जनता जनार्दन नसे झोपलेला
तो कधी सुस्तावलेला
कधी कर्जाच्या ओझ्याने दबलेला !
आश्वासनाने भुललेला
उरलेला वेळ घालवायला
हजारो चानेल्स दिमतीला !
पुन्हा हवा शिवा जन्मायला
जागृत करण्या ह्या जनतेला !
आजच्या जिजाऊत विझलेली ज्वाला
म्हणे शिवाजी येवो शेजारी जन्माला !
घराबाहेर जाता ती सांगे आपल्या चिमण्याला
दिसला कुठे गलबला ,किंवा कल्ला
न बोलता सरळ ये घराला
नाही तर तुज वर च होईल हल्ला !
असे वाढवले जर बाळाला
तो हि लागेल घोटाल्यातले शून्य मोजायला !
अर्चना
आज च्या एका स्टेटस वरून सुचले तसे .......
तो कधी सुस्तावलेला
कधी कर्जाच्या ओझ्याने दबलेला !
आश्वासनाने भुललेला
उरलेला वेळ घालवायला
हजारो चानेल्स दिमतीला !
पुन्हा हवा शिवा जन्मायला
जागृत करण्या ह्या जनतेला !
आजच्या जिजाऊत विझलेली ज्वाला
म्हणे शिवाजी येवो शेजारी जन्माला !
घराबाहेर जाता ती सांगे आपल्या चिमण्याला
दिसला कुठे गलबला ,किंवा कल्ला
न बोलता सरळ ये घराला
नाही तर तुज वर च होईल हल्ला !
असे वाढवले जर बाळाला
तो हि लागेल घोटाल्यातले शून्य मोजायला !
अर्चना
आज च्या एका स्टेटस वरून सुचले तसे .......
No comments:
Post a Comment