प्रथम दिनी आई भवानी आली लाल रंगात
आठव दिधली तुझ्या आहे मी रक्तात !१!
दुसरे दिनी माय रेणुका आली आकाशी रंगात
म्हणे मजसी माया आहे तुजवर आभाळागत !२
तृतीय दिनी गौरी माता आली पीत रंगात
घालून देत असे हळदीगत भक्तीची रीत जगात !३!
चौथे दिनी अन्नपूर्णा माउली प्रगटली हिरव्या रंगात
सांगे श्रद्धेने काम करता समृद्धीची होई बरसात !४!...
पंचम दिनी काली माँ अवतरली करड्या रंगात
विसरू नको प्रेमळ धरणीशी नाते ,सांगे कानात !५ !
सहावे दिनी जगतजननी अम्बा अवतरली केशरी रंगात
देण्या सर्वा आशिष, रहा सतत उत्सवी आनंदात !६!
सातवे दिनी शुभ्र वस्त्र लेवुनी आली सरस्वती स्वप्नात
सांगे बुद्धी अन पवित्र वाचा याने मान लाभे विश्वात ! ७ !
आठवे दिनी आई सप्तशृंगी प्रगटली गुलाबी रंगात
गावया अलौकिक ,सुमधुर ,पावन प्रीतीचे संगीत !८!
नववे दिनी लक्ष्मीमाता अवतरे जांभूळ रंगात
जिच्या प्रेमळ कृपेने जगती होई भरभराट ! ९ !
देवी माता रंगे नवरात्रीला नऊ रंगात
भक्तगण होई दंग तिच्या उपासनेत !१० !
देवीची अगाध महती जाणुनी आरती म्हणतात
सर्व दुखः -संकटे विसरुनी मनी हर्षतात !११ !
No comments:
Post a Comment