Wednesday, 29 July 2020

श्रावण

*श्रावण*
येता हा श्रावण मास 
आठवे का बालपण? 
शाळा कमी एक तास 
पावसाची रुणझुण !

झोका टांगला झाडाला 
ऊत येतसे खेळाया 
मेंदी हाती रेखायला 
सुंदर नक्षी पहा या 

येता हा श्रावण मास 
आठवे मज तारुण्य
प्रीतीचा होई उल्हास 
दिसे  ते इंद्रधनुष्य !

यावर्षी श्रावण मास 
लावला मुखाला मास्क 😷
नाही जायचे माहेरी 
हात धूत रहा घरी 😁


अर्चना कुलकर्णी. 

 🙏)
29/07/2020

No comments:

Post a Comment