Saturday, 11 July 2020

चित्रकाव्य

चित्रकाव्य
खुणावतेय ही वाट मला
येतेस का तू फिरायला? 
आता सूर्य आला मावळायला
जातेच किनारी खेळायला !

सुंदर साधी सरळ वाट ती
दोन्ही बाजूस झाडें सजली
 पुढे जायचा मार्ग दाविती
आजवरी कधी ना देखिली !

मनोहारी सागर दर्शन हे
लाटा किती उंच झेपाविती
जणू सूर्याला जाऊन भिडती
गगनी विविध रंग उधळती !


अर्चना कुलकर्णी.


चित्रकाव्य
जाते मी या वाटेवरूनी
मी आहें निसर्गप्रेमी
ऐकते कोकीळ गाणी
बोलावते आहें दुरून कोणी !
**----****-----***

चित्रकाव्य
मोहवते मला ही पायवाट
जाईन म्हणे मी एकटी
ऐकु येतोय पक्ष्यांचा किलबिलाट
नको च कोणी सोबती !

अर्चना कुलकर्णी.

No comments:

Post a Comment