हळद लागली,
मेहंदी रंगली,
वाट ज्याची पाहिली
घडी जवळ आली
******
हळदीचा दिसें रंग
मेहंदीचा येई वास
मी माझ्यातच दंग
होतात तुझे भास !
***----
हे बंध कसे रेशमाचे
दोन मने जुळण्याचे
नाते असे विश्वासाचे
डोळ्यात आसू प्रेमाचे !
******
गोड गोजिरी, साज साजिरी
लाडकी तू साऱ्या घराची
होणार ग तू नवरी
प्रेमळ सून सासरची
******-
अर्चना कुलकर्णी
No comments:
Post a Comment