Saturday, 11 July 2020

आप्पा

बाबा
आई चे प्रेम बालपणी च उमजते,
वडिलांची माया कळायला थोडे मोठे व्हावे लागत,

बाबांची आवड आपल्याला कधी कळतच नाही
आपल्या गरजा पुरवताना तेदेखील  विसरून जातात
आता विचारावे  वाटते माझ्या करिता तुम्ही किती आवडी सोडल्या ?

माझ्या हौशेखातर कधी नाही म्हटले नाही सहलीला

स्वतः मात्र जात राहिले बस ने ऑफिस ला !

चांगले हवे घर राहायला म्हणून घेतला flat  छान!
हफ्ते फेडताना मात्र निघाला तुमचा घाम !

जाणवले नाही कधी तेव्हा ,
जाणवते ते आज जेव्हा

श्वास घ्यायला सुद्धा दिवस नाही पुरा

कधी भेटाव म्हटले तर
आज नाही जमत ,उद्या नाही जमत

फोन वर बोलून तुम्ही समाधान मानायचे

माझे मात्र मन मला खात राहायचं ...!



बाबा,  आज चा दिवस मात्र आहे खास तुमचा !

 तुमच्या जुन्या आठवणी चा !



अर्चना कुलकर्णी

१९/६/२०११


बाबा (अप्पा )

आईचे प्रेम बालपणीच समजते पण बाबा चे प्रेम समजायला मोठे व्हावे लागते.हे तर नेहमीच मी म्हणते.  तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही जे प्रेम, माया दिलीत ते समजायला खूप वेळ लागला.  मुलगा व मुलगी हा भेद तुम्ही कधी च केला नाहीत.  शिक्षणाबरोबर इतर गोष्टीत भाग घ्यावा म्हणून प्रोत्साहित करणे, ज्यात आवड आहें ते कर च पण जे जमणार नाही असे वाटतं तिथे ही भाग घे असे आवर्जून सांगणे असे. प्रत्येक गोष्ट फक्त यश मिळेल च म्हणून करायची नाही.  चढाओढीत मागे पडलो म्हणून रडायचे नाही किंवा ते परत करायचे नाही हे चुकीचे हे शिकायला मिळाले. वाचनालयातून चांगली पुस्तके आणून द्यायची मग त्यावर चर्चा करायची हा तुमचा आवडता खेळ. वक्तृत्व चांगले होण्यासाठी नकळत उपयोग झळा. बालनाट्य दाखवण्याकरिता बसने घेऊन जात आठवते अजून ते.  आयुष्यात प्रत्येक प्रसंगी सल्ला देण्यापूर्वी आमच्या मनात काय आहें हे खुबीने काढून घेत व योग्य सल्ला दिलात.  तेव्हा हे ही सांगायला विसरत नसतं, निर्णय घेतलाय त्यावर ठाम राहायला शिका.  चांचलपणे आज हे उद्या ते असा प्रकार नको. पाठीशी खंबीरपणे उभे आसने म्हणजे काय ते तुम्ही आई व अप्पानी प्रत्येक कृतीतून दाखवून दिले. परिस्थिती चे दुःख इतरांना न दाखवता, समोरच्याची कशी मदत करता येईल हे तुमच्याकडून शिकायला मिळाले.  आज योग दिवस, संगीत दिवस व पिता दिन एकत्र आलेत.. तुम्हाला नाट्यसंगीताची खूप आवड, काही पदे तुम्ही म्हणत असत.  सिनेसंगीत ऐकत पण कधी म्हटलेलं आठवत नाही.  योग, म्हणजे शाळेत असताना आमच्याकडून घालून घेतलेले सूर्यनमस्कार आठवतात.  तसें च लोकमान्य टिळकांची गोष्ट.निवृत्त झाल्यावर योग विद्या शिकून घेतली.  त्या वयात नियमित पणे आसने करत, प्राणायाम करून प्रकृती निरोगी ठेवली.
तुम्ही गेल्यावर जाणवले तुम्ही आपल्या स्वभावामुळे किती माणसे जमा केली होती.  त्यावेळी येणारे नगरसेवक, इतर कार्यकर्ते नाही तर मला कौतुक वाटले, जेव्हा गवत काढणाऱ्या दोन स्त्रिया आल्या.  त्यानी   सांगितले, 15आगस्ट ला काकांच्या (तुमच्या ) हस्ते ध्वजवंदन होते.  त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला च सांगितले, इथे वाढलेले गवत ज्यांनी काढले, त्यांना धन्यवाद, त्यामुळे च आता मी उभा राहू शकलो व आम्हाला पुढे बोलावले. आमी आमचं काम केल होतं पण काकामुळे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. असे दुसऱ्याचे सदैव कौतुक करणारे तुम्ही.
तुम्ही माझ्यापासून दूर कधी जाऊच शकत नाहीत.  माझ्या आजूबाजूला च आहात. प्रत्येक योग्य निर्णयाला तुमची साथ आहें आणि ती कायम राहिल. 
Miss you.... 

अर्चना कुलकर्णी. 
21/06/2020


No comments:

Post a Comment