Saturday, 22 August 2020

मानसपूजा

 मानस पुजा


मानस पुजेस बसले मी 

यावे यावे महाराज तुम्ही


घर माझे छोटे सुंदर

यावे यावे गजानन तुम्ही 


झाडले पुसले स्वच्छ हो केले 

यावे यावे महाराज तुम्ही


कुंकुम रांगोळी रेखीली 

यावे यावे गजानना तुम्ही 


फुलांची आरास ही केली 

यावे यावे महाराज तुम्ही 


मांडला चौरंग त्यावरी आसन 

यावे यावे गजानना तुम्ही


धुपाचा गंध, दिवे तेवती मंद 

यावे यावे महाराज तुम्ही


पोथी झाली वाचून 

यावे यावे महाराज तुम्ही


स्वागता तुमच्या मी अधीर 

यावे यावे गजानना तुम्ही 


गण गण गणांत बोते 

यावे यावे महाराज तुम्ही


सुंदर सुंदर लीला तुमच्या अपरंपार 

यावे यावे श्री गजानना तुम्ही


यावे यावे लवकर यावे 

गण गण गणांत बोते 


आले आले श्रीमहाराज आले 

मना तू होई एकाग्र आता 

भक्तीने ओवाळू औक्षण करू 


बसावे मंचकी आपण देवा 

काय करू मी आपूली सेवा 

सेवेत फक्त भाव बघावा 

आपण आला संतोष झाला !

!!!गजानन महाराज की जय !!!


प्रथम तुम्हा नमस्कार करीते 

मनोभावे मी वंदन करीते 


देवाधीदेवा चरण ही दावी 

पुजा माझी गोड मानून घ्यावी 

आधी पंचांमृत की अत्तर पाणी 

गार नको थोडे उन च घाली 

आणिला रुमाल चरण पुसाया 


आवडेल का हा पीतांबर पिवळा

उत्तरीय केशरी अंगावर घाला 

सुवासिक फुलांच्या ह्या विविध माला


मोगरा गुलाब की शेवंती बाई 

चाफा बकुळ की नाजूक जुई 

तरारली फुले झाली फुलाना घाई 

हाऱ हा सुंदर श्री वक्षांवर शोभे  


पिठले, भाकरी त्यावर लोणी 

सोबत कांदा अन मिरची 

बरोबर केलीय उन उन खिचडी 

वाटीत घालते खीर थोडी तरी 

सारे लागोलग खाऊन घ्या हो !


घालते मी घालते वारा 

तुम्ही आता आराम करा 

भोजन झाले मंचकी बसले 

गोविंदविडा घेते झाले !


काय बोलावे काय करावे 

सांगावे का मनातले सांगावे 

तव चरणी मी लीन होते 

पुन्हा पुन्हा मी नमन करीते !


उघडूनी डोळे समोर पाहते 

अनुभुती सुंदर शांत मी होते 


मुखात नाम, कामात नाम 

स्मरणात नाम, ध्यानात नाम 

मनात नाम, नामात नाम 

कृपावंत गजानन महाराज हो!


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

अर्चना कुलकर्णी 

23/08/2020

No comments:

Post a Comment