Thursday, 11 October 2018

प्रिये चहा

 प्रिये चहा, 

प्रिये चहा 

रात्रीचा कलह विसरोनी, 

शरण तुज आलो हा

पाणी हे उकळवत 

आलं ते घाली किसून 

चहा पत्ती ने रंग येत, 

दरवळला गंध पहा....... 

धार दुधाची वर ओतत, 

चिमूटभर साखर घालत 

गाळतो हा चहा मगात 

बिस्किटासवे 

आणिला तुज निकट 

राग सोड सखे बिकट 

सदा हसत रहा.... 

अर्चना 

12.02/2018

Sunday, 7 October 2018

Asech

कोण जाणे करील इथे कोण-कधी कुणाचा घात
का धरू नये, म्हणते मी, स्वतःच स्वतःचा हात.
जगाला वाकुल्या दाखवून करावी पराभवावर मात
कशाला बसावं कुढत,  या क्षणभंगूर मायावी जगात ?
अर्चना
8/10/2017