Friday, 25 September 2020

अकल्पित आनंद

 अकल्पित 


किती वर्षे वाट पाहिली 

साऱ्याची नजर चुकवली 

कित्येक दूषणे झेलली 

आपली नाती ही दुरावली !


किती देवांची करुणा भाकली 

किती वैद्यांचे उंबरे घासले 

औषधांनी च  पोटे भरली 

वाट पाहून मने कोमेजली 


अचानक  हालचाल जाणवली

अकल्पित घडले जाणीव झाली 

ख़ुशी ही कोणा सांगावी पहिली? 

मिठीत त्याच्या प्रेमाची गोडी वाढली !


अर्चना कुलकर्णी

अकल्पित

 अकल्पित 

सकाळपासून आभाळ भरलेले 

मन देखील तसेच भरलेले, 

कोसळून मोकळा झाला तो 

ती मात्र तशीच घुस्मटलेली !


किती दिवस घाबरायचं? 

असे च घरात बसायचं? 

आली अकल्पित आपत्ती 

त्यानेच आली ही भीती 


ओसरला पाऊस पोचले  गच्चीवर 

निसर्गाचा पाहुनी चमत्कार 

इंद्रधनूचा होता साक्षात्कार 

तिच्या ही मनातील मिटला अंधःकार!


अर्चना कुलकर्णी

मंत्रमुग्ध

 संपला हा पावसाळा 

लागती उन्हाच्या झळा 

जीव हा नकोसा झाला

जागा नाही विसाव्याला !


निघाले मी लगबगा

कामे होती थोडी फार 

मुलांची खरेदी झाली 

प्याले पाणी  गारेगार !


अचानक  ढग आला 

येता वारा  दूर झाला  

अहाहा इंद्रधनुष्य 

उद्गारली छोटी हर्षाने !


पाहुनी  उंच  कमान 

जाहली मंत्रमुग्ध मी 

मारावी का एक उडी? 

की घ्यावी एक गिरकी? 


बघुनी आजूबाजूला 

नुसती उभी राहिली 

आठवे वयोमानाला 

उगाचच ओशाळली !


असे असतें जीवन 

पावसाळा न उन्हाळा 

गोडी नाही तयावीण 

शिकवी निसर्गशाळा !


अर्चना कुलकर्णी.

संगत (चारोळी )

 संगत 

कोणाशी करू नकोस संगती 

याचीच होती तिला सदा बंदी 

महामारीच्या काळात पटली महती 

जेव्हा अडकले त्याचे जीवन स्वछंदी 

***--****----****

अर्चना कुलकर्णी

आजोबा नातू चित्रकाव्य

 चित्रकाव्य 

धरून तुझ्या बोटाला 

फिरवतो आज सारे गाव 

नंतर धरून माझ्या हाताला 

कमावशील मोठे नाव !


धरून ठेव बोटाला 

नको वाटेत ठेच लागायला

अनुभव माझ्या गाठोड्यातला 

येईल तुझ्या कामाला 


सोडू नको ही संगत 

शेवटी तूच माझा मित्र 

तुझ्यासवे आयुष्यात रंगत 

ही च मोठी गंमत !


छोटे कधी मोठे होतात 

कळत नाही राव 

आनंद मावेना गगनात 

पाहतो नव्याने गाव !


अर्चना कुलकर्णी.

ही रात्र संपेल ना?

 ही रात्रही संपेल ना? 


सारे झाले आता ठप्प 

जणू सुरु आहे रात्र 

चीन अमेरिका गप्प 

सान थोर  सारे त्रस्त !


नको नको वाटे प्रवास 

घरी बसावे तासंतास 

अदृश्य विषाणू घाली गस्त 

मास्क,सॅनिटायझरवर भिस्त !


मानवाची सत्ता, मस्ती 

बिघडवली होती सृष्टी 

आली होती त्यास सुस्ती 

शिकेल का चांगल्या गोष्टी? 


जगभर चाले ह्याचे थैमान 

झाले खूप सारे लोकडाऊन 

सुरुवात करून शांत वुहान 

इतर मात्र अजून ही हैराण 


उपाय आणि लस सापडेना 

बाहेर पडायचा मार्ग दिसेना 

माणूस मात्र अजिबात हरेना 

संपेल कधी हा करोना? 


बाळ कधी जाईल शाळेत? 

आईच्या डोळ्यासमोर चित्र 

बाळाला दिसती सारे मित्र 

दोघांना वाटे ही संपेल ना रात्र?  



अर्चना कुलकर्णी. 

24/09/20

Saturday, 12 September 2020

मैत्री भेट


भेट 


फिरत होते काल  दुपारी 

समोर मोठ्ठी गाडी थांबली 

नव्हती ही फार रहदारी 

त्यातून ती सखी  उतरली !


ओळख मला तिची पटली 

धावतच तिजपाशी गेले 

पटकन मिठीच मारली 

ती तशी फारच गांगरली !


नजरेत ओळख दिसेना 

काय करू मजला सुचेना 

सांगावे तिचे न माझे नाव 

ह्याचे ही न उरले भान !


केली मग उसनी धिटाई 

शाळा, वर्ग, नाव  सांगितले  

ओळखीला सांगितल्या बाई 

 तिला मात्र काही न आठवले !


डोळ्यातले पाणी काही बोलले 

माफी मागून मी ही पुढे गेले 

हा श्रीमंतीचाच गर्व असावा? 

मनाने नाही चा कौल दिला !


घरी येताच चार सख्याना 

पटापट फोन मी फिरवला 

शोधून काढू तिचा ठिकाणा 

चंगच जणू तसा बांधला !


ठाऊक होते एका सखीला 

कर्करोगाने तिला ग्रासलेले 

कंटाळली होती ती त्रासाला 

साऱ्यांना च  तिने टाळलेले !


क्रमांक आठवला गाडीचा 

शोधून काढला तिचा पत्ता 

गेले सख्यांसह घरी तिच्या 

हसली, समोर पाहून आम्हाला!


किती बोलू आणि काय बोलू

असे जाहले होते आम्हाला 

तीस वर्षाचा  विसर पडला

जावून पोचलो त्या शाळेला !


आवळे,चिंचा, शोपा,बोरे

शाळेबाहेर च मिळे सारे 

सभाजी ने वाजवली घंटा 

वर्गात जाऊन बसले सारे 


आपण दोघी एका बाकावर 

आठवण तिने च सांगितली 

नंतर  घसरलो डब्यांवर 

मधली सुट्टी ती शाळेमधली 


लंगडी,खोखो स्पर्धेचे दिवस 

कवायत न नाटकाचे दिवस 

आठवली ती शाळेची सहल 

झाला तयार वेगळा माहोल !


दहावीनंतर आपण पांगलो 

आपापल्या संसारी गुंतलो 

काळ बालपणीचा न विसरलो 

भूतकाळात  पुन्हा रमलो !


मैत्री नसते फक्त आनंदात 

साथ देऊ आम्ही सुखदुःखात 

बाळगू हा च दृढ विश्वास 

उमगले तिला ही भेट खास !


अर्चना कुलकर्णी.

पाखरू

 पाखरू (चारोळी )

पाखरू 

मन पाखरू पाखरू 

केलीत कवाडे बंद 

तरी ही लागे विहरु 

लागे त्यास तुझा छंद !


**********--*-***-**********

पाखरू... 

रोज सकाळी गच्चीवर 

भरते पाखरांची शाळा

चिमणी, मैना, कबुतर 

बुलबुल अन कावळा !


बोली जरी वेगवेगळी 

एकच गोष्ट ते सांगती 

गप्पा मारू जरा सकाळी 

सारे आपण सखेसोबती !


टिपून आणू दाणापाणी 

पण हवा ही पावसाळी 

पंखावरी पडता पाणी 

हिव भरे ती सांयकाळी !


पहा येतसे छोटे बाळ 

इवले इवले ते हात 

पाहुनी मैना घाली शीळ 

देई आपणा मऊ भात !


दिसाची छान सुरुवात

घेऊ आता उंच भरारी 

त्या दूर निळ्या गगनात 

खेळेल बाळ हर्षभरी !


अर्चना कुलकर्णी.

नववधू चारोळ्या

 हळद लागली, 

मेहंदी रंगली, 

वाट ज्याची पाहिली 

घडी जवळ आली 

******


हळदीचा दिसें  रंग 

मेहंदीचा  येई वास 

मी माझ्यातच दंग 

होतात तुझे भास !

***----

हे बंध कसे  रेशमाचे 

दोन मने जुळण्याचे 

नाते असे विश्वासाचे 

डोळ्यात आसू प्रेमाचे !

******

गोड गोजिरी, साज साजिरी 

लाडकी तू साऱ्या घराची 

होणार ग तू नवरी 

प्रेमळ सून सासरची 

******-

अर्चना कुलकर्णी

चित्रकाव्य नववधू


 आज चा उपक्रम 

चित्रकाव्य 


हळद लावूनी

मेहंदी रेखूनी

वाट पाही मी 

सौभाग्यकांक्षिणी !


उलाघाल मनी 

पाहे मागे वळूनी 

माहेर विसरुनी 

होई अर्धांगिनी !



स्वप्न सजवूनी 

हर्षित होऊनी 

उल्हसित मनी 

मी तुझी सजणी !


बंधन प्रेमाचे 

हवेहवेसे मनी 

मिलन जीवाचे 

मी तुझी कामिनी  !


ओलांडुनी उंबरा 

होईन गृहिणी 

म्हणशील का मला 

तू गृहस्वामिनी?  



अर्चना कुलकर्णी.

दिवस पावसाचा

 दिवस  पावसाचा 

आठवे अजून 

गेला गर्जत 

बरसून, 

ओलेती 

अशी 

मी... 




दिस पावसाचा 

नाही भरोसा कोणाचा 

कोसळेल का कधी जोरात? 

उभी मी आडोश्याला कधीची !

********************

दिवस हा पावसाचा !


वळवाचा पाऊस अन 

त्यात वेड्यागत भिजणे 

हरपलेले मन अन 

भान विसरून पाहणारा तो 

लाजणारी मी अन 

तगमगणारा तो ,

बावरलेलें मन ,

हळूच त्याच्या मिठीत 

सामावणारे तन !

झाला अविस्मरणीय 

पावसाचा हा दिन !


अर्चना कुलकर्णी. 

10/09/2020


मरगळलेल्या

 सुकल्या, तनमनाने 

किती केली आर्जवे ,

किती विनवणी ती...

वाट पाहिली किती.. 


💦अन आलास धावून

 शेवटी काल राती..

चराचरी ओलावा,

  सौहार्द, शिंपडून

दिलीस तनामनाला

      शांती.....🙏

🌧️🌧️🌧️🌧️🌧️

   



Monday, 7 September 2020

चित्रकाव्य


 चित्रकाव्य... 


 प्याद्यासारखे आपण 

स्वतः च ठरविती 

मी राजा अन तो शिपाई 

खेळी कधी कशी होई 

प्यादे ही राजाला मात  देई! 

**---

छोट्याश्या अहंकारापायी 

 बोलणे दुरापास्त होई 

दोघात भिंत उभी राही 

दुरुन च एकमेका पाही !


**-**-******

ऊन अन सावली 

असे असतें जीवन 

योग्य खेळावी खेळी 

होई बावरे ते मन  


अर्चना कुलकर्णी