आठवणी -
मनात आज धरला आहे आठवणीनी फेर ,
त्यामुळेच मन आहे आज सैरभैर
कधी जवळच्या सखीगत हसवतात
तर कधी अनोळखी बनून फसवतात
भूतकाळातून वर्तमानात यायला नको म्हणतात
अन दिवसाचे तास त्यात च हरवतात....
खरोखर अशी जर मनाची स्थिती आपली बरेचदा होते . भूतकाळात च मन दंगून जाते .
प्रत्येक सणाला आपले मन FLASH BACK मध्ये जाते .लहानपणीची आठवण मन ताजेतवाने करून जाते . राष्ट्रीय सणांविषयी सुद्धा शालेय जीवनातल्या आठवणी असंख्य असतात . शिक्षकांच्या आठवणी निघाल्या की मन अगदी मोंटेसरीच्या वर्गात जावून बसते ....ते शाळा सोडेपर्यंत भेटलेले अनेक शिक्षक -शिक्षिकांच्या आठवणीत रममाण होते .पण मनाला एक वेगळाच आनंद, उत्साह देवून जाते .
सिनेमात FLASH BACK दाखवून आपले मनोरंजन केले जाते . त्यातला सर्वात माझ्या लक्षात राहिलेला FLASH BACK मैंने प्यार किया मधील कबुतराचा FLASH BACK . माझ्या मते कबुतराचा FLASH BACK असलेला तो एकमेव चित्रपट असेल.
आपल्या मनात कधी तरी कोणी सांगितलेले एखादे चांगले वाक्य किंवा घटना मनात घर करून राहते , ती आठवली कि पुन्हा नवीन जिद्द निर्माण होते .अशा आठवणीत अडकणे केव्हा हि चांगले ठरू शकते .
पण जेव्हा एखाद्याविषयी किंवा घटनेविषयी राग ,तिरस्कार निर्माण होवू शकतो ,तेव्हा तशा आठवणीत न गुंतता पटकन दुसरे काम हाती घ्यावे नाही तर तो ही दिवस आपला रहात नाही .कटू आठवणीपासून दूर राहावे .कटू आठवणीतून द्वेष ,तिरस्कार जास्त वाढीला लागतो .कॉम्पुटर प्रमाणे तिथे ही पटकन डिलीट मारून पुढे जावे .
सुखाच्या ,आनंदाच्या ,चांगल्या क्षणांच्या आठवणीच्या झुल्यावर बसून फिरून यावे , मन उत्साहाने कामाला सुरुवात करते, आपल्याबरोबर इतरांचे ही जीवन आनंदमय होते ....
अर्चना ...10 /10/2012 .
No comments:
Post a Comment