेस नक्की तुमच्या कडे येईन …. जर मी दोन महिन्यात तुम्हाला भेटायला नाही आले तर हि माझी कहाणी माझ्या अक्षरात लिहून तुमच्याकडे देते आहे … तसे च माझा पत्ता पण आहे …. तुम्ही मला न्याय मिळवून द्याल ना ?






पूर्वप्रसिद्धी - http://issuu.com/-012/docs/________________________-__________







Thursday, 3 October 2013

अश्शी पुरुष जात बाई…

अश्शी पुरुष जात बाई…
स्वतः चे खरे करत राहते
त्यात झाली चूक काही
तर पत्नीलाच बोलते !
अशी पुरुष जात बाई
सदा न कदा कामात रहाते
उरला वेळ क्रिकेटला वहाते
गप्पा मारायला वेळ नाही !

Wednesday, 4 September 2013

गुरु

 काहीजण माझ्यापुढे चालत असतात ….
वाटेतले काटे वेचून घेत माझा मार्ग निष्कंटक करत  राहतात ….
काहीजण चालत राहतात  पुढेच …….
पण काटे टाळून वाट कशी काढायची हे दाखवत …
काही जण मागून येत होते जाणूनबुजून …
पायात रुतलेला काटा काढायला कुणी असावं म्हणून …
काहीजण मात्र पावलागणिक माझ्यासोबत राहिले ….
वाटेतल्या अदृश्य काट्यांची जाणीव करून देत …
डोळ्यांची भाषा बोलत … आणि …
हाताच्या घट्ट पकडीतून भक्कम आधाराची ग्वाही देत …
जर … त्या अदृश्य काट्या पुढे माझा अगदीच निभाव लागला नाही तर … 

सारेच गुरू …
  आई -वडील , शिक्षक ,समाजसेवक , भाऊ -बहिणी , मैत्रिणी- मित्र  , पती …। ते सारे -गुरू …
  माझ्या  मनात झिरपणारे …सर्वाना भावपूर्वक नमस्कार !
५/९/२०१३ 
 


ashi hi fasgat

माझे माझे ज्याला समजत होते ,
ते कधीच माझे नव्हते
फसले होते तुझ्या बोलण्याला
सावध झाले आता बघून तुझ्या वागण्याला
अर्चना

Monday, 19 August 2013

दाभोळकर तुम्ही चुकलात !

 कोणीतरी भ्याडपणे  हल्ला केला . 

अंधश्रद्धेचा असा हि बळी  गेला …। 

विवेकाचा अविवेकाने नाश केला 

नव  विचाराचा अस्त  झाला ?

विधेयक जावून बसेल आता बासनात 

अन राजकारणी स्वस्थ  आसनात !

दाभोळकर  तुम्ही चुकलात !

उगाच  जन्म घेतला पुरोगामी महाराष्ट्रात !


अर्चना ….

Friday, 9 August 2013

आठवणी

दुःख वाटून कमी होते ,
आठवणी वाटून संपत नसतात
त्या आठवणीचे मोल कोणाला जाणवत नाही



 आठवणी  ह्या अशाच असतात
कधी पटकन हसू हि आणतात
वाटून कधी संपत नाहीत
की  मोल इतरांना कळत  नाही
तर  ज्याच्या त्यालाच छळतात
इतके कि डोळ्यातून पाणी काढतात
जा म्हणून जात नाहीत
 आठवण काढ म्हणून येत नाहीत ……

आपण मात्र ठरवायचे
कोणत्या आठवणीत किती गुंतायचे
कसल्या आठवणीत रमायचे
आणि हसून -खेळून जगायचे

अर्चना .

Wednesday, 7 August 2013

napaak halla

जखमी मातेची चिंता कोणाला ?

जो तो सांभाळी  आपल्या सत्तेला 

दुख्ख सलते तिच्या उरात !

राजा चा जीव पैशाच्या मोहात 

प्रजा जरी नसली दुबळी 

तरी आज तीही झाली आंधळी !

सर्वत्र शब्दाचे बुडबुडे फुटले 

निषेध , मोर्चे काढून झाले 

पुन्हा एकदा मेणबत्त्या पेटल्या 

त्याच  मशाली का नाही जागवल्या ?

अर्चना .






 

Monday, 5 August 2013

माझ्या मनातला पाऊस .




माझ्या मनातला पाऊस .
प्रत्येकाच्या मनात पाऊस अगदी लहानपणापासून असतो ,अगदी  "ये रे पावसा " ह्या गाण्यातून आपली पावसाशी ओळख होते .ती गट्टी मग आपल्यासोबत कायम राहते ….   मोठे झालो की पावसाची विविध रूपे मनात साठवत जातो ,म्हणून च कधी कोणाला आपणाला जास्त समजते असे सांगायचे असले की पटकन म्हणून जातो "तुझ्यापेक्षा मी चार पावसाळे जास्त पाहिले आहेत . ' रिमझिमणारा पाऊस , कोसळणारा पाऊस , गारांचा पाऊस , भुरभुरणारा पाऊस , बरसणारा पाऊस ….  बालपणीचा पाण्यात होड्या सोडणारा पाऊस , शाळेतून येताना रेनकोट विसरलो  म्हणून पाठीवरचे दप्तर डोक्यावर धरून मस्त मजेत बागडणारा पाऊस …. तर तरुणपणी बीच वर किंवा ट्रेक ला जावून मुद्दाम भिजण्याचा आणि भिजवण्याचा आनंद देणारा पाऊस ……
मी  वेगवेगळ्या भागातले पाऊस अनुभवले आहेत ,,,,,,, अगदी देश-विदेशातले …। आफ्रिकेत असताना वर्षातून दोन वेळा पावसाळा  ऋतू असे …. तर नाशिकमध्ये श्रावण -भाद्रपदात बरसणारा व लगेच थांबणारा पाऊस …. युरोप मध्ये पावसाबरोबर येणारी बोचरी थंडी देखील अनुभवली …।  तरी हि मनाला भावतो तो मुंबईचा पाऊस … आम्ही मुंबईकर एप्रिलपासूनच ७ जून ची वाट पहात असतो …. अजून दोन महिने आहेत …. आता एक च महिना उरला असे म्हणत उन्हाळ्याच्या त्रासातून सुटका होईल अशी वाट पाहतो …… मग  वृत्तपत्रात येवू लागते या वर्षी पावसाळा लवकर सुरु होईल … केरळला पावसाचे आगमन …. आहा मग आमचे पावसाचे आतुरतेने वाट पाहणे …. सगळे कसे अगदी ठरल्यासारखे …. मग हळूहळू आकाशात काळे ढग गोळा होणार …. धडाम धुडूम आवाज होणार आणि अगदी वाजत गाजत मुंबईत पावसाचे आगमन …ढग गोळा  व्हायला लागले की लगेचच स्कूटी बाहेर काढायची आणि पावसाची मजा लुटायला तयार … सुरुवातीला भुरभूर येणारा पाऊस  त्याचे थेंब गरम रस्त्यावर पडताच त्याची होणारी वाफ … रस्ता ओला  होईस्तोवर  … सुटणारा मातीचा सुगंध , झाडा- पानावर जमा होणारे पावसाचे थेंब …सुरुवातीला स्वच्छ होणारे रस्ते … नंतर …. रस्त्यावर साठून राहणारे पाणी … छत्री नसल्याने भिजणारी माणसे …. कोणी मुद्दाम पहिल्या पावसात भिजायला बाहेर पडलेले …. लगेच च कुठून तरी कणीस विकणारा येवून उभा राहतो …. मग गरमागरम कणीस त्यावर लिंबू तिखट लावून खायचे …कोणीतरी बातमी आणणार मुंबईची जीवनवाहिनी रेल्वे बंद पडली आहे …. नेहमीचेच आहे … आता दोन तीन  दिवस तरी पाऊस मुक्काम हलवणार नाही …. हवेत गारवा आला का ? छे हा प्रश्न मनाला पडत नाही,........ घरी येवून मस्त पैकी गरमागरम कांदा भजी …. .....….
 उद्या मरीन  ड्राईव्ह ला जावू या की गेट वे ला असा विचार करत मैत्रीणीना फोन लावायचे …. दुसर्या दिवशी त्यापैकी एखाद्या ठिकाणी जावून लाटांचा उत्सव बघायचा …. हा पावसाचा आनंद पुढे वर्षभर मनात साठवायचा ….
 
 
 
पूर्व प्रसिद्धी - या सख्यानो ई -अंक जुने २०१३

Friday, 2 August 2013

केली इंटरनेटशी मैत्री

जोडली जगाशी दोस्ती

तुटत चालली मात्र

इथली रक्ताची नाती !

 

छोट्याचे मोठेपण

छोट्याचे मोठेपण
आता एक छोट्या  मुलाने फुलपाखरू पकडले ,  व आईला दाखवत होता .\
 आईने सांगितले अरे रोहन सोडून दे त्याला … रोहन ने लगेचच सोडले ,
 पण आता तो कुठे जाईल ? अरे ते आपल्या घरी जाईल …
 मग घरी कोण कोण असेल ? …आई -बाबा भाऊ - बहिण वगैरे असतील …
 मग तो घरी काय सांगेल ?… सांगेल मला रोहनने पकडले होते…
 छट  ,त्याला कुठे माझे नाव माहित आहे …
 अरे मी आता नाही का हाक मारून सांगितले ,तेव्हा ऐकले असेल …. नो… त्याला आपली भाषा येत नाही ….मग तू च सांग तो काय सांगेल घरी ? ….
तो सांगेल एका alien ने HI=JACK केले होते ……
 

Sunday, 28 July 2013

Get well soon

काल  Get Well Soon हे नाटक पाहिले . ब-याच दिवसांनी एक अप्रतिम नाटक बघितले असे वाटले ,

एक वेगळा विषय आणि अतिशय वेगळ्या प्रकारे त्याचे सादरीकरण . दोन्ही गोष्टी मनाला आवडून गेल्या .

 नाटक नशा मुक्ती साठी अविरत प्रयत्न करणारे डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पुस्तकावर आधारित आहे .

नशामुक्ती  केंद्रातून बाहेर पडलेल्या माणसाची आहे . त्याच्या मनात चालणारी द्वंद अतिशय उत्कृष्टपणे मांडली  आहेत . कुठे हि उथळ भाषा नाही तरी हि सर्व विषय घेतले  आहेत .
सोशल DRINKER  पासून दारुडा होण्यास वेळ लागत नाही , आणि त्यातून मुक्त होणे कसे ते इतक्या प्रगल्भतेने दाखवले आहे , Hats off to Dr. Anand Nadkarni , Dr, Anil Avachat , नाट्य  लेखक - प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक - चंद्रकांत कुलकर्णी
त्याच्या शी आपला काही संबंध नाही , मी काही नशा करत नाही असे न म्हणता प्रत्येकाने हे नाटक आवर्जून पाहावे असे मला वाटते .
कारण नशा नाही म्हणजे काय ? कोणाला दारू ,सिगारेट , पान तंबाखू याची नशा असेल . पण त्याही पेक्षा भयंकर अशी नशा असते ,  कौतुकाची , मोठेपणाची , पैशाची , हि च पुढे जावून सत्तेची होते ते आपल्याला जाणवत नाही . मग आपण जाणता  अजाणता अनेकांवर शारीरिक - शाब्दिक अन्याय - अत्याचार करतो त्याची आपल्याला जाणीव देखील होत नाही . हि एक नशा च आहे हे सुद्धा मन काबुल करत नाही .
आणि मग कधी कुठे कमीपणा आला कि आपली चूक लक्षात न घेता , त्याचे खापर दुसर्याच्या डोक्यावर लादायला मोकळे होतो …….

मग ह्या नशेतून मोकळे होण्याकरिता आपण प्रयत्न तरी करतो का ?

नक्की " गेट वेल  सून " कोणाला उद्देशून आहे ? हे तरी नक्की बघा ….

नाटकातल्या प्रत्येकाने आपली भूमिका अगदी चोख बजावली आहे .डॉक्टर झालेले संदीप मेहता अतिशय  balanced charectar उत्तम रीतीने सदर केले आहे .  स्वप्नील जोशी तर विचारायलाच नको , भूमिकेशी इतक्या समरसतेने काम केलेय कि केवळ लाजबाब …। स्वप्नील च्या भाषेत बोलायचे झाले तर God bless you Swapnil .


 

Wednesday, 24 July 2013

barbala

पुन्हा एकदा बार चा दरवाजा उघडला

जुन्या  बारबालेच्या जीवात जीव आला

म्हणे  मिळाली मान्यता

मिळेल  आता  प्रतिष्ठा ?

सांगेल जर ती मी आहे बारबाला

कोणी होईल का तयार लग्नाला ?

परत जावून भेटली बारमालकाला

तिला तिथे नकार च मिळाला !

सुकलेली तिची काया

अन चेहऱ्यावरची उडली रया

संपली होती  जमलेली माया

कोण दाखवेल तिला दया ?

होतील नवीन बारबाला

श्रीमंतांच मन रिझवायला

मध्यमाचे status symbol ठरायला

गरिबाला अजून गरीब करायला

पुन्हा एकदा बार चा दरवाजा उघडला !

अर्चना . १६ / ०७ /२०१३








 

Friday, 28 June 2013

African रेसिपि

पाककृती - आफ्रिकेतल्या -

आठ वर्षे आफ्रिकेत राहिले तेव्हा काही गोष्टी पाहिल्या , तिथल्या लोकंचे मुख्य अन्न मका असे लक्षात आले . मका भाजून , उकडून खाल्ला जातोच , त्याखेरीज त्याची वेगवेगळी पीठे तयार केली जातात . पांढरे पाठ , पिवळे पीठ  आणि त्याप्र त्येकाचा वेगवेगळा वापर केला जातो .  त्यांच्याकडून काही शाकाहारी  पदार्थ शिकले त्याच्या बद्दल थोडेसे …. 

१ )उगाली  -
साहित्य - मक्याचे जाडसर दळलेले  पांढरे पीठ १ वाटी
                पाणी ४ वाट्या
             मीठ चवीनुसार
           
कृती - प्रथम पाणी  मीठ टाकून उकळण्यास ठेवावे . पाणी उकळू लागल्यावर त्यात थोडे थोडे करून मक्याचे पीठ घालावे , सारखे मिश्रण हलवत राहावे . सर्व पीठ टाकून झाल्यावर पाण्याचे झाकण ५ मिनटे ठेवावे . मग परत झाकण काढून मिश्रण हलवावे ,  , एक वाफ आणावी . अगदी घट्ट  गोळा तयार करतात … भाजी बरोबर खातात .

हे त्यांचे रोज चे अन्न होय . अगदी लहान मुलापासून  ते म्हातार्यापर्यंत आवडीने  खातात . पौष्टिक गुणधर्मांमुळे मी हि ते करू लागले .   त्यात मी बदल करून कधी पाण्याला  मिरची - मोहरीची फोडणी देवून केले , खूप छान लागले .

२) मांडाझी - गोड पदार्थ -
साहित्य - १ अंडे , १/२ कप दुध , १/४ कप साखर , २ कप मैदा किंवा (सेल्फ रेसिंग फ्लोर )  १ टी स्पून बेकिंग पावडर , १/४ कप पिठीसाखर
 तळण्याकरिता तेल
पिठीसाखर खेरीज इतर सर्व साहित्य एकत्र मिसळावे . आपल्या कणकेप्रमाणे मळावे .१ तास कपड्याखाली झाकून ठेवावे .साधारण ६ गोळे करावे .   नंतर १ गोळा घेवून   पोळपाटावर जाड पोळी लाटावी ,  त्याचे चार भाग (त्रिकोणाकृती होतील असे ) करावे .  
तेल गरम झाल्यावर , मंद आचेवर तळून घ्यावे .
खायला देताना त्यावर थोडी पिठीसाखर भुरभुरावी .

चहा , कफ्फे  बरोबर खूप छान लागतात .

३. अवकाडो  मिल्क शेक -
   १ अवकाडो , २ कप दुध , ४ चमचे साखर .

पूर्ण पिकलेला अवकॅडो , आधी मऊ  करून घेणे . नंतर त्याचे वरचे साल काढून टाकणे . आतला गर  व साखर मिक्सर मधून  काढावा , नंतर त्यात दुध घालून एकत्र परत फिरवावे . खूप सुंदर हिरव्या रंगाचा मिल्क शेक तयार होतो . 


४. सुकुम विकी  - म्हणजे पालेभाजी . ती बनवण्याची कृती अतिशय सोपी आहे
 साहित्य - पालकाप्रमाणे असलेली  सुकुमा हि हिरवी पालेभाजी १ जुडी  , १ कांदा ,१ टोमाटो , २ चमचे तेल . मीठ

प्रथम तेल गरम करावे , त्यात बारीक चिरलेला  कांदा परतवा . टोमाटो बारीक चिरून घालावा , पालेभाजी घालावी . पाणी घालून शिजवावी .

ह्यात भाजीत जे विटामिन्स  , असतात त्यामुळे पुढचे काही दिवस उपास घडला तरी त्रास होत नाही असे म्हणतात .
कधी भाजी शिजत आल्यावर त्यात च  मांस घालतात . किंवा कधी मक्याचे पीठ लावतात … अशा रीतीने एक च दिश पूर्ण अन्न बनवतात .

५ . मक्याचे पटीस  -
मक्याचे पिवळे  पीठ १ कप , १ कप मैदा , १/२ टी स्पून बेकिंग पावडर , चवीला मीठ ,पाव चमचा साखर , २ मोठे चमचे तूप किंवा लोणी .
सर्व साहित्य एकत्र करून ,कोमट  पाण्याने घट्ट  मळावे . थोडे मक्यःचे दाणे मीठ घालून उकडून घ्यावे .  पीठाचे छोटे छोटे गोळे करून त्यात मक्यःचे दाणे  टाकून गोल नीट  बंद करावा . पटीस  प्रमाणे हलक्या हाताने दाबून तव्यावर शालो  fry  करावे .

मधल्या वेळेस खायला चटणीसोबत  हा पदार्थ चांगला लागतो .

       

Monday, 17 June 2013

आठवणीतला मे महिना !

मे महिन्याचा महिमा
माझा जन्म मुंबईतला ,सारे बालपण मुंबईतच , आजोळ हि मुंबईतच …आजोळी राहायला कधी फारसे गेल्याचे आठवतदेखील नाही . त्यावेळेस असे वाटायचे की मुंबईतच असल्याने नाही जात राहायला , दुःख नव्हते कशाचे .  त्यामुळे मे महिना म्हटले की फक्त डोळ्यासमोर यायची ती शाळेला सुट्टी …
मे महिना म्हणजे उन्हाळा असे कधी वाटले नाही, कारण मुंबईत पावसाचे दोन महिने सोडले कि कायम उन्हाळाच ….  मे महिन्याची सुट्टी म्हणजे धमाल ,मस्ती, मजा …
सकाळ झाली कि लगेच च घराबाहेर पळायचे  ,भाड्याने सायकल घ्यायची तासभर घुमावायची मग दुसर्या मैत्रिणीबरोबर तिला सायकल आणायची  म्हणून तिच्यासोबत जायचे…दुपार  होईतोवर अशी मजा …. दुपारी सगळ्याच्या मताने बैठे खेळ ….  संध्याकाळी विटीदांडू ,लपाछापी ,चोर पोलीस , लगोरी., डबा ऐसपैस .. असे  खेळ खेळत आईने किमान दहा वेळेस हाका मारल्यानंतरच घरी जायचे …. अभ्यासाची घाई नाही की गृहपाठ झाला नाही ह्याचा ओरडा नाही … 
सर्व जण  कोजागिरीला जागरण करतात , पण आम्ही मात्र वैशाख पौर्णिमेला जागरण करत असू … एक दिवस गच्चीवर जमायचे … प्रत्येकाने घरून खाऊ आणायचा किंवा  कधी कधी वर्गणी गोळा करून कच्चे समान आणायचे आणि गच्चीतच भेळ  बनवायची …. गोड म्हणून कोणाच्या तरी घरून खाऊ यायचा …. गाण्याच्या भेंड्या , कानगोष्टी असे खेळ खेळायचे…
मे महिना म्हणजे वाळवण करायचे दिवस … पापडाचे पीठ तयार झाले कि त्याची चव बघण्यापासून ते लाटून , वाळत घालेस्तोवर किती वेळा पोटात जात असेल … आई चा डोळा चुकवून पापडाची लाटी खाण्याची मजा काही और च …. पापडाचे  प्रकार तरी किती उडीदाचे , नाचणीचे ,ज्वारीचे ,तांदळाचे …त्यात परत काळेमिरी चे, लाल तिखटाचे , हिरव्या मिरचीचे …. मग साबुदाण्याच्या कुरडया … गव्हाच्या चीकावड्या …. आहा … वेगवेगळ्या प्रकारची लोणची मग त्या बरण्या  उन्हात नेवून ठेवायच्या …. न पाडता संध्याकाळी घरात आणून ठेवायच्या …. आता घरी करत नाही पण नुसत्या आठवणीने हि तोंडाला पाणी सुटते ….
मे महिना म्हणजे फळांचा राजा आंबा आणि फणस …त्यांचे  दिवस … चैत्राला जी वाटली डाळ  आणि कैरीचे पन्हे सुरुवात होते… ती आंबे आले की द्विगुणीत होते …. हपुस्स्स्सस्स्स ,पायरीई ….  अशी आरोळी आली की मग झालीच सुरुवात आम रसाची ……. फणसाचे गरे … पोटाला बरे म्हणत फणस खायचा …. उन्हाळा म्हणून ICECANDY  आणि ICE -CREAM त्यात हि आंब्याचा स्वाद घ्यायचा …. 
मे महिना म्हणजे लग्नाचे दिवस  मग कोणा मावशी -मामाचे लग्न असले की नटून -थटून लग्नात मिरवायचे …. मध्ये च कोणी तरी विचारणार मला ओळखतेस का ? आठवत नसले तरी हो म्हणायचे आणि हसायचे …. गम्मत म्हणजे कधी तरी वर्ष दोन वर्षातून भेटणारी एवढे  नातेवाईक कसे बरे आठवणार ? पण तसे म्हटले तर परत सगळी इथली तिथली नाती सांगणार … …. त्या पेक्षा हो म्हणणे श्रेयस्कर …. पटकन पळता येत असे …. तेव्हा देखील जेवणापेक्षा संध्याकाळचे ICE -CREAM  खास आवडीचे …
अशी गमतीजमती करत दीड महिन्याची सुट्टी किती पटकन संपली असे वाटत शाळा सुरु व्हायची ……

आता जरी सुट्टी असली तरी ही मजा नसते पण मनात मात्र ह्याच आठवणी ताज्या होवून जातात ….



पूर्व प्रसिद्धी या सख्यानो या ई- अंक मे २०१३

Tuesday, 16 April 2013

घर असावे घरासारखे



 घर हा शब्द ऐकताच  मनात अनेक भावना उचंबळून येतात ....तो शब्द रहातच नाही अनेक गोष्टी डोळ्यासमोर तरळून जातात .प्रथम डोळ्यासमोर येते ती आई ,तिचा प्रेमळ कुरवाळणारा स्पर्श .....अन तिचे कायम स्वयंपाकघरातले वावरणे ,,,,,,,,प्रत्येकाच्या आवडी लक्षात ठेवून खायला  घालणे ...मग आठवते बाबांनी न बोलता दिलेली प्रत्येक चांगल्या कामाची शाबासकी …… असे सगळे जवळचे आप्त आठवता आठवता डोळ्या
समोर वेगवेगळी चित्रे दिसू लागतात .....लहान घरे , प्रशस्त घरे ,झोपडी, बंगले , कौलारू घरे तर इमारतीतले flats ........असे करता करत आठवायला लागते सुगरणीचे  कुठे फिरायला गेले की झाडाला टांगलेले ,लटकलेले सुबक आकर्षक घरटे   ....तर चिमणीचे काड्या काड्या जमवून केलेले घरटे .....मधमाश्याचे पोळे .....मुंग्यांचे वारूळ ......कुठे झाडाची ढोली ही च आपली खोली ......मग मनात येते अशी प्रत्येक सजीवाला आपल्या घराची ओढ असते .........
ते घर फक्त माती -विटांचे असते का ?…घर म्हटले कि  त्यात असावा लागतो आपलेपणा .....म्हणूनच घर म्हटले की प्रथम आठवते की आई ......प्रेमाने सर्वांचे करणारी . ........तसे हि स्त्रीला घराबद्दल अगदी लहानपणपासून एक वेगळीच ओढ असते ....म्हणून च लहानपणी तासनतास भातुकलीच्या खेळात ,बाहुला -बाहुलीचे लग्न करण्यात ,वेगवेगळे पदार्थ करण्यात  मग्न असतात ........पण  जिथे वयाची २०-२२ वर्षे घालवली ते घर लग्नानंतर परके होते आणि परके घर आपले म्हणून ते आपलेसे करण्याची  धडपड करायची ......आणि ते घर सजवायचे ...फुलवायचे ......हे च तिचे स्वप्न होते .....तिथे असणाऱ्या ....आल्या- गेल्याना आनंद ,प्रेम आपल्या आपुलकीतून  भरभरून देत राहते  ......घर म्हणजे एक शब्द नाही तर ती एक भावना आहे  .घर म्हणजे फक्त विश्रांतीचे ठिकाण असेही नसावे ,जिथे  एकमेकांच्या  भावनांना समजून उमजून ...सांभाळून राहणारे ......प्रत्येकाच्या मताला किंमत असणारे ......सर्वांनाच हळुवारपणे फुलवणारे ....एकमेकांच्या मनातले न बोलत सुद्धा भाव जाणणारे .......प्रसन्न  वाटेल सर्वाना असे वागणारे ....असे नातेवाईक राहतात .....मग ते घर लहान आहे की मोठे आहे हे जाणवत हि नाही मग ......किंवा जवळचे नातेवाईक काही कारणाने जरी दूर असले तरी ते घरचेच वाटू लागतात .......अशी बरीच घरे आपल्या मनात हि घर करून रहातात ....आपल्याही नकळत .........

Sunday, 10 March 2013

.अशी च एक

अशी च एक
फेसबुक वरच्या त्याच्या पोस्ट्स न ती भाळली
स्त्री  स्वातंत्र्याच्या  कॉम्मेंट्स वाचून मनी हरखली!
त्याच्याशी  च्याटींगची वाट  पाहू लागली
मग स्वतःहून भेटीची गळ घातली!
पहिल्या भेटीतच आपले मन हरवून बसली!
तो हि अगदी वचनांनी बांधला असे म्हणाला
मग वरचेवर गाठी भेटींचा पाऊस पडला
काही  वस्तू -पैशांचा ही  व्यवहार व्यवहार झाला 
एके दिवशी तो मात्र चाचरतच बोलला
आईचा  डोक्यावरचा पदर कधी नाही ढळला
आता सून हि तशीच हवी असा तिचा हट्ट पडला...
सांभाळशील न तू  तुझ्या पदराला ?
पण साडीच हवी का नेसायला ?
अन मग मी जावू कशी नोकरीला ?
reporter चा जोब करते माहित आहे ना तुला ?
लग्नानंतर नको च जावूस तू नोकरीला !
अरे, पण तू तर हो आहेस  स्त्री  स्वातंत्र्याला !
ते सारे सोपे आहे लिहायला अन वाचायला
पण उपयोगी नाही ते जगायला
नाही म्हणू शकत नाही आईला !
प्रसन्न होते मन पाहून ठळक टिकलीला !
 स्त्रीने महत्व द्यावे घर सांभाळायला !
घरी आलो कि बघू शकणार नाही मी बंद दाराला !
करून टाक रामराम reporting ला
मी आहे समर्थ तुझी काळजी घ्यायला !
तेव्हा मग ती मनातून समजली
"बोले तैसा चाले "अशी मानव जात कसली ?
उगाच कुठे  ती फसली ,परि  नाही ती खचली
"मान ठेवीन मी माझ्या इच्छेचा "असे ती वदली
अन क्षणातच त्याच्या पुढून निघुनी गेली !
पोलिसात जावून दाद मागितली
पण तिथे हि तिची परवड च झाली
दुसरे दिवशी नावासकट घटना तिनेच भिंतीवर टाकली
लगेचच त्याची profile गायब झाली 
उलट सुलट चर्चा झाली , पण ती जर हि नाही कचरली !
फार थोड्यांनाच तिची व्यथा उमगली 
आज तरुणीच्यात जागरुकता आणली
फेसबुकच्या आभासी जगातली  वास्तवता तिने दाखवली 
हि तर मोठी  क्रांती  तिने केली !
अर्चना .....






Friday, 22 February 2013

व्यथा मनीची मनीच राहीली !

प्रिय सुप्रिया ,

मला माहित आहे की हे पत्र जरी मी लिहिले तरी तुला कधी च मिळू शकणार नाही...आणि माझे अनेक प्रश्न हि अनुत्तरीत च राहणार आहेत.......
दोन दिवसापूर्वी कळले ,अजिबात विश्वास वाटला नाही....अनेक वेळा वर्तमानपत्रात वाचतो त्या प्रमाणे सुप्रिया  ......आपली हसरी मैत्रीण असे काही करेल.....खरे तर जेव्हा कळले तेव्हा तर हि बातमी खोटी असु  दे अशी देवाकडे किती तरी वेळ प्रार्थना करत होते.....पण ते खरे ठरले  आणि माझ्यावर जो काही आघात झाला तो अजून हि तसाच आहे ...म्हणून आता रात्री तुला लिहायला हे पत्र घेतले ....
सुप्रिया आज हि आठवते आहे मला आपली पहिली भेट ....अंजू च्या जिम मध्ये ...तू आलीस खूप गोड ,हसरा चेहरा ...छान पाणीदार डोळे ..जराशी बुटकी .....गोरी ....लांबसडक ...आणि जाडजूड वेणी......तू जिम मध्ये नेहमीचीच होतीस मी नवीन होते .....इतर कोणी नाही पण तू स्वतः हून नाव विचारलेस .....'मुंबईहून आलीस 'असे म्हणून हसलीस .....मी म्हटले किती छान केस आहेत.....त्यावर तू म्हणालीस जितके केस लांब तितकी माझी उंची कमी आणि जितके घनदाट तितके आयुष्यात दुख जास्त असे आई म्हणायची ......मला च काय कोणालाही कळले नाही तू असे का म्हणतेस ? 'अग , असे पूर्वीचे समज ग '.....आणि हसून व्यायामाला सुरुवात केलीस....
त्यानंतर आपण नेहमीच भेटत होतो ... जाणवत होते नावाप्रमाणेच तू सर्वाना प्रिय आहेस....मनापासून व्यायाम करणारी अशी तू एकटीच असे आम्ही सर्वजणी  म्हणायचो.... एखादे दिवशी जमले नाही तर दुसर्या दिवशी अगदी दुप्पट करशील इतके असायचे  तुझे..
भिशी सुरु केली तेव्हा विचारले येशील का ग तू ? म्हणालीस शक्य नाही होणार ग पैसे देणे .....पण का? हे खरे कारण कोणी विचारलेच   नाही ....कोणी म्हणाले कि तिच्या घरी मैत्रीणीना आणणे  बंदी आहे ......असेच सोडून दिले ....
त्यानंतर तू जिम ला येणे बंद केलेस सासर्यांना बरे नव्हते सर्व करावे लागे ....त्यांचा पाय AMPUTE  केला होता ...बरोबर आहे कसे जमणार तुला .....बस इतकाच विचार केला......
मग तू रस्त्यात भेटलीस आपण दोघी चांगल्या तासभर बोलत होतो ..मुलीची शाळा तिथली पालक सभा ...तिचे पाचवीचे वर्ष ...नवीन विषय ....सासर्यांची तब्येत ....तेव्हा बोलताना समजले कि तुझे आई-वडील लहानपणीच वारले ...मामाने तुला व तुझ्या भावाला सांभाळले .....आता भाऊ दिल्लीत .....त्यामुळे माहेरी कोणी नाही असे च चित्र...तरी हि तुझ्या चेहऱ्यावर एक अल्लड ,निरागस हसू तसेच होते ....
मग मी तुला मुद्दाम बोलावू लागले मुलीला शाळेत सोडायच्या वेळेस उभी राहून गप्पा मारत असे .....पण तेव्हा हि तुझा हसरा चेहरा........ कधीच जाणवले नाही ग .....कि "तुम इतना जो मुस्करा रहि  हो ...क्या गम ही जिस को छुपा राही हो ..." आज जाणवते आहे .....आणि खूप अपराधी वाटते आहे .... आपल्या इतर कामांमधून आपण कधी दुसर्याचा विचार केला नाही......इतके  कदाचित तुला सांगायचे असेल पण कधी विचारू शकले नाही ....
तू सुद्धा आपण मैत्री म्हणतो पण ती फक्त हसणे - खाणे - गप्पा मारणे एवढी च मर्यादित का ठेवलीस  ? तुझ्यावर होणार्या अन्यायाबद्दल तू कधी च कोणाशी काही बोलली नाहीस.....
एकदाच बोललेले एकच वाक्य आमच्या घरी भाजीवाली येते ....माझ्या नवर्याला आवडत नाही....मी भाजीवाल्याकडे गेलेले ...... त्यावर मी म्हटले असे आज च्या जमान्यात कसे चालेल ? तुझा नवरा देखील SALESMAN  आहे मग त्याला बघून बायकांनी दारे बंद करावी का ?...तर लगेच च हसत म्हणालीस अग तसे नाही ....उलट तुम्ही सर्व मैत्रिणी खरेदी करता म्हणून चांगले चालले आहे आमचे ...

का असे केलेस ? किती हि अन्याय झाला तरी तुझ्या डोळ्यात कधी विस्तव दिसलाच नाही ....की डोळ्यानीच विझवली होती तुझ्या मनातली आग ? कसे पचवलेस  तू हे सारे ? कसे स्विकारलेस ?
अन शेवटी असे काय घडले ? की तू स्वतःला जाळून घेतलेस ? मुलीची हि काळजी नाही का वाटली तुला ?  कसला कंटाळा आला   ? सासर्यांचे मनापासून तू केलेस .......आणि ते गेल्यावर महिन्याभरात  तुझे असे का व्हावे ? की हा अपघात होता ? अपघात, घात-पात ,की आत्मघात सर्वच अनाकलनीय..... माझ्या प्रिय सुप्रिया चा असा अप्रिय अंत व्हावा ......एक हसू जे गेले तीन वर्षे मी पहात होते ते मावळले .........
ह्या सार्या प्रश्नांची उत्तरे मला कधी च मिळणार नाहीत ......पण मी आज मात्र मनापासून ठरवले आहे कि कोणत्या हि स्त्रीवर अन्याय होतो आहे असे वाटले की नक्की च तिला बोलायला लावणार .....तिला योग्य ते सहाय्य करणार .....जावून दे ती सांगत नाही सोडून देवू ....असे नक्की च करणार नाही.......कदाचित अन्याय नसेल हि पण जे काही मानसिक दडपण असेल ते तरी नक्की कमी करण्याचा प्रयत्न करून  दुसर्या कोणाचा हि असा अप्रिय अंत मला बघावा लागणार नाही ..... त्याने तरी तुला शांती मिळेल ...असे वाटते .....

तुझी मैत्रीण (?)
 
अर्चना

Wednesday, 20 February 2013

fb status

शब्दकोशातून चार शब्द हुडकले
ते जमले तसे एकमेकांना जोडले
अन माझे fb स्टेटस update केले
कोणी त्यास वाह वाह केले
कोणी म्हणे आहे हे असंख्य चुकांनी भरले
कोणी गुपचूप स्वतः च्या भिंतीवर टांगले
कोणी हसुनी दुर्लक्षित केले
कोणी म्हणे कसे हे सुचले ?
क्षणात मन आनंदले तर कधी भंगले
प्रतिसादाने माझे fb page रंगले !

अर्चना ..

Wednesday, 23 January 2013

आयुष्य

आयुष्य ------
आपले आयुष्य हे क्षणभंगुर आहे ,म्हणून रडत काढावे ? कि आपण गेलो तरी इतरांनी चांगली आठवण ठेवावी म्हणून चांगुलपणाने काढावे हे ज्याच्या त्याच्या हाती असते ....सर्व काही मिळोन सुद्धा रडणारी माणसे  आपण पहातो तसे च काही सुद्धा जवळ नसताना आनंदाने जगणारी माणसे सुद्धा खूप आहेत. जे आपल्याकडे आहे त्याचा विसर पडतो ,आणि जे नाही त्याची च खंत करत राहणारे आनंदात राहू शकत नाहीत. आयुष्य म्हणजे कटकट म्हटले कि काम करताना सुद्धा ओझे वाटू लागते ......... प्रयत्न करणा-याला  कोळश्या तून हिरा मिळू शकतो .पण काहींच्या समोर हिरा असून त्याचे मोल समजून वागू शकत नाहीत .......माझ्या मते आयुष्य हे  तान्हुलाच्या निरागसतेने हसण्यासारखे असावे.....जे आपण ही मुक्तपणे हसू शकतो आणि आपल्या हसण्याने इतरांना सुखावू शकतो.....