असेच भास
मोठेपणा ची शाल कधीची पांघरली
सोबत समजूतदारपणाची वस्त्रे ल्याली
म्हणून कधीच उघड नाही रडली
काल दिवसभर मनातून च गहिवरले
आई अप्पानची सतत आठवण मनात च काढली
आता गेले मी स्वप्नातच चेंबूर च्या घरी
आई आप्पा नव्हते त्या मंदिरी
पण आले दोघे ही पटकन
आई फक्त म्हणाली बस नाही ग मिळाली
आणि हात पाय धुवायला गेली
तिथून स्वयंपाक घरात शिरली
आलेल्या व्यक्तीला आधी खायला द्यायची
तिची जुनी सवय अजून नाही सुटली.
आप्पा बसले बोलत, 323 ची बस पकडली
खूप जोरात त्याने आणली
आपली भेट झाली......
बस आणि मला जाग आली
स्वप्नातल्या भेटीने ही मला
लाभली गुरुकृपेची सावली
🙏🏻🙏🏻🙏🏻
अर्चना कुलकर्णी
मोठेपणा ची शाल कधीची पांघरली
सोबत समजूतदारपणाची वस्त्रे ल्याली
म्हणून कधीच उघड नाही रडली
काल दिवसभर मनातून च गहिवरले
आई अप्पानची सतत आठवण मनात च काढली
आता गेले मी स्वप्नातच चेंबूर च्या घरी
आई आप्पा नव्हते त्या मंदिरी
पण आले दोघे ही पटकन
आई फक्त म्हणाली बस नाही ग मिळाली
आणि हात पाय धुवायला गेली
तिथून स्वयंपाक घरात शिरली
आलेल्या व्यक्तीला आधी खायला द्यायची
तिची जुनी सवय अजून नाही सुटली.
आप्पा बसले बोलत, 323 ची बस पकडली
खूप जोरात त्याने आणली
आपली भेट झाली......
बस आणि मला जाग आली
स्वप्नातल्या भेटीने ही मला
लाभली गुरुकृपेची सावली
🙏🏻🙏🏻🙏🏻
अर्चना कुलकर्णी
No comments:
Post a Comment