पाककृती - आफ्रिकेतल्या -
आठ वर्षे आफ्रिकेत राहिले तेव्हा काही गोष्टी पाहिल्या , तिथल्या लोकंचे मुख्य अन्न मका असे लक्षात आले . मका भाजून , उकडून खाल्ला जातोच , त्याखेरीज त्याची वेगवेगळी पीठे तयार केली जातात . पांढरे पाठ , पिवळे पीठ आणि त्याप्र त्येकाचा वेगवेगळा वापर केला जातो . त्यांच्याकडून काही शाकाहारी पदार्थ शिकले त्याच्या बद्दल थोडेसे ….
१ )उगाली -
साहित्य - मक्याचे जाडसर दळलेले पांढरे पीठ १ वाटी
पाणी ४ वाट्या
मीठ चवीनुसार
कृती - प्रथम पाणी मीठ टाकून उकळण्यास ठेवावे . पाणी उकळू लागल्यावर त्यात थोडे थोडे करून मक्याचे पीठ घालावे , सारखे मिश्रण हलवत राहावे . सर्व पीठ टाकून झाल्यावर पाण्याचे झाकण ५ मिनटे ठेवावे . मग परत झाकण काढून मिश्रण हलवावे , , एक वाफ आणावी . अगदी घट्ट गोळा तयार करतात … भाजी बरोबर खातात .
हे त्यांचे रोज चे अन्न होय . अगदी लहान मुलापासून ते म्हातार्यापर्यंत आवडीने खातात . पौष्टिक गुणधर्मांमुळे मी हि ते करू लागले . त्यात मी बदल करून कधी पाण्याला मिरची - मोहरीची फोडणी देवून केले , खूप छान लागले .
२) मांडाझी - गोड पदार्थ -
साहित्य - १ अंडे , १/२ कप दुध , १/४ कप साखर , २ कप मैदा किंवा (सेल्फ रेसिंग फ्लोर ) १ टी स्पून बेकिंग पावडर , १/४ कप पिठीसाखर
तळण्याकरिता तेल
पिठीसाखर खेरीज इतर सर्व साहित्य एकत्र मिसळावे . आपल्या कणकेप्रमाणे मळावे .१ तास कपड्याखाली झाकून ठेवावे .साधारण ६ गोळे करावे . नंतर १ गोळा घेवून पोळपाटावर जाड पोळी लाटावी , त्याचे चार भाग (त्रिकोणाकृती होतील असे ) करावे .
तेल गरम झाल्यावर , मंद आचेवर तळून घ्यावे .
खायला देताना त्यावर थोडी पिठीसाखर भुरभुरावी .
चहा , कफ्फे बरोबर खूप छान लागतात .
३. अवकाडो मिल्क शेक -
१ अवकाडो , २ कप दुध , ४ चमचे साखर .
पूर्ण पिकलेला अवकॅडो , आधी मऊ करून घेणे . नंतर त्याचे वरचे साल काढून टाकणे . आतला गर व साखर मिक्सर मधून काढावा , नंतर त्यात दुध घालून एकत्र परत फिरवावे . खूप सुंदर हिरव्या रंगाचा मिल्क शेक तयार होतो .
४. सुकुम विकी - म्हणजे पालेभाजी . ती बनवण्याची कृती अतिशय सोपी आहे
साहित्य - पालकाप्रमाणे असलेली सुकुमा हि हिरवी पालेभाजी १ जुडी , १ कांदा ,१ टोमाटो , २ चमचे तेल . मीठ
प्रथम तेल गरम करावे , त्यात बारीक चिरलेला कांदा परतवा . टोमाटो बारीक चिरून घालावा , पालेभाजी घालावी . पाणी घालून शिजवावी .
ह्यात भाजीत जे विटामिन्स , असतात त्यामुळे पुढचे काही दिवस उपास घडला तरी त्रास होत नाही असे म्हणतात .
कधी भाजी शिजत आल्यावर त्यात च मांस घालतात . किंवा कधी मक्याचे पीठ लावतात … अशा रीतीने एक च दिश पूर्ण अन्न बनवतात .
५ . मक्याचे पटीस -
मक्याचे पिवळे पीठ १ कप , १ कप मैदा , १/२ टी स्पून बेकिंग पावडर , चवीला मीठ ,पाव चमचा साखर , २ मोठे चमचे तूप किंवा लोणी .
सर्व साहित्य एकत्र करून ,कोमट पाण्याने घट्ट मळावे . थोडे मक्यःचे दाणे मीठ घालून उकडून घ्यावे . पीठाचे छोटे छोटे गोळे करून त्यात मक्यःचे दाणे टाकून गोल नीट बंद करावा . पटीस प्रमाणे हलक्या हाताने दाबून तव्यावर शालो fry करावे .
मधल्या वेळेस खायला चटणीसोबत हा पदार्थ चांगला लागतो .

No comments:
Post a Comment