Wednesday, 29 July 2020

बाल्या . चित्रकाव्य

चित्रकाव्य 
माझा छोटा छकुला 
घंगाळात तो बसला 
आनंद त्याचा इवला
मला तो खूप भावला !

बंब आज नाही भरला 
पण त्याचे काय त्याला !
ओढून बघे तो नळाला 
एका थेम्बानेही सुखावला !

मुकावे कसे या क्षणाला? 
बंद करावे यास चित्रात 
थांबवू कसे या खेळाला? 
उचलून नेतेच त्याला घरात !

अर्चना कुलकर्णी.
28/07/2020

No comments:

Post a Comment