Friday, 28 June 2013

African रेसिपि

पाककृती - आफ्रिकेतल्या -

आठ वर्षे आफ्रिकेत राहिले तेव्हा काही गोष्टी पाहिल्या , तिथल्या लोकंचे मुख्य अन्न मका असे लक्षात आले . मका भाजून , उकडून खाल्ला जातोच , त्याखेरीज त्याची वेगवेगळी पीठे तयार केली जातात . पांढरे पाठ , पिवळे पीठ  आणि त्याप्र त्येकाचा वेगवेगळा वापर केला जातो .  त्यांच्याकडून काही शाकाहारी  पदार्थ शिकले त्याच्या बद्दल थोडेसे …. 

१ )उगाली  -
साहित्य - मक्याचे जाडसर दळलेले  पांढरे पीठ १ वाटी
                पाणी ४ वाट्या
             मीठ चवीनुसार
           
कृती - प्रथम पाणी  मीठ टाकून उकळण्यास ठेवावे . पाणी उकळू लागल्यावर त्यात थोडे थोडे करून मक्याचे पीठ घालावे , सारखे मिश्रण हलवत राहावे . सर्व पीठ टाकून झाल्यावर पाण्याचे झाकण ५ मिनटे ठेवावे . मग परत झाकण काढून मिश्रण हलवावे ,  , एक वाफ आणावी . अगदी घट्ट  गोळा तयार करतात … भाजी बरोबर खातात .

हे त्यांचे रोज चे अन्न होय . अगदी लहान मुलापासून  ते म्हातार्यापर्यंत आवडीने  खातात . पौष्टिक गुणधर्मांमुळे मी हि ते करू लागले .   त्यात मी बदल करून कधी पाण्याला  मिरची - मोहरीची फोडणी देवून केले , खूप छान लागले .

२) मांडाझी - गोड पदार्थ -
साहित्य - १ अंडे , १/२ कप दुध , १/४ कप साखर , २ कप मैदा किंवा (सेल्फ रेसिंग फ्लोर )  १ टी स्पून बेकिंग पावडर , १/४ कप पिठीसाखर
 तळण्याकरिता तेल
पिठीसाखर खेरीज इतर सर्व साहित्य एकत्र मिसळावे . आपल्या कणकेप्रमाणे मळावे .१ तास कपड्याखाली झाकून ठेवावे .साधारण ६ गोळे करावे .   नंतर १ गोळा घेवून   पोळपाटावर जाड पोळी लाटावी ,  त्याचे चार भाग (त्रिकोणाकृती होतील असे ) करावे .  
तेल गरम झाल्यावर , मंद आचेवर तळून घ्यावे .
खायला देताना त्यावर थोडी पिठीसाखर भुरभुरावी .

चहा , कफ्फे  बरोबर खूप छान लागतात .

३. अवकाडो  मिल्क शेक -
   १ अवकाडो , २ कप दुध , ४ चमचे साखर .

पूर्ण पिकलेला अवकॅडो , आधी मऊ  करून घेणे . नंतर त्याचे वरचे साल काढून टाकणे . आतला गर  व साखर मिक्सर मधून  काढावा , नंतर त्यात दुध घालून एकत्र परत फिरवावे . खूप सुंदर हिरव्या रंगाचा मिल्क शेक तयार होतो . 


४. सुकुम विकी  - म्हणजे पालेभाजी . ती बनवण्याची कृती अतिशय सोपी आहे
 साहित्य - पालकाप्रमाणे असलेली  सुकुमा हि हिरवी पालेभाजी १ जुडी  , १ कांदा ,१ टोमाटो , २ चमचे तेल . मीठ

प्रथम तेल गरम करावे , त्यात बारीक चिरलेला  कांदा परतवा . टोमाटो बारीक चिरून घालावा , पालेभाजी घालावी . पाणी घालून शिजवावी .

ह्यात भाजीत जे विटामिन्स  , असतात त्यामुळे पुढचे काही दिवस उपास घडला तरी त्रास होत नाही असे म्हणतात .
कधी भाजी शिजत आल्यावर त्यात च  मांस घालतात . किंवा कधी मक्याचे पीठ लावतात … अशा रीतीने एक च दिश पूर्ण अन्न बनवतात .

५ . मक्याचे पटीस  -
मक्याचे पिवळे  पीठ १ कप , १ कप मैदा , १/२ टी स्पून बेकिंग पावडर , चवीला मीठ ,पाव चमचा साखर , २ मोठे चमचे तूप किंवा लोणी .
सर्व साहित्य एकत्र करून ,कोमट  पाण्याने घट्ट  मळावे . थोडे मक्यःचे दाणे मीठ घालून उकडून घ्यावे .  पीठाचे छोटे छोटे गोळे करून त्यात मक्यःचे दाणे  टाकून गोल नीट  बंद करावा . पटीस  प्रमाणे हलक्या हाताने दाबून तव्यावर शालो  fry  करावे .

मधल्या वेळेस खायला चटणीसोबत  हा पदार्थ चांगला लागतो .

       

Monday, 17 June 2013

आठवणीतला मे महिना !

मे महिन्याचा महिमा
माझा जन्म मुंबईतला ,सारे बालपण मुंबईतच , आजोळ हि मुंबईतच …आजोळी राहायला कधी फारसे गेल्याचे आठवतदेखील नाही . त्यावेळेस असे वाटायचे की मुंबईतच असल्याने नाही जात राहायला , दुःख नव्हते कशाचे .  त्यामुळे मे महिना म्हटले की फक्त डोळ्यासमोर यायची ती शाळेला सुट्टी …
मे महिना म्हणजे उन्हाळा असे कधी वाटले नाही, कारण मुंबईत पावसाचे दोन महिने सोडले कि कायम उन्हाळाच ….  मे महिन्याची सुट्टी म्हणजे धमाल ,मस्ती, मजा …
सकाळ झाली कि लगेच च घराबाहेर पळायचे  ,भाड्याने सायकल घ्यायची तासभर घुमावायची मग दुसर्या मैत्रिणीबरोबर तिला सायकल आणायची  म्हणून तिच्यासोबत जायचे…दुपार  होईतोवर अशी मजा …. दुपारी सगळ्याच्या मताने बैठे खेळ ….  संध्याकाळी विटीदांडू ,लपाछापी ,चोर पोलीस , लगोरी., डबा ऐसपैस .. असे  खेळ खेळत आईने किमान दहा वेळेस हाका मारल्यानंतरच घरी जायचे …. अभ्यासाची घाई नाही की गृहपाठ झाला नाही ह्याचा ओरडा नाही … 
सर्व जण  कोजागिरीला जागरण करतात , पण आम्ही मात्र वैशाख पौर्णिमेला जागरण करत असू … एक दिवस गच्चीवर जमायचे … प्रत्येकाने घरून खाऊ आणायचा किंवा  कधी कधी वर्गणी गोळा करून कच्चे समान आणायचे आणि गच्चीतच भेळ  बनवायची …. गोड म्हणून कोणाच्या तरी घरून खाऊ यायचा …. गाण्याच्या भेंड्या , कानगोष्टी असे खेळ खेळायचे…
मे महिना म्हणजे वाळवण करायचे दिवस … पापडाचे पीठ तयार झाले कि त्याची चव बघण्यापासून ते लाटून , वाळत घालेस्तोवर किती वेळा पोटात जात असेल … आई चा डोळा चुकवून पापडाची लाटी खाण्याची मजा काही और च …. पापडाचे  प्रकार तरी किती उडीदाचे , नाचणीचे ,ज्वारीचे ,तांदळाचे …त्यात परत काळेमिरी चे, लाल तिखटाचे , हिरव्या मिरचीचे …. मग साबुदाण्याच्या कुरडया … गव्हाच्या चीकावड्या …. आहा … वेगवेगळ्या प्रकारची लोणची मग त्या बरण्या  उन्हात नेवून ठेवायच्या …. न पाडता संध्याकाळी घरात आणून ठेवायच्या …. आता घरी करत नाही पण नुसत्या आठवणीने हि तोंडाला पाणी सुटते ….
मे महिना म्हणजे फळांचा राजा आंबा आणि फणस …त्यांचे  दिवस … चैत्राला जी वाटली डाळ  आणि कैरीचे पन्हे सुरुवात होते… ती आंबे आले की द्विगुणीत होते …. हपुस्स्स्सस्स्स ,पायरीई ….  अशी आरोळी आली की मग झालीच सुरुवात आम रसाची ……. फणसाचे गरे … पोटाला बरे म्हणत फणस खायचा …. उन्हाळा म्हणून ICECANDY  आणि ICE -CREAM त्यात हि आंब्याचा स्वाद घ्यायचा …. 
मे महिना म्हणजे लग्नाचे दिवस  मग कोणा मावशी -मामाचे लग्न असले की नटून -थटून लग्नात मिरवायचे …. मध्ये च कोणी तरी विचारणार मला ओळखतेस का ? आठवत नसले तरी हो म्हणायचे आणि हसायचे …. गम्मत म्हणजे कधी तरी वर्ष दोन वर्षातून भेटणारी एवढे  नातेवाईक कसे बरे आठवणार ? पण तसे म्हटले तर परत सगळी इथली तिथली नाती सांगणार … …. त्या पेक्षा हो म्हणणे श्रेयस्कर …. पटकन पळता येत असे …. तेव्हा देखील जेवणापेक्षा संध्याकाळचे ICE -CREAM  खास आवडीचे …
अशी गमतीजमती करत दीड महिन्याची सुट्टी किती पटकन संपली असे वाटत शाळा सुरु व्हायची ……

आता जरी सुट्टी असली तरी ही मजा नसते पण मनात मात्र ह्याच आठवणी ताज्या होवून जातात ….



पूर्व प्रसिद्धी या सख्यानो या ई- अंक मे २०१३