Thursday, 29 November 2012

diwali

दिवाळी -
मनुष्य स्वभाव हा उत्सव प्रिय आहे आहे असे म्हटले जाते .उत्सवामुळे आपल्याला काय मिळते ? तर माझ्या मते मनाला आनंद मिळतो तो पुढे कित्येक दिवस पुरतो.
मनाची खिन्नता दूर होते ,रोजच्या जीवनातून मोकळेपण मिळते . कधी आपण कोणाला भेटावयास जातो किंवा आपल्याकडे कोणी त्या निमित्ताने येतात. विचारांची देवाण -घेवाण होते .पण हे सण  का साजरे केले जातात ? हे जाणून न घेताच सण  साजरा केला गेला तर ती भावनाशुन्यता ठरते .
दिवाळी किंवा दिपावली  , दीपोत्सव ..सर्वांच्या आवडीचा सण !अंधारातुन प्रकाशाकडे ,अज्ञानातून ज्ञानाकडे , अंधश्रद्धे कडून विज्ञानाकडे नेणारा हा  सलग ४-५ दिवस चालणारा आपला हा मोठा सण  ! त्याची सुरुवात हि फार आधीपासून होते .घराची साफ सफाई केली जाते. दिवे उजळले जातात , दागिने ,नवीन साड्या ,नवीन कपडे याची खरेदी केली जाते .
दिवाळीत पणतीला खूप महत्व आहे . ती मातीची असावी ,त्यामागचे कारण आपले असलेले धरणीशी नाते दर्शवते . इलेक्ट्रिक माळेपेक्षा  पणतीची माळ  लावावी ,त्यामागची भावना अशी की एका पणतीने दुसरी पणती लावता येते , उजेड जास्त  ठिकाणी पसरवू शकते. पण एका बल्ब ने दुसरा बल्ब  लावता येत नाही.

आपल्याकडे दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस (अश्विन शुद्ध द्वादशी) पासून साजरा केला जातो. त्या दिवशी संध्याकाळी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते .गायीचे अनन्यसाधारण महत्व लक्षात जाणून घेणे हे त्यातून समजते .
दुसरा दिवस धनत्रयोदशी ,ह्या दिवशीसंध्याकाळी  धन किंवा लक्ष्मी ची पूजा केली जाते. तिला झेंडूची फुले वाहिली जातात .धने आणि गुळ  याचा नैवेद्य दाखवला जातो .आकाशकंदील लावले जातात . रांगोळी काढली जाते . धन्वंतरी - देवांचे वैद्य -यांची उपासना सुद्धा धनत्रयोदशी दिवशी केली जाते .आकाशकंदील ची प्रथा आपल्याकडे जपान किंवा चीन मधून आली असावी असे म्हटले जाते. आकाशकंदील हे आपल्या पूर्वज आहेत त्यांना देखील आपण आनंदात आहोत हे दिसावे म्हणून तो उंचावर लावला जातो .त्या च दिवशी यम दीप दान केले जाते, ज्यामुळे आपल्या वर यमराजाची अवकृपा होवू नये असे मानले जाते .
त्यानंतर येते ती नरकचतुर्दशी ,नरकासुर नावाच्या राक्षसाचा नाश ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने केला. त्याने कैद केलेल्या सोळा हजार स्त्रियांचा उद्धार करण्यात आला .त्याच्या त्रासातुं मुक्त झाल्याने लोकांनी दीप लावून आनंद व्यक्त केला अशी कथा सांगितली जाते .ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करण्यची प्रथा आहे .
थंडी चे दिवस  सुरु होत आहेत,त्याकरिता  सर्वांगाला  तेल लावून अंघोळ करण्यची प्रथा आली असावी .पहाटे  च पणत्या लावल्या जातात . मुले फटाके  वाजवतात .फराळाचे पदार्थ खाल्ले जातात .मुलांचे औक्षण केले जाते .सर्वत्र आनंद पसरतो .

Tuesday, 20 November 2012

kasab

फाशी झाली क्रूरकर्म्याला
न्याय मिळाला बलिदानाला
जरी आनंद  होई जीवाला
काय करावे या मनाला ?
नाही तयार विश्वास ठेवायला !
 अचानक जाग कशी आली सरकारला
जो आला संपवण्या मुंबईला
त्याला अंधारातच का फाशी दिला ?
कोणी म्हणे आदेश दिला यमाला
घेवून ये तू हरामखोराला
अन डेंगू ने पछाडलेला
गेला आपसूक यमसदनाला !
अर्चना ......
21-11-2012

Monday, 29 October 2012

आठवणीच्या झुल्यावर ....



आठवणीच्या झुल्यावर झुलताना
अनेकदा मी अनुभवलंय
पहिल्या प्रेमाच्या आठवणीत
पाय  जमिनीवर ठरत च  नाहीत ,
इंद्रधनुषी स्वप्नाला हात लावल्याखेरीज
झुला खाली येत च नाही .....l १ l
शाळेतल्या आठवणी तर अफाट आभाळासारख्या
कधी हळुवार पावसाने चिंब करून

मनाला सुखावतात
तर कधी धुव्वाधार  कोसळून
आपले श्वास च गुदमरतात
मैत्रीच्या- द्वेषाच्या ह्या विविध रंगात
फुलपाखरागत हवेत च तरंगतात l 2l

नातातल्यांच्या आठवणी
महासागरागत खोल असतात ,
कधी संथ शांत असतात
आपणास संयमित करतात
तर कधी बेभान  होवून
किनार्यावर आपटून घेणाऱ्या लाटेगत
आपलाच खेळ करत राहतात l ३ l
आठवणी ह्या फक्त आठवणीच असतात
कधी जागेपणी पाहिलेली गोड स्वप्ने असतात
तर कधी बोचरी होवून झोप ओरबाडून नेतात
न संपणारे रंग लेवून फिरतात अन फिरवतात
म्हणून च  आठवणीशिवाय जगणे अशक्य करतात l ४ l


अर्चना ,ठाणे .9 -10 -12

Tuesday, 23 October 2012

देवीची आरती


प्रथम दिनी  आई भवानी आली लाल रंगात
आठव दिधली तुझ्या आहे मी रक्तात !१! 


दुसरे दिनी माय रेणुका आली आकाशी रंगात
म्हणे मजसी माया आहे तुजवर आभाळागत !२ 


तृतीय दिनी गौरी माता  आली पीत रंगात
घालून देत असे हळदीगत भक्तीची रीत जगात !३!
 


चौथे दिनी अन्नपूर्णा माउली  प्रगटली हिरव्या रंगात 
सांगे  श्रद्धेने काम करता समृद्धीची होई बरसात !४!...
पंचम दिनी काली माँ  अवतरली करड्या रंगात
विसरू नको प्रेमळ धरणीशी नाते ,सांगे कानात !५ !


सहावे दिनी जगतजननी अम्बा अवतरली केशरी रंगात
देण्या सर्वा  आशिष, रहा सतत उत्सवी आनंदात !६!

सातवे दिनी शुभ्र वस्त्र लेवुनी आली सरस्वती स्वप्नात
सांगे बुद्धी अन पवित्र वाचा याने मान लाभे विश्वात ! ७ !
 आठवे दिनी आई सप्तशृंगी प्रगटली गुलाबी रंगात
गावया अलौकिक ,सुमधुर ,पावन प्रीतीचे संगीत !८!
नववे दिनी लक्ष्मीमाता अवतरे जांभूळ  रंगात
जिच्या प्रेमळ   कृपेने जगती होई भरभराट ! ९ !
देवी  माता रंगे  नवरात्रीला   नऊ रंगात 
भक्तगण  होई  दंग  तिच्या  उपासनेत  !१० !
देवीची  अगाध  महती  जाणुनी आरती म्हणतात 
सर्व दुखः -संकटे  विसरुनी  मनी हर्षतात !११ !

Wednesday, 10 October 2012

नाते

आपले अबोल  नाते

ते शब्दांत नाही समजवायचे
डोळ्यांतुन समजुन घ्यायचे
अन मनाने सजवायचे
अस्वस्थ मनाला  सावरायचे
अन कोवळ्या भावनेला जपायचे
नकळत हि न दुखवायचे
अन अश्रू येण्यापूर्वीच गोंजारायचे
चुकीच्या रस्त्यावरून परत आणायचे
अन कधी हि एकटे न सोडायचे !
कधी नाही रुसायचे
अन नाते आपले फुलवायचे !

अर्चना ...

आठवणी -


 आठवणी -
मनात आज धरला आहे आठवणीनी फेर ,
त्यामुळेच  मन  आहे आज सैरभैर
कधी जवळच्या सखीगत  हसवतात
तर कधी अनोळखी बनून फसवतात
भूतकाळातून वर्तमानात यायला नको म्हणतात
अन दिवसाचे तास त्यात च हरवतात....
खरोखर अशी जर मनाची स्थिती आपली बरेचदा होते . भूतकाळात च मन दंगून जाते .
प्रत्येक सणाला आपले मन FLASH BACK  मध्ये जाते .लहानपणीची आठवण मन ताजेतवाने करून जाते . राष्ट्रीय सणांविषयी सुद्धा शालेय जीवनातल्या आठवणी असंख्य असतात . शिक्षकांच्या आठवणी निघाल्या की मन अगदी मोंटेसरीच्या वर्गात जावून बसते ....ते शाळा सोडेपर्यंत भेटलेले अनेक शिक्षक -शिक्षिकांच्या आठवणीत रममाण होते .पण मनाला एक वेगळाच आनंद, उत्साह देवून जाते .
सिनेमात FLASH BACK  दाखवून आपले मनोरंजन केले जाते . त्यातला सर्वात माझ्या लक्षात राहिलेला FLASH BACK  मैंने प्यार किया मधील कबुतराचा FLASH BACK . माझ्या मते कबुतराचा FLASH BACK  असलेला तो एकमेव चित्रपट असेल.
आपल्या मनात कधी तरी कोणी सांगितलेले एखादे चांगले वाक्य किंवा घटना मनात घर करून राहते , ती आठवली कि पुन्हा नवीन जिद्द निर्माण होते .अशा आठवणीत अडकणे केव्हा हि चांगले ठरू शकते .

पण जेव्हा एखाद्याविषयी किंवा घटनेविषयी राग ,तिरस्कार निर्माण होवू शकतो ,तेव्हा  तशा आठवणीत न गुंतता पटकन दुसरे काम हाती घ्यावे नाही तर  तो  ही दिवस आपला रहात नाही .कटू आठवणीपासून दूर राहावे .कटू आठवणीतून द्वेष ,तिरस्कार जास्त वाढीला लागतो .कॉम्पुटर प्रमाणे तिथे ही पटकन डिलीट मारून पुढे जावे .
सुखाच्या ,आनंदाच्या ,चांगल्या क्षणांच्या आठवणीच्या झुल्यावर बसून फिरून यावे , मन उत्साहाने कामाला सुरुवात करते, आपल्याबरोबर इतरांचे ही जीवन आनंदमय होते ....



अर्चना ...10 /10/2012 .

Monday, 1 October 2012

पाऊस

या कातरवेळी आला अवचित पाऊस
कडाडली वीज अन झाला तुझा भास !
आठवली ती भेट जेव्हा नव्हते कोणी आसपास
आज मात्र ,भिजली जरी गात्र तरी मन उदास !
अर्चना .
....


 ढगात साठलेला पाऊस गडगाडाटासह  बरसला
अन तप्त धरणीला शांत करून गेला
तुझ्या  आठवांचा पाऊस अलगदच डोळ्यावाटे झिरपला
अन मनासह शरीराला दाह देवून गेला !

अर्चना ....
.1-10 -2012

Friday, 28 September 2012

मन

मन आठवांचे माहेर
नाही उगी क्षणभर !
कधी मनी
आशेचा महासागर
आणि  कधी नयनी
लोटे अश्रूचा महापूर !
कळे ना मज
का होई सैरभैर  ?

अर्चना

29--09-2012

Tuesday, 25 September 2012

विरक्ती !

असे अचानक कधी तरी
रिक्त होतात मनाच्या खोल्या,
नि बंद  पडून राहतात कवाडे  ,
नको तो सूर्याचा प्रकाश
हवा वाटे जीवघेणा अंधार
पाउल नको टाकू  बाहेर,
की डोकवू नको  कुठे,

वाटे  पडून रहाव निपचित
आपल्याच  मनाच्या भावना निरखत !
नको कोणाच्या शब्द्खुणा
नको गर्दीच्या पाऊलखुणा

नको कसली हि आसक्ती
अशी च पोसावी विरक्ती !

अर्चना कुलकर्णी ,ठाणे

Friday, 14 September 2012

शब्द ---


शब्द ---

काही कठोर ,तर काही मृदू
काही खट्याळ ,तर काही प्रेमळ
कधी द्वअर्थी ,तर कधी निर्मळ
काही व्यक्त होतात
तर काही अव्यक्त च राहतात
कधी हृदयाला भिडतात
तर कधी हृदयाला घर पाडतात
कधी विषासारखे कडू
तर कधी मधासारखे गोड
चेहऱ्यावर जरी हास्य आणले
तरी मनात हे शब्द दाटले
बोलणार्याने बोललेले
ऐकणार्याने समजलेले
एकमेकात गुंतलेले 
नाते अंतरी ते जोडलेले !

अर्चना ....24/09/2012

Thursday, 13 September 2012

कोळी

कोणत्याही नात्यामध्ये गुंतायच नसतं,,
नात्याला आपण गुंफायच असतं..!!
होवून कोळी जाळ आपणच विणायचं असतं,,
कोळ्या सारखच  मात्र मुक्त फिरायचं असतं..!
असं कधीतरी वाचलं होतं
पण खरच का कोळी मुक्त राहू शकतो ?
जाळे विणता विणता तेच घर म्हणू लागतो !
अन मग अवचित तुटता ,तो हि रडत असतो !

अर्चना ...

Monday, 10 September 2012

मिलन

दिवस आहे बेभान पावसाचा
लाटा घेतसे  आसरा किनार्याचा
दिस जरी नाही आज पुनवेचा
तरी आहे आपल्या मिलनाचा !
अर्चना ....

Thursday, 30 August 2012

कढीपत्ता

फोडणीत मी प्रथम पडतो
ताटातून हि  पहिला  बाहेर पडतो
तरीही मी न डगमगतो
ताठ मानेने उभा राहतो
जेवणात सुगंध पसरवतो
सर्वांच्या मनात घर करून राहतो !
अर्चना ....

Tuesday, 7 August 2012

पुन्हा हवा शिवा जन्मायला

जनता  जनार्दन नसे झोपलेला 
तो कधी सुस्तावलेला
 कधी कर्जाच्या  ओझ्याने दबलेला !
आश्वासनाने भुललेला
उरलेला वेळ घालवायला
 हजारो  चानेल्स दिमतीला !
पुन्हा हवा शिवा जन्मायला
जागृत करण्या ह्या जनतेला !
आजच्या   जिजाऊत  विझलेली ज्वाला
म्हणे शिवाजी येवो  शेजारी जन्माला !
घराबाहेर जाता ती सांगे आपल्या चिमण्याला
दिसला कुठे गलबला ,किंवा कल्ला
न बोलता सरळ ये घराला
नाही तर तुज वर च होईल हल्ला !
असे  वाढवले जर बाळाला
तो हि लागेल घोटाल्यातले शून्य मोजायला !
अर्चना

आज च्या एका  स्टेटस वरून सुचले तसे .......


Saturday, 2 June 2012

शब्द

शब्द हे फुलांसारखे  असतात
म्हणून कसेही ओवायचे  नसतात!
शब्दांच्या ओळी होतांना,
शब्दांचे अर्थ कुस्कारायचे   नसतात!!
अर्चना

 

 

शस्त्राविना संहार शब्द करतात 

 

मनाला पूर्ण घायाळ करतात 

 

न दिसती खुणा तयाच्या  

 

मात्र ज्याने त्यानेच सांभाळायच्या  !

 
 

Sunday, 27 May 2012

घाव

जवळचे च कोणी जेव्हा निखार्यागत वागतात
 अश्रू देखील तेव्हा न ओघळणे पसंद करतात
अन हुंदके हि मूक होवून जातात
मनातले घाव मनातच राहतात !

अर्चना

Sunday, 20 May 2012

माता दिन

माता दिन म्हणुनी
लेकाचा फोन आला
विसरुनी मागचे सारे
आईला पाझर फुटला !
ऐकोनी शुभेच्छा सार्या
माता म्हणे त्याजला
तुला पाहोनी
बराच काळ लोटला !
शिकुनी घे तू
कॉम्पुटर चा मेळ सगळा
मग SKYPE  वरुनी
दाखवेन दुनिया सारी तुजला !
अरे पण एकदा
येवूनी जा बाळा
तव स्पर्शाकरिता
जीव हा आसुसला !
कामाचा हा सारा पसारा
त्यात नसे सुट्टीला थारा !
तिकीट धाडतोस का मजला ?
येवूनी भेटेन मी तुला !
पहातो मिळेल का विसा तुला
अन त्याने फोन ठेवला !
मग लेकीचा फोन वाजला
आई तुझ्या वर मी केली कविता
ऐक आधी ती आता
जागी सर्व श्रेष्ठ माझी माता
तिच्यावाचुनी जीवनात रिक्तता !
मातेस वाटे बहु धन्यता
कधी येतेस तू भेटायला ?
आता नको
खूप असेल न गावी उन्हाळा ?
मग मी येवू का मुंबईला ?
अग पाणी नाही नळाला
अन नणंद हि
येत असे  माहेरपणाला
भेटू आपण दिवाळीला !
आवरोनी भावनेचा उमाळा
हास्य आणोनी डोळा
म्हणतसे सुखी रहा तू बाळा !

अर्चना ....

Sunday, 13 May 2012

आई

बाळ जन्माला येताच स्वतःचे अस्तित्व विसरणारी ती असते आई
केवळ मुलांकरिता सतत झटणारी ती असते आई
बालपणी आपण न बोलताच समजणारी ती असते आई
लहानपणी आपल्यामागे सावलीसारखी धावणारी ती असते आई
मित्र परिवारात जरी तिला विसरतो तरी ती असते आई
जीवनात कुठल्याही अडचणीत प्रथम जिची आठवण येते ती असते आई
जिच्या मांडीवर डोके ठेवल्यावर सर्व चिंता विसरायला लावते ती असते आई
स्वतः करिता काहीही न मागता देवाकडे फक्त मुलांकरिता मागते ती असते आई !
जिच्या मायेपेक्षा ,त्यागापेक्षा जगात काहीही श्रेष्ठ नाही अशी असते ती आई !....

अर्चना

नाती

जोडलेली  नाती निभावताना,
प्रश्न नसावा अभिमानाचा
नात्यातील विश्वास महत्वाचा…
तो विश्वास जपताना
हवे प्रेम अन आपुलकी .
करू नयेत कधी हेवे दावे
जावे विसरुन दोष अन्‌ रुसवे फ़ुगवे!
नात्याचे मग झाड बहरते
कधी त्यास मग पानगळ हि न छळते !
अर्चना




Thursday, 3 May 2012

मन

मनाला घालू नकोस फार आवर
फिरू दे त्याला हि चौफेर
 वाटेल कधी कोणाची ओढ अनावर
 मग  पळत सुटेल ते चौखूर !
ठेव विश्वास तुझ्या नजरेवर
होणार नाही मन कधी सैरभैर !

अर्चना ...



asech

चांगले मित्र म्हणता म्हणता
कधी पाठीत खंजीर खुपसतात
ते कळत नाही !
प्रत्येकाच्या आयुष्यात
"यु टू ब्रुटस " असे म्हणायचा
क्षण आल्याशिवाय रहात नाही !....
अर्चना

Wednesday, 2 May 2012

सांज वात

 सांज वात लावता
घर माझे उजळे
आनंदे कर जुळता
भय सारे दूर पळे !!
अर्चना कुलकर्णी

श्रीकृष्ण

श्रीकृष्ण बासरी वाजवतो
गोकुळ सारे गाजवतो !
बासरीचा सूर तो ऐकता
वासरे थांबती पाणी पिता!
थबके गोपी नृत्य करिता
जीवा शिवाची होई एकता ! 

जीवा-शिवाची ही भेट झाली
तगमग ती सर्व संपली
जन्म मृत्यू ची फेरी चुकली
मनी बिंबली एकच मुरली !
वृन्दावनीची निरव शांती
किती फिरावे ,परी न तृप्ती
आनंदाचे क्षण रेंगाळती
अजून हि त्या आनंद प्रांती !

8.12.2010

पाऊस

पावसाच्या प्रत्येक सरीमध्ये
मला तुझी छबी दिसते
अन पावसात भिजण्याची
मनी उर्मी दाटते ....




पाऊस जरी थांबलेला
श्वास माझा रोखलेला
पापण्या तुझ्या मिटलेल्या
अन स्पर्श तुझा भासातला
आज मात्र हळुवारलेला !









आठवणी पावसाच्या
कधी ना सरायच्या
मनमुराद भिजायच्या
मन प्रसन्न करायच्या


अर्चना ...2/5/2012

Tuesday, 1 May 2012

प्रिय सखीस ,

 अग, तुझं माझं नात
धरणी पावसागत !
वाट पहाते धरणी पावसाची
मी वाट पहाते तुझ्या बोलण्याची
धरणी शोधे पावसाला
काळ्या काळ्या ढगात
मी शोधते तुला fb  च्या जंगलात
बोलून शब्द चार
तू झालीस पसार
मी मात्र अजून
 करते आहे तुझा च विचार

बाबा

आई चे प्रेम बालपणी च उमजते ,
वडिलांची माया कळायला थोडे मोठे व्हावे लागत,

बाबांची आवड आपल्याला कधी कळत च नाही
आपल्या गरजा पुरवताना ते हि विसरून जातात
आता विचारावे  वाटते माझ्या करिता तुम्ही किती आवडी सोडल्या ?
माझ्या हौशेखातर कधी नाही म्हटले नाही सहलीला
स्वतः मात्र जात राहिले बस ने ऑफिस ला

चांगले हवे घर राहायला म्हणून घेतला flat  छान
हफ्ते फेडताना मात्र निघाला तुमचा घाम
जाणवले नाही कधी तेव्हा ,
जाणवते ते आज जेव्हा
श्वास घ्यायला सुद्धा दिवस नाही पुरा
कधी भेटाव म्हटले तर
आज नाही जमत ,उद्या नाही जमत

फोन वर बोलून तुम्ही समाधान मानायचे
माझे मात्र मन मला खात राहायचं ...!
बाबा आज चा दिवस मात्र आहे खास तुमचा !
 तुमच्या जुन्या आठवणी चा !

15/6/2011

संसार

अचानक जमल्या मैत्रिणी चार
सर्वांनी मांडले आपले विचार
त्यातून निघाले एक च सार
असा असतो हा संसार
स्त्री चरित्रावर विखार
पुरुषास मात्र मोकळे दार
पुरुष करे व्यभिचार
तरी सारे घेती कैवार
स्त्रीस मात्र बोलण्याचा हि न अधिकार
तिज असे मूक हुंदक्यांचा आधार
चूक नसताना हि स्त्री ने घ्यावी माघार
 तर च  चालतो दोघांचा संसार !!

3/7/2011

मैत्री -सख्यांशी

या सख्यानो या करिता माझ्या मनातले काही ,
जन्मले तेव्हाच , नात्याचे जाळे तयार होते ,
तरीहि जगताना , खऱ्या मैत्रीच्या शोधात होते ,

मैत्री" , शब्द उच्चारताच, आपलेपणाची जाणीव होते,
मनही मग दुख, पेलला हसत-हसत तयार होते,

गरज नसते दाखल्याची , जेथे असतो फक्त विश्वास ,
मैत्रीच्या या नात्याची , बात च असते काही खास ,

इतर नात्यापेक्षा, हे नाते काहीतरी वेगळे असते,
न बोलता मनातील वेदना एकमेकांना कळत असते ,
नेहमी चांगल्या विचारांची , जाणीव मैत्री करून देते ,
आपल्या अबोल्याचा , ती अर्थ समजून जाते ,

दुखाच्या क्षणी, ती धीर देत असते ,
तर सुखामध्ये, आनंद द्विगुणीत करत असते ,

नशीबवान आहे मी , मला खऱ्या मैत्रीचा सहवास लाभला ,
आणि ....खर्या मैत्रीचा शोध माझा fb var  संपला .

सौ.अर्चना कुलकर्णी .
22/06/2011 

मुक्ताफळे

सामान्यांचा जीव जाणार,
राजकारणी त्यातून खेळ खेळणार
भाषणांच्या फैरी झाडणार
२-५ लाखाची मदत करणार
त्याला मिडिया मलम म्हणणार
आपण सारे हा तमाशा बघणार !
 अर्चना १५/७/२०११
 सतत वाटत राहते
तुझ्या भेटीची हुरहूर
मनात मात्र..
तुझ्याच आठवणींचे काहूर..

 अर्चना १५/७/२०११

फेस बुक

फेस बुक

आज काल फेस बुक वर झाले ग्रुप्स भारी ,
जो तो उठून नवी गुढी उभारी,
प्रत्येक ग्रुप चा विषय च न्यारा
मुंबई,पुणे ,नासिक अशी शहरे झाली बारा,
मैत्री वरून निघाले ग्रुप्स सारे अठरा
सर्वत्र  तीच पोस्ट ,तरी प्रत्येकाला आपला ग्रुप प्यारा ,
ग्रुप आपला ठरावा सरस
अशी असते एकमेकात छोटी सी चुरस 
आपण व्हावे सर्वात FAMOUS ,
त्याकरिता कोणी कोणाचे करत नाही JEALOUS

कुठे चालतो मनाचा खेळ
तर कुठे जातो नुसताच वेळ
छोट्या -मोठ्यांचा जमतो चांगला मेळ
आणि मग खायला मिळते सुंदर शी भेळ

कधी कोणी म्हटले करा जरा विषयाला धरून पोस्ट
कि झाले च सार्यांचे हुप्प
म्हणे तुम्हाला कळत नाही आमचे कष्ट
मग admin  लाच  सारे म्हणती तुम्ही राहा जरा गप्प.
जुनी च कविता कोणी टाके ५० ठिकाणी
तर कोणी भिंतीवरच गप्पा मारी
सारख्या सारख्या notiifications  जीव होतो हैराण
पण न राहावे ग्रुप मध्ये तर जीवन होते वैराण 
एक मात्र नक्की आहे
सर्वांचा उद्देश एक च आहे
मैत्री वाढवू या ,
मैत्री चे नाते सांभाळूया !

Archana ...(Dec 2011 )

Saturday, 28 April 2012

बालपण

आज हि आठवते आहे
ते निरागस बालपण !
बालवाडीत खाल्लेला
केक चा सांडलेला कण !
ते अल्लड बालपण अन
शाळेत साजरे केले मराठी सण !
ते खट्याळ क्षण जेव्हा
दुसर्याच्या डब्यातील
पाहून खाऊ छान
सुटायचे आपले भान !

अर्चना ....१९/१२/२०११

मैत्री

मैत्री म्हणजे नेमके काय ? प्रत्येकाचे मत वेगळे असेल , माझ्या मते आधी ओळख ,मग विश्वास .... आपल्या चांगल्या -वाईट प्रसंगाला समजून घेईल असा , स्वतः चे आनंद-दुख आपल्याला सांगेल असा ..... असा विश्वास असला कि मैत्री झाली ...मग नेहमी हाय ,हेल्लो म्हणायची पण गरज लागत नाही .मित्र/मैत्रीण फार काळ आपल्याशी बोलले नाहीत म्हणजे मैत्री संपते का ? तर तसे नंसते खर्या मैत्रीत समजुतदारपणा असतो , जर कधी एकाचे चुकले ...तर दुसर्याने समजून सांगण्याचा अधिकार असतो ,आणि दुसर्याने ते समजून घेण्याचा भाग असतो ...इथे माफी किंवा धन्यवाद अशा वरवरच्या शब्दांना थारा नसतो...मैत्रीमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात ,पण ते इतर ठिकाणी गोस्सीप चे विषय म्हणून बोलले जावू नये हि सामान्य अपेक्षा असते.. मैत्री करताना मी विचारपूर्वक करत नाही , पण मैत्री तोडताना कोणी हि गैरसमजातून तुटू नये हि अपेक्षा आहे... आपल्याला काय वाटते ? 
 अर्चना २०/२/२०१२


 

स्त्री अस्मिता

नारी ही सृष्टीची माता !
असे हि प्रेमळ सरिता
तिजठायी अखंड सहनशीलता
अन कार्यकुशलता
कधी बने ती रंजिता
तर कधी परिणीता
जपे सदा स्व अस्मिता
भाव मनी तो सदैव समर्पिता !


 अर्चना - ७/३/२०१२

रुजावी तिथे प्रीती , मग होते प्रगती

 काल अर्चना मला म्हणली कि जेथे राघव तिथे सीता  या विषयावर काही लिहायचे आहे . मी हसून तिला म्हटले कि तुझे रामाबद्दल चे विचार मला माहित आहेत , म्हणून तू राम बद्दल न लिहिता या युगातील आधुनिक सीतेबद्दल च लिही न ! त्यावर ती चटकन म्हणाली संग मग तू च नंदा बद्दल .
तर आता माझी कथा !  नमस्कार , मी राजेश लोखंडे , शासकीय सेवेत मी उच्च लिपिक या पदावर कार्यरत  आहे .माझी पत्नी नंदा . आमचे लग्न झाले तेव्हा ती बारावी (कला ) प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली होती. मी जुनी अकरावी पास . मी शासकीय सेवेत शिपाई म्हणून काम करत होतो. लग्नानंतर थोडे च दिवसात त्या कार्यालयात लिपिक पदाकरिता परीक्षा होती . मी ती द्यावी का न द्यावी अशा विचारात होतो . तेव्हा नंदा म्हणाली तुम्ही ती परीक्षा द्या ,आपण दोघे मिळून अभ्यस करू या . आन इघारातले सर्व आवरून ती माझ्या कडून अभ्यास करवून घ्यायला लागली. घरी माझे आई -वडील सर्व तिला नावे ठेवत , कि असे काय नवर्याच्या मागे लागते अभ्यास करा अभ्यास करा . पण तिने कधी पर्वा केली नाही . गणित मला फार अवघड जाई , ते तिने मला शिकवले . वयाच्या २२ व्या वर्षी माझ्या कडून पाढे पाठ करून घेतले . आमच्या प्रयत्नाला यश आले, मी लिपिक म्हणून काम करू लागलो. तेव्हा च मला जाणवले कि नंदा खूप हुशार आहे ,आपण तिला पुढे शिक म्हणावं , आणि तिचे B .A . करिता नाव घातले . माझ्या आई -वडिलांनी आमचे घर सोडले , आमचे नाव सोडले , जातीत मानसिक  त्रास द्यायला सुरुवात झाली . पण नंदा व मी झुकलो नाही. मला ऑफिस मधील सहकाऱ्याची साथ होती . प्रत्येक जण माझे विचार ऐकून कौतुक करत असे , आणि भावनिक पाठींबा म्हणजे काय ते जाणवत असे. नंदा B .A . झाली .
त्याच दरम्यान आम्हाला मुलगी हि झाली , तिचे थाटात बारसे केले . घरचे कोणी हि फिरकले देखील नाही. नंदाच्या आई ने सर्व नीट पणे सांभाळले नंदा आणि सायली ला . मग नंदा ने नोकरी करिता अर्ज सुरु केले . तिला कारकुनी कामात आवड नव्हती हे मला कळत होते , पण नियमित पगाराकरिता तशी च नोकरी चांगली असे ती म्हणत होती .मग मी तिला सांगितले कि तू शाळेत अर्ज कर ,तिथे नोकरी मिळाली तर दोन्ही गोष्टी साध्य होतील . तुझी आवड आणि नियमित उत्तपन .
नंदाची परीक्षा होती तेव्हा महिनाभर मी सुट्टी घेतली , आणि घरातली सारी कामे मी करायला लागलो. तिने फक्त तिचा अभ्यास करावा .
वर्षभराने सुश्रुत चा आगमन झाले . गार्गी आणि सुश्रुत ह्या दोघांना सांभाळून शाळेत नोकरी करणे कठीण होते. म्हणून तिने B .ED . यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून करायचे ठरवले . मी हि पाठींबा दिला ,जिद्दीने तिने घर - मुले सांभाळून अभ्यास केला . शेवटचे महिनाभर शाळेत जावून शिकवणे गरजेचे होते तेव्हा नंदाच्या आईनी मुलांची जबाबदारी घेतली . आणि आश्चर्य म्हणजे ती B .ED . प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली . मग तिला मुंबई MUNICIPAL  शाळेत नोकरी मिळाली. मुलांना पालान्घाराची सोय केली . घराचे सर्व नंदा बघत असे , मला कधी कामाला हात लावू देत नसे . दिवस चांगले जात होते ,मग नंदा च मागे लागली ,किती दिवस भाड्याच्या खोलीत राहायचे ? आपण एक ब्लोक्क घेवू  या , मी कर्ज घेतले आणि १ BHK  ब्लोक घेतला . तिने M .A . केले .मुलांच्या शिक्षणाकडे कटाक्षाने लक्ष दिले .

जेथे प्रीती -तेथे  प्रगती

काल विशाखाने विषय दिला ,जेथे राघव तिथे सीता ! ह्या विषयावर काय लिहायचे , मग आठवले राजेश बद्दल .... आणि आता राजेश सांगेल त्याची कथा .
तर आता माझी कथा !  नमस्कार , मी राजेश लोखंडे , शासकीय सेवेत मी उच्च लिपिक या पदावर कार्यरत  आहे .माझी पत्नी नंदा . आमचे लग्न झाले तेव्हा ती बारावी (कला ) प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली होती. मी जुनी अकरावी पास . मी शासकीय सेवेत शिपाई म्हणून काम करत होतो. लग्नानंतर थोडे च दिवसात त्या कार्यालयात लिपिक पदाकरिता परीक्षा होती . मी ती द्यावी का न द्यावी अशा विचारात होतो . तेव्हा नंदा म्हणाली तुम्ही ती परीक्षा द्या ,आपण दोघे मिळून अभ्यस करू या .आणि  घरातले  सर्व आवरून ती माझ्या कडून अभ्यास करवून घ्यायला लागली. घरी माझे आई -वडील सर्व तिला नावे ठेवत , कि असे काय नवर्याच्या मागे लागते अभ्यास करा अभ्यास करा . पण तिने कधी पर्वा केली नाही . गणित मला फार अवघड जाई , ते तिने मला शिकवले . वयाच्या २२ व्या वर्षी माझ्या कडून पाढे पाठ करून घेतले . आमच्या प्रयत्नाला यश आले, मी लिपिक म्हणून काम करू लागलो. तेव्हा च मला जाणवले कि नंदा खूप हुशार आहे ,आपण तिला पुढे शिक म्हणावं , आणि तिचे B .A . करिता नाव घातले . माझ्या आई -वडिलांनी आमचे घर सोडले , आमचे नाव सोडले , जातीत मानसिक  त्रास द्यायला सुरुवात झाली . पण नंदा व मी झुकलो नाही. मला ऑफिस मधील सहकाऱ्याची साथ होती . प्रत्येक जण माझे विचार ऐकून कौतुक करत असे , आणि भावनिक पाठींबा म्हणजे काय ते जाणवत असे.
नंदाची परीक्षा होती तेव्हा महिनाभर मी सुट्टी घेतली , आणि घरातली सारी कामे मी करायला लागलो. तिने फक्त तिचा अभ्यास करावा .नंदा B .A . झाली .

त्याच दरम्यान आम्हाला मुलगी हि झाली , तिचे थाटात बारसे केले . घरचे कोणी हि फिरकले देखील नाही . मग नंदा ने नोकरी करिता अर्ज सुरु केले . तिला कारकुनी कामात आवड नव्हती हे मला कळत होते , पण नियमित पगाराकरिता तशी च नोकरी चांगली असे ती म्हणत होती .मग मी तिला सांगितले कि तू शाळेत अर्ज कर ,तिथे नोकरी मिळाली तर दोन्ही गोष्टी साध्य होतील . तुझी आवड आणि नियमित उत्पन्न .वर्षभराने सुश्रुत चा आगमन झाले . सायली  आणि सुश्रुत ह्या दोघांना सांभाळून शाळेत नोकरी करणे कठीण होते. म्हणून तिने B .ED . यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून करायचे ठरवले . मी हि पाठींबा दिला ,जिद्दीने तिने घर - मुले सांभाळून अभ्यास केला . शेवटचे महिनाभर शाळेत जावून शिकवणे गरजेचे होते तेव्हा नंदाच्या आईनी मुलांची जबाबदारी घेतली . आणि आश्चर्य म्हणजे ती B .ED . प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली . मग तिला मुंबई MUNICIPAL  शाळेत नोकरी मिळाली. मुलांना पाळणा घराची  सोय केली . घराचे सर्व नंदा बघत असे , मला कधी कामाला हात लावू देत नसे . दिवस चांगले जात होते ,मग नंदा च मागे लागली ,किती दिवस भाड्याच्या खोलीत राहायचे ? आपण एक ब्लोक्क घेवू  या , मी कर्ज घेतले आणि १ BHK  ब्लोक घेतला . तिने M .A . केले .मुलांच्या शिक्षणाकडे कटाक्षाने लक्ष दिले .आज मुलगी शिकून रुईया महाविद्यालयात प्रोफेसर आहे. मुलगा इंजिनीरिंग करत आहे .नंदा मुख्याध्यापक झाली आहे.  माझे आई- वडील  परत आले. त्यांचे हि ती मन लावून करते . शिक्षणाने प्रगती होते हे त्यांना हि आता पटले आहे.
.... भले राजेश कोणी मोठा सत्कारा इतका नसेल पण सामान्य जीवन जगताना देखील यशस्वी सहजीवन कसे असावे हे ह्यामधून दिसून येते , म्हणून मी म्हणेन कि जेथे राघव तिथे सीता न म्हणता ....
.नकोत नुसती नाती ,
मोडून काढू भिंती ,
  रुजावी तिथे प्रीती ,

 मग होते प्रगती .

अर्चना कुलकर्णी ..ठाणे-- March 2012

मन



मनास  पडले मनाचेच  कोडे
न माहित कधी ते उलगडे ?
कधी ते स्वप्नात बागडे
वेचीते  कधी सत्याचे तुकडे !

आठवे कधी बोलणे रांगडे

बोले कधी बोल चिमखडे !

कधी जाणवता  उन उघडे

पांघरी ते विश्वासाचे कातडे

मनास पडले मनाचेच कोडे !


Archana - 14//02/2012 




रितेपणा

प्रौढ वयाची ती ललना
पांघरी चेहऱ्यावर बालिशपणा
करत असे सर्वांशी लडिवाळपणा
लपवण्या आपला एकटेपणा
कोणी म्हणतसे चवचालपणा
कोणा  मनी दाटे करूणा
कुणी दाखवी आपलेपणा
तरी ना भरे तिचा रितेपणा !


अर्चना ...

Sunday, 15 April 2012

मैत्री

मैत्री असावी मैत्रीसारखी नकोत नुसती नाती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच काही भीती
तिथे सूर जुळता उमटतील आपोआप गाणी
गाण्यातून अर्थ कळावा,मौनातून गाणी
पैश्याचा तिथे उच्चार नसावा ,नसावा कसला मान
लहान मोठे असे नसावे सर्व आहोत समान
आहोत आपण मैत्रिणी याचे ठेवू या भान
गप्पा मारताना मात्र नसावे वेळेचे भान !

(मूळ कविता घर असावे घरासारखे यावरून सुचलेली )
Archana Kulkarni.

घर आहे तेच असते

घर आहे तेच असते ,
शिशुपणी आपल्या स्मित हास्यात डोलू लागते !
बालपणी उभे राहण्याकरिता आधार देवू लागते
तरुणपणी आपल्या सुखात ते हि हसू लागते
प्रौढपणी आपली काळजी घेवू लागते
वार्धक्याकडे झुकताच आपल्याला टाळू लागते
अन नंतर नंतर आपल्या प्रस्थानाची वाट बघू लागते
घर आहे तेच असते ,फक्त भाषा बदलत राहते !

अर्चना

चिमणी

 एकटीच चिमणी करत होती चिव चिव
कळले न कोणा त्यातले अर्थपूर्ण मन
भयाण आणि भकास झाले सारे रान
कशाकरिता करायची ही सारी वणवण
सहन होत नाही तिला ही ताण
ज्याची कोणालाच नाही  जाण !
  • अर्चना ....

Thursday, 12 April 2012

स्पर्धा ....

आमच्या वसाहतीत काल संध्याकाळ चा सुदृढ बालक स्पर्धा (वयोगट १ ते ३ वर्षे ) आयोजित केली होती . मी नेहमीप्रमाणे भाजी घ्यायला खाली उतरले तर सगळी छोटी मुले आई सोबत उभी ....त्यांची तेव्हा धावण्याची स्पर्धा सुरु होत होती .. ८-१० बालके धावण्याकरिता उभी त्यांच्या मागे आई (आया ) असे धाव, तिकडे  पोच ,पहिला तू च आला पाहिजेस ... आता मुलांचे वय दीड ते अडीच असावे पण प्रत्येक आई हेच सांगत  होती ,बाळांना किती समजत होते माहित नाही .
शिट्टी वाजली मग आई तर काय एकदम ओरडायला च सुरुवात अरे राजू धाव अग राणी नीट पळ, आणि बाजूने त्याही धावू लागल्या .....


एका बाजूने बाबा ज कॅमेरे घेवून धावत आहेत ......
आहा आणि  आमचा बाळू बसला कि धपकन खालीच ... मग आई चा वैताग... अरे पळ न! .... नाही........ मी नाही ....आणि भोकाड सुरु!
...राणी ने सुरुवात तर चांगली केली ,पण बाजू ने आई पण धावते पाहिल्यावर आली  धावत आई कडे  , आता झाली न पंचाईत !
सगळे पळत आहेत हे पाहून सनी ने केली सुरुवात दुडूदुडू रांगायला च .....
तिथे राजू ,मनी ,सोनी,पिंकी  धावत होते , आणि एकदाचा  राजू पोचला पहिल्या नंबर वर ..... आणि गप्पकन आई च्या हातातील केक खाल्ला...... मग सगळ्यांना समजले कि राजू इतके भरभर कसा धावला? त्याचे बाबा एका बाजूला उभे होते आणि आई दुसर्या बाजूला हातात केक घेवून उभी !


झाले चिडलीच कि मग पिंकीची  आई ...तुम्ही चीटिंग  केलीत मिसेस .......... ! असे नाही करायचे ....दोघींचे जुंपले ...
माझ्या मागून बाळू चे आई -बाबा येत होते.... बाळू ची आई बाबांवर चिडली होती ..आहे न अगदी तुमच्यासारखा ...जरा जागचा हलला नाही...गेले न बक्षीस ?
राणीच्या आई ने तर राणीच्या पाठीत च धपाटाच  घातला .... एरवी मी हाक मारते तर तू पी.टी.उषापेक्षा जास्ती जोराने दुसरीकडे पळतेस आणि आज काय झाले ?


आमच्या घरचे त्यात कोणी नव्हते म्हणून मी थांबले नाही ...


पण माझ्या मनात काही प्रश्न आले ,तुम्हाला पण काय वाटते ते सांगा ..१. सुदृढ बालक स्पर्धेत पळण्याची शर्यत का आली ?


२. सुदृढ बालक ठीक आहे पण पालकांची मने सुदृढ आहेत का ?


३. आयुष्यातल्या पहिल्या -वहिल्या स्पर्धेत हरल्यानंतर आई च्या हात चा धपाटा खाल्लेली राणी स्पर्धा हि स्पर्धा असते त्यात हार-जीत आहे च असा विकॅह्र करू शकेल  का ?


४. ह्या स्पर्धेत मुलाचा नंबर आला नाही म्हणून पालकांनी (विशेष तः आई ने ) आपला पराजय असे मानणे योग्य आहे का ?




मुलांना मुल म्हणून जगू न देणे अगदी दीड वर्षापसून  योग्य आहे का ?.......


महिला दिन

आला महिला दिन आला
स्त्रियांचा सत्कार केला
अबला नसे हि सबला
असा केला गलबला
परत त्याच गप्पा झडल्या
स्त्रीभ्रूण हत्या विषय चघळला
कित्येक गर्भारशी विझून गेल्या
हुंडा बळी किती गेल्या ?
कित्येक गेल्या उगाच छेडल्या
दुख त्यांचे त्याच गिळल्या
विसरून सारे दिला
नवचैतन्याचा नारा !



ती आणि तो

तिच्या त्याच्या आवडी कधी च जुळत नाहीत
हातात हात घालून फिरायला त्याला आवडत नाही
रस्त्याने चालताना भरभर चालणे तिला जमत नाही
हॉटेलातले पंजाबी जेवण त्याला आवडत नाही
अन तिथे जावून भाजी-भाकरी खाणे  तिला रुचत नाही
मित्र मैत्रीणीना गोळा करणे त्याच्या स्वभावातच नाही
मित्र मैत्रीणीना न भेटता तिला राहवत नाही
नाटक पाहताना मागची सीट त्याला चालत नाही
नाटक पाहताना सीटवरून कटकट तिला टाळता येत नाही
 तिला स्वच्छता साफसफाई केल्याशिवाय राहवत नाही
घरभर पसारा केल्याखेरीज त्याला चैन पडत नाही
खरेदीला निघाल्यावर दहा दुकाने फिरणे त्याला खपत नाही
एकाच दुकानातून  ते ही पटपट खरेदी तिला जमत नाही
तिची होणारी घुसमट त्याला कळत नाही
त्याचे होणारे हाल- दगदग  तिला समजत नाही
असे वेगवेगळे स्वभाव बनवाल्याखेरीज निर्मात्याला चैन पडत नाही
आणि विरुद्ध स्वभाव एकत्र आणल्याशिवाय त्याला  मजा वाटत नाही
तरी संसार हा दोघांचा आहे तो निभावल्या शिवाय ते रहात नाहीत
आणि सुखी संसाराचे चित्र दाखवायला विसरत नाहीत .....!
अर्चना ....

Monday, 19 March 2012

असच...

निराळे  कार्य प्रत्येकाप्रती
 आगळे  रूप  प्रत्येकाप्रती
वेलीवरती कलिंगडे येती
उंच वडाकडे फळे न धरिती
गुलाब ,मोगरा  फुले च नुसती
त्यांच्या फळाकडे कोणी न पाहती
पानवेलीची  पानाकरिता कीर्ती
आंब्याची  फळाकरिता महती
जसे ठरवते नियती
त्यात च ते सुख मानती !


अर्चना

Monday, 12 March 2012

प्राजक्त


प्राक्तन प्राजक्ताचे

कोणा न कळले

उमलताच ते

मातेने झिडकारले

धरेने सावरले

रमणी ने वेचिले

परी कधी न माळिले

हरी चरणी अर्पिले

असुनी सुवास हि

कोणी त्यास न पुसिले

त्याचे दुख्ख फक्त

त्यानेच साहिले ...!

अर्चना



------------------------------------------------------------------------ 


पारिजातक मला नेहमीच भावतो
जो स्वतः करिता फुलतो
आसमंताला  सुगंधित करतो
अन मनी फक्त हरीचरणाची आस धरतो !


अर्चना ....


Friday, 9 March 2012

सखे...

सखे ,
मुलगी झाली म्हणून
आणू नको डोळ्या पाणी
शिकून सवरून
कर तिला शहाणी
सांग तिला समजावुनी ,
आहेस तू संजीवनी ,
संसाराची तू स्वामिनी
नको बनुस फक्त कामिनी ,
राहा सदैव तू मानिनी
अन्यायाविरोधात हो तू दुर्गाभवानी,
तुला सार्यांनी म्हटले पाहिजे
हीच आहे खरी सौदामिनी !
अर्चना .....
 ८ मार्च २०१२

Friday, 24 February 2012

प्रिय सखीस ,

आज ची संध्याकाळ कलंडत आली

अन सखे मला तुझी आठवण आली !
काही चूक नसताना ,तू मला सोडून गेलीस ,
कारण सांगायच्या हि फंदात पडली नाहीस ,
जाताना अशी काही जखम दिलीस
पहिल्या अपयशाची तू निशाणी झालीस !
आज हि फिरताना वेडे मन आशेने पाहते

नजर हि कायम तुलाच खिडकीत शोधते !
आठवेल कधी तरी तुला हि सारे काही
पण कदाचित तेव्हा वेळच मिळणार नाही !
अर्चना ........

आनंदवन -एक अविस्मरणीय दिवस !

मी परवा आनंदवन इथे जावून आले . तिथली भेट म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव ...
आपल्याकडे  सर्व  काही  आहे , तरी  आपण  फार  छोट्या  गोष्टीं करता  रडत  राहतो ,

कधी  बोलून  तर  कधी  मनात ..खंतावतो

पण  ज्या  लोकांना  काही  अपंगत्व  आहे , किंवा  रोग  झाला  आहे  म्हणून  घरचे  सुद्धा  विचारत  नाहीत  ..... त्या  लोकांनी  आज  एक  स्वयंपूर्ण  गाव  निर्माण  केला  आहे . केवळ महारोग झाला आहे म्हणून आपले नातेवाईक विचारत नाहीत , आणि मग इथे यावे लागते , . त्या मागे घेतलेले बाबा आमटे यांचे अपार श्रम आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडतात.
एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होवून बाबा आमटे त्यांच्या पत्नी साधना ताई , त्यांची  दोन्ही मुलगे - विकास आणि प्रकाश आणि आता नातवंडे सर्व परिवार केवळ धन्य आणि धन्य ...
आम्ही आनंदवन इथे सकाळी ७ ला पोचलो ,तेव्हा तिथे रस्ते झाडणे काम सुरु होते. प्रत्येक ठिकाणी मराठीत पाट्या लावलेल्या होत्या ,त्यामुळे कार्यालय शोधायला वेळ लागला नाही.

तिथे शिरतानाच जाणवत होते की आनंद वन मधील  स्वच्छता केवळ वरवरची वाटत नाही तर ती त्यांच्या अंगात पूर्णपणे भिनली आहे .

आनंद वनात फेरफटका मारायला सुरुवात केली,आमच्या बरोबर इथले कार्यकर्ते श्री .प्रभू स्वतः होते.
आमचे स्वागत करायला भाजी पाला ,फुले ,फळे सर्व काही हजर होते. कोबी,वांगी,मिरची,वाल,चवळी वेगवेगळी भाजी इथे लावली जाते ,जी इथे जेवणात वापरली जाते ,जास्तीची भाजी गावात नेवून विकली जाते.भाजी व फळांची लगडलेली  झाडे बघून जे समाधान मिळते ते बाजारातून भाजी खरेदी करताना कधी च मिळत नाही .

बाबा आणि साधना ताई यांच्या  समाधीचे  दर्शन घेतल्यावर जी भावना निर्माण झाली ती मी शब्दात सांगू शकत नाही.बाबांनी सांगितले होते कि माझे दहन न करता इथेच समाधी बांधावी ,त्यांच्या शेजारीच गेल्या वर्षी साधना ताईची समाधी बांधण्यात आली . पतीच्या कार्यात शेवटपर्यंत साथ देणारी स्त्री !
शेजारीच असलेली गुलाबाची बाग ...सर्व सुंदर ....
आनंदवन ,बनताना एका तून दुसरे असे करत करत बनत गेले ते गाव.
त्यानंतर आम्ही पहिली ती शाळा , आणि त्याच्या बाजूला असलेली निवासस्थाने .. मुलांकरिता व मुलींकरिता .
तिथून समोरच ज्यांचे आई -वडील आनंदवनात कामाकरिता जातात त्यांच्या छोट्या मुलांकरिता असलेले पाळणाघर , आणि इथली तान्ही ते तीन वर्षापर्यंत ची बाळे...

अंध ,अपंग मुलांची निवासी शाळा  पाहून मन थक्क झाले . सर्व गोष्टी एखाद्या सामान्य मुलांप्रमाणे करण्याची जिद्द दिसत होती .ग्रीटींग्स ,कलाकुसर, भिंतीवर लावण्याकरिता चित्रे  हे तर अतिशय कुशलतेने करत होते.त्यांनी त्यांच्यातल्या कमी असलेल्या गोष्टींवर मात केली होती .

तसेच ह्या मुलांचा एक ऑर्केस्ट्रा हि तयार केला आहे, खूप सुंदर आवाजात गाणारी मुले- मुली . व त्या तालावर नाचणाऱ्या मुली सर्व स्तिमित  करणारे होते.

१४ तळी ह्या आनंदवनात तयार केली आहेत , तिथून सर्व ठिकाणी पाणी पुरवले जाते आणि गम्मत म्हणजे संपूर्ण नागपुरात नसले  तरी त्या तळ्यात उन्हाळ्यात हि पाणी राहते....
११ वी व १२ वी करिता college  आहे. जिथे जवळच्या खेड्यातून ,गावातून मुले शिकायला येतात .कृषी -तंत्र महाविद्यालय आहे .
आता एक मोठे स्वयंपाक  घराचे काम सुरु आहे ,जिथे एका वेळेस २००० ते २५०० लोकांचे अन्न एकाच छत्राखाली शिजवले जाईल .

सुतार काम, हातमाग,चर्मकला सर्व विभागांना भेटी दिल्या .हातमागावर विणले जाणारे सतरंजीचे रंग मन मोहून घेत होते .प्लास्टिक पासून उशा ,गाद्या बनवण्याचा एक प्रकल्प हि इथे आहे .
ह्या  जागेसारख सौंदर्य नाही कुठे आणि हे सौंदर्य  निर्माण करणारे लोक ती आहेत ज्यांना समाजाने कुरूप, अछूत अशा अनेक संज्ञा बहाल केल्या होत्या त्यांच्याकडून .......

ह्या सर्व गोष्टींची माहिती देण्याकरिता आमच्या बरोबर प्रभू काका ३४ वर्षापूर्वी कोकणातून इथे बाबांचे कार्य बघायला आले आणि ते इतके प्रभावित झाले कि घरी जावून सांगितले कि मी आता तिथे च राहणार आहे ,व आज ३४ वर्षे ते इथले कार्यकर्ते आहेत . असे अनेक कार्यकर्ते तिथे आहेत , केवळ सामाजिक भावनेतून प्रेरित होवून आपले वेगळे आयुष्य जगात आहेत.
नंतर विकास भाऊ आणि कौस्तुभ या दोघांनी सर्वांशी मनमोकळ्या गप्पा केल्या .प्रकाश आमटे ,साधना ताई यांची काही पुस्तके विकत घेतली , काही कलाकुसरीच्या वस्तू घेतल्या आणि आमचा दिवस संपला .
आयुष्यातला तो एक दिवस मला तर तो दिवस कायम स्मरणात राहील...

26-1-2012