विश्वास.....
अखेर तो दिवस उगवला, राजने नर्गिस ला चहाला बोलावले. खूप दिवस मनात चाललेल्या गोष्टी तिला सांगायच्या होत्या खूप काही बोलायचं होतं आणि शेवटी वळणाच्या वाटेवर असणाऱ्या चहाच्या दुकानात नेले, साधे दुकान तरी चहा अप्रतिम असतो अशी भलावण केली. नर्गिस तर बावरल्यासारखी वाटत होती. पूर्वीची उधारी दिल्याशिवाय चहा मिळणार नाही असे ऐकल्यावर राज गोंधळून गेला, पण आज दे मग मी उधारी देतो अशी गयावया करून चहा सांगितला . आज रोख दे, मागची उधारी नंतर असे म्हणत चहावाल्याने हो म्हटले. खिशात दोन आणे नसल्याने नर्गिसने दिले.चहा घेता घेता राजने आपली खरी परिस्थिती सांगितली. एकट्याच्या कमाईत
घर संसार कसे होणार? असे म्हणताच नर्गिसने एकाच्या नाही दोघांच्या कमाईत सर्व नीट होईल.
असे म्हणत खूप दिवस साठलेले मनातील प्रेम आज तिने त्याला सांगितले.. त्यानंतर शब्दांची गरज नव्हती..,.
तरीही राजचा विश्वास बसला नाही... ती म्हणाली खरंच राज मला तुझ्या सोबत आयुष्य घालवायचे आहे... एकमेकांच्या डोळ्यात जणू गुंतून गेली . आजन्म सोबत राहण्याचे विश्वासाने नाते जपण्याचे जणू एकमेकांना वचनही दिले.
अर्चना कुलकर्णी.
(राज कपूर व नर्गिस ह्यांच्या श्री 420 ह्यातील प्रसंगावर आधारित ललित )
No comments:
Post a Comment