Wednesday, 15 April 2020

कला

कला
कोणतीही कला असू दे, ती माणसाला माणूसपण देते.  प्रत्येक कला ही वेगवेगळी, काही कला शिकून आत्मसात करता येतात, पण त्याकरिता उपजत ओढ तरी असावी लागते असे मला वाटते.  गायन, नृत्य, अभिनय, चित्रकला, लेखन  ह्या तर खूप कठीण आहेत.  मला तशी कोणतीच कला येत नाही.  पण कलासक्त मी जरूर आहें.  कलेला दाद मिळाली की कला बहरते.  माझे वडील खूप छान लिहायचे, त्यांना प्रत्येकातली कला दिसत असे, समजत असे, आणि त्याचे कौतुक करण्याकधी  मागे पुढे पाहत नसतं. शाळेत असताना एकदा चित्रपट  चांगला नव्हता हे जेव्हा मी पटकन बोलले, तेव्हा मला नीट समजावून सांगितले.
ऐक, तुला काय आवडले नाही, विषय, अभिनय, चित्रण की गाणी?  प्रत्येक गोष्टीत कला आहें आणि त्यामागे अनेकांचे श्रम असतात.  त्यामुळे जे आवडले नाही त्यापेक्षा जे आवडले त्यावर लक्ष टाक.  खूप मोठा संदेश मला त्यातून मिळाला. 
स्वयंपाक ही सुद्धा एक कला आहें, हे आईकडून जाणवले.
परिस्थितीशी लढताना तिने कधी ही जेवणाची चव सोडली नाही.  करेल ते मन लावून करायची,  आहें त्या साधन सामुग्रीत उत्कृष्ट जेवण बनवणार, असे सगळे नावाजायचे .
कामवाल्या मावशीला ही आग्रहाने खाऊ घालणार.
मनातले असे च काही..  *कला * विषयी
अर्चना कुलकर्णी. 
15/04/2020

No comments:

Post a Comment