Tuesday, 16 April 2013

घर असावे घरासारखे



 घर हा शब्द ऐकताच  मनात अनेक भावना उचंबळून येतात ....तो शब्द रहातच नाही अनेक गोष्टी डोळ्यासमोर तरळून जातात .प्रथम डोळ्यासमोर येते ती आई ,तिचा प्रेमळ कुरवाळणारा स्पर्श .....अन तिचे कायम स्वयंपाकघरातले वावरणे ,,,,,,,,प्रत्येकाच्या आवडी लक्षात ठेवून खायला  घालणे ...मग आठवते बाबांनी न बोलता दिलेली प्रत्येक चांगल्या कामाची शाबासकी …… असे सगळे जवळचे आप्त आठवता आठवता डोळ्या
समोर वेगवेगळी चित्रे दिसू लागतात .....लहान घरे , प्रशस्त घरे ,झोपडी, बंगले , कौलारू घरे तर इमारतीतले flats ........असे करता करत आठवायला लागते सुगरणीचे  कुठे फिरायला गेले की झाडाला टांगलेले ,लटकलेले सुबक आकर्षक घरटे   ....तर चिमणीचे काड्या काड्या जमवून केलेले घरटे .....मधमाश्याचे पोळे .....मुंग्यांचे वारूळ ......कुठे झाडाची ढोली ही च आपली खोली ......मग मनात येते अशी प्रत्येक सजीवाला आपल्या घराची ओढ असते .........
ते घर फक्त माती -विटांचे असते का ?…घर म्हटले कि  त्यात असावा लागतो आपलेपणा .....म्हणूनच घर म्हटले की प्रथम आठवते की आई ......प्रेमाने सर्वांचे करणारी . ........तसे हि स्त्रीला घराबद्दल अगदी लहानपणपासून एक वेगळीच ओढ असते ....म्हणून च लहानपणी तासनतास भातुकलीच्या खेळात ,बाहुला -बाहुलीचे लग्न करण्यात ,वेगवेगळे पदार्थ करण्यात  मग्न असतात ........पण  जिथे वयाची २०-२२ वर्षे घालवली ते घर लग्नानंतर परके होते आणि परके घर आपले म्हणून ते आपलेसे करण्याची  धडपड करायची ......आणि ते घर सजवायचे ...फुलवायचे ......हे च तिचे स्वप्न होते .....तिथे असणाऱ्या ....आल्या- गेल्याना आनंद ,प्रेम आपल्या आपुलकीतून  भरभरून देत राहते  ......घर म्हणजे एक शब्द नाही तर ती एक भावना आहे  .घर म्हणजे फक्त विश्रांतीचे ठिकाण असेही नसावे ,जिथे  एकमेकांच्या  भावनांना समजून उमजून ...सांभाळून राहणारे ......प्रत्येकाच्या मताला किंमत असणारे ......सर्वांनाच हळुवारपणे फुलवणारे ....एकमेकांच्या मनातले न बोलत सुद्धा भाव जाणणारे .......प्रसन्न  वाटेल सर्वाना असे वागणारे ....असे नातेवाईक राहतात .....मग ते घर लहान आहे की मोठे आहे हे जाणवत हि नाही मग ......किंवा जवळचे नातेवाईक काही कारणाने जरी दूर असले तरी ते घरचेच वाटू लागतात .......अशी बरीच घरे आपल्या मनात हि घर करून रहातात ....आपल्याही नकळत .........