श्रीकृष्ण
श्रीकृष्ण बासरी वाजवितो
गोकुळ सारेच गाजवितो !
सूर तो बासरीचा ऐकता
वासरे थांबती पाणी पीता !
थबके गोपी नृत्य करिता
जीवा शिवाची होई एकता !
जीवा शिवाची भेट ही झाली
तगमग ती सारी शमली !
जन्म मृत्यू ची फेरी चुकली
मनी ठसली एकच मुरली !
वृन्दावनीची नीरव शांती
किती फिरावे परि न तृप्ती
आनंदाचे क्षण रेंगाळती
अजून ही त्या आनंद प्रांती !
मनास ये एक अनुभूती
छबी माधवाची ठसे चित्ती
अवीट गोडी हो त्या नवनीती
मन होई हो अमर अमृती !
अर्चना कुलकर्णी
11/08/2020
No comments:
Post a Comment