दूर जाणारा रस्ता पाहून मन वेडावतं
दूर गेलेल्याच्या आठवाने भरून येत
पल्याड च्या गावी जावे असे वाटतं
पण मन मात्र इथेच घुटमळतं
अर्चना.
अंधाऱ्या वाटेवरून जाताना
प्रकाशाचा किरण दिसला
त्यांची चौकशी करताना
माझा मला आनंद गवसला.
2
रस्त्याच्यापल्याड असेल का एक गाव
जिथे नसेल जातीपाती चा दुजाभाव
नसेल कोणी तिथे रंक किंवा राव
रंग रूपाचा ही नसावा भेदभाव !
वाट
1
ही वाट मला तुझी
आठवण करून देते
माझे वेड मन मग
त्यातच रमून जाते
2
या वाटेवरच्या
तुझ्या आठवणी
वेड्या करतात
मला एकांताच्या क्षणी
3
माझी आठवण आली की
मागे वळून बघ एकदा
सांगायचे आहे मला मी
या वाटेवर वाट पाहिली कैकदा
4
वाटेवरून चालताना तुझ्यासोबत
वाट कधी संपली नाही कळले
अनोळखी होतीस तू मला
समजले नाही भाव मनीचे कधी जुळले
5
तू मी आणि ही
आठवणींची वाट
डोळ्यांत माझ्या
आसवांची हलकी लाट
6
पुन्हा एकदा आठवणींची
मैफिल मी सजवली
तुझी माझी या वाटेवरची
प्रीती जेव्हा मला होती आठवली
7
जमतंय की मला
तुझ्या सारखं जगणं
सोडून दिलंय या
वाटेवर वाट बघणं
8
या वाटेवर तुझ्या
आठवणींचा सुगंध दरवळतोय
तुझ्याशिवाय घेतलेल्या
एकेक श्वासाने मी विव्हळतोय
सोनेरी वस्त्रे लेवुनी
दिनकर आला गगनी
जागी झाली अवनी
नमन माझे क्षणोक्षणी !
🙏🏻🙏🏻
अरे मावळत्या दिनकरा
तुझ्या सोबतीने आज खेळतोय वारा
कुठे पडती भराभर गारा
आमच्याकडे मात्र विजेने केला पोबारा !
😃😃😃😃
*गाव*
नाही मला स्वतः चे गाव
स्वप्नातच पाहते मी एक गाव
ज्याला नसेल काही नाव
नदीकिनारी घर असावे छान !
------======-----
कधी कधी वाटते पुन्हा व्हावे लहान
नदीकाठी जाऊन घ्यावी गिरकी छान
गावाच्या निसर्गात विसरावे भान
सुर नाही लागला तरी घ्यावी तान !
---====-
असे गाव माझे स्वप्नातले
बालपणापासून सांभाळलेले
जिथे घर असले जरी मातीचे
पण अगत्य मात्र हवे प्रेमाचे
मैत्र बंध असावे आपुलकीचे
तिथे नाते जुळावे युगायुगाचे !
क्षमा
मागावी क्षमा खुल्या दिलाने
करावी क्षमा मोकळ्या मनाने
सहज शक्य होईल साधनेने
***
क्षमा
धर्म जात जरी असतील वेगळे,
क्षमेचे प्रकार देखील वेगवेगळे
मात्र सर्वात क्षमेचे महत्व आगळे !
****
क्षमा
क्षमाला पर्यायी शब्द सॉरी आला
सारा घोळ इथे च झाला
जाता येता सॉरी म्हणायला लागला
पण भाव मात्र नाहीसा झाला !
---------
गुलमोहर
देखोनि रवीची ती लाली
गुलमोहर ती हळूच लाजली
उतरला रक्तिमा तिच्या गाली
त्याच रंगीं फुलांनी सजली !
अर्चना.
विषय *गुलमोहर*
तळपत्या उन्हात फिरताना
कडेला तो दिसला डोलताना
उन्हाची तमा न बाळगताना
देत होता सावली पथिकाना
अर्चना कुलकर्णी.
अक्षय
अहो, अक्षय राहावे पाणी
म्हणून करतो त्याचे दान
राहावी अक्षय गोड वाणी
म्हणून झटवतो का प्राण?
*****
काव्यपुर्ती
वैशाख वणव्याला ती घाबरली
म्हणाली घरातच खेळते भातुकली
खाऊ ची जमवाजमव केली
भांडी जागेवर रचून झाली
अरे, बाहुली कुठे ती हरवली?
आई आली घेऊनि बाहुली
पाहुनी नटलेली सजलेली बाहुली
कळी खुलूनी ती खुदकन हसली.
अर्चना