मला वाटतं, माझी जी पिढी आहे, त्या पिढी मधील स्त्रिया माजघरातून अंगणात येत आहेत. त्यांच्या नजरेत अजून तुळशवृंदावन आहे. हिरवं गार सारवण आणि रांगोळी चे टिपके आहेत.
पुरुषांना खरे तर अशी च स्त्री मनातून भावत असते. 👍
साधी ही असावी पण बुद्धिमान ही असावी आणि मग माजघरात ही असावी..
आणि त्याच्या वर जिवापाड प्रेम असेल तर तिला हे मान्य पण असतं..
सगळी हुशारी बासनात बांधून ती माजघरात च असते..
तशी च शोभते...
असा विचार करणाऱ्या पुरुषांना विचारावे वाटते..
जेव्हा तुम्ही कोणी च नव्हता त.. तेव्हा ती तुमच्या जीवनात आली. आता तुम्ही ' कुणीतरी ' आहात तेव्हा त्या ' कुणीतरी ' होण्यात ले निम्मे श्रेय तिचं आहे.
तुम्ही 'काही' करत असता तेव्हा ती ' आई ' झालेली असते.
तिला माजघरात च स्थान असतं.. कालांतराने तिने ते हसत हसत स्वीकारले तर ठीक... मग च तिचा उदो उदो होतो..मात्र ते तिने नाकारले तर दाह होतो. ..
आणि मग तो सरळ सरळ मोकळा होतो..
त्याच्या साठी अनेक वाटा असतात..
तिच्या साठी असणारी खुणावणारी वाट मात्र चारित्र्य हनन करणारी ठरते.
जेव्हा बुद्धीचं बळ घेऊन च ती वाट काढते ती स्वतःसाठी कृतज्ञ असते.
पण कुठली ही त्रास देणारी गोष्ट.... वाघ च आहे म्हणून बघितली तर वाघ च वाटतो..👍
आपले आयुष्य आपल्याला च सोपे करता येत असते.
हे खूप उशिरा समजले तर मात्र भयाण पोकळी शिवाय समोर काही च नसतं.....!!