Wednesday, 29 July 2020
श्रावण
*श्रावण*
येता हा श्रावण मास
आठवे का बालपण?
शाळा कमी एक तास
पावसाची रुणझुण !
झोका टांगला झाडाला
ऊत येतसे खेळाया
मेंदी हाती रेखायला
सुंदर नक्षी पहा या
येता हा श्रावण मास
आठवे मज तारुण्य
प्रीतीचा होई उल्हास
दिसे ते इंद्रधनुष्य !
यावर्षी श्रावण मास
लावला मुखाला मास्क 😷
नाही जायचे माहेरी
हात धूत रहा घरी 😁
अर्चना कुलकर्णी.
🙏)
29/07/2020
येता हा श्रावण मास
आठवे का बालपण?
शाळा कमी एक तास
पावसाची रुणझुण !
झोका टांगला झाडाला
ऊत येतसे खेळाया
मेंदी हाती रेखायला
सुंदर नक्षी पहा या
येता हा श्रावण मास
आठवे मज तारुण्य
प्रीतीचा होई उल्हास
दिसे ते इंद्रधनुष्य !
यावर्षी श्रावण मास
लावला मुखाला मास्क 😷
नाही जायचे माहेरी
हात धूत रहा घरी 😁
अर्चना कुलकर्णी.
🙏)
29/07/2020
श्रावण (अष्टाक्षरी )
श्रावण
आली ही श्रावणसर
विरली ही लगेचच
पसरे पिवळे ऊन
हो सुखाची पखरण !
उधळण ती रंगाची
चाहूल इंद्रधनूची
याद आपल्या भेटीची
शपथ ती वचनाची !
आले कुठून वादळ
नको ते ठेवून गेले
डोळ्यात श्रावण माझ्या
नात्यात गुंतत गेले !
चाहूल ती अंकुराची
तुला भीती ती जनाची
मी खंबीर आई मनाची
वाट पाहि *श्रावणाची* !
( *श्रावण*- श्रावण बाल )
अर्चना कुलकर्णी.
29/07/2020
आली ही श्रावणसर
विरली ही लगेचच
पसरे पिवळे ऊन
हो सुखाची पखरण !
उधळण ती रंगाची
चाहूल इंद्रधनूची
याद आपल्या भेटीची
शपथ ती वचनाची !
आले कुठून वादळ
नको ते ठेवून गेले
डोळ्यात श्रावण माझ्या
नात्यात गुंतत गेले !
चाहूल ती अंकुराची
तुला भीती ती जनाची
मी खंबीर आई मनाची
वाट पाहि *श्रावणाची* !
( *श्रावण*- श्रावण बाल )
अर्चना कुलकर्णी.
29/07/2020
Saturday, 11 July 2020
आप्पा
बाबा
आई चे प्रेम बालपणी च उमजते,
वडिलांची माया कळायला थोडे मोठे व्हावे लागत,
बाबांची आवड आपल्याला कधी कळतच नाही
आपल्या गरजा पुरवताना तेदेखील विसरून जातात
आता विचारावे वाटते माझ्या करिता तुम्ही किती आवडी सोडल्या ?
माझ्या हौशेखातर कधी नाही म्हटले नाही सहलीला
स्वतः मात्र जात राहिले बस ने ऑफिस ला !
चांगले हवे घर राहायला म्हणून घेतला flat छान!
हफ्ते फेडताना मात्र निघाला तुमचा घाम !
जाणवले नाही कधी तेव्हा ,
जाणवते ते आज जेव्हा
श्वास घ्यायला सुद्धा दिवस नाही पुरा
कधी भेटाव म्हटले तर
आज नाही जमत ,उद्या नाही जमत
फोन वर बोलून तुम्ही समाधान मानायचे
माझे मात्र मन मला खात राहायचं ...!
बाबा, आज चा दिवस मात्र आहे खास तुमचा !
तुमच्या जुन्या आठवणी चा !
अर्चना कुलकर्णी
१९/६/२०११
बाबा (अप्पा )
आईचे प्रेम बालपणीच समजते पण बाबा चे प्रेम समजायला मोठे व्हावे लागते.हे तर नेहमीच मी म्हणते. तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही जे प्रेम, माया दिलीत ते समजायला खूप वेळ लागला. मुलगा व मुलगी हा भेद तुम्ही कधी च केला नाहीत. शिक्षणाबरोबर इतर गोष्टीत भाग घ्यावा म्हणून प्रोत्साहित करणे, ज्यात आवड आहें ते कर च पण जे जमणार नाही असे वाटतं तिथे ही भाग घे असे आवर्जून सांगणे असे. प्रत्येक गोष्ट फक्त यश मिळेल च म्हणून करायची नाही. चढाओढीत मागे पडलो म्हणून रडायचे नाही किंवा ते परत करायचे नाही हे चुकीचे हे शिकायला मिळाले. वाचनालयातून चांगली पुस्तके आणून द्यायची मग त्यावर चर्चा करायची हा तुमचा आवडता खेळ. वक्तृत्व चांगले होण्यासाठी नकळत उपयोग झळा. बालनाट्य दाखवण्याकरिता बसने घेऊन जात आठवते अजून ते. आयुष्यात प्रत्येक प्रसंगी सल्ला देण्यापूर्वी आमच्या मनात काय आहें हे खुबीने काढून घेत व योग्य सल्ला दिलात. तेव्हा हे ही सांगायला विसरत नसतं, निर्णय घेतलाय त्यावर ठाम राहायला शिका. चांचलपणे आज हे उद्या ते असा प्रकार नको. पाठीशी खंबीरपणे उभे आसने म्हणजे काय ते तुम्ही आई व अप्पानी प्रत्येक कृतीतून दाखवून दिले. परिस्थिती चे दुःख इतरांना न दाखवता, समोरच्याची कशी मदत करता येईल हे तुमच्याकडून शिकायला मिळाले. आज योग दिवस, संगीत दिवस व पिता दिन एकत्र आलेत.. तुम्हाला नाट्यसंगीताची खूप आवड, काही पदे तुम्ही म्हणत असत. सिनेसंगीत ऐकत पण कधी म्हटलेलं आठवत नाही. योग, म्हणजे शाळेत असताना आमच्याकडून घालून घेतलेले सूर्यनमस्कार आठवतात. तसें च लोकमान्य टिळकांची गोष्ट.निवृत्त झाल्यावर योग विद्या शिकून घेतली. त्या वयात नियमित पणे आसने करत, प्राणायाम करून प्रकृती निरोगी ठेवली.
तुम्ही गेल्यावर जाणवले तुम्ही आपल्या स्वभावामुळे किती माणसे जमा केली होती. त्यावेळी येणारे नगरसेवक, इतर कार्यकर्ते नाही तर मला कौतुक वाटले, जेव्हा गवत काढणाऱ्या दोन स्त्रिया आल्या. त्यानी सांगितले, 15आगस्ट ला काकांच्या (तुमच्या ) हस्ते ध्वजवंदन होते. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला च सांगितले, इथे वाढलेले गवत ज्यांनी काढले, त्यांना धन्यवाद, त्यामुळे च आता मी उभा राहू शकलो व आम्हाला पुढे बोलावले. आमी आमचं काम केल होतं पण काकामुळे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. असे दुसऱ्याचे सदैव कौतुक करणारे तुम्ही.
तुम्ही माझ्यापासून दूर कधी जाऊच शकत नाहीत. माझ्या आजूबाजूला च आहात. प्रत्येक योग्य निर्णयाला तुमची साथ आहें आणि ती कायम राहिल.
Miss you....
अर्चना कुलकर्णी.
21/06/2020

लाट.. चारोळी
दीक्षित डाएट ची लाट
फॅशन च्या लाटा येत च राहतात
आता आलीय
करोना ची लाट
.. *----*****
लाट
मुंबईतला अनुभवावा पहिला पाऊस,
शहरभर फिरावे, मग मरीन ड्राईव्हला टेकावे,
त्या फेसाळणाऱ्या शुभ्र लाटा,
त्यातून आजूबाजूस उडणारे तुषार,
त्यात जी मजा आहें,
आहें समुद्राची ओढ,
लागत नाही त्याचा थांग,
नाही त्याला कुठे अंत,
बघावे पुनः पुनः त्या लाटांकडे,
बस, एवढेसे स्वप्न वेड्या मुंबईकरांचे !
**************
लाट
डाएट च्या भरपूर लाटा
आदळल्या माझ्यावर
शोधल्या त्यातल्या पळवाटा
नाही घेतले काही मनावर
😁😁😁😁😁

संयम
संयम
प्रेमाचे असे हे बंधन
नाहीत इथे नियम
पण असावा संयम
फुलते मग आनंदवन !
अर्चना कुलकर्णी
संयम
आठवण तुझी येता
संयम सारा सुटतो
पापण्यांचे झाकण उघडून
पाझर डोळ्यातून वाहतो
अर्चना कुलकर्णी.
प्रेमाचे असे हे बंधन
नाहीत इथे नियम
पण असावा संयम
फुलते मग आनंदवन !
अर्चना कुलकर्णी
संयम
आठवण तुझी येता
संयम सारा सुटतो
पापण्यांचे झाकण उघडून
पाझर डोळ्यातून वाहतो
अर्चना कुलकर्णी.
गुरुपौर्णिमा ... आई
असेच मनातले काही :
गुरूपौर्णिमा
आई तूच प्रथम गुरु, तुला कसे मी विसरू?
पण तीन वर्षापूर्वी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आम्हाला पोरके करून गेलीस !
तू च बोलायला शिकवलेस ,बोट धरून चालायला शिकवलेस, योग्य खायला दिलेस. जसं जसेमोठे होत होतो तेव्हा चान्गले वाईट काय कसे ओळखावे हे शिकवलंस पण काही गोष्टी तुझ्या वागण्यातून शिकवत गेलीस. तुझे नर्सिंग चे शिक्षण झाले होते त्यामुळे सेवा भाव अंगात मुरलेला होता. कोणी आजारी झाले तरी चलबिचल न होता औषधाबरोबर धीर देण्याचे काम करायची. कधी त्यामुळे भीती वाटत नसे. हाडाची शिक्षिका तू होतीस च, जरी नोकरी केली नाहीस तरी मुलांच्या अभ्यासाची पूर्ण जबाबदारी तू आनंदाने पार पाडली. समाजसुधारणा करायला घराबाहेर पडली नाहीस कधी, पण सुरुवात घरापासून केलीस. घरी येणाऱ्या कामवालीला तिच्या मुलांना शिकव असे सांगून थांबली नाहीस, त्यांना दुपारी घरी बोलावून शिकवायला सुरु केलेस. दारावर येणारा पोस्टमन असो की फळविक्रेता भय्या, तुझ्याकडे हक्काने पाणी मागत. तू ही कधी कोणताही भेदभाव केलाच नाहीस. जेवण बनवणे ही तुझी आवड होती, विविध प्रांतातील पदार्थ आम्ही लहानपणीच खाल्ले होते. कलाकुसरीच्या वस्तू, कचऱ्यातून कला तुझे छंद. त्यामुळे नकळत चांगल्या वस्तू बघणे शिकत गेलो. देवावर तुझी अपार श्रद्धा !पण त्याचे अवडंबर कधी माजवले नाहीस. स्वतः उपास करायचिस पण मुलांना लादले नाहीत. देवाचे नामस्मरण करायला सर्व आटोपल्यावर रात्री. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुला शतशः नमन !🙏
दुसरे गुरु तात, आप्पा होय. आप्पानी तर कधी मुला मुलीत भेदभाव केला नाही. अभ्यासात विशेष लक्ष देत. जे शिकायचे ते शिकायला परवानगी दिली, मदत केली. पुस्तकं वाचणे, लिखाण, नाटक बघणे ह्या सर्व गोष्टींची गोडी लावली. नाट्यगीत ऐकणे त्यांची आवड ती च कानसेन आवड माझ्यात आली. आप्पा तुम्हाला मनापासून नमस्कार 🙏
त्यानंतर शाळेत असंख्य शिक्षक भेटले. सर्व च शिक्षक मनापासून शिकवत. मराठी, इतिहास, इंग्लिश धड्यांव्यतिरिक्त अवांतर वाचण्याकरिता प्रवृत्त केले.वक्तृत्व, सामान्यज्ञान, चित्रकला, खेळ सर्व स्पर्धा शाळेतून होत असे. त्या सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वंदन ! 🙏
शाळेत असतानाच वाचनात आले की "शिक्षक हे आयुष्यभर पुरत नसतात, त्यामुळे ग्रंथ हे च गुरु "
वाचनाची आवड कायम जपली,
अगदी विनोदी पुस्तकातून सुद्धा आपल्याला शिकवण मिळते च हे जाणवते.
निसर्ग हा तर मोठा गुरु, पण हे बऱ्यापैकी उशिरा कळले. तरी पण जेव्हा लक्षात आले, तेव्हा पासून स्वतः पुरते, कुटुंबापुरते निसर्ग रक्षण करण्याचा प्रयत्न करू लागले. त्याने खूप शिकायला मिळाले.
असे आयुष्यभर शिक्षण सुरु च राहते
भाऊ, बहिणी, शेजारी, नातेवाईक,
मित्र मैत्रिणी सुद्धा त्यात येतात. कधी आपली मुले आपल्याला शिकवतात ते ही गुरु च नाही का?
सर्व अशा ज्ञात अज्ञात गुरूंना आज नमन 🙏🏻

ध्यास
ध्यास
स्त्री शिक्षणाचा घेऊनि ध्यास
ज्योतिराव व सावित्री जगले
दलितांचा उद्धार हा च ध्यास
करिता बाबासाहेब झटले !
अर्चना कुळकर्णी.
****-*-********-
स्वातंत्र्याचा ध्यास घेऊनि
भगतसिंग, सुखदेव क्रांतिकारी झाले
हसत हसत फासावर चढले
भारतीय इतिहासात अमर जाहले.
*----******--------***
कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी
बाबा आमटे झटले
पुनर्वसनाचा घेऊन ध्यास
आनंदवन फुलवले खास !
****---*****-
अर्चना कुलकर्णी.
स्त्री शिक्षणाचा घेऊनि ध्यास
ज्योतिराव व सावित्री जगले
दलितांचा उद्धार हा च ध्यास
करिता बाबासाहेब झटले !
अर्चना कुळकर्णी.
****-*-********-
स्वातंत्र्याचा ध्यास घेऊनि
भगतसिंग, सुखदेव क्रांतिकारी झाले
हसत हसत फासावर चढले
भारतीय इतिहासात अमर जाहले.
*----******--------***
कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी
बाबा आमटे झटले
पुनर्वसनाचा घेऊन ध्यास
आनंदवन फुलवले खास !
****---*****-
अर्चना कुलकर्णी.
भास
असेच भास
मोठेपणा ची शाल कधीची पांघरली
सोबत समजूतदारपणाची वस्त्रे ल्याली
म्हणून कधीच उघड नाही रडली
काल दिवसभर मनातून च गहिवरले
आई अप्पानची सतत आठवण मनात च काढली
आता गेले मी स्वप्नातच चेंबूर च्या घरी
आई आप्पा नव्हते त्या मंदिरी
पण आले दोघे ही पटकन
आई फक्त म्हणाली बस नाही ग मिळाली
आणि हात पाय धुवायला गेली
तिथून स्वयंपाक घरात शिरली
आलेल्या व्यक्तीला आधी खायला द्यायची
तिची जुनी सवय अजून नाही सुटली.
आप्पा बसले बोलत, 323 ची बस पकडली
खूप जोरात त्याने आणली
आपली भेट झाली......
बस आणि मला जाग आली
स्वप्नातल्या भेटीने ही मला
लाभली गुरुकृपेची सावली
🙏🏻🙏🏻🙏🏻
अर्चना कुलकर्णी
मोठेपणा ची शाल कधीची पांघरली
सोबत समजूतदारपणाची वस्त्रे ल्याली
म्हणून कधीच उघड नाही रडली
काल दिवसभर मनातून च गहिवरले
आई अप्पानची सतत आठवण मनात च काढली
आता गेले मी स्वप्नातच चेंबूर च्या घरी
आई आप्पा नव्हते त्या मंदिरी
पण आले दोघे ही पटकन
आई फक्त म्हणाली बस नाही ग मिळाली
आणि हात पाय धुवायला गेली
तिथून स्वयंपाक घरात शिरली
आलेल्या व्यक्तीला आधी खायला द्यायची
तिची जुनी सवय अजून नाही सुटली.
आप्पा बसले बोलत, 323 ची बस पकडली
खूप जोरात त्याने आणली
आपली भेट झाली......
बस आणि मला जाग आली
स्वप्नातल्या भेटीने ही मला
लाभली गुरुकृपेची सावली
🙏🏻🙏🏻🙏🏻
अर्चना कुलकर्णी
चित्रकाव्य
चित्रकाव्य
खुणावतेय ही वाट मला
येतेस का तू फिरायला?
आता सूर्य आला मावळायला
जातेच किनारी खेळायला !
सुंदर साधी सरळ वाट ती
दोन्ही बाजूस झाडें सजली
पुढे जायचा मार्ग दाविती
आजवरी कधी ना देखिली !
मनोहारी सागर दर्शन हे
लाटा किती उंच झेपाविती
जणू सूर्याला जाऊन भिडती
गगनी विविध रंग उधळती !
अर्चना कुलकर्णी.
चित्रकाव्य
जाते मी या वाटेवरूनी
मी आहें निसर्गप्रेमी
ऐकते कोकीळ गाणी
बोलावते आहें दुरून कोणी !
**----****-----***
चित्रकाव्य
मोहवते मला ही पायवाट
जाईन म्हणे मी एकटी
ऐकु येतोय पक्ष्यांचा किलबिलाट
नको च कोणी सोबती !
अर्चना कुलकर्णी.
खुणावतेय ही वाट मला
येतेस का तू फिरायला?
आता सूर्य आला मावळायला
जातेच किनारी खेळायला !
सुंदर साधी सरळ वाट ती
दोन्ही बाजूस झाडें सजली
पुढे जायचा मार्ग दाविती
आजवरी कधी ना देखिली !
मनोहारी सागर दर्शन हे
लाटा किती उंच झेपाविती
जणू सूर्याला जाऊन भिडती
गगनी विविध रंग उधळती !
अर्चना कुलकर्णी.
चित्रकाव्य
जाते मी या वाटेवरूनी
मी आहें निसर्गप्रेमी
ऐकते कोकीळ गाणी
बोलावते आहें दुरून कोणी !
**----****-----***
चित्रकाव्य
मोहवते मला ही पायवाट
जाईन म्हणे मी एकटी
ऐकु येतोय पक्ष्यांचा किलबिलाट
नको च कोणी सोबती !
अर्चना कुलकर्णी.
एक गंम्मत
एक गंम्मत
माझा मुलगा साधारण दीड पावणे दोन वर्षाचा असेल तेव्हा, मी त्याला घेऊन एका मंदिरात गेले. बरेच देव होते, मी आपली त्याला सांगत होते, हे बघ शंकर बाप्पा, म्हणून ओं नमः शिवाय, ही पार्वती माता, हे गणपती बाप्पा, श्रीराम, सीता... प्रत्येक देवाचे नाव घेतले की पाठोपाठ तो ही बोबडे बोल बोलत होता, हा बघ मारुती.. तो काही बोलला नाही, पुन्हा पुन्हा दोन तीन वेळेस सांगितले तरी बोलेना.
मनात उगाच च ह्याला *र * बोलताच येत नसेल का?
मंदिरातून बाहेर पडलो आणि समोरून लाल मारुती गाडी गेली, तसा लगेच बोलला मारुती..... केवढं हसायला आले मला च. त्यावेळेस मारुती ची गाडी नवीन च बाजारात आली होती व लाल रंग बघायला खूप छान वाटे. त्यामुळे दिवसातून पन्नास वेळा तरी मी त्याला दाखवून सांगे, ती बघ मारुती आली, पटकन खा, ती बघ लाल मारुती आली टाळी वाजव.
त्यामुळे मंदिरात मारुती (? )
🤣🤣🤣
Archana....
x
Thursday, 9 July 2020
असेच
पूर्वी फक्त ट्रक ,रिक्षा याच्या मागे काही साहित्य लिहिलेले वाचयला मिळायचे , जे ,वाचत, हसत माझा स्कूटी वरून प्रवास होत असे. हल्ली बाईक , कार यावर हि काही न काही लिहिलेले वाचावयास मिळते ,
उगाच च त्यावरून मी त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल असा अंदाज करत , प्रवास करत असते
… उदा . ! १. I am riding becoz of my father.
2. Mama's Boy
३. शूर आम्ही सरदार
४. बघतोस काय मुजरा कर
५. आम्ही रस्त्यावर राहायला नाही आलो
६ . आशा - निशा
७. आर्या - वंश
८. देवाक काळजी
असे काही बाही लिहिलेले असते गाडीवर ,
काल बघितले एका कार च्या काचेवर लिहिले होते अहिंसक , त्याच्या अगदी बाजूलाच शिवाजी महाराजांचा फोटो हातात ल्या तलवारी सह !
नक्की काय विचार असेल लिहिणार्याचा ?
आज एका कार वर लिहिले होते श्रीमंत योगी ! माझ्या पुढे च ती गाडी चालली होती , मध्येच त्या गाडीतून खराब झालेला आंबा रस्त्यावर टाकला … पडल्यामुळे तो फुटला कोय एकीकडे साल दुसरीकडे…
स्कूटी त्यावरून नेणे म्हणजे घसरणे च …
जरा बाजूनेच स्कूटी पुढे घेतली . सिग्नल ला त्या गाडी शेजारी जावून उभी राहिले , म्हटले काय हो असा रस्त्यात का कचरा टाकता ? त्यावरून गाडी घसरू शकते , त्या बाई ने उलट माझ्याकडेच रागाने पाहिले , तुम्हाला दिसला न पडलेला , मग बाजूने यायचे . असे म्हणून खिडकी बंद केली व सिग्नल सुटताच गाडी जोरात सोडली ….
हे श्रीमंत योगी ? कि माजेलेले श्रीमंत ?
अर्चना
८/६/१५

Subscribe to:
Posts (Atom)