Tuesday, 11 August 2020

कृष्ण

 कृष्ण  

पुत्र जरी तो देवकीचा 

कान्हा तो यशोदेचा !

माखनचोर गोपींचा 

सखा तो या राधेचा !

बंधू असे द्रौपदीचा 

मित्र शोभे सुदाम्याचा !

गीता असे ज्ञानदिवा 

माझ्या अंतरी विसावा !

सापडे प्रेमाचा ओलावा 

लाभे मायेचा थंडावा !

अनंत रूपे तव शक्ती

कशी करावी तव भक्ती? 


त्यागुनी मोहा हे योगेश्वर, 

लाभेल का तव छाया हे दामोदर?


अर्चना कुलकर्णी.

10/08/2020

No comments:

Post a Comment