Saturday, 3 December 2011

चारोळी

 चारोळी 😄

चार रेघा ओढून होते का रांगोळी तयार? 

त्यासाठी ही जुळावा लागतो आकार 

चार शब्द जुळवून चारोळी होते का तयार? 

त्यासाठी लागतो भावनेचा अविष्कार 

शोधू नका ह्यात काव्य प्रकार 

जाणुनी घ्या माझा हा मुक्तसंचार 

अर्चना 

3/12/2011


तुझ्यासाठीच जगता जगता

  जगणे माझे राहुन गेले..

मी तुझ्यातच माझे सारे 

  विश्व पाहिले ....

तु मात्र मला कधीच 

 समजून नाही घेतले!

8/12/2011

Wednesday, 12 January 2011

अशी ही मैत्री

 अग तुझं माझं नातं 

धरणी पावसागत 

वाट पाहे धारणी पावसाची 

मी वाट पाहे तुझ्या बोलण्याची 

धरणी शोधे पावसाला 

त्या काळ्या ढगात 

मी शोधते fb च्या पानात 

बोलून शब्द चार तू झालीस पसार 

मी मात्र अजून करते आहे तुझाच विचार 

अर्चना कुलकर्णी 


12/01/2011