Saturday, 11 July 2020

एक गंम्मत

एक गंम्मत 
माझा मुलगा साधारण दीड पावणे दोन वर्षाचा असेल तेव्हा, मी त्याला घेऊन एका मंदिरात गेले.  बरेच देव होते, मी आपली त्याला सांगत होते, हे बघ शंकर बाप्पा, म्हणून ओं नमः शिवाय, ही पार्वती माता, हे गणपती बाप्पा, श्रीराम, सीता... प्रत्येक देवाचे नाव घेतले की पाठोपाठ तो ही बोबडे बोल बोलत होता,  हा बघ मारुती..  तो काही बोलला नाही,  पुन्हा पुन्हा दोन तीन वेळेस सांगितले तरी बोलेना.   
मनात उगाच च ह्याला *र * बोलताच येत नसेल का?  
मंदिरातून बाहेर पडलो आणि समोरून लाल मारुती गाडी गेली,  तसा लगेच बोलला मारुती..... केवढं हसायला आले मला च.  त्यावेळेस मारुती ची गाडी नवीन च बाजारात आली होती व लाल रंग बघायला खूप छान वाटे. त्यामुळे दिवसातून पन्नास वेळा तरी मी त्याला दाखवून सांगे, ती बघ मारुती आली, पटकन खा,  ती बघ लाल मारुती आली टाळी वाजव.    
त्यामुळे मंदिरात मारुती (? )
 🤣🤣🤣


Archana.... 
x

No comments:

Post a Comment