Saturday, 29 September 2018

Walk वेळी

 सकाळी walk ला जाण्याच्या रस्त्यावर पाहिले न सहज वाटले....

झाले असता काम आपुले 

देव ही रस्त्यावर टाकले,

नव्या घरात जुन्यास न जागा

की नसे आला प्रत्यय मानाजोगा ?,

कालपर्यंत वाढवी घराची शोभा

तो च का आज रस्त्यावर उभा?,

रस्ता असे असा खास

वहाने राहती उभी हमखास,

जिथे लोकांची खूप वर्दळ

पण घंटागाडीची नसे पळापळ,

अहा ,मी किती थोर !

कचऱ्यात टाकल्याचा नसे जीवास घोर

जाता येता पाहती सान थोर,

देव ठेवले रस्त्यावर !


अर्चना कुलकर्णी. नाशिक 

29/09/2018 

Tuesday, 18 September 2018

Nostalgic about pooja

हरतालिका
पूजा ,उपास का करायचा ?हे कळण्याआधीच उपास सुरू झाला ,ते आईमुळे ! ती खूप देवभक्त होती , उपास सतत च असत ,पण पूजा खूप नसत! दररोज च्या देवाची पूजा तर मुलाचे सर्व आटोपून झाले की देव ! तोवर ती फक्त चहा वर असे हे देखील नंतर उमजू लागले.
हरतालिका व वटपौर्णिमा ह्या दोन्ही दिवशी मात्र अगदी साग्रसंगीत ,षोडपचारे पूजा !
हरतालिकेच्या आदल्या दिवशी च पत्री गोळा करून आम्ही मुले आणत असू. तेरडा ,आघाडा, डाळिंब,सीताफळ , प्राजक्त, ,अनंत , अशी अनेक पत्री जमा करत.कोणतीही पाने 5 पेक्षा जास्त आणू नका असे ती सांगे.रात्री 12 पर्यंत जागरण , त्यात ल्या मटार करंज्या अजून ही आठवतात.आई मात्र
रात्री सर्व पत्री  नीट करून ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवत असे!
सकाळी लवकर उठून ,जस्वाद ,प्राजक्त ,गोकर्ण तसे च इतर काही फुले आम्ही आणत असू.
इमारतीमधील इतर ही 5/6 बायका जमत, आई पूजा करता करता च त्यांना देखील सांगे , व एका चौरंगावर सर्व जणी पूजा करत.दिवसभर फक्त पाणी अथवा शहाळ्याचे पाणी!
पण त्या पूजेचा उत्साह इतका की नकळत च उपास सुरू झाले , दिवसभर उपास करायचा ,संध्याकाळी उपासाचे पदार्थ☺ह्यात चैन !
आईचा उपसाचा स्टॅमिना जबरदस्त होता , ती फक्त शहाळ्याचे पाणी!
लग्नानंतर काही वर्षे आई कडे जाऊन पूजा केली, मग परदेशी जाणे झाले ,घरातच देवाला नमस्कार ! मुले लहान,ऑफिस ची घाई ह्या सर्वात घड्याळाकडे बघत पूजा करणे मला मान्य नाही झाले , उपास करत असे पण पूजा मांडणे बंद झाले।
त्यात काही वेळेस विकत आणलेली पत्री म्हणजे निव्वळ कचरा ,फुले शिळी हे बघून पूजा करणे बंद केले हे चांगले च झाले असे वाटायचे!
आज बरेच वर्षांनी पूजा केली , दारात उमललेली फुले , बागेतील पत्री गोळा करताना खूप मस्त वाटले.
😊परत लहान झाल्यासारखे च। मग तशी च पूजा केली.
देवपूजेने काही होत नाही इतपत मनाला माहीत असताना देखील पूजा करताना जे प्रसन्न वाटते ,त्याची तुलना कशाची च होत नाही!



Friday, 7 September 2018

असा ही अनुभव

अनुभव
गेल्या आठवड्यात औरंगाबाद येथील घृष्णेश्वर मंदिरात जाण्याचा योग आला.
वेळ ११/ ११.३० ची असल्याने मंदिरात फारशी गर्दी नव्हती.
दर्शन घेऊन बाहेर पडलो तर एक छोटा मुलगा गंध लावून घ्या असा आग्रह करत होता.
आम्ही नाही ,नको रे असे म्हटले.तर म्हणाला ते पैसे मला शिकायला उपयोगी पडतील. अर्थात मन द्रवले, म्हटले हम्म बघते!लगेच म्हणाला हवे तर पेन व वह्या घेऊन द्या ,हो म्हणून चपला-बूट घालण्याकरिता आम्ही दोघे तिथे गेलो. तर तिथे बसणाऱ्या आजी म्हणाल्या , ओ हा मुलगा शिकत नाही.उगाच इथे तिथे भटकतो.
त्या मुलाला विचारले, काय रे कितवीला आहेस?तर म्हणाला आहे मी पाचवी ला !
सांग बरे ,मराठीत पहिला धडा कोणता शिकवला ?
अ अ ....
बरे ,मग तू आता कोणता धडा वाचलास ?
काही उत्तर नाही.
का रे अभ्यास नाही करत का ?
तर गेला पळून !
म्हणजे आपल्या भावनेचा कसा उपयोग करून घेत असतात!
आपल्याला वाटते,खरं  देवावर पैसे खर्चण्यापेक्षा कोणाच्या शिक्षणा ला उपयोग होईल!


अर्चना कुलकर्णी
12 जानेवारी 2018