चंद्र *
चंद्र पहिला आला कानावर🎇
आई च्या अंगाई तुन,
दिसला मग तिच्याच कडेवर
मामा म्हटले बोबड्या शब्दातून,
तारुण्याच्या उंबरठ्यावर
मोहविले त्याच्या रूपातून,
शोधेल तो प्रियकराला
समजावले मी मनाला
चंदामामा झाला तो चंद्रमा,
शोधत राहिले प्रत्येक गाण्यातून,
भेटला जेव्हा चंद्र मला,
जागविले चैत्र यामिनी ला 🌕
बाळाच्या आगमनापूर्वीचे कौतुक
केले त्याच्याच साक्षीने,
चंद्रकोरीवर बसून अन हळूच लाजून
बाळ येता घरी आता
तो च माझा चंद्र झाला,
मामापासून सुरु झालेला चंद्राचा प्रवास मुलापाशी विसावला 😃
परत होईल तो सुरु नातवंडांसोबत
तो बघ चांदोमामा 😄
अर्चना कुलकर्णी, nasik
14/4/2020
" चंद्र "
चंद्र पहिला आला कानावर🎇
आई च्या अंगाई तुन,
दिसला मग तिच्याच कडेवर
मामा म्हटले बोबड्या शब्दातून,
तारुण्याच्या उंबरठ्यावर
मोहविले त्याच्या रूपातून,
शोधेल तो प्रियकराला
समजावले मी मनाला
चंदामामा झाला तो चंद्रमा,
शोधत राहिले प्रत्येक गाण्यातून,
भेटला जेव्हा चंद्र मला,
जागविले चैत्र यामिनी ला 🌕
बाळाच्या आगमनापूर्वीचे कौतुक
केले त्याच्याच साक्षीने,
चंद्रकोरीवर बसून अन हळूच लाजून
बाळ येता घरी आता
तो च माझा चंद्र झाला,
मामापासून सुरु झालेला चंद्राचा प्रवास मुलापाशी विसावला 😃
परत होईल तो सुरु नातवंडांसोबत
तो बघ चांदोमामा 😄
अर्चना कुलकर्णी, nasik
14/4/2020
" चंद्र "
No comments:
Post a Comment