Friday, 25 August 2023

विश्वास

 विश्वास.....


अखेर तो दिवस उगवला, राजने नर्गिस ला चहाला बोलावले. खूप दिवस मनात चाललेल्या गोष्टी तिला सांगायच्या होत्या खूप काही बोलायचं होतं आणि शेवटी वळणाच्या वाटेवर असणाऱ्या चहाच्या दुकानात नेले, साधे दुकान तरी चहा अप्रतिम असतो अशी भलावण केली. नर्गिस तर बावरल्यासारखी वाटत होती. पूर्वीची उधारी दिल्याशिवाय चहा मिळणार नाही असे ऐकल्यावर राज गोंधळून गेला, पण आज दे मग मी उधारी देतो अशी गयावया करून चहा सांगितला . आज रोख दे, मागची उधारी नंतर असे म्हणत चहावाल्याने हो म्हटले. खिशात दोन आणे नसल्याने नर्गिसने दिले.चहा घेता घेता राजने आपली खरी परिस्थिती सांगितली. एकट्याच्या कमाईत

घर संसार कसे होणार? असे म्हणताच नर्गिसने एकाच्या नाही दोघांच्या कमाईत सर्व नीट होईल.

असे म्हणत खूप दिवस साठलेले मनातील प्रेम आज तिने त्याला सांगितले.. त्यानंतर शब्दांची गरज नव्हती..,.

तरीही राजचा विश्वास बसला नाही... ती म्हणाली खरंच राज मला तुझ्या सोबत आयुष्य घालवायचे आहे... एकमेकांच्या डोळ्यात जणू गुंतून गेली . आजन्म सोबत राहण्याचे विश्वासाने नाते जपण्याचे जणू एकमेकांना वचनही दिले.


अर्चना कुलकर्णी.


(राज कपूर व नर्गिस ह्यांच्या श्री 420 ह्यातील प्रसंगावर आधारित ललित )

Wednesday, 9 August 2023

पाणीपुरी

 आजकाल काय ऐकावे ते नवल . आज काय तर पाणीपुरी दिवस आहे म्हणे . असो . खाण्यासाठी जन्म आपुला . मला तर देवाने पृथ्वीवर विविध पदार्थांचा आस्वाद घ्यायलाच पाठवले आहे. भरपूर खा आणि मस्त रहा हेच आपल्या जीवनाचे ब्रीद वाक्य आहे. आज सर्दी खोकला झालाय खूप म्हणून विचारच करत होते की पाणीपुरी करू या.. मग काय रगडा तयार केला.. गोड पाणी, तिखट पाणी.... पुऱ्या केल्या.. हुश्श...

झाली एकदाची तयारी... फोटो तर काढावाच ना, शास्त्र असते ते....



Wednesday, 2 August 2023

जे वेड मजला लागले



 कल्पतरू जागतिक साहित्यिक मंच आयोजित उपक्रम...


जे वेड मजला लागले...


जे वेड मजला लागले

तुजलाही ते लागेल का?...

असे गुणगुणत श्री निघाला तर खरा.. पण प्रश्न होता हे शिवानीला विचारायचे कसे?

 शिवानी, सहा महिन्यापूर्वीच त्याच्या ऑफिसमध्ये जॉईन झालेली बंगाली मुलगी. दिसायला साधीशीच पण सालस, कामात अगदी हुशार, मितभाषी. पहाताक्षणी आवडली श्रीला. मराठी येत नाही म्हणून कमी बोलते का?की बोलायला आवडत नाही?एक ना अनेक प्रश्न श्री च्या मनात.

कामाच्या निमित्ताने हळूहळू ओळख होत होती.आवाज अगदी मधाळ, ऐकत रहावा असा श्रेया घोषाल सारखा.कामात तर अगदी हुशार. कधी कसली तक्रार नाही.

खूप फॅशन नसली तर आकर्षक पेहराव.दिवसागणिक तिच्याबद्दलची  प्रीती वाढत होती.पण तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नव्हता. काल मोठा धीर करून तिला कॉफीकरिता विचारले.

आज ती भेटणार,धडधड वाढतेय. पहिल्या भेटीतच आपल्या मनीचे गुपित सांगावे का?तिला रुचेल का? कोणत्या भाषेत सांगावे? तयार होऊन शीळ घालत श्री बाहेर पडला. 'जे वेड मजला लागले.'  फ्लोरिस्ट कडून लाल गुलाबाचे फूल घेऊन कॉफी हाऊस कडे निघाला. बहरलेल्या गुलमोहराच्या झाडाखाली शिवानी पाठमोरी उभी दिसली. पटकन पुढे जावून गुलाब तिच्या केसात माळला.. शब्द आपोआप आले, I love you.. शिवानीने लाजून होकार दर्शवला...


अर्चना कुलकर्णी..