स्त्री शक्ती
कशास हवा तो जागर स्त्रीशक्तीचा
जन्मण्यापूर्वीच केला जातो विचार हत्येचा
बालपणाचे नसती चार दिवस सुखाचे
जिथे जावे तिथे पुरुषी विखार वासनेचे
शाळा, कॉलेज, नका म्हणू नवरात्री होळीतही अत्याचार
शिकारी होतो नामनिराळा तिचाच मात्र सर्वत्र उद्धार
कोणास मिळती समान अधिकार,
अधिकांश मात्र पिता, पती, पुत्र हे च सूत्रधार !
अश्रू झाकून पापण्याखाली देते साऱ्यांना आधार
तेव्हा ही म्हटले जाते सोडले की हिने घरदार !
नकोत सत्कार, नको पुरस्कार नकोत जाता येता नमस्कार !!
येतात कानी असंख्य निर्भयाचे चित्कार
स्त्री एकीचा दाखवू चमत्कार
अपराध्याला त्वरित शासन हाच करू या निर्धार !
अर्चना
7/3/2020

No comments:
Post a Comment