दिवाळी -
मनुष्य स्वभाव हा उत्सव प्रिय आहे आहे असे म्हटले जाते .उत्सवामुळे आपल्याला काय मिळते ? तर माझ्या मते मनाला आनंद मिळतो तो पुढे कित्येक दिवस पुरतो.
मनाची खिन्नता दूर होते ,रोजच्या जीवनातून मोकळेपण मिळते . कधी आपण कोणाला भेटावयास जातो किंवा आपल्याकडे कोणी त्या निमित्ताने येतात. विचारांची देवाण -घेवाण होते .पण हे सण का साजरे केले जातात ? हे जाणून न घेताच सण साजरा केला गेला तर ती भावनाशुन्यता ठरते .
दिवाळी किंवा दिपावली , दीपोत्सव ..सर्वांच्या आवडीचा सण !अंधारातुन प्रकाशाकडे ,अज्ञानातून ज्ञानाकडे , अंधश्रद्धे कडून विज्ञानाकडे नेणारा हा सलग ४-५ दिवस चालणारा आपला हा मोठा सण ! त्याची सुरुवात हि फार आधीपासून होते .घराची साफ सफाई केली जाते. दिवे उजळले जातात , दागिने ,नवीन साड्या ,नवीन कपडे याची खरेदी केली जाते .
दिवाळीत पणतीला खूप महत्व आहे . ती मातीची असावी ,त्यामागचे कारण आपले असलेले धरणीशी नाते दर्शवते . इलेक्ट्रिक माळेपेक्षा पणतीची माळ लावावी ,त्यामागची भावना अशी की एका पणतीने दुसरी पणती लावता येते , उजेड जास्त ठिकाणी पसरवू शकते. पण एका बल्ब ने दुसरा बल्ब लावता येत नाही.
आपल्याकडे दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस (अश्विन शुद्ध द्वादशी) पासून साजरा केला जातो. त्या दिवशी संध्याकाळी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते .गायीचे अनन्यसाधारण महत्व लक्षात जाणून घेणे हे त्यातून समजते .
दुसरा दिवस धनत्रयोदशी ,ह्या दिवशीसंध्याकाळी धन किंवा लक्ष्मी ची पूजा केली जाते. तिला झेंडूची फुले वाहिली जातात .धने आणि गुळ याचा नैवेद्य दाखवला जातो .आकाशकंदील लावले जातात . रांगोळी काढली जाते . धन्वंतरी - देवांचे वैद्य -यांची उपासना सुद्धा धनत्रयोदशी दिवशी केली जाते .आकाशकंदील ची प्रथा आपल्याकडे जपान किंवा चीन मधून आली असावी असे म्हटले जाते. आकाशकंदील हे आपल्या पूर्वज आहेत त्यांना देखील आपण आनंदात आहोत हे दिसावे म्हणून तो उंचावर लावला जातो .त्या च दिवशी यम दीप दान केले जाते, ज्यामुळे आपल्या वर यमराजाची अवकृपा होवू नये असे मानले जाते .
त्यानंतर येते ती नरकचतुर्दशी ,नरकासुर नावाच्या राक्षसाचा नाश ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने केला. त्याने कैद केलेल्या सोळा हजार स्त्रियांचा उद्धार करण्यात आला .त्याच्या त्रासातुं मुक्त झाल्याने लोकांनी दीप लावून आनंद व्यक्त केला अशी कथा सांगितली जाते .ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करण्यची प्रथा आहे .
थंडी चे दिवस सुरु होत आहेत,त्याकरिता सर्वांगाला तेल लावून अंघोळ करण्यची प्रथा आली असावी .पहाटे च पणत्या लावल्या जातात . मुले फटाके वाजवतात .फराळाचे पदार्थ खाल्ले जातात .मुलांचे औक्षण केले जाते .सर्वत्र आनंद पसरतो .